Ek Saitaani Ratra - 45 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 45

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 45

भाग 45



माने साहेब व नेमाडे साहेब , दोघेही त्या हैवानांची चाहूल लागताच शिताफीने दगडाच आडोसा घेऊन लपून बसले .

तीस मीटर अंतरावर छाती ईतक्या वाढलेल्या झुडपांत हालचाल झाली, आणी एकसाथ ती चार हैवान घोळक्याने बाहेर आली..


माने व नेमाडे दोघेही आश्चर्यकारक नजरेने समोर पाहत होते .

वीस मीटर अंतरावर , जिथे ती अघोरी विधी घडली होती - तिथे चार जण उभी होती.


तीन जण एकाच शरीरयष्टीचे होते -
आणी त्यांची चाल वानरासारखी होती.

मधला तो धिप्पाड देहाचा राका मात्र मांणसासारखा ताठ चालत होता.

चौघांच्याही अंगावर कपडे म्हंणून एक खाकी पेंट होती - बाकी वरच शरीर मात्र उघड होत.

चेहरा विद्रूप होता - घाणेरडा होता - चेटकीणीसारख होता... बटबटीत पिवळे- निळे कचकड्याचे डोळे, पातळसर त्वचा, चेटकी नाक, पिशाच्छी दात -!

" माय गॉड नेमाडे साहेब! काय आहे हे ? ना रूप आहे , ना धड आकार आहे! असं वाटतंय , की निसर्गामार्फत ह्यांच जन्म झालंच नाहीये.!"
माने साहेब बोलून गेले ..

' धप्प ' जमिनीवर काहीतरी आपटल्यासारखा आवाज झाला.

मग एक विव्हलण्याचा स्वर ऐकू आला .

" आह्ह्ह्ह्ह!" मानवाचा आवाज होता तो!

माने व नेमाडे साहेब दोघांनी पुन्हा समोर पाहिल..

त्या चौघांसमोर एक फोर्स मेंबर जमिनीवर पडला होता.

काहीवेळा अगोदर आडव्या दोरीला अडकून जे दोन जन पडले होते - त्यातलाच हा एक शिल्लक होता.. त्यालाच ही चौघ इथे पकडुन घेऊन आली होती.

" ह्याच ताज रक्त आणी मांस सर्वपित्याला अर्पन कराव लागेल..! तेव्हाच आपल्या सर्वपित्याला पुन्हा त्यांची शक्ति मिळेल..आणी ते पुर्ववत जागे होतील..!"
राका उच्चारला. त्याची कचकड्याची निलसर बुभळांची ती हिंस्त्र नजर त्या तिघांवरून फिरली.
ईं:थलाईवा मुद्दामून मेल्याच ढोंग करून जमिनिवर आडवे पडले होते.

डोळे जरासे अर्धवट उघडून चोर नजरेने समोर पाहत होते ..कानांनी त्यांचा चाललेला संवाद ऐकत होते.

नेमाडे साहेब माने साहेब दोघेही
ज्या दगडाच आडोसा घेऊन लपले होते.. त्या दोघांचे
मागेच हिरवी झुडपे होती-

नेमाडे साहेबांच्या पाठीला मच्छर चावल तसे त्यांनी पाठणावर हात मारला - आणी मागची झुडपे जराशी सळसळली..

राकाच्या कानांनी तो सळसळ आवाज ऐकला..
त्याची संशयी निळसर कचकड्याच्या बुभळांची नजर ह्या दोघांच्या दिशेने स्थिरावली..

जर त्या दोघांमधोमध ते काळशार पाषाणी दगड नसत तर ? केव्हाचंच ही दोघ मातीत मिसळली असती.

हळूच चालत तो - ती दोघ लपून बसलेल्या त्या कालशार दगडाच्या दिशेने जाऊ लागला..

दगडाला पाठ टेकवून माने साहेब - नेमाडे साहेब..मोठ मोठे श्वास भरत होते - डोळे विस्फारले होते - पुर्णत शरीर थरथरत होत..
घामाने ओलंचिंब झालं होत.

मागून पाचफुट दैत्यासारखा धिप्पाड देहाचा राका हळू हळू पुढे येत होता..

दगडापासून फक्त पाच पावळ शिल्लक होती..
त्याच्या पावळांनी चरचरणारा पानांचा आवाज छाती बदडवत होता..कानसुळे गरम करत होता..

तोच अचानक राका जागीच थांबला..
त्याने गर्रकन वळून खाली पाहिल..

राकाचा बलदंड पाऊल थलाईवांनी आपल्या हातांनी पकडलेल-

" हिरहिर्र्रहिर्र घुर्र्र्र्र्र्र..!" एखादा भुकेने व्याकूल झालेला श्वापद जस सावजाकडे पाहून गुरकावा ..तसा तो राका त्या निळ्सर कचकड्याच्या बुभलानी .. थलाईवांकडे पाहत गुरकला..

आणी पुढच्याक्षणाला..त्याने आपल्या बलदंड बाहूंची हालचाल केली-

थलाईवांच्या कपाळात अटकलेला बाण जोरात उपसून काढला..!

बाण बाहेर निघताच - थलाईवा मृत झाले..
कारण बाणाच्या पातीने मेंदूला ईजा पोहचवली होती..

राकाने एका हातात थलाईवांच प्रेत उचल्ल...
मान वाकडी केली- जबडा विचकला.. धारधार पिशाच्छी दात बाहेर काढुन - कचकन मानेचा एक चावा घेतला..!

मानेभवतालच अर्ध मांस राकाच्या तोंडात होत- तो
ते मावा खालल्यासारख चघळत होता..!

मग त्याने ते प्रेत अलगद सुकलेल्या काठीसारख समोर असलेल्या दगडाच्या दिशेने भिरकावल..
' धप्प!' आवाज करत प्रेत माने व नेमाडे साहेबांच्या पुढ्यात पडल..होत .

इं: थलाईवांची निर्जीव नजर ह्या दोघांकडेच पाहत होती-

तोंडाचा आवासला- जात जिभ बाहेर आलेली..
मानेभवतालच मांस ओरबाडल होत , त्यातून रक्ताची धार , जामिन ओल करुन गेली होती.

माने साहेब व नेमाडे साहेब दोघांनी एकमेकांकडे पाहिल..व हलकेच आवंढ़ा गिळला.
xxxxxx

"गूड..सर ! तुम्ही म्हंणालात ते अगदी खर आहे, एक्सट्रा प्लानची खरज गरज होती!"
सुर्यांशला रणदिवेंनी त्या दोन मेंबर्सला कोठे पाठवल होत , आणी का ? कश्यासाठी पाठ्वल होत ? हे सर्व सूर्यांशला थोडक्यात सांगितल होत.
आणी त्यालाही रणदिवेंच म्हंणन पटल होत..

" मग ! आता काय करायचं?"
सुर्यांशने उत्सुकतेने विचारल.

" आपल्याकडे रायफल आहेत, ईगल ने जस स्नाईपरिंग केल तसंच आपणही करायचं!"
रणदिवे म्हंटले.

" ओके , मग आपल्याला सर्वात आधी , झाडावर चढ़ाव लागेल - पोजीशन घ्यावी लागेल.!"
सुर्यांश सुद्धा आपली बुद्धी चालवत उच्चारला.

" ठीके, तुला ही रायफल चालवता येते.. तर !"
रणदिवेंनी विचारल.

त्यांच्या त्या वाक्यावर सुर्यांशच्या चेह-यावर बारा वाजले , बंदुकीचा तो थोबाडावर बसलेला , सनसनाटी आघात आठवला, आणी नाक ठणकल..

" हो ..!" सुर्यांशच्या तोंडून बायकी आवाज बाहेर पडला.

" हं?" न समजून रणदिवे म्हंणाले.

तसा सुर्यांशने घसा खाकरल..

" येते की, येते बंदुक चालवते , खुशाल दोन जण मारू शकतो मी!" सुर्यांश सपशेल फ़ेकत उच्चारला.


त्याच्या मनाला कोठेतरी भीती वाटली, की आपण नाही म्हंटलो आणि ह्या इन्सपेक्टरने ईगलसारखच आपल्या हातून बंदुक खेचून घेतली तर? - आणी ती केल्यासारखी बारीकशी बंदुक दिली तर?
त्या बंदूकीने त्या सैतानाना मारण तर सोडा साधी जखम सुद्धा होणार नव्हती, आणी समजा झालीच तर खरचटल्यासारखी होणार होती.

चेह-यावर उसणे अवसान आणत सुर्यांश रणदिवेंकडे पाहत होता -

" ठीके ऐक, तू ह्या झाडापासून , जरा बाजुच्या म्हंणजेच डाव्या बाजुच्या झाडावर पोजीशन घे ! आणि मी ह्या झाडावरून पोजिशन घेतो! ओके..?"

" ओके..!" सुर्यांशने ईगलची ए:डब्लु:एम हाती घेतली, आणी निघुन गेला.

" आणी तुम्ही दोघे!"
रणदिवेंसमोर दोन हेड कोंन्सटेब्लज उभे होते.
" इथे झुडपांच्यात पोजिशन घ्या. ! हव तर लपूनच बसा आणि , तुमच्याकडे तुमची सर्व्हिस
रिव्हॉलव्हर आहे ना ? "

" हो सर " ते दोघेही एकदाच उच्चरले.

" ओके ,गुड लक !" रणदिवेंनी ए:ड़ब्लू: एम तिला असलेल्या पट्टया मार्फत खांद्याला अडकवली..आणी झाडावर चढु लागले.

" चल..!" एक हेड कोंन्सटेबल आपल्या साथीदाराला म्हंटला.

आणी दोघेही जरा दूर बाजुच्याक वेगवेगळ्या झुडपांत दडून बसले.

xxxxxxxxxx
त्या चार जणांमधोमध तो फोर्स मेंबर जमिनीवर पडला होता .

ही चारही जण त्याच्याकडे पाहून विकृत हसत होती.

वेदना जराश्या कमी झाल्या तसा , त्या मांणसाने अवतीभवती पाहिल, डोळ्यांना गडद अंधारात प्रथम काही दिसल नाही, पण जशी नजर अंधाराला स्थिरावली..

तसे समोरच दृष्य अंधूक अंधूक का असेना दिसू लागल ...

समोर पाच फुट उंच काल्या कुट्ट अश्या उंच सावल्या उभ्या दिसल्या-

गडद कालिदास अंधारात त्यांच्या डोळ्यांची हिंस्त्र वखवखणारी बुभळे वेगवेगल्या छ्टेने लकाकत होती .

ते पिवळेजर्द, निळसर कचकड्याचे बुभळ- पाहता, उरात धडकी भरत होती- भीतीचे अंमळ अंगभर शहारा उमटवत आत घुसत होते .

" क..क..कोण आहात तुम्ही?मला का पकडलंय !" त्या मांणसाच्या तोंडून आवाज बाहेर आला. आवाजात भीतिचा कमालीचा अंश जाणवत होता.

त्याच हे प्रश्ण रुपी उच्चार येण साहजिकच होत.
कारण काहीवेळा अगोदर तो आपल्या साथीदारांसोबत धावत होता - मग पाय अडकून तो जमिनीवर खाली पडला , वेगाने खाली पडताच त्याची शुद्ध हरपली होती.

बंद डोळ्यांच्या काळ्या छायेत तरंगत असताना अचानक हवेतून खाली येऊन जमिनीवर आदळल्यासारख त्याला झाल ..आणी बेशुद्धीतून तो एकदमच शुद्धीवर आला..

अंग जरास ठणकत होत - मेंदू जरास जड लागत होत.. नजर आस्थिर होती..

मग काहीवेळाने
डोळ्यांना अंधाराचा सराव होताच हे विचीत्र राक्षसी सावल्यांचे अपरिचित आकार डोळ्यांना दिसले.

छातीत कशी कळ आली, नाडी जनरेटरसारखी धड धडू लागली..

मग भीतीने म्हंणा की आणखी काही, त्याच्या तोंडून थरथरता आवाज बाहेर पडला.

" आम्ही कोण आहोत , जाणुन घ्यायचं तूला?"
आवाजात छद्मी पणा होता. आसुरी थट्टा मस्करीने
कोणितरी बोलावा तस स्वर होता हा!

" होय..को ..को..कोण आहात तुम्ही.? आणी मला ईथे का आणलंय? माझे बाकीचे साथीदार कुठे आहेत!"

" तुझे साथीदार काय हिहिहिहिहिह!"
सुकाचा आवाज आला. मग तो खिदळत हसला..
त्याच्यासोबतच ते तिघेही जोक मारल्यासारख एकमेकांना टाळी देत हसू लागले..

राकामात्र वखवखल्या नजरेने एकटक
त्या फोर्स मेंबरकडे पाहत होता.

" एक एकाच काटा काढला आम्ही , असा फाडून खाल्ल्ं आम्ही तुझ्या साथीदारांना..! "
चामा गर्वाने म्हंटला. त्याने हातांची विशिष्ट प्रकारे
हालचाल केली.

" बस्स!" राकाचा मोठा आवाज आला .
" मज्जेसाठी दुसर सावज पाहू आपण, आधी ह्याच बळी देऊन , सर्वपित्याच्या शक्तिला बळ देण गरजेच आहे.!" राका चालत पुढे आला.

अंधारात त्याची धिप्पाड काली सावली - त्या मांणसाला आपल्या दिशेने पुढे पूढे येताना दिसत होती..
आणी त्याचे ते दोन जोड्यां चे निळसर कचकड्यांचे बुभळ अंधारात विषारी छटेने लकाकत होते.

राकाने धनुष्य काढुन हातात घेतला , भात्यातून
एक टोकदार पातीच बाण बाहेर काढल , तेच लवचिक दोरीला अडकवल..

त्या बाणाच्या पातीसमोरून जरा पुढे पाहता..
एक दगड दिसत होत - आणी त्या दगडाच्या एका बाजुने , जरास डोक बाहेर काढून माने साहेब हे थरार नाट्य उभ्या डोळ्यांनी पाहत होते..

तोच त्यांनी डोक मागे घेतल..
माने साहेब दगडाला टेकले होते - त्यांच्या हातात सर्व्हीस रिव्हॉलव्हर धरलेली होती.

" नेमाडे साहेब बस्स झाल आता , मी आणखी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सहका-यांचे जिव जातांना नाही पाहू शकत , तुम्हाला हव तर तुम्ही जाऊ शकता..!" माने साहेबांनी पुढे पाहिल..

समोर थलाईवांच प्रेत पडलेल..आणी त्याही पुढे एक जंगलातून बाहेर पडण्याची वाट होती.

राकाने बाण खाली जमिनीवर ठेवला आणि कमरेला खोवलेला धार धार पातीचा सुरा बाहेर काढला.

" आह्ह!" राकाच्या तोंडून गरजता स्वर बाहेर पडला..- तो मोठ्याने ओरडला..

त्याच्या हाताची हालचाल झाली- हाताच्या पंज्यातला सुरा वर हवेत गेला..

ईकडे दगडाआडून माने साहेन खाडकन उठले..
रिव्हॉलव्हर असलेला हात - समोर धरला गेला..होता..

तोच धाड आवाज करत गोळी सुटली..

" धाडssssss !"

क्रमश:




xxxxxxxxx