Ek Saitaani Ratra - 34 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 34

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 34

भाग ३४


मध्यरात्री 4:30 वाजता...
कालपाडा जंगल:









माने साहेब - नेमाडे साहेब दोघेही एकाच जागेवर उभे होते .





तस म्हंनायला जंगलातली मोठ मोठाली झाडे, आणि छातीपर्यंत वाढलेली झुडपे - त्यांच्यासोबत होतीच.





नेमाडे साहेबांनी हातात लोकेशन कैचर स्क्रीन पकडली होती.






हिरव्या रंगाची ती चौकोनी स्क्रीन, त्यावर एकूण बारा लाल रंगाचे लहानसर टीपके ,गोल वर्तुळाकारात उभे दिसत होते.





आणी हळू हळू ते लाल रंगाचे ठिपके जवळ आले जात वर्तुळ छोठ छोठा होत होता..





ह्याचा अर्थ असा की फोर्स मेंबर टार्गेटला विळखा घालत होते.



" फोर्स तार्गेटला विळखा घालतीये माने साहेब !"





नेमाडे साहेबांनी चिंतादायक नजरेने माने साहेबांकडे पाहिल.








माने साहेबांच्या चेह-यावर ही चिंता भीती दिसून येत होती.





नेमाडे साहेब आणि माने साहेब दोघांच्याही चेह-यावर पसरलेल्या त्या चिंता आणि काळजीच कारण काय होत ते तुम्हाला पुढे कळेलच !


या पाहूयात पुढे !


xxxxxxxxxxx


सर्व पोलिस फोर्स मेंबर्सनी गोल वर्तुळाकार तैयार केला होता.





आणी त्या आकारामधोमध म्हंणजेच सर्व पोलिस फोर्सच्या पुढ्यात तो काल्या मैक्सीतला आकार जमिनीवर ढोप्यांवर बसला होता.





छाती इतक्या वाढलेल्या झाडझुडपांमधून चालत पोलिस फोर्स पुढे येत होती.



दोन्ही हातांनी काल्या रंगाची यु:एम:पी 45 बंदूक पकडली होती-





बंदुकीची गोलसर नळी त्या काळ्याशार मैक्सीवरच्या आकारावर ताणली गेली होती.

सर्वाँची तर्जनी ट्रिगरवर ठेवलेली होती..





एक हूकूम ,आज्ञा मिळताच चारही बाजुंनी
जोरदार फायरींग सुरु होणार होती-

गोळ्यांच्या कव्हरसचा कचरा पडणार होता - फक्त एक हूकूम- एक आज्ञा बस्स , मग त्या काल्याशार मैक्सीतल्या आकाराचा खेळ खल्लास होणार .!



होणार होता ना?




पन ते इतक सोप्प होत का ?
काहीवेळा अगोदरच रेंचो उर्फ रघुभट्टने ईगलचा कसा काटा काढला होता ? आठवतंय ना?



पोलिस फोर्स त्या अमानविय कृत्यापासून पुर्णत अजाण होती....अनभिज्ञ होती.





पोलिस फोर्समध्ये एकून बारा मेंबर्स होते.

पाच सीनीयर कोंन्सटेबल्ज (हवालदार.


चार हेड कोंन्सटेबल्ज .(हवालदार





आणि दोन (एस:पी)सब इंन्सपेक्टर, आणी उर्वरीत फक्त एक थ्री स्टार पोलिस इंन्सपेक्टर
मृग्विजय थलाईवा, जे फोर्स संभाळत होते.


सर्व पोलिस फोर्स घटनास्थळावर पोहचली होती.

आणि समोरच ते दृष्य पाहून सर्वांच्या अंगावर एन थंडीत

सर्रकन काटा उभा राहिला होता.



सर्व फोर्स पुढे दहा पावलांवर

एक तांबडसर उफाळलेल्या आगीचा हवनकुंड जळत होता.


हवनकूंडाच्या वरच्या बाजूस मानवी शीर (डोक)ठेवल होत-

त्या मानवी शीरेचे डोळे सताड उघडे आपल्या सर्वांकड़ेच पाहत होते.


तोंडाचा आ-वासला जात दात, जीभ ,जराशी बाहेर आलेली,


आतली घशातली घंटा स्पष्ट दिसत होती.


प्रेताच्या शिरेचे ते विस्फारलेले डोळे- आणी उघड तोंड

मृत्यु आल तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतिल , हे

दिसून येत होत.


हवनकुंडाच्या खालच्या बाजूस एक मेलेल माकड ठेवल होत.

माकड म्हंणजे सहदेहासहित नव्हत हो! माकडाची फ़क्त सोळलेली कालिशार कातडी अंथरली होती .


आतल मांस तर त्या हवनकुंडात जळत होत. त्या तपकीरी आगीतुन
काळधुर-करपट वास घेऊन बाहेर पडत होत.


हवनकुंडाच्या डाव्या
बाजुला तांदळाच्या पिठाच्या सफेद चार बाहुल्या जमिनीवर झोपवल्या होत्या.

त्या प्रत्येक बाहुलीच्या अंगाला काला, लाल,पिवळा मिश्रित दोरा बांधलेला .


चेह्र-याच्या जागी ना आकार होत, ना उकार, ना घनआकार !


डोळ्यांच्या खोंबण्यांच्या जागी फ़क्त दोन कालेशारक लहानसर खड़े बसवले होते.


दोन्ही -हातांवर - आणि खाली दोन्ही पायांवर टाचण्या टोचल्या होत्या.


चारही बाहुल्यांच्या छातीवर एक बिबवा
ठेवलेला दिसत होता.


आणी एक गोष्ट म्हंणजे त्या पांढ-या बाहुल्यांवर
जरास रक्ताचे थेंब पडलेले दिसत होते.



हवन कुंडाच्या उज्व्या बाजुला एक गोळ सोनेरी थाली ठेवली होती -

त्यात काळसर ,हिरवा,पिवळा,भगवा अश्या रंगाचा बुक्का होता-

त्याच थाळीत चार लिंबू होते ,लिंबाला लाल -पिवळा मिश्रित धागा
गुंडाळलेला,आणि त्यालाही टाचण्या टोचल्या होत्या


हवनकूंडातली वाकडीतिकडी हेलकावे खाणा-या आगीच्या प्रकाशात हे भयाण दृष्य दिसत होत.


तिथे उपस्थीत प्रत्येक फोर्स मेंबर ही अघोरी, वामपंथी, करणीची विधी पाहुन भीतिने लटलट काफत होता.



" हेल्लो !" इं:थलाईवांनी आपला एक हात कानावर ठेवला.

कानावर हेडफोन होत -


ते ईगलशी संपर्क साधत होते.

पन दोन- मिनीट झाले होते ईगलच प्रतिऊत्तर काही केल्या येत नव्हत .

ज्याने इं: थलाईवा जरासे चींतींत झाले होते.



रेंचो उर्फ रघुभट्ट अद्याप जमिनीवरच बसला होता.




त्याच्या पुढ्यात अद्याप हवनकूंडातली आग जलत होती-





त्या हवनकूंडातल्या आगीचा प्रकाश अवतीभवती पसरला होता -






पोलिस फोर्सच्या मेंबर्सच्या घाबरलेल्या भेदरलेल्या, घामाने भिजलेला - ओल्या झालेल्या चेह-यांवर पडला होता.





अस समजू नका ,की रेंचोला उर्फ रघुभट्टला ह्या सर्वाँची चाहूल लागली नव्हती-






त्याला केव्हाचंच ह्या सर्वाँची उपस्थिती ईथे जाणवली होती-


मृतोक्ष्वरी सैतानी देवाने जरी त्याला श्राप दिला असला -

तरी श्रापानुसार तो अर्ध मानव आणी अर्ध आत्मा बनला होता.





पन त्याच्या शक्ति? त्या शक्तिला मात्र कसलीच ईजा ! कसलेच बंधन नव्हते .- तो तिला हवी तशी वापरू शकत होता.




रेंचोची पिवळेजर्द डोळे- त्यात दोन हिरवे लुकलूकते मीरी एवढे ठिपके , त्या हवनकूंडातल्या आगीला पाहत होते..


त्याची बुभलांची नजर केव्हा कशी बदलेल ते त्या ध्यानालाच ठावूक!





" हैलो ईगल..! ईगल.. तू आहेस का? तू ऐकतोयस का ? "


इं:थलाईवा बोलत होते.




ईगलच्या प्रेतासमोर सुर्यांश बसला होता..
ईगलच्या ग्लोव्हज घातलेल्या हातात वॉकी टॉकी मशीन होती-




त्यातून आवाज येत होते..-
सुर्यांशने पटकन वॉकी - टॉकी हाती घेतला..




" हेलॉ..!हेलॉ..!"


सुर्यांश घाईतच म्हंणाला.



" हेलॉ..ईगल?"




" नॉ आई एम सुर्यांश !"




" बळवंतेंचा मुलगा , सुर्यांश ? "




" होय बरोबर ओलखलत !"





" ओके ओके - सो सुर्यांश प्लीज मला ईगलशी बोलायचं आहे..! प्लीज माईक त्याच्याकडे दे..!"





ह्या वाक्यावर व सुर्यांशने खाली पाहिल - ईगलच उघड डोळ्यांच प्रेत त्याच्याकडेच पाहत होत -




त्या प्रेताच्या थंडगार नजरेला पाहताच सुर्यांशच्या सर्व अंगावर काटा उभा रहिला.




" सुर्यांश ..सुर्यांश ..!"


फोन मधून दोनदा आवाज आला त्या आवाजाने सुर्यांश भानावर आला.



" हे पहा...तू ..तू..तूम्ही ईगलशी बोलू शकत नाही..- ..क..क..कारण..!"



" कारण..? कारण काय? "

इं:थलाईवांनी विचारल


" क ..क..कारण..ई..ई..ईगल..म..म..मेलाय..!"




" व्हॉट..!"


इं:थलाईवा यांना एकदम धक्काच बसला.- त्यांच्या चेह-या हवनकूंडातल्या आगीचा तांबडसर प्रकाश पडला होता.


त्यातच ती विस्फारलेली नजर भयाण भासत होती

काहीवेळ शांतता पसरली..आणि मग अचानक त्या थंडगार शांततेत तो आवाज आला..

" ह..ह..ह..ही.ह..ही..!"



त्या त्रिकोणी टोपीआडून ते खसखसत्या स्वरातल चिरकस हसू बाहेर पडल.

जणू ते वाक्य रेंचोने ऐकल असावं.


सर्व फोर्स मेंबर्सच्या बंदुकी रेंचोवर ताणल्या होत्या .-






तरी सुद्धा ते ध्यान हसत होत ? त्या बंदुकीच्या गोळ्यांची त्याला भीती वाटत नव्हती का ?




तिथे उभा प्रत्येक जण ते खसखसत हसू ऐकून भ्यायला होता - ह्दयात काळीज फडफडत होत.


जो तो सुकलेल्या गळ्याने आवंढ़ा आत लोटत होता.



रघुभट्टने आपला एक हात हलकेच वर आणला.



हवनकूंडातली आग , सापासारखी बिन हवेच्या झोताने वाकडीतिकडी हेलकावे खाऊ लागली..


" माझी अठ्ठेचाळीस वर्षाची मेहनत , अशीच वाया घालवलीत ना तुम्ही..! "




हाताच्या पंज्याच्या जागी कंकाळ होत- त्या कंकाळच्या पंज्याची मधली तर्जनी हवनकूंडातल्या आगीला आपल्या इशा-यावर नाचवत होती.





" माझ्या भावाच जिव घेतल ना तुम्ही ?
हां! आता मी तुमचा जिव घेणार , हीहिहिहिहिहिहीहीहीह...! हवनकूंडातली...आग जो पर्यंत पेटतीयेना , तो पर्यंत पळा...जा जिथ जायचं तिथे जा..! पन एकदा की हा आग विझली..- की मंग तुमच्या डोळ्यांसमोर असं अंधार पसरेल , की पुन्हा कधीच प्रकाश पाहायला मिळणार नाही- हिहिह्हिह्हीह्ह्ज"



एखादी चेटकीन हसावी- तस ते ध्यान हसत होत.




उभ्या जंगलात त्या हसण्याचा भेसूर आवाज गुंजत होता.



तीन- चार हवालदारांनी तर पळ काढ़ायच सुद्धा ठरवल होत.




पन तोच इं:थलाईवांचा कण्खर भारदस्त आवाज आला.





" फोर्स..! ह्या वेड्याच ऐकू नका - हातात बंदुक आहे तुमच्या , आणी आपल्याकडे शुटहीमची पुर्णत ऑर्डर आहे - प्रत्येकाला माझ्याकडून फुल सुट समजून घ्या , आणी अक्खी मैग्जीन रिकामी करा ह्या हरामखोरावर , चाळण बनवा साल्याची..!"




" हिहिहिहिहिहीहीहीहीहीही."
इं:थलाईवा भारदस्त आवाजात आपल्या टीमला हिंमत देत होते .


तोच ते हसू आल.- ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती!





बारा यू:एम:पी अंगावर ताणल्या असतांनाही हा हसतोच कसा? हा प्रश्ण तिथे उप्स्थित सर्वाँना पडला होता.





एकाच वेळेस तीनशेच्या पुढे गोळ्या अंगावर बरसणार होत्या - अंगाची , हाडा ,मांसाची, पुर्णत शरीराची बारीक बारीक चाळणीसारखी हाळत होणार होती..आणी हा हसतोय ?



इं:थलाईवांचा क्रोध अनावर झाला.



" शट यू आर माऊथ मxxxफxxर..! "




इं:थलाईवांनी त्यांच्या हातात असलेली यू.एम.पी टू-एक्सकॉपसहित डोळयांसमोर धरली - आणि घशातला आवाज जरासाही न कमी करता, तितक्याच जोरात ओरडले.


" एटैकsssss..फक sss धिस... बिच..!"





क्रमश: ...