Maticha Sanshodhak - 1 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | मातीचा संशोधक - भाग 1

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

मातीचा संशोधक - भाग 1



संशोधक कादंबरी भाग १
अंकुश शिंगाडे

तो हिवाळा सुरु होता. थंडी वाजत होती. तसा कचरु आज अंथरुणावर खिळून बसला होता. सकाळ झाली होती. परंतु तो काही बाहेर पडत नव्हता अंथरुणाच्या. झोप पहाटेलाच उघडली होती. परंतु थंडीमुळं अंथरुणाच्या बाहेर पडावसं वाटत नव्हतं.
कचरु एक शेतकरी होता. दररोज तो शेतीवर जाण्यासाठी सकाळीच उठायचा. तशी अंघोळ न करताच तो शेताकडे निघायचा. शेत त्याचं जवळच होतं. तसा तो शेतात पोहोचताच प्रातःविधी आटोपवायचा. त्यानंतर तो घरी यायचा. घरी आल्यावर जेवनखावण करायचा व पुन्हा तो आपल्या दिवटीवर म्हणजे शेतात निघून जायचा. त्यानंतर तो सायंकाळ झाली व थोडा अंधार पडू लागला की शेतातून बाहेर पडायचा. असा त्याचा नित्य क्रम होता.
कचरु आज एक शेतकरी जरी असला तरी तो आधी एक शिक्षक होता. त्यानं शेती करण्यासाठी आपली नोकरी सोडली होती आणि आता तो शेतीवर काम करु लागला होता. तो शेती करीत होता. कारण त्याला सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सुखी करायचे होते. त्यांच्या आत्महत्या वाचवायच्या होत्या. त्यासाठीच तो शेती करुन संशोधन करणार होता.
कचरु जेव्हा लहान होता. तेव्हा शेतकऱ्यांचे होणारे हाल बघवत नव्हते. त्याच्या मालाला कवडीचीही किंमत नसायची. त्याच्या मालाची आणि त्याची अवहेलनाच केली जायची. त्याला हिन समजलं जायचं. एवढंच नाही तर त्याला आत्महत्या करण्यासाठी विवश केलं जायचं.
तो वातावरणीय परिणाम. अवकाळी पाऊस आणि गारांचाही पाऊस यायचा. तो वादळं घेवून यायचा आणि आल्यावर पिकांना नेस्तनाबूत करुन टाकायचा. पीकं कोलमडून जायची. तेव्हा प्रत्येक शेतकरी हळहळायचा. वाटायचं की हा अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस कशाला येत असेल? परंतु तो वातावरणीय बदलानं यायचाच.
अवकाळी पाऊस दरवर्षी नित्यनेमानं शेतकऱ्यांच्या भेटीला यायचाच. तसाच गारांचाही पाऊस यायचा व आपला परिणाम शेतकऱ्यांना दाखवून द्यायचा. जणू त्यांना आल्यावर असं वाटायचं की खरंच त्यांचं जमीनीशी नातं तर जुळलं नसावं? ती नाळ असल्यानं तो येत असावा असं वाटायचं लोकांना. परंतु त्या पावसाला रोकण्याची ताकद कोणात नव्हती व कोणीही अवकाळी पावसाला आणि गारांच्या पावसाला थांबवू शकत नव्हता. त्यातच कधीकधी जेव्हा गारांचा पाऊस यायचा. त्यावेळेस कोणी गावातील एखादा व्यक्ती काहीतरी मंत्र पुटपुटायचा व गारांचा पाऊस निघून गेल्यावर बालिशपणानं बडबडायचा की त्यानंच गारांचा पाऊस उधळून लावलेला आहे.
दरवर्षी येणारा हा पाऊस. त्यातच दरवर्षी होणारं हे नुकसान. ते पाहून त्यात शिरलेली अंधश्रद्धा. ती अंधश्रद्धा कचरु नेहमीच पाहात असे. तो चिकित्सक बुद्धीचा होता व त्याला वाटायचं की यावर आपण काहीतरी उपाय करावा. परंतु त्याला काही सूचत नव्हतं. तसा तो लहानच होता. मात्र त्यानं त्या बालिश वयातही थॉमस एडीसन, लुई पाश्चर, मायकेल फॅरेडेचं जीवनदर्शन वाचलं होतं. ते शिकले नव्हते. परंतु त्यांचं नाव आज जगात होतं. जग त्यांचं नाव अतिशय आदरानं घेत होते. त्याचं कारण होतं त्यांनी केलेलं संशोधन. तसं कचरुलाही वाटायला लागलं होतं की आपणही संशोधन करावं व शेतकऱ्यांना त्रास होत असलेल्या अवकाळी आणि गारांच्या पावसापासून शेतकऱ्यांना वाचवावं.
संशोधन वृत्ती, शिक्षण, त्यातच संशोधनाचा ध्यास घेवून जगत होता कचरु. हळूहळू तो मोठा झाला. परंतु त्याची जिज्ञासावृत्ती तेवढ्या प्रमाणात वाढली नव्हती. त्यामुळं त्याला संशोधन करायला बराच अवधी लागला होता. तसा तो लहानपणापासूनच प्रयोग करीत होता. परंतु त्याचे ते प्रयोग हमखास फसत असत व त्यावर त्याचे आईबाबाही रागवत असत.
प्रयोगाची जिद्द काही कचरुला स्वस्थ बसू देत नव्हती. तो लहानच होता तरीही. तसा तो लहानच असतांना त्याला शाळेत आव्हानात्मक शिक्षण शिकवलं जायचं. जिज्ञासा वाढायची व त्यावेळेस वाटायचं की आपणही संशोधन करावं. शेवटी ते त्याचं स्वप्नच ठरायचं आणि स्वप्नातच तो जगायचा.
मध्यंतरीचा काळ कचरुचा अतिशय वाईट अवस्थेत गेला होता. जीवनाच्या खेळात काटकसर करीत करीत त्याचं जीवन गेलं होतं. त्यामुळं त्याची प्रयोगी वृत्ती मागं पडली होती. तसे त्याचे लहानपणचे प्रयोग करणे आता बंद झाले होते व तो केव्हा लहानाचा मोठा झाला हे कळलंच नव्हतं. तसा काळ अतिशय सपाट्यानं ओसरला होता व आता कचरु मोठा होवून एका शाळेत शिक्षक म्हणून विराजमान झाला होता.

************************************************

कचरुचं नाव कचरु ठेवलं होतं त्याच्या मायबापानं. त्याचंही एक कारण होतं. ते म्हणजे त्याच्या मायबापाला बरीच मुलं झाली होती. परंतु साथीच्या येणाऱ्या रोगात ती वाचली नव्हती. काही मुलं वेगवेगळ्या आजारांनी मरण पावली होती. त्यातच आता अंतिम समयी देव देव करीत कचरुचा जन्म झाला व नाव ठेवायचा योग आला. तसं त्याच्या आईला तिची मरणारी मुलं आठवली व ती आपल्या पतीला म्हणाली,
"आपुन आपल्या पुर्वी मेलेल्या बाळांचं नाव चांगलं चांगलं ठिवलं होतं. परंतु ते वाचले नाईत."
"हो, ते कचऱ्यासारखे जन्माला आले. अन् कचरा जसा फेकून देतेत. तसे मरण बी पावले."
"हो, हे बी कचऱ्यासारखंच जनमाले आलं असन काहो?"
"आतं मी तरी का सांगू बा. ते समदं देवाच्या हातात हायती."
"हो नं."
"पण धनी नाव तं ठिवाच लागन नं."
"हो, ते बी बराबर हाये."
"का नाव ठेवून तं जी?"
"नाव.......नाव."
तो विचार करु लागला. तसं त्याला आठवलं व तो म्हणाला,
"कचरा. कचरु ठेवूया नाव आपण."
"कचरा! हे काय नाव झालंया?"
"हो. नावच की."
"पण धनी लोकं का म्हणतीन जी?"
"लोकाईचं का कराचं हाये. आपल्याले आवडलं नं. मग बाकीचे काई बी म्हणोत. आपल्याले त्याची लाज कायची? अन् तुनं बी पायलं का आजपर्यंतची आपली मुलं, कोणती मार जगली. तुले माईत हाये नाय का, किती चांगली चांगली नावं ठेवली होती आपुन. पण जगली का? आतं कचरा नाव ठेवून पावू. पावूया जगते का ते?"
"ते बी बराबर हाये. कचरा तं कचराच. नंतर बदलवता येईन."
"हो, ते बी खरं हाय."
त्या पतीपत्नीचं ते बोलणं. तसे ते बोलत असतांना कचरु नाव ठेवायचं ठरलं. तसं कचरु नाव ठेवण्यात आलं व त्याचं चांगलं संगोपन करण्यात आलं. आज कचरु लहानाचा मोठा झाला होता. शिक्षणाच्या संधी शोधत होता.
कचरुचा जन्म कचऱ्यासारखाच झाला होता. परंतु त्याचा जन्म जरी कचऱ्यासारखा झाला असला तरी त्याच्या वडीलानं त्याची फार काळजी घेतली होती.
कचरु लहानाचा मोठा होवू लागला होता. तसं त्याचं आता शाळेचं वय झालं होतं आणि आता तो शाळेत जावू लागला होता.
ती शाळा.......ती शाळा जि. परीषदची सरकारी शाळा होती. तसं पाहता त्याही काळात जि. परीषदच्या शाळेत शिकवणं म्हणजे मुलांचं आयुष्य वाया घालवणं असा लोकांचा समज होता. त्या काळात जि. परीषद शाळेत शिकवत होतेच. लोकांचा समज झाला होता की जि. परीषद शाळेत अजिबात शिकवीत नाहीत. त्यांचा कल कॉन्व्हेंट शाळेकडे जास्त होता.
जि. परीषद शाळा चालत नव्हत्या. कारण त्यांनी स्वतःला अपडेट केलं नव्हतं. अपडेट करण्याकडे त्यांचा कल नव्हता. ते स्वतःला अपडेट करु पाहात नव्हते. मात्र कॉन्व्हेंट शाळेनं स्वतःला अपडेट केलं होतं. तशीच कॉन्व्हेंट शाळा मुलांचा अपडेट स्तरावर विकास करीत होत्या. म्हणूनच कॉन्व्हेंट शाळा चालत होत्या. कचरुनं शाळेत नाव टाकलं. तसा काही काळ कचरुला ती शाळा अपडेट नसल्यानं आवडत नव्हती. कारण शाळेत शिकविलं जाणारं तंत्रज्ञान हे कंटाळवाणं वाटत होतं. एरवी त्या शिकविण्यात कंटाळवाणेपणाच असायचा.
जि. परीषद शाळेतही शिक्षण होतं कॉन्व्हेंटसारखंच. परंतु त्या शाळेतील शिक्षक जुन्याच शिकविण्याच्या पद्धतीनं शिकवीत होते. शिक्षकांना आनंददायी पद्धतीनं कसं शिकवावं हे माहीत नव्हतं. त्यामुळंच त्यांनी जुन्याच पारंपारीक पद्धतीनं शिकवणं सुरु ठेवलं होतं. म्हणूनच आज जिल्हा परीषद शाळेत मुलं टिकत नव्हती व जास्त मुलं नव्हती.
कचरुला न आवडणारं शिक्षण. अशातच नवीन अभ्यासक्रम आला व सर्वप्रथम शाळा स्तरावर बदलाव झाला. कचरुच्या शाळेतील एक शिक्षक वेगळंच काही करीत होता. जणू तो अपडेट झाला असल्याचं वाटत होतं. तो आता शिकवीत नव्हता. फक्त मार्गदर्शन करीत होता.

************************************************

अलिकडे काळ बदलला आहे. बदलत आहे. अशा काळात नवनवीन गोष्टी देशात येवू घातलेल्या आहेत. येत आहेत. नवीन तंत्रज्ञानही येत आहे. अशा बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. त्यालाच अपडेट होणं म्हणता येईल. ज्याला असं अपडेट होणं जमत नसेल, त्यानं मेलेलं बरं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
शिक्षकाची नोकरी. अलिकडे सर्वांना शिक्षकाच्या नोकरीचा वीट आलेला दिसतोय. ती कराविशी वाटत नाही. त्याचं कारण आहे त्याला असणारी अशैक्षणिक कामं. त्यातच प्रशिक्षणाचीही रेलचेल असते.
आजवर आपण पाहिलं की शिक्षकासाठीच नाही तर जगातील सर्वच बाबींसाठी सरकारनं लोकांना प्रशिक्षीत केलं. त्याला इंग्रजीत मिटींग आणि मराठीत सभा असं नाव दिलं. कोणतेही प्रशिक्षण यातूनच साकार झालं. शिवाय या माध्यमातून प्रशिक्षण साकार होत असतांना त्यात चहापाण्याची भर घातली गेली व हा चहापानाचा खर्च अधिकारी वर्गानं आपल्या खिशातून काढला नाही तर तो शासनाच्या तिजोरीत टाकला व शासनानंही तो खर्च स्वतः केला नाही तर तो जनतेच्या खिशात टाकला असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण जनताच सरकारचा खर्च उचलते आपल्या खिशातून कोण्या ना कोण्या बाबींतून कर भरुन. मात्र यात सरकारच्या या सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होते हे न सांगायला नको. तसं पाहिल्यास आजपर्यंत आलेली प्रशिक्षणं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर महत्वाची नव्हतीच.
निपुण भारत योजना. ही सरकारची योजना आहे व ती साकार करणं हाच सरकारचा उद्देश आहे. कारण त्यातून एक व्यक्ती नाही तर गावं न् गाव निपुण बनणार आहे. एक गावंच नाही तर शहर, राज्य व देशही निपुण बनणार आहे. मग जग बनो की न बनो. ते बनवीत असतांना सरकारसमोर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीचं उदाहरण आहे की ज्या जपानच्या या दोन्ही संपन्न शहरावर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकल्या गेला. तेव्हा संपुर्ण जपान बेचिराख झालं. तसेच तिथं भुकंपाचे कधीमधी धक्केही लागतात. त्यातही जपान बेचिराख होतं. असं असतांना आजही हा जपान देश अलीकडील काळात संपन्न देश म्हणून ओळखला जातो. त्याचा अभ्यास केला सरकारनं व ठरवलं की आपल्या या देशाला सक्षम बनवायचं. त्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायचं. मग ते जर करायचं असेल तर काय करायला हवं? असा विचार करुन सरकारनं निपुण भारत योजना आणली.
निपुण भारत योजना. ती आणताच ती कार्यान्वीत कशी करता येईल याचा विचार झाला. त्यासाठी ती राबवणे गरजेचे. परंतु राबविण्याच्या त्या गोष्टी मोठ्या व्यक्तीला सांगीतल्यास तो व्यक्ती ऐकेल काय की चालढकल करेल? हाही एक प्रश्न पडला आहे. त्यानंतर सरकारनं विचार केला की याला लायक कोण? तसा विचार करताच त्यांच्या डोळ्यासमोर आला शिक्षक व शिक्षणक्षेत्र. कारण शिक्षक हा इमानदार व अतिशय मेहनत घेणारा. मग आठवलं की हे तंत्रज्ञान बालपणापासूनच शिकवायला हवं. तरंच देश निपुण होईल. मग काय, तेथूनच सुरुवात करायची सरकारनं ठरवलं व सरकारनं निपुण भारतचं हत्यार शिक्षणक्षेत्रापुढं टाकलं व सांगीतलं की याचा वापर करायचा आहे. मग तो कसा करायचा ते पाहा. प्रशिक्षणं द्या. नाहीतर अजुन काही करा. फक्त देश निपुण बनायला हवा. नाहीतर तुमची काही खैर नाही. शेवटी त्यानंतर शिक्षणक्षेत्रानं निर्णय घेतला की आता काही बरं नाही. आता आपण शिक्षकांच्या माथी निपुण भारतची योजना टाकायला हवी. तेच खऱ्या अर्थानं इंद्रधनुष्य पेलवणारे असतात.
शिक्षणक्षेत्र.......त्यांनी तसं ठरवताच अभ्यासक्रम तयार केल्या गेला. त्या अभ्यासक्रमात नवनवीन गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. त्यानंतर तो अभ्यासक्रम राबविण्यासाठी शिक्षकाला प्रशिक्षण देण्यासाठी बोलावलं गेलं व नेहमीच्या प्रशिक्षणासारखं हेही एक प्रशिक्षण समजून शिक्षक नावाचा प्राणी उपस्थीत झाला तोही नेहमीप्रमाणेच. चालढकल करुन प्रशिक्षण पुर्ण करावं असा त्यांचा विचार होताच. परंतु नाही.
ही प्रशिक्षणं इतर प्रशिक्षणासारखी नव्हती. कारण यात सुरुवातीलाच शिक्षकांनी ऐकलं की आता शिकवायचं अजिबात नाही. त्यामुळंच शिक्षकांना ते प्रशिक्षण आवडलं. कारण कोणतीही गोष्ट करु नका म्हटलं तर त्या गोष्टीत कोणीही जास्त लक्ष जसं घालतो. तेच या निपुण भारत प्रशिक्षण देतांना घडलं.
निपुण भारत प्रशिक्षण चांगल्यासाठी आहे. ते प्रत्येकानं घ्यावं. शिक्षकानंच नाही तर पालकांनीही घ्यावं. तसं पाहिल्यास ती आजची गरज आहे. शिवाय याबाबतीत काही व्हिडीओ यु ट्युबवर अपलोड आहेत. फक्त आपल्याला यु ट्युबवर निपुण भारत असं टाईप करुन विषय टाकायचे आहेत. आपोआपच साईट खुलेल. थोडा नेट कव्हरेज असावा. त्यात आपल्याला निपुण भारत योजनेत काय काय करता येईल. त्याची इत्यंभूत माहिती आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास निपुण भारत ही सरकारची योजना अतिशय सुंदर असून देश कसा विकसीत करायचा याची ही योजना आहे. त्याची प्रशिक्षणही चांगली आहेत. शिक्षकांसाठी तर ही योजना अतिशय सुंदर योजना आहे. त्यातच भविष्यवेधी शिक्षण अभ्यासक्रमही शिक्षकांसाठी चांगला आहे. मात्र ते भविष्यवेधी शिक्षण कसं विद्यार्थ्यांना देता येईल? त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक. ते युट्यूबच्या माध्यमातून मिळू शकतं. तसं पाहता सर्वांना अपडेट होण्याची गरज आहे. जसं व्हाट्सअप, फेसबुक वा इतर ॲप आपण अपडेट करतो तसे. बदलाव गरजेचा. ज्यात बदलाव होत नसेल. तो नष्ट होतो. त्याची गरज संपते. निपुण भारत वा भविष्यवेधी शिक्षण हेच सांगतं की स्वतःला अपडेट करा. मगच तुम्ही जगाच्या स्पर्धेत टिकाल. नाहीतर तुमचा या जगात असण्याचा काहीही अधिकार नाही. त्यापेक्षा तुम्ही मेलेले बरे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
कचरुच्या शाळेत शिकविणारा तो शिक्षक आता विद्यार्थ्यांना काहीच शिकवीत नव्हता. तो फक्त मुलांना आव्हान द्यायचा. म्हणायचा की हे तुम्हाला करताच येत नाही. मग जिद्द चढायची. वाटायचं की आपल्याला काहीच करता येत नाही असं शिक्षक का म्हणतात. मग हुरुप चढायचा कचरुला व कचरु नव्या उमेदीनं त्या गोष्टी करायचा. त्यातच इतर मुलंही.
कधीकधी त्या शिक्षकाला काय वाटायचं माहीत नाही. तो शिक्षक चांगलं काम केल्यावर सेल्फीही घ्यायचा व ती सेल्फी स्वरुपात काढलेली फोटो व्हाट्सअप ग्रुपवर पाठवायचा. कधीकधी स्टेटसवर. तो कचरुच्या वडीलांना जायचा व त्या अल्प प्रमाणात शिकलेल्या वडीलांना अतिशय आनंद व्हायचा व बिचारा कचरुचा बाप आपल्या मुलांबद्दल त्याला चांगलं वाटताच तो त्या सेल्फी फोटोचा फोटो आपल्या डीपीवर ठेवायचा. अशाप्रकारे कचरुचा विकास होत चालला होता. नवीन अभ्यासक्रमानुसार कचरु त्या नवीन शिक्षकाच्या शिकविण्यानं भारावून गेला होता. त्याच्यात जिज्ञासावृत्ती वाढीस लागली होती. त्यामुळंच कचरु त्या शिक्षकांच्या कोणत्याही आव्हानाला स्विकार करीत असे व त्याच आव्हानाच्या भरवशावर कचरु आता जिल्हा परीषद शाळेत घडत चालला होता. नवनवीन प्रयोगही तो करु पाहात होता.
आज स्पर्धेचा काळ होता. या स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर आव्हानानुसार शिकावे लागत होते. त्यातच तसं आव्हान स्विकारुन स्वतःला सिद्ध करावे लागत होते.
सरकारी शाळा ज्या आतापर्यंत ओस पडल्या होत्या. त्या शाळा आता चालायला लागल्या होत्या. कारण होतं प्रेरीत झालेले विद्यार्थी व त्यांच्यात निर्माण झालेली जिज्ञासावृत्ती.
काळ बदलत चालला होता. तसे कचरुच्या वर्गातील विद्यार्थी प्रयोग करु लागले होते. ते कृतीशील बनले होते व आता ते अगदी प्रयोग करण्यात वा अभ्यास करण्यात गर्क होवून जात होते. त्यांच्या शाळेतील अभ्यासाच्या वेळा जरी ठरल्या असल्या तरी ते अभ्यास करतांना त्यांचा वेळ कसा जातो हेही त्यांना आता कळत नव्हतं. तसं पाहता शासनानं जो अभ्यासक्रम बनवला होता. तो विशेष असा अभ्यासक्रम होता आणि तो अभ्यासक्रम सरकारी शाळेची जी ओस पडलेली स्थिती होती. ती स्थिती दूर करण्यासाठीच बनवला होता. तसं पाहता सरकारी शाळेत आज पटसंख्या कमी झालेली होती. ती शासनाला वाढवायची होती. त्यासाठीच सरकारनं असल्या प्रकारचा अभ्यासक्रम आखला होता. तसाच विद्यार्थ्यांना त्रास होतो म्हणून सरकारनं विद्यार्थ्यांच्या पुस्तकाचेही ओझे कमी केले होते. शिवाय त्यांना खाद्य म्हणून सरकारनं खिचडी देखील सुरु केली होती व अंडी व केळीची योजनाही शाळेत सकस आहार म्हणून सुरु केली होती. तरीही लोकं कॉन्व्हेंटलाच जात होते.

************************************************

अलिकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळंच ते कोणत्याही माध्यमातून का मिळेना. लोकं आपल्या पाल्यांना शिकवू लागले आहेत. त्यातच हा काळ स्पर्धेचा आहे व तो काळ स्पर्धेचा असल्यानं मुलांना दर्जेदार शिक्षण हवं आहे व असं दर्जेदार शिक्षण हे कॉन्व्हेंटलाच मिळतं असा कयास पालकांचा असल्यानं पालक वर्ग आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटला टाकत आहेत.
दर्जेदार शिक्षण म्हणजे अपडेट झालेलं शिक्षण. ज्याला भविष्यवेधी शिक्षण असं देखील म्हणता येईल. परंतु ते शिक्षण विद्यार्थ्यांचा जीव घेते की काय? अशी भीती आज प्रत्येक पालकांच्या मनात होवू घातली आहे. त्याला कारणंही तसंच आहे. ते कारण म्हणजे दप्तराचं ओझं व दुसरं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक देत असलेला अभ्यास. तो अभ्यास करतांना मुलं एवढी गुंतून जातात की त्यांना झोप येते तरी ते झोपत नाहीत. तसाच एक धाक विद्यार्थ्यात शाळेचा दिसून येत आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी अशाच एका जागणाऱ्या एका मुलीला विचारलं असता ती म्हणाली,
"सर, काय करु. मॅडम छडी मारतात. जर हा उपक्रम नाही केला तर........." त्याबाबत दुसरी मुलगी म्हणाली,
"सर जागावेच लागेल. कारण मी जागले नाही व उपक्रम पुर्ण केला नाही तर दुसऱ्याच मुलीचा पहिला क्रमांक येईल."
अभ्यासक्रम व उपक्रम छान होते. तसे रोजच उपक्रम येत होते त्या दोन्ही मुलींना आणि दोन्ही मुली जागत होत्या दररोजच. त्यातच आरोग्याच्या संबंधी कुरकुर दररोजच होत होती. तसे मायबापही परेशानच होत होते. परंतु त्यांनाही भीती होती की तशी तक्रार शाळेला केल्यास शाळा त्या मुलींना शाळेतून काढून तर टाकणार नाही.
विशेष म्हणजे ती गोष्ट वाखाखण्याजोगी नव्हती. उपक्रम चांगला होता. परंतु तो राबवीत असतांना अजुनही छडीचा धाक गेलेला नाही असं त्या एका मुलीवरुन दिसून आलं. तर दुसऱ्या मुलीवरुन तिची स्पर्धा दिसत होती. परंतु यात दोन्ही मुलींचं होणारं नुकसान साहजीकच दिसत होतं.
अलिकडील काळात दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली शिक्षकानं काहीही शिकवू नये व फक्त मार्गदर्शन करायचं हेच ठरलं. त्यात विद्यार्थ्यांना प्रेरीत करायचं, आव्हान द्यायचं, जिज्ञासुवृत्ती वाढवायची. तसा अभ्यासक्रम शासनानं ठरवला व त्याच अभ्यासक्रमावर आधारीत शिक्षणाची व्याख्या करुन तो अभ्यासक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. तसं पाहता असा अभ्यासक्रम राबवीत असतांना शासनानं खाजगी शाळेला परवानग्या दिल्या. तसेच जि. परीषद शाळा व खाजगी शाळा यात स्पर्धा लावल्या. तुमच्यात ताकद आहे तर मुलं टिकवून दाखवा.
शासनानं शाळेबाबत स्पर्धा लावल्या की त्यांनी आपल्या शाळेत मुलं टिकवावी. मग या स्पर्धेत कॉन्व्हेंटच्या शाळा टिकल्या. कारण ते अपडेट धोरणानं वागत गेली. तशा जि. परीषद शाळा अपडेट धोरणानं वागत नव्हत्या. कारण त्यांना अपडेट धोरण म्हणजे काय? हेच माहीत नव्हतं. जे कॉन्व्हेंटला माहीत होतं.
काळ हळूहळू पालटत होता. मुलांचा कमी वयात शाळेत प्रवेश सुरु झाला. पुर्वी हात कानाला पुरल्याशिवाय शाळेत मुल दाखल होत नव्हते. आता शाळेतील मुल दाखल करतांना कानाला हातच पुरवावा लागत नाही. कमी वयातच शाळेतील नाव दाखल होतं. त्यातच आजच्या काळात दहावीत दाखल होणारे विद्यार्थी हे कमी वयाचेच असतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
आजचा काळ पाहता वाढती इयत्ता, तसंच कमी होत गेलेलं वय. त्यातच वाढता अभ्यासक्रम विचारात घेवून शासनानं अभ्यासक्रम तयार केला. त्यामुळंच साहजीकच पाठ्यपुस्तकात जास्त अभ्यासक्रम केंद्रीत झाला. त्यानंतर जो अभ्यासक्रम तयार झाला. त्या आधारावर पाठ्यपुस्तकं तयार झालीत. जी पाठ्यपुस्तकं आजच्या काळात विद्यार्थ्यांना वाहायला जड झाली. दप्तराचे ओझे वाढले व त्यानं विद्यार्थ्यांचे खांदे दुखायला लागलेत.
विद्यार्थ्यांचे खांदे दुखणे पाहता वाढलेल्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारनं पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाचे चार भाग बनवले व त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करणे सुरु केले. एक पुस्तक दोन ते तीन महिन्यासाठी द्यायचं ठरलं व एकाच पाठ्यपुस्तकात सर्वच विषयाचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु ही बाब केली शासनानं जि. परीषद शाळेतील विद्यार्थ्यांबाबत. कॉन्व्हेंटच्या मुलांबाबत केली नाही. त्यामुळंच साहजीकच आजही कॉन्व्हेंटची मुलं दप्तराचे ओझे वाहात आहेत. त्यानं विद्यार्थ्यांचे खांदेही दुखतात तर शाळेतील विद्यार्थ्यांना चढायला उतरायला लिफ्टची व्यवस्था नसल्यानं ते चढतांना विद्यार्थ्यांचे पाय दुखायला लागले. तसंच नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन नवीन उपक्रम अशा कॉन्व्हेंटच्या शाळा घेत असल्यानं मुलं ते उपक्रम पुर्ण करण्यासाठी रात्र रात्र राबत आहेत. त्यातच त्यांची झोपमोड होत आहे व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसंच आता हाच अभ्यासक्रम नवीन भविष्यवेधी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आला असून हा नवीन येणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा जीव घेणार की काय? याबाबत शंका आहे. कारण हा अभ्यासक्रम त्याच धर्तीवर आधारीत आहे. या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक प्रेरीत करणार आहेत. जिज्ञासा वाढवणार आहेत व आव्हान देणार आहेत. यानुसार विद्यार्थी जर एखाद्या विषयासाठी प्रेरीत झाले आणि त्यांची जिज्ञासुवृत्ती वाढली आणि एखाद्या विषयाबद्दल त्यांनी आव्हान स्विकारलं, तर ती रात्र रात्र जागतीलच. यात शंका नाही. कारण ते आव्हान केव्हा केव्हा व कसं कसं पुर्ण करता येईल याचा विचार ते करणार आहेत. तसे आव्हान पुर्ण करण्यासाठी ते प्रेरीत झालेले असणार. ज्यातून पुरेशी झोप होवू शकणार नाही व त्याचा आरोग्यावर परिणाम होवून शकेल ही संभावना नाकारताही येत नाही.
महत्वाचं म्हणजे नवीन भविष्यवेधी अभ्यासक्रम तयार केल्या गेला. ही आनंददायी बाब आहे. त्याचा उहापोह नाही. तसं पाहिल्यास प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. पहिली बाजू आनंददायी असते तर दुसरी बाजू दुःखानंही भरलेली असते. पहिल्या बाजूनुसार परिणाम हा चांगलाच निघू शकतो तर दुसऱ्या बाजूनुसार त्याचा परिणाम हा वाईटही निघू शकतो. त्यामुळंच त्याचा परिणाम जर चांगला निघत असेल तर त्याचा पुरस्कार करण्याची गरज नाही. कारण ते शासनाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा परिणाम जर वाईट निघाला तर त्याला दोष देण्याचा अधिकारही कुणाला नाही. कारण बदलत्या काळानुसार वेगवेगळे प्रयोग करण्याचा अधिकार सरकारला आहे. तसा प्रयोग जर शासन करीत नसेल तर त्याला शासन म्हणता येणार नाही. शासनानं असा अभ्यासक्रम आणला, त्याचं स्वागतच आहे. कारण अभ्यासक्रम चांगला आहे व विद्यार्थ्यांची बुद्धीमत्ता व बौद्धिक पातळी वाढविणारा आहे. मात्र शासनानं हे धोरण राबवतांना एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे विद्यार्थ्यांची कुवत. त्या कुवतीनुसार आव्हानात मर्यादा पाडावी व विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार त्याला जेवढे झेपेल. तेवढेच आव्हान देणारा अभ्यासक्रम राबवावा. त्यात वेळेचं बंधन घालावं. तशीच अभ्यासक्रमाची आखणी करावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना रात्र रात्र जागावी लागणार नाही. तसाच त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम होणार नाही व विद्यार्थ्यांचा जीव जाणार नाही. तशीच पावलं शासनानं उचलायला हवीत म्हणजे पावलं.

*****************************************

ती जि. परीषद शाळा. आता ना तिथं खांद्यावर दप्तराचं ओझं होतं. ना कुणाचे खांदे दुखत होते. ना वरच्या मजल्यावर जावं लागत होतं, ना पाय दुखत होते कुणाचे. ना चिमुकल्या मुलांना शाळेत जावं लागत होतं. ना मोठ्यांवर अभ्यासाचं टेंशन. सगळे भयमुक्त वातावरणात अभ्यास करीत होते. शिवाय जेवायलाही मध्यान्हं जेवन मदतीला होतं. त्यातच त्या जेवणात अंडी आणि आता केळीही सोबतीला होती. विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसीक व सर्वतोपरी विकास करण्याकडे जि. परीषद शाळेचा कल होता. त्या शाळेत आज कॉन्व्हेंटपेक्षा जास्त उपक्रम राबवले जात होते. परंतु तरीही लोकांचा ओंढा कॉन्व्हेंटकडेच जास्त होता. त्याचं कारण होतं बालकांची सुरक्षा.
अलिकडील काळात बालकांच्या सुरक्षेला जास्त महत्व आहे. बालगुन्हेगारी ही वाढतच चालली आहे. ज्याची सुरुवात वयाच्या अगदी लहानपणापासूनच होते.
मुलं लहान असतात. अगदी दोन तीन वर्षाची. त्यावेळेस त्या मुलांसमोर मायबाप घरी भांडत असतात. एकमेकांना शिव्याही देत असतात. त्यांना वाटत असते की माझं मुलांसमोर लहान आहे. त्याला काहीच कळत नाही अन् काही कळणारही नाही. तसं पाहता त्याचं वय लहान असतं. त्यामुळं त्याला काही कळतही नाही. परंतु तो आपला भ्रम असतो. त्याही वयात त्याला कळत असतं.
वरील बाबतीत अशीही एक म्हण आहे की दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. ते अगदी खरं आहे. मुलांचा विकास हा गर्भ जेव्हा शरीरात राहतो. तेव्हापासूनच होत असतो. त्या गर्भात बाळावर जसे संस्कार पडतात. तसा बाळ निपजतो. ती आई बाळ नऊ महिने पोटात असेपर्यंत जो जो आणि जसा जसा विचार करते, तसतसे गुण बाळाच्या अंगात उतरत असतात. याला गर्भसंस्कार असे देखील म्हणता येईल. तसं पाहिल्यास हे गर्भसंस्कार अतिशय महत्वाचे असे संस्कार असतात. याचाच अर्थ असा की जर या नऊ महिन्यात चांगले संस्कार जर त्या बाळाच्या गर्भावर झाले तर त्या मुलाला पुढील जन्मानंतरच्या आयुष्यात कितीही वाईट संस्कार झाले तरी त्याचा परिणाम बाळावर होत नाही. म्हणूनच भरणपोषण करतांना बाळ गर्भात राहतो. तेव्हाच खऱ्या अर्थानं चांगलं पोषण करण्याची गरज आहे. तद्वतच बाळ गर्भात असतांना त्यांच्या चांगुलपणासाठी असे गर्भसंस्कार शिबीरं आयोजीत करण्याची गरज आहे. परंतु त्या गोष्टीला कोणीच प्रमाण मानत नाहीत व कोणीच तसे गर्भसंस्कार आजच्या काळात तरी आयोजीत करीत नाहीत. उदा द्यायचं झाल्यास आपल्याच पुराणकथेतील भक्त प्रल्हादाचं देता येईल की ज्यावेळेस कयाधू गर्भावस्थेत होती, तेव्हा देव व दानवाचं युद्ध झालं. त्यात देवांनी काकूला पळवून नेलं व पळवून नेवून तिच्यावर संस्कार केले. परंतु त्यावेळेस तिच्यावर काहीच संस्कार झाले नाहीत. मात्र तिच्या गर्भातील बाळावर ते संस्कार झाले व ते बाळ त्यालायक जन्मास आलं. पुढं कयाधू जेव्हा दानव राज्यात आली आणि तिनं बाळाला जेव्हा जन्मास घातलं. तेव्हा बाळ थोडंसं मोठं झाल्यावर त्याला शिकविण्याचा प्रयत्न केल्या गेला. तेव्हा बाळ भक्त प्रल्हाद दानववृत्तीच्या गोष्टी शिकत नव्हता तर तो त्यांनाच शिकवून जायचा. याचं कारण काय असावं? तर ते गर्भात झालेले संस्कारच होय. तसेच संस्कार झाले होते अभिमन्यूवरही. त्यानं तर चक्कं चक्रव्यूह भेदण्याचं ज्ञान प्राप्त केलं होतं गर्भात.
महत्वाचं म्हणजे गर्भातही संस्कार होतात. त्या मुलांना चांगलं बनवायचं असेल तर..... गर्भसंस्कार महत्वाचेच. त्यातच जन्मानंतरचे पाच सहा वर्ष मुल शाळेत जाईपर्यंत त्या बालकाचा विकास होणे महत्वाचे. परंतु अलिकडील काळात या बाबी कोणीच लक्षात घेत नाहीत. तसं पाहता अलिकडील काळातील महागाईची झळ पती पत्नी, या दोघांनाही पडल्यामुळं त्यातच पैशाला अलिकडील काळात महत्व प्राप्त असल्यामुळं पैसा कमविण्याच्या अलिकडील काळात जणू स्पर्धाच लागल्या आहेत. त्याचाच परिणाम मुलांवर होत आहे. मुलांना त्यांच्यावर संस्कार होण्याच्या उमेदीच्या काळात आपण पैसा कमविण्याच्या हव्यासानं पती पत्नी म्हणून आपले कर्तव्य असतांना आपण कामाला जातो. मुलांवर विशेष असं लक्ष नसतंच आपलं. मग आपण मुलांवर संस्कार करण्यासाठी काय करतो? तसा पैसा असतोच आपल्याजवळ. त्या पैशाच्या भरवशावर मुलांना त्याच्या वयाच्या दोन तीन वर्षापासूनच कॉन्व्हेंटला नेवून टाकतो. काही पालक तर असे आहेत की जे पैसा कमविण्यासाठी बाहेर जातात आणि बाळाला कोण पाहिल म्हणून पाळणाघरात टाकतात.
वरील सर्व बाबी व आपलं वागणं आपल्या अनुषंगानं बरोबर आहे. कारण आपल्याजवळ वेळ अजिबात नाही. परंतु त्या बाबी जरी बरोबर असल्या तरी मुलांवर संस्कार होण्याच्या दृष्टीकोनातून घातक आहेत. वरील सर्व बाबींतून मुलांवर सुसंस्कार नाहीत तर कुसंस्कार होत आहेत व मुलं अगदी लहान वयापासूनच गुन्हेगारीकडं जात आहेत.
आज वरील बाबींच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येत आहे की लहान असलेली ती मुलं लहान वयातच खोटी बोलत असतात. काहीही म्हणत असतात. कशीही वागत असतात. परंतु आपल्याला त्यावेळेस मजा येते व आपण त्यांच्या लीला पाहून हसतो. म्हणतो की किती चांगल्या बाललीला करीत आहेत. परंतु त्यावेळेस आपल्याला त्या बाललीला घातक वाटत नाहीत की ज्या बाललीला बालगुन्हेगारी निर्माण करु शकतात. मात्र त्या बाललीला जेव्हा गुन्हेगारी स्वरुपात बदलतात. तेव्हा विचार येतो की आपण त्या बाललीलांना त्यावेळेसच थांबवलं असतं तर आज ही वेळ आली नसती.
विशेष सांगायचं झाल्यास या बाललीला घातक अशा बाललीला असून त्याची दखल वेळीच घेण्याची गरज आहे. त्याची दखल जर वेळीच घेतल्या गेली नाही तर त्या बाललीला धोकादायक होवू शकतात यात शंका नाही. तेव्हा ह्या बाललीलांना वेळीच थांबवावे. जेणेकरुन प्रत्येक मुलात कुसंस्कार नाही तर सुसंस्कार निर्माण होतील व त्याचाच फायदा देशालाही होईल व संबंध देशच सुसंस्कारी स्वरुपाचा होईल. कुसंस्कारी स्वरुपाचा नाही.
कचरुच्या बाललीला घातक नव्हत्या. तसेच त्याचे पाय पाळण्यात दिसत होते. तो कोणी उच्चस्तराचा मुलगा बनेल असं वाटत होतं.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मुशीत कचरुचं आयुष्य जात होतं. तसाच तो त्याच जि. परीषद शाळेतील आयुष्याच्या वाटेवर आपलं जीवन फुलवीत होता. तशी त्याची शाळा दुपारचीच होती.
सरकारनं शाळेची वेळ बदलवली होती. लोकं म्हणत होते की शाळा सकाळीच असावी. कारण सकाळची हवा ही शुद्ध असते. परंतु सरकारच्या म्हणण्यानुसार लोकं चालत नव्हते तर त्यांना आपल्या पाल्याची शाळा आपल्या मतानुसार हवी होती.
शाळा नऊ नंतर भरवायची का? हा प्रश्न होता आणि हा प्रश्न आता प्रत्येक जनमाणसात निर्माण झाला होता. तसं पाहता त्यावर मा. शिक्षण मंत्र्यानंही आपलं मत मांडलं होतं. त्यावर प्रत्येकजण आपापलं मत मांडत होते. कोणी कोणी काहीही उलटंसुलटं बरळत होते.
आज वेळ बदलवायलाच हवी असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसं आवाहन मा. शिक्षकमंत्र्यानं केले होते. त्यातच त्यांनी म्हटलं होतं की असं केल्यानं त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होवू शकतो. तसं पाहिल्यास त्यांचं म्हणणं बरोबर होतं. कारण तो त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रास्त होता.
सरकारच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास झोप, माणसाची झोप ही अतिशय महत्वपुर्ण गोष्ट होती. जर पुरेशी झोप झाली नाही तर माणसाचं मन चिडचिडं होत असतं. माणसाला दिवसभर बेचैनी वाटत असते. कोणत्याही कामात बरोबर लक्ष लागत नाही. काम करायला आवडत नाही. झोपच घ्यावीशी वाटते. असं सरकार म्हणत होतं. याचाच अर्थ असा की जिथं घरची कामंच करायला आवडत नाही. तिथं शाळेतील अभ्यास करायला कसं आवडणार. तरीही सकाळी सकाळी मुलं स्वतःच्या मनातून नाही तर मायबाप म्हणतात म्हणून किंवा शिक्षकांच्या धाकाने शाळेत जात असत. अशावेळेस मुलं शाळेत जात असतांना त्यांना शाळेत शिकावंसं वाटत नसे. शिक्षकांच्या शिकविण्याकडं लक्ष नसायचं त्यांचं. त्यामुळंच मुलं शिकत नव्हती.
शिक्षण.....अलिकडील काळातील देशाच्या विकासाच्या बाबींमधे सर्वात महत्वाची बाब आहे. या बाबींचं महत्व लक्षात घेवून शासनानं भविष्यवेधी शिक्षणाचा अभ्यासक्रम बनवला आहे. त्याच शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळेची वेळ वाढवणे हाही भाग अतिशय महत्वपुर्ण भाग आहे. त्यानुसार सरकारनं ती वेळ वाढविण्याचं ठरवलं आहे. परंतु याही गोष्टीला काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर ही वेळ वाढवली तर मुलांमध्ये आळशी वृत्ती वाढीस लागेल. त्यातच सकाळी वातावरण हे शुद्ध असतं व त्या वातावरणात असलेला शुद्ध ऑक्सिजन मुलांना मिळणार नाही. जो आता सकाळी शाळा असल्यानं मिळत असतो. ज्यातून आरोग्याच्या समस्याच निर्माण होवू शकत नाहीत. असं लोकांचं म्हणणं.
शालेय वेळ. त्या वेळेबाबत विचार केल्यास व दुसरी बाजू पाहिल्यास तशी बदलवणंही योग्य वाटत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच. तसाच प्रत्येक गोष्टीचा फायदा तोटा असणारच. तसं लोकांचं म्हणणंही बरोबरच आहे की वातावरणातील शुद्ध ऑक्सिजन शरीराला मिळणार नाही. जे ऑक्सिजन शरीराला अतिशय आवश्यक आहे. ज्यानं आरोग्य चांगलं असतं. दिर्घायुष्य लाभू शकतं. तसा सकाळी उठण्याला इतिहासही आहे. पुर्वीचे लोकं सकाळी उठायचे. सडा सारवण करायचे. या सडा सारवणानं व्यायामही व्हायचा. आताच्या काळासारखा वेगळा व्यायाम करण्याची गरज राहायची नाही. ते मुलांनाही सकाळी उठवायचे. ज्यातून मुलं उत्साही राहायची. ज्यातून आरोग्याच्या समस्या असायच्या. परंतु तेवढ्या समस्या नसायच्या. ज्यातून दिर्घायुष्य लाभायचं. तसं पाहता पुर्वीचे लोकं रात्रीला लवकरच झोपायचे. कारण रात्रीला लाईन नसायची. त्यामुळं उजेडही नसायचा. तसाच मोबाईलचा शोध लागलेला नव्हता.
आज काळ बदलला. बदलत्या काळानुसार स्मार्टफोन आला. त्या स्मार्टफोनच्या नादात लोकांचा रात्री झोपण्याचा वेळ वाढला. त्याच नादात मुलंही जागायला लागली. मोबाईलमुळं सकाळी झोपेतून उठण्याची वेळ वाढली. मुलांच्याही झोपून उठण्याची वेळ वाढली. म्हणूनच वेळ वाढविण्याची गरज आहे असं वाटतं. परंतु यातून पुढील जीवनात गंभीर समस्या नक्कीच निर्माण होवू शकतात हेही तेवढंच खरं आहे. यावर विचार व्हायला हवा.
महत्वाची गोष्ट ही की वेळ शाळेची बदलवावी की बदलवू नये. हा प्रश्न नाही. प्रश्न आहे विद्यार्थ्यांना सवय लावणे. ही सवय विद्यार्थ्यांच्या लहानपणीच लागू शकते अन् ती लहानपणापासूनच लावायला हवी. याच अनुषंगाने सकाळी शाळा असणे गरजेचे आहे. परंतु त्यावर जनमत असं की ती गोष्ट जरी आरोग्यदायी असली तरी ती स्विकारायला तयार नाही. त्यातच मंत्रीमंडळात असलेली मंडळी उगाचंच आपलं मोठेपण कसं सिद्ध करता येईल याकडे जास्त लक्ष देत असतात. ते आपलं मत मांडत असतात. काही मतं स्वागताची असतात. याचाच अर्थ असा नव्हता की मा. शिक्षण मंत्र्यांनी मांडलेलं मत स्वागताचं नव्हतं. तेही स्वागताचं होतं. परंतु लोकांना वाटत होतं की संविधानातील आर्टीकल चौदानुसार स्वतंत्र मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असला तरी आपलं मत कोणावर लादू नये म्हणजे झालं. वेळेबाबतचा निर्णय त्या त्या परिक्षेत्रातील लोकांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार घेवू द्यावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांची, पालकांची फसगत होणार नाही. विद्यार्थीही उत्साही राहतील. पालकही उत्साही राहतील व संबंधीत यंत्रणाही उत्साहीत राहील यात दुमत नाही. मात्र आपला निर्णय भोळ्याभाबड्या जीवांचं नुकसान करणारं ठरु नये. कारण शिल्पकारांना दगडाला घाव दिल्याशिवाय देवरुपात आणता येत नाही. तसंच विद्यार्थ्यांचंही आहे. त्यांनाही ते शिकत असतांना थोड्याफार यातना झाल्याशिवाय परिस्थितीशी लढणं समजणार नाही. त्यालाच शिक्षण असंही नाव देता येईल. सकाळी शाळा असणं वा उठणं हेही एकप्रकारचं शिक्षणच आहे. त्याचा बाऊ करु नये म्हणजे झालं. हं, शाळेची वेळ बदलविण्यापेक्षा विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची वेळ बदलवा. जसे. ज्या विद्यार्थ्याला ज्या वेळेला शाळेत यायचे असेल. तेव्हा तो येवू शकेल. त्याचा अभ्यास व्हायला हवा. अलिकडील भविष्यवेधी शिक्षण अभ्यासक्रम तेच सांगतं. विद्यार्थ्याला स्वतः शिकू द्यावं. त्यावर आवर घालू नये. बंधन अजिबात देवू नये. वेळ वाढवणे हे एक प्रकारचं बंधनच आहे. विद्यार्थ्यांच्या विकासाला कुंटविण्यासाठी. तसाच त्याच्या शरीराला होणारा शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा कायमचा बंद करण्यासाठी. तसंच हे जर करायचं नसेल व शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला हवा असेल तर सकाळी शाळा असणे गरजेचे आहे.
ती सरकारी शाळा. ती शाळा आता दुपारी झाली होती. त्यातच कचरुला बरं वाटत होतं. तो आता मस्त आरामात उठत होता झोपेतून. तशी त्याची आई त्याचेमागे तगादा लावायची उठण्यासाठी. म्हणायची की ही सवय मोडून टाक. तुला पुढे लय त्रास होईल.
कचरुचं ते लहान वय. आईनं त्याला उठवताच आईचा फार राग येत होता त्याला. पुर्वीही सकाळची शाळा असतांना आईचा त्रासच व्हायचा उठवतांना आणि आताही नऊ वाजता झोपेतून उठवताच त्रासच होत होता आईचा.
आईला वाटायचं की शाळा सकाळीच राहो की दुपारी राहो, सगळा त्रासच आहे. तसं पाहता तिला सकाळी असलेली शाळा आवडायची. कारण तिची सगळी कामं सकाळी कचरु शाळेत जाताच उरकून जायची. त्यानंतर ती मोकळी व्हायची. तसं पाहता दुपारी शाळेला सुटी होताच ती कचरुला घेवून शेतात जायची. त्यातच तिचं लेकरु दिवसभर तिच्या सोबत असायचं.
कचरुच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे बाबा शेतात ढोर मेहनत करीत असायचे. परंतु हाताला काही गवसायचं नाही. शेती तशी कोरडवाहू होती. एक विहिर खोदली होती सरकारच्या योजनेतून. परंतु ती जास्त खोल नव्हती. त्या विहिरीला खोदण्याचा जो सरकारी टेंडर होता. त्याच टेंडरमधील पैसा सरकारी कर्मचाऱ्यांनी खाल्ल्यानं विहीर कमी खोल झाली होती. त्यात पाणी होतं. परंतु ते पाणी जेमतेम होतं. ते पाणी शेतीला पुरत नव्हतं. त्यामुळं ती विहीर बिनकामाचीच झाली होती.
ती कोरडवाहू शेती. परंतु आता सरकारनं तिथं बिनकामाची विहीर खोदून दिल्यामुळं ती शेती ओलिताची झाली होती. तसं पाहता त्या ओलिताच्या शेतीत ओलीत काहीच नसल्यानं पीकत काहीच नव्हतं. शेवटी कचरुच्या बापानं ठरवलं की या शेतीला बोरींग करावं. मग त्यानं मानवी बोर आणलं व शेतीला बोरींग करण्याचा प्रयत्न केला. परंतु बोरवाल्यांनी सांगीतलं की त्याचा बोर फक्त आठच फुट जात आहे. खाली दगड आहे. बोर होत नाही. तसं पाहता कचरुच्या बापाचा तोही पैसा व्यर्थ गेला. आता शेवटचा पर्याय म्हणून तो कोरडवाहूच शेती करु लागला होता. मात्र शेतीचा जो शेतसारा होता. तो जास्त देवू लागला होता आणि सरकारी वीजही कटलेली नसल्यानं तिचं बिलही येवू लागलं होतं.
वीज वापरात नव्हती. ना वीजवाल्यांनी वीज भरणा होत नाही म्हणून वीज कापून नेली नव्हती. त्यातच बील सुरु होतं. ते वाढत होतं. मग कोणीतरी सांगीतलं की ही वापरात नसलेली वीज एक अर्ज देवून बंद करुन टाकावी. मग ती वीज कचरुच्या बाबानं एक अर्ज देवून बंद करुन टाकली. परंतु तरीही वीजबिल यायचं. त्याचं कारण होतं त्यानं वीज बिलाचे न भरलेले पैसे. ते भरायला पैसेच नव्हते.
कचरुचे ते मायबाप. बापाचं नाव रामदास होतं तर आईचं नाव कौशल्या होतं. रामदासची शेती पीकत नव्हती. मग तो कसा काय वीजेचा भरणा करु शकेल. अर्ज तर दिला होता. त्यानं वीज आकारणी बंद झाली होती. परंतु शेवटी मुद्दल होतं. ते तो भरु न शकल्याने वीज दर येत नव्हता. परंतु मुद्दल व त्यावर वाढणारी व्याजाची रक्कम येत होती. शेवटी कसंबसं करुन रामदासनं ते वीजबिल भरलं व येणारी वीज कायमची बंद केली. मात्र ओलीताची शेती आहे असंच सारखं लिहून येत होतं सातबाऱ्यावर. त्यामुळं त्याच्या शेतीला जास्त भाव होता. त्यातच कोणी म्हणत असे की त्यानं शेती विकून टाकावी. कारण शेतीला जास्त भाव आहे. परंतु रामदास आपल्या शेतीला आपली आईच समजत होता. त्यामुळंच कोणी विकायची भाषा जरी केली तरी ती त्याला सहन होत नसे. त्याला फारच राग यायचा त्या गोष्टीचा.
शेती पीकत नव्हती. तरीही रामदास शेती करीत होता. कारण शेती हाच एकमेव पर्याय त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन होता.
कचरु दुपारी शाळेतून यायचा व तो आपल्या आईसोबत शेतात जायचा. त्याला तसं शेत फार आवडायचं. कारण त्याला शेतातील चांगल्या चांगल्या वस्तू खायला मिळायच्या. त्यातच खेळही खेळायला मिळायचा. तसं पाहिल्यास शेतात सवंगडी नसायचे. त्यामुळं कोणतेही खेळ तो एकटाच शेतात खेळायचा.
कचरुची हिवाळ्यात चांदीच असायची. हिवाळ्यात खायला तर भरपूर मिळायचं. शिवाय त्याच्या पतंगीचा छंद हिवाळ्यातच पुर्ण व्हायचा.
पतंग........पतंग आकाशात उडवाविशी वाटायची. परंतु पतंगीसाठी लागणारे पैसे कुठून आणणार? गरीबी फारच होती. त्यामुळं प्रश्न पडायचा. तेव्हा कचरु आईनं दुकानातून आणलेल्या व सामानासोबत आलेल्या वर्तमानपत्राची पतंग बनवायचा. ती पतंग सापडलेल्या मंजाच्या सहाय्याने आकाशात उडवायचा. तसं पाहिल्यास ती पतंग आकाशात उंच गेलेली पाहतांना कचरुचा आनंद गगनात मावेनासा असायचा.
ती पतंग.......ती अवकाशात गेली की कचरुच्या मनाला अगदी चांगलं वाटायचं. ती पतंग उंच उडायची. घिरट्या खावून खाली यायची नाही. त्यातच ती उडतांना कचरु तिला एका झाडाला बांधून ठेवायचा व तो दुसरी शेतातील कामे करीत बसायचा.
कचरुची कामे ही काही पुस्तक वाचन करणारी गोष्ट नव्हती. त्यातच ती कामं शेतातीलही नव्हती. तर ती बिनकामाचीच कामं होती. तो ती कामं अतिशय सोज्वळतेनं करीत असायचा. उन्हाळ्यात बाप शेतीत येवू नको असं त्याला म्हणत असे. परंतु तो बापाच्या मागं लागून शेतात जायचा व बापाच्या वखराच्या मागं मागं पाय दुखवत फिरायचा. तसं फिरतांना बाप ओरडायचा. बापाला वाटायचं की मुलाचे पाय दुखतील. परंतु कचरु काही ऐकायचा नाही. तो कधी वखरावर बसून तर कधी पायी पायी चालत वखरामागं फिरायचा.
ती बैलं कष्ट करणारी बैलं होती. ती अतिशय मेहनत करीत असत. परंतु कचरुच्या बापाला त्याची काही लेनदेन नव्हती.
ती बैलाची जोडी. त्यातील एक बैल मारकुंड्या स्वभावाचा होता. एकदा कचरु दुसरीत असतांना त्या बैलानं कचरुला आपला एक पाय मारला होता. त्यानं लंगडा झाला होता कचरु. कचरुला आता त्या बैलाची भीती वाटत होती.

****************************************

रामदासच्या घरी पुर्वी शेती नव्हती. तो लोकांची कामं करायचा व आपला उदरनिर्वाह करायचा. परंतु त्यानं आपल्या सासऱ्याच्या म्हणण्यानुसार शेती घेतली होती व तो आता शेती करु करु लागला होता.
रामदास शेती दुसऱ्याकडून बैल मागून करीत होता. कधीकधी ती माणसं बैलं देत नव्हते. तसंच कधीकधी शेती करतांना अनेक अडचणी बैलाअभावी उद्भवत. कधीकधी हंगामात बैलं मिळायचे नाही. शेतकरी आपली शेती करण्यासाठी बैलाचा वापर करायचे. भाड्याचीही बैलं वेळेवर उपलब्ध होत नसत. त्यामुळं हंगामात पेरता यायचं नाही. हंगाम पडायचा. त्यामुळं रामदासनं विचार केला. विचार केला की जोडी बनवायची. जेणेकरुन त्या जोडीच्या साहाय्यानं त्याला हंगामाच्या वेळेवर शेती पेरता येईल. आपलीच जोडी असल्यानं दुसऱ्याची भाडे तत्वावर शेतीही करता येईल.
भाडेतत्त्वावर शेती करण्याचा विचार करताच रामदासनं ठरवलं की जोडी बनवावी. परंतु त्यावेळेसही बैलाचा दर जास्त होता. सहजासहजी कमी किमतीत बैलं मिळत नसत. तसं पाहता ती बैलाची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतही नसे. ह्यामुळेच की काय, शेती करण्यासाठी बैलं कशी घ्यावी हा प्रश्न रामदास समोर उपस्थीत झाला. तसा तो विचार करु लागला.
रामदासनं जोडी बनविण्याचा निर्धार करताच तो गुरांच्या बाजारात गेला. त्यानं पाहिलं की तरण्याताठ बैलाची किंमत पुष्कळ असून तेवढे पैसे त्याचेजवळ नाहीत. शिवाय म्हातारी कमी किमतीची बैलंही बाजारात नव्हती. तसा तो परत आला. परंतु बैलं घेण्याचा ध्यास त्याचा पिच्छा काही सोडत नव्हता. अशातच आठवले त्याला घरच्या गाईची वासरं.
रामदासच्या घरी एक गाय होती. जी गाय त्याच्या सासऱ्यानं त्याला बक्षीस म्हणून दिली होती नव्हे तर विवाह करुन आलेल्या आपल्या कन्येला दान दिली होती. त्या गाईचे तीन वासरं होतं. वासरं मोठी होताच रामदास ती विकून टाकत असे. त्यातच रामदासनं आपल्या मोठ्या दोन वासराची जोडी बनवली व तो शेती करु लागला.
रामदास शेती करु लागला. अशातच गावावरून त्याची मुलगी व जावई गावी आले. ते तसे कामानिमित्त आले होते.
रामदासला तीन मुलं व एकच मुलगा होता. मोठी मुलगी शहरात दिली होती व जावईदेखील शहरात राहात होता. उरलेल्या दोन मुलीचे विवाह व्हायचे होते. जशी रात्र झाली. तशी मुलगी म्हणाली,
"बा, तुह्या जावयाले दिवटी लागत हाये. तवा त्याले पाचशे रुपये लागतेत. परंतु तेवळे पैसे आमच्याकडं नाईत. म्हणून आमी आलोया तुमाले पैसे मागाले. पाचशे रुपये द्या. म्हणजे तुह्या जावई दिवटीवर लागन अन् आमचा संसार बाका होईन."
पोरीनं रामदासला विनवणी केली. परंतु रामदासजवळ पैसाच नव्हता. त्यामुळं त्याच्यासमोर विचार होता. काय करावं? तो विचार करीत होता. जर असा पैसा नाही दिला तर......तर जावयाला नोकरी लागणार नाही व आपलीच मुलगी सुखी होणार नाही. काय करावं तो विचार करु लागला. तशातच तो आपल्या मुलीला म्हणाला,
"लेकी, तुले तं माईतच हाये का आमच्याजोवर पैसा नाई. आमीच आमचा संसार कसा चालवतो. आमचं आमाले माईत. तवा तुले पैसे कोठून द्यावेत हा ईचार हाये."
रामदासचं ते बोलणं. तशी मुलगी म्हणाली,
"बा, जोडी ईक. अन् आमाले पैसे दे. जावयाचा पगार झाला का तुले पैसे देतो आमी. मंग जोडी घेवून टाकजो."
मुलीनं आव न पाहता अन् टाव न पाहता बोलून दिले ते शब्द. परंतु तशी मुलगी बोलताच रामदास विचारात पडला. तसा तो विचार करु लागला. जर जोडी विकली तर शेती कशी करता येईल. शिवाय आजच्या तारखेला बैलाची किंमतही फारच आहे. बैलं कुठून होवून येणार. शेवटी तसा विचार करताच त्यानं ठरवलं की आता काहीही होवो, जावयांना राग का येईना, आपण जोडी विकायची नाही. शेवटी तसं ठरवताच रामदास आपल्या मुलीला म्हणाला,
"पोरी, जोडीशिवाय कास्तकारी कसली? मी जर जोडी ईकली तं कास्तकारी डुबन. मी काई तुले पैसे देवू शकत नाई."
रामदासनं तोंडातून शब्द काढले. जेही म्हटलं ते ह्रृदयातून म्हटलं नाही. तशी मुलगी म्हणाली,
"पण बा, तुह्याच जवाई हाये नं तो. तो नोकरीले लागन तं तुह्यीच पोरगी सुखी होईन नं."
मुलीच्या तोंडातून निघालेल्या गोष्टी. तसा नकार द्यायचा विचार नव्हताच रामदासचा. शेवटी मुलगी आपलीच. आपलीच मुलगी सुखी होईल असा विचार करुन रामदासनं आपल्या जोडीतील आपल्याच घरच्या गाईचा बैल विकायची इच्छा नसूनही विकला. तो बैल ताबडतोब विकला जावा म्हणून त्यानं तो बैल आपल्या जावयाच्याच एका नातेवाईकाला विकला व मिळालेले पाचशे रुपये त्यानं आपल्या जावयाला नोकरीवर लागण्यासाठी दिलेत.
रामदासनं जोडीतील एक बैल विकल्याने एकच जोडीतील बैल घरी शिल्लक राहिला होता दुसरा एक त्याला जोड होता. परंतु तो गोरा बराच लहान होता. त्याला मोठे व्हायला निदान दोन वर्षाचा तरी कालावधी होता. त्यामुळं तेव्हापर्यंत काय करावं हा प्रश्न होता. एक बैल....... त्याच्या घरच्या गाईचे तो वासरु होता. त्यातील एक वासरु लहान होते. तसं पाहता रामदासनं आता एक बैल विकल्यानं एका बैलाची गरज होती व त्यातच बैलाच्या जोडीचीही. परंतु त्याच्या घरचे घरच्या गाईचे एक वासरं लहान होते. एक जोडीचा मोठा होता. परंतु एकट्या बैलानं काही शेत वाहता येत नव्हतं.
रामदासनं आपल्या दावणीतील जोडीचा बैल तर विकला. शिवाय तो एवढ्या ताबडतोब विकावा लागला की विचार करायला वेळच मिळाला नाही. चांगला तरण्याताठ होता तो बैल आणि किंमत पाहता वेळेवर विकल्याने जास्तही मिळाली नव्हती. शेवटी त्याला आता कोणत्याही परिस्थितीत एक जोडीचा बैल घेणं आवश्यक होतं. त्यासाठी पैसे गोळा करणं आवश्यक होतं.
रामदासला बैलाची आवश्यकता होती. त्यामुळं त्यानं त्यासाठी पैसे गोळा केले व तो बैलाच्या शोधात होता. त्याला कमी पैशात बैल आवश्यक होता. तसा तो बाजारात बैल घ्यायला जाणार नव्हता. कारण त्यानं मागंच एकदा बाजारात जावून पाहिलं होतं.
रामदास शोधतच होता बैल घेण्याची गोष्ट. त्यापैकी एक दिवस तो फिरत असतांना त्याला गावच्या एका व्यक्तीनं सांगीतलं की त्याचेजवळ एक बैल आहे. तो थोडा म्हातारा आहे. परंतु तो म्हातारा बैल दोनचार वर्ष तरी काम देवू शकतो. तसं न राहवून दोन वर्षानं आपल्या घरच्या गाईचाच गोरा मोठा होवून कामास येईल असा विचार करुन रामदासनं तो म्हातारा बैल विकत घेतला व तो आता आपली वाहीजुपी करु लागला.
तो म्हातारा बैल. तो लहान मुलांचा राग करीत होता की काय? तो तसा घरच्या गाईचा नव्हता. त्यानं एकदा कचरुला पाय मारला होता. त्यानं कचरुचा पाय दुखावला होता. त्यामुळं कचरु आता त्या बैलाला मारकुंडा बैल म्हणून त्याचेजवळ जात नव्हता.
तो म्हातारा बैल. त्यानं रामदासच्या घरी तब्बल आठ वर्ष काढले. तसं पाहता तो बैल कामातून भाकड होईपर्यंत घरच्या गाईचा लहान गोरा आता मोठा झाला होता. तो आता शेतीच्या कामात येवू लागला होता. शेती थोडीशी चांगली झाली होती व काही पैसा शिल्लक पडत होता. तोच त्या वयोवृद्ध बैलाचा काही उपयोग नाही. म्हणून पैशाच्या लोभाने रामदासनं तो बैल विकायचा निर्णय घेतला. तशी घरची मंडळी त्या बैलानं कठीण परिस्थितीत साथ दिला म्हणून विकू नको असं रामदासला सांगत होती. परंतु रामदासच तो. तो ऐकेल तेव्हा ना. त्यानं नाही विकणार असं पोकळ आश्वासन दिलं. तशी एक दिवस कौशल्या घरी असतांना सायंकाळी जेव्हा रामदास घरी आला. तेव्हा तिला तो म्हातारा बैल दिसला नाही. कारण विचारलं असता रामदासनं वेळ मारुन नेली. म्हणाला की तो बैल मरण पावला व त्याला तिथंच टाकलं. परंतु नंतर माहीत पडलं की तो बैल कसाबाला विकला.
कौशल्या व कचरुला जेव्हा माहीत झालं की तो बैल कसाबाला विकला, तेव्हा अतिशय वाईट वाटत होतं. परंतु आता काही उपाय नव्हता.

****************************************

आपण मांसाहारी नाही. कारण आपण तोंडानं पाणी पितो. जिभेनं नाही. जो जिंभेनं पाणी पितो, त्या प्राण्यांना मांसाहारी म्हणतात. जसे मांजर, वाघ, सिंह, कुत्रा वैगेरे वैगेरे. म्हणूनच आपण मांस खावू नये तर वनस्पतीजन्य अन्न खावं. यात शंका नाही.
समाजात आज मांसाहारी व शाकाहारी अशा गटाचे लोकं वावरत असतात. शाकाहारी आणि मांसाहारी लोकांचं वर्गीकरण करायचं झाल्यास समाजात शाकाहारी कमी व मांसाहारीची संख्या जास्त आहे. शिवाय ती वाढत चाललेली आहे. ज्याप्रमाणे समाजात मांसाहारी लोकं आहेत. त्याचप्रमाणे मांसाहारी प्राणीही आहेत. परंतु कधीकधी आश्चर्य वाटतं जेव्हा ऐकलं जातं की शाकाहारी प्राणीही मांस खातात. होय, मानव हा मांसाहारी प्राणी नाही. परंतु तो मांस खातो. हरीणही अशीच प्रजाती की जी त्याच्या शरीरातील कॅल्शिअम कमी झाल्यास ते मांस खातांना दिसतात. त्या मांसात ते चक्कं सापही गिळत असतात. आहे ना आश्चर्याची बाब. परंतु जे प्राणी मांस खातात. त्याचा अंतही तसाच होत असतो. हे निर्विवाद सत्य आहे. काही मांसाहारी प्राणी त्यांचं पोट दुखत असेल तर दुर्वा खात असतात. आता दुर्वा म्हणजे शाकाहारी अन्न. समाजात अशा मांसाहारी लोकांचे प्रमाण पाहिले तर भरपूर आहे. त्यामानानं शाकाहारी लोकांचे प्रमाण कमी आहे.
आजच्या काळात लोकं म्हणतात की कुक्कुटपालन वा बकरीपालन हा व्यवसाय केल्यानं माणसाच्या संपत्तीत वाढ होते. कारण हे प्राणी मांस जास्त देतात व विकल्यास लाखो रुपये मिळवून देतात. कारण अलिकडील काळात मांसाची मागणी पाहता बकऱ्याचं मांस जास्त भावाचं आहे व कोंबडीचं मांसही जास्त महाग आहेच. त्यामुळंच अलिकडील काळात कुक्कुटपालन व बकरीपालन वाढत चाललेलं आहे. म्हटलं जातं की बकरीपालन व कुक्कुटपालन हा शेतीला पर्यायीपुरक धंदा म्हणून एक चांगला व्यवसाय आहे. ज्या शेतीत काही मिळत नाही. त्याच शेतकरी माणसानं शेतीला पर्यायीपुरक कुक्कुटपालन वा बकरीपालन यासारखा जोडधंदा केल्यास भरपूर पैसे मिळतात असं लोकांचं म्हणणं. परंतु ते धांदात खोटं आहे. असं जर झालं असतं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून बकरीपालन वा कुक्कुटपालन जोड व्यवसाय म्हणून उभारला असता. परंतु तो पर्यायीपुरक व्यवसाय होवू शकत नाही. म्हणूनच लोकांनी असा व्यवसाय करणं बंद केलं आहे. त्याचं कारण तसंच आहे. ते कारण म्हणजे त्याला कापत असतांना त्यांनी दिलेला शाप.
शेतकरी असा घटक आहे की त्याला संबंध संसारच पाप करायला लावत असतं, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ज्याची फळं ही शेतकऱ्यांनाच भोगावी लागतात. जसे, शेतीतील माल ओला असतांनाच शेतकरी त्याच्यातून पीक मिळविण्यासाठी कधीकधी त्याच्या वाळण्याची अर्थात परिपक्व न होण्याची वाट पाहात नाहीत व उभं पीक कापून टाकतात. ही जीवहत्याच असते. कारण वनस्पतींनाही जीव असतो हे विज्ञानानं सिद्ध केलंय. तसं पाहिल्यास जीवहत्या हे पापच असते. मग ती कोणाचीही असो. वनस्पतीचीही का असेना. वनस्पतींना वाळण्यापुर्वीच कापणं म्हणजे जीवहत्याच करणं होय. आता काहीजणं आणखी कुक्कुटपालन आणि बकरीपालन या धंद्याला पर्यायीपुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांना ते प्राणी पाळायला लावत आहेत. त्यातच तो माल विकून तो निगरगट्ट करुन त्याचे पाप शेतकऱ्यांच्याच माथी मारायला पाहात आहेत आणि एकप्रकारे शेतकऱ्यांच्या दैनेवर, आत्महत्येवर हासत आहेत असे चित्र दिसत आहे. जणू शेतकऱ्यांनीच जास्त पापं करावीत. त्यांनीच त्या पापाचा परिणाम म्हणून दुष्काळाचं जीणं जगावं अन् दुसऱ्या वर्गाने मस्त एसीच्या बंगल्यात विदेशी नाचगाणी लावून थिरकणाऱ्या तरुणीसमवेत रम आणि मटनाच्या ठुशावर ताव मारायला लावावा व स्वतःला चिडविण्यासाठी त्यांना तयार करावं. स्वतः पाप करुन. यात त्यांच्यासाठी शेतकरी एवढा मेहनत घेतो व पीक पिकवून स्वतःला त्रास करुन घेतो. जणू कोवळ्या वयातील म्हणजेच पीक हिरवे असतांना कापून पाप करुन घेतो. तसेच पर्यायीपुरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन वा बकरीपालन व्यवसाय करुनही स्वतःच्या माथी पाप मारुन घेतो.
शाप अशी गोष्ट की त्या शापानं संपुर्ण मानवजाती बेचिराख होवू शकते. आपल्याला माहीतच असेल पुर्वीचा काळ. जे आपल्याच धर्मग्रंथात लिहिलं आहे. कोणी त्या धर्मग्रंथाला थोतांड ग्रंथ म्हणतात. असो, ते काहीही म्हणोत. परंतु त्यात दाखवलं आहे की एखाद्या साधूनं एखाद्याला शाप दिलाच तर तो शाप खरा ठरत असे. तेच घडतं आज. आज हे कसायाला विकलेले मुके प्राणी बोलत नाहीत. परंतु ज्यावेळेस कसाई त्यांना कापतो. तेव्हा त्याला भयंकर वेदना होत असतात. ते जणू अक्षरशः रडतात. मग आपल्या मनातून ते शापवाणी उच्चारतात. जी शापवाणी त्या कसायाला लागत नाही. त्यामुळं त्यांची मोठमोठी घरं उभी राहतात. परंतु तो शाप लागतो, त्याचं पालनपोषण करणाऱ्या लोकांना. त्यातच जी मंडळी असा कुक्कुटपालन वा बकरीपालनाचा व्यवसाय करतात. ते नेस्तनाबूत होतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास या प्रकाराची शहानिशा केल्यास असे दिसून येईल की काल ज्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर बकरीपालन व कुक्कुटपालन होतं. आज ते गर्भश्रीमंत नाहीत. तर आज ते भीक मागतांना दिसत आहेत. अर्थातच शेतकरी. आज शेतीला फार मोठी किंमत आली आहे. जर शेती विकली तर........परंतु तीच शेती करीत असणाऱ्या शेतकरी वर्गाला कवडीचीही किंमत नाही. एवढा मोठा व्यवसाय आणि ही गरीबी आली कशी? तर याचं उत्तर आहे. त्यांनी कसायाला विकलेल्या कित्येक निरपराध प्राण्यांचा कसायानं घेतलेला जीव व त्याचा शेतकऱ्यांना बसलेला शाप. शेतकऱ्यांनी साधा बैल आणि गायही, ती गाय भाकड झाल्यावर तिला पोषलं नाही. पोषायचा त्रास केला. पैसे येतात म्हणून कसायाला विकलं. बैलानंही एवढी शेतकऱ्यांच्या घरी मेहनत घेवूनही तो म्हातारा झाल्यावर बिनकामाचा होताच घरी मरण दिलं नाही. दोन पैसे पदरात पडतात. म्हणूनच त्याला कसायाला विकलं. तसंच आपल्याला पावसामुळं पीक भेटूच शकणार नाही. या हव्यासानं त्यानं जीवंत पीक कापलं. हे पाप घडत गेलं वर्षानुवर्ष व शेतकरी भोगत आला त्या पापाचाच परिणाम वर्षानुवर्ष. मदतीला कोणीच आला नाही. सर्वांनी मात्र मजा मारली. वास्तविकता ही की शेतकऱ्यांनी पुर्वी गारा, अवर्षण, दुष्काळ या स्वरुपात परिणाम भोगला आणि आता आत्महत्या स्वरुपात परिणाम भोगत आहेत. खरं तर हे प्राणी त्या व्यक्तीनं आपल्या लेकरागत सांभाळलेले असतात आणि आपल्याच त्या लेकरांना विकून त्यांनी आपल्या लेकराचा जीव घेतलेला असतो. यात तसूभरही असत्यता नाही.
गाय, शेळी, कोंबडी, बैल कसायाला विकणं ही वाईट बाब आहे. जीवनभर ज्या प्राण्यांनी स्वार्थ न पाहता ज्या शेतकरी माणसाची सेवा केली. ज्या बैलानं मेहनत करुन शेतकऱ्यांना जगवलं. त्या शेतकरी माणसानं तो बैल भाकड होताच त्याला कसायाला विकणं एक चांगली गोष्ट नाही. ज्या कोंबडीनं अंड दिलं, ज्या गाईनं दुध दिलं, अन् ज्या बकरीनं लेंडीखत दिलं. त्यांनाही शेतकऱ्यानं त्यांचे उपकार मानून सन्मानानं वागवलं नाही. त्यानं आपल्याला दोन पैसे मिळतील याचा विचार केला. परंतु असा विचार केला नाही की मनुष्यप्राणी असो की एखादं जनावर. त्याला मरावंसं वाटत नाही. अशातच ज्या बैलाला किंवा गाईला आपण कसायला विकतो, तो कसाई त्या बैलाला किंवा गाईला चांगल्या प्रकारे कापत नाही. त्याचे हालहाल करुन त्याला कापतो वा ठार करतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आला होता. त्यात बैलाला कापतांना दाखवलं होतं.
बैल किंवा गाय ही ताकदवर असल्याचं मानलं जातं. तिला कापतांना कसाई आधी त्यांना पंगू बनवतात. याचाच अर्थ असा की त्या गाई किंवा बैलांना खुंटाला बांधलं जातं. त्यानंतर दुरुनच त्याचे मागचे पाय गुडघ्यावर वार करुन जखमी केले जातात. त्यानंतर तो बैल मागील पायावर उभा राहू शकत नाही वा पळूनही जावू शकत नाही. तो खाली बसतो. त्यानंतर कसाई त्याचे पुढील पाय जखमी करतात. ते एवढे जखमी करतात की ते जनावर चारही पायानं अंगूपंगू होतं. तसा रक्तप्रवाह वाहातच असतो व त्या रक्तप्रवाहातून त्या जनावराचा क्षीणपणा वाढत असतो. शेवटी त्याचा क्षीणपणा एवढा वाढतो की ते जनावर कोणतीच ताकदीची हालचाल करु शकत नाही. कसाई तेच पाहात असतो व जसं त्याच्या लक्षात येतं की ती गाय अथवा बैल क्षीण झालं. तेव्हा तो त्याच्या मानेवर वार करतो व करकर कापून टाकतो तो त्या मुक्या जीवास. शेवटी ते जनावर मरण पावतं. परंतु ते असं तडपत तडपत मरण पावत असतांना ते कसायाला शाप देत नाही. शाप देत असतं मालकांना. ज्या मालकाच्या घरी ते लहानाचं मोठं झालेलं असतं. ज्या मालकाच्या घरी त्यानं सेवा केलेली असते. अर्थातच याचा शाप लागतो शेतकरी वर्गाला. कारण ते प्राणी आपल्या अधिवासाचा जास्तीत जास्त काळ शेतकऱ्यांच्या घरीच जास्त घालवत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की कुक्कुटपालन वा बकरीपालन करावं. करु नये असं नाही. कोंबडीचा वापर अंडे मिळविण्यासाठी करावा. त्यांच्या विष्ठेचा वापर भरपूर उत्पन्न यावं यासाठी खत म्हणून करावा. तसं पाहिल्यास बकरीच्या लेंडीखताचा वापर शेतीला खत म्हणून केला जातो. तसाच वापर होतो तिच्यापासून मिळणाऱ्या दुधाचा. ते दूध फारच ताकदवर समजलं जातं. अशा बकरीच्या दुधाचा जर वापर आजच्या काळात होत गेला तर निश्चितच समाजातील लोकांची जी प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. ती निश्चितच वाढवता येईल वा शेतात त्या लेंडीखताचा वा कोंबडी विष्ठेचा वापर करुन भरघोस उत्पादन मिळवता येवू शकेल. अलिकडील काळात शेतकरी लोकं आत्महत्या करीत आहेत. त्याचं कारण आहे शेती न पिकणं. शेतीचंही भाकड होणं. त्याचं कारण आहे. शेतीत शेणखताची लेंडीखताची मात्रा कमी असणं. ती जनावरं कसायाला विकली जातात. म्हणूनच खते कमी होत आहेत. त्यातच ती जनावरं त्यांनी कसायाला विकलेली. कुठंतरी त्यांनी आपली जनावरं कसायांना विकली असावीत. जेणेकरुन त्यांचा शाप लागला असावा व त्याचा परिणाम शेती पिकण्यावर झाला असावा? ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच शेतकरी मित्रांनी आतातरी सुधरावं. तसंच समाजानंही सुधारावं. मांस खाणं हे काही आपलं खाणं नाही. कारण आपण तोंडानं पाणी पितो. जिभेनं नाही. जे जिभेनं पाणी पितात ते मांसाहारी असतात. आपला गट त्यात मोडत नाही. आपण मुळातले शाकाहारी. हळूहळू आपण हरिणासारखे कॅल्शिअम कमी होताच मांस खायला लागलो. याचा अर्थ असा नाही की आपण मांसाहारी आहोत. ते जनावरं आहेत. त्यांना कॅल्शिअम कुठून मिळतं त्याचं ज्ञान नाही. म्हणूनच ते मांस खातात. परंतु आपल्याला तर कळते ना. कॅल्शिअम मिळविण्यासाठी चुन्याचाही वापर करता येवू शकतो. मांस खाण्याची तेवढी गरज नाही. मग आपण मांसच का खावं? ती जीवहत्याच. मग काय खावं की पाप घडणार नाही. आपण खावं विविध प्रकारच्या डाळी. ज्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. आपल्याला प्रथिनं मिळतात. आपण खावं तुप, तेल. ज्यामुळं स्निग्ध पदार्थ मिळतात. अन् आपण खावं एकदल वाळलेले धान्य, ज्यानं आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळतात. क्षार हे पेयापासून मिळतात. तर जीवनसत्व आपल्याला फळापासून मिळतात. ती जीवहत्या नाही. कारण एक फळाचा भाग सोडला तर बाकी सगळे वाळलेले पदार्थ असतात. ते पदार्थ खाल्ल्यानं पाप घडत नाही. यात शंका नाही.
विशेष सांगायचं म्हणजे मांस खाणं म्हणजे पाप करणं होय. याचा शाप केवळ उत्पादकालाच बसतो असं नाही तर ते पाप कापणाऱ्यालाही बसतं. त्याचबरोबर खाणाऱ्यालाही तेवढंच बसतं. प्रत्येकाला थोडंफार प्रमाणात बसतंच. परंतु पापाची बेरीज वजाबाकी केल्यास उत्पादकाला जास्त पाप बसतं. हे तेवढंच खरं आहे. कारण उत्पादकानं उत्पादनच केलं नसतं तर पाप तरी घडलं असतं का? याचं उत्तर नाही असंच येईल. तेव्हा उत्पादकांनी याचा याबाबत सारासार विचार करावा. उत्पादीत झालेल्या मालाचा वापर कसा करावा? विक्री करावी की नाही? याचाही त्यानं विचार करावा. जेणेकरुन त्याच्या हातून कोणतंच पाप घडणार नाही व त्याला पुढील काळात पश्चातापाची वेळ येणार नाही.
बैल मरतुकडा झालेला. तो म्हातारा होता. त्यामुळं त्याचा आपल्याला काहीच आता उपयोग नाही. त्रासच जास्त आहे असा विचार करुन रामदासनं त्याला कसायाला विकलं. त्याचे त्याला काही पैसेही मिळाले होते. परंतु जेव्हा त्यानं बैल कसायाला विकला. तेव्हा त्या बैलालाही समजलं. समजलं की त्याच्या मालकानं त्याला कसायला विकलं आहे. ते लक्षात येताच त्या मरतुकड्या बैलानंही डोळ्यातून अश्रू सांडवले होते.
मुकं जनावर जरी असलं तरी त्यालाही भावभावना असतातच. कधीकधी ते रडतं, अश्रू गाळत असतं, जेव्हा त्याला वेदना होतात. ते प्राणी मदत करा म्हणून हाक लावत असतात. कधीकधी आपल्याला त्या कळतही असतात. परंतु आपल्या त्यांच्याप्रतीच्या भावना ह्या मेलेल्या असतात नव्हे तर आपण त्या भावना मारलेल्या असतात. मग आपल्याला त्यांच्या भावना का कळतील? त्या कळत नाहीत. त्या न कळल्यानं आपण त्यांना कोणतीच मदत करीत नाही आणि कोणत्याच स्वरुपाची त्यांची दया घेत नाही.
रामदासनं बैल विकला. त्यानंतर जोडीचा बैल म्हणून घरच्याच गाईच्या मोठ्या झालेल्या बैलाचा उपयोग केला व एक बैल दुसऱ्याचा घेतला व तो बैल कसायाला विकला. परंतु तो बैल विकल्यानंतर रामदासला चांगले दिवस आले नव्हते. त्याचं प्रारब्धच पालटलं होतं. ते प्रारब्ध एवढं पालटलं होतं की घरी जोडी असूनही व रामदास चांगली मेहनत करीत असूनही त्याची शेती चांगली पीकत नव्हती. बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमीनी चांगल्या पीकत असत. परंतु रामदासची जमीन पीकत नसल्यानं त्याच्या घरी उपासाचे फाके पडत होते. आता शेती बरोबर पिकेनासी झाली. कधी ती शेती ओल्या दुष्काळानं खंगायची तर कधी कोरडा दुष्काळ पडायचा. ते हाल व ते प्रारब्ध हळूहळू कौशल्या आणि कचरुच्या लक्षात आलं होतं.
कचरु आज थोडा मोठा झाला होता. तो शिक्षणासोबत शेतीचं कसबही शिकला होता. तो आता घरच्या गाईच्या असलेल्या व जोडी बनलेल्या बैलाकडे विशेष लक्ष देवू लागला होता. त्याच्या खानपानावरही विशेष लक्ष देवू लागला होता आणि त्या दोघाही मायलेकानं आता ठरवूनच ठेवलं होतं की आता कितीही वाईट परिस्थिती आली तरीही आपण कोणत्याही बैलाला कसायाला विकायचं नाही. त्यांना आपल्याच खुंटीवर मरु द्यायचं.
कचरु शिकत होता शाळा. तशी त्याला रविवारीच सुट्टी असायची. त्या दिवशी तो बैलाला चारत बसायचा अंधार पडेपर्यंत. बैलाचे पोट ठुम्म भरले की मग तो त्यांना घरी आणायचा.
रामदासची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. तसं आता त्याचं दारु पिणंही वाढलं होतं. रामदास आता जास्त दारु ढोसायला लागला होता. त्यातच आता गाठीचा पैसा पुरेनासा होत होता. रामदास कधीकधी सकाळीच दारु ढोसून राहायचा. बैलाची चिंता त्याला नसायची. त्यामुळंच बैलं खुंटावरच बांधून राहायची. अशातच दुपार व्हायची व तेव्हा बैलाला भूक लागायची. बैलं हंबरडा फोडायची. परंतु रामदासची दारु उतरलेली नसायची. तेव्हा कौशल्याला त्या बैलाची दया यायची व ती ते बैल घेवून शेतावर जायची. कधीकधी कचरुही.
सरकारच्या आदेशानुसार कचरुची शाळा दुपारी झाली होती. आता त्याला बैलं शेतावर नेता येत नव्हते. परिस्थिती नाजूक असल्यानं व घरी उपासमार होत असल्यानं कौशल्या लोकांच्या मजुरीला जाई. त्यातच रामदास दारु पिवून पडला असल्यानं बैलं घरीच बांधलेली असायची. कधीकधी कौशल्या बैलाला वैरण टाकून ती कामावर जात असे. कधी बैलाला चारण्यासाठी कचरु शाळेला बुट्टी मारत असे. तो तरी काय करणार होता. शाळेला बुट्टी मारण्याशिवाय त्याचेजवळ पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यास शाळेतील काही शिक्षक ओरडायचे. काही मात्र लाड करायचे. त्यांना परिस्थिती माहीतच होती. तसेच ते शिक्षक मध्यान्हं जेवनही कचरुला जास्त द्यायचे. आज रामदासचा ताल पाहता कचरुला शेतकरी बनावसं वाटत नव्हतं. परंतु ते प्रारब्ध त्याला शेतीकडेच ढकलत होतं. अशातच तो शेतीचं सारं कसब शिकला होता. शेती नांगरणे, वखरणे, डवरणे या साऱ्या बाबी त्याला शिकवाव्या लागल्या नाहीत. त्या त्यानं आपोआपच हस्तगत केल्या होत्या. आता त्याला नांगराला कसं बांधायचं वा वखर कसा जुंपायचा. बैलबंडी कशी हाकायची. या सर्व गोष्टी येत होत्या. अशातच जोडीचा एक बैल म्हातारा झाला व एक दिवस तो बैल मरण पावला.
घरच्याच गाईचा गोरा. तो वयोवृद्ध झाला व एक दिवस तो मरण पावला. तो मरण पावताच कचरु आणि कौशल्यानं एक खड्डा खणला. त्यांना वाटत होते की त्या बैलानं आपली एवढी सेवा केलेली आहे. त्याला दफन करावं. त्याही दिवशी रामदास पिवूनच होता सकाळ पासून.
कौशल्या व कचरु खड्डा खणून होते बैलाला दफन करण्यासाठी. तोच रामदासची दारु उतरली. त्यानं पाहिलं की बैल मरुन पडलेला आहे. कचरु व कौशल्या खड्डा खणत आहेत. तसं ते दृश्य पाहताच रामदासला चीड आली. त्याला वाटत होतं की त्या मेलेल्या बैलाला रानात नेवून फेकून द्यावं. पुरु नये. परंतु कचरु आणि कौशल्या त्याला पुरत होते. ते पाहून त्याचा राग अनावर होत होता. तो शैतानासारखा त्यांना काहीबाही बोलत होता नव्हे तर दगडंही मारत होता. परंतु कचरु अन् कौशल्या त्याच्या दगडं मारण्याला जुमानले नाहीत. त्यांनी खड्डा खणलाच व त्यांनी दफन करुन टाकलं बैलाला. त्यानंतरच त्यांनी मोकळा श्वास घेतला.
त्या बैलाचं नाव खंडू होतं. ते नाव कचरुनंच ठेवलं होतं. ते मरण पावताच त्याच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. जणू त्याला तो बैल म्हणजे आपल्याच परिवारातील एक सदस्य वाटत होता.
तो बैल तसा कचरु अन् त्याच्या आईनं पुरुन टाकला. त्यानंतर काही दिवस असेच गेले. आता घरी एकच बैल होता. त्या एकट्या बैलानं शेती करणं जमत नव्हतं. तसा रामदास त्याला विकून टाकायच्या गोष्टी करीत होता. परंतु कौशल्या व कचरु त्याला विकायची बंदी घालत होते. त्यांचं मत होतं की एखादा जोड बैल विकत घ्यावा व शेती करावी. दुसरा बैल देईल केव्हा व आपल्याला शेती चांगली करता येईल केव्हा? तशी बैलं नसतानाची परिस्थिती कौशल्यानं अनुभवलीच होती. शेवटी त्यांनी एक बैल विकत घेतला. ज्या बैलाची किंमत कमी होती.
तो बैल.......तो बैल थोडा लंगडत चालत होता व चालतांना त्याचे मागचे पाय फुटत होते. परंतु परिस्थिती अशी होती की रामदास चांगला बैल घेवू शकत नव्हता. कारण चांगल्या बैलाची किंमत ही बरीच होती.
तो बैल विकत घेताच त्या बैलानं अगदी म्हातारपणापर्यंत रामदासला साथ दिला. आता जोडी म्हातारी झाली नव्हती. परंतु रामदास म्हातारा झाला होता.
रामदास म्हातारा झाला होता. परिस्थिती साथ देत नव्हती. तरीही लढत होते ते तिघेही जण परिस्थितीशी. कसेतरी या दरम्यान रामदासनं आपल्या दोन्ही मुलीचे विवाह पार पाडले व आता तो त्याची पत्नी व मुलगा कचरु सोबत जगत होता. अशातच तो एकदाचा दिवस. रामदास आजारी पडला. तो एवढा आजारी पडला की त्याला शहरातील मोठ्या रुग्णालयात भरती करणं भाग होतं. त्याला शहरातील रुग्णालयात नेलं व भरती केलं. या दरम्यान कौशल्याला बैलाच्या जोडीची चिंता पडली. ती कुठं ठेवावी याचा विचार होताच. शेवटी तिनं विचार केला की आपण आपले बैलं शेजारी राहात असलेल्या आपल्या भावाकडे ठेवावीत. भाऊ आपला आहे. तो त्यांची चांगली काळजी घेईल.
कौशल्याचा तो विचार. तिला काय माहीत होते की रामदास जास्त दिवस भरती राहील की कमी दिवस? तो सुधारणार की नाही? तसाच तिचा भाऊ दगाबाजी करेल की बैलाला सांभाळेल?
रामदासची प्रकृती जास्तच खराब होती. तो रुग्णालयात अगदी चालत चालत गेला होता. परंतु तो आता भरती झाला तेव्हापासून उठू शकत नव्हता. अशातच गावावरून कौशल्याच्या भावाचा निरोप आला. बैलाची देखभाल होत नाही. ती बैलं कोणाकडं ठेवावीत. नाहीतर विकून टाकावीत.
ती बैलं.......एकीकडं ती बैलं होती तर दुसरीकडं रामदास होता. एकीकडं बैलाला ठेवण्याची चिंता होती तर दुसरीकडं रामदासच्या तब्येतीची चिंता होती. काय करावं कौशल्याला सुचत नव्हतं. तिही तशी म्हातारीच झाली होती. तिनं कचरुला विचारलं, 'काय करावं?' कचरुही तसा लहानच. शेवटी निर्णय झाला. बैलाची जोडी विकून टाकावी. त्यात जो पैसा येईल. तो पैसा रामदासच्या उपचाराला लावता येईल.
बैलं विकायचा प्रश्न. परंतु ते बैलं स्वतः जावून विकावे कसे? तोही प्रश्न होताच. शेवटी आपले प्रारब्धच समजून कचरु विचार करु लागला. बापाची तब्येत पाहून आईच्या भावाला बैल विकणं आलं काय? तो मनोमन तडफडू लागला. तसा तो शिव्याशाप देवू लागला. परंतु प्रारब्धच ते. त्या प्रारब्धासमोर कोणाचं चालत नाही म्हणतात. कचरुचंही तेच झालं. कचरुच्या मनाची इच्छा नसतांनाही त्यानं बैलं विकण्यास परवानगी दिली. वाटत होतं की बैलं चांगली धष्टपुष्ट आहेत. त्याची किंमत चांगली येणार. परंतु ती बैलं कौशल्याच्या भावानं अतिशय अल्प किंमतीत विकली होती. तशीच ती बैलं त्यानं कसायालाच विकली होती. जी त्यानं आम शेतकऱ्यांना विकायला हवी होती. शिवाय विकल्या किंमतीतील बराच पैसाही खाल्ला होता. परंतु प्रारब्धच ते. प्रारब्धासमोर कुणाचं चालतं? कुणाचंच नाही. तेच घडलं कचरुबाबत. कचरुही त्यावर बोलू शकला नाही. अशातच रामदासला ती गोष्ट माहीत होताच तो धसक्यानं रुग्णालयातच मरण पावला होता.
रामदास मरण पावला होता. तेव्हा कचरु जवळ पैसा नव्हता. मयत कशी करावी असा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता. त्यातच त्यानं आपल्या बापाची मयत आपल्या बहिणीला करायला लावली. कारण तीच एक होती. जी सक्षम होती व जिचा पती सरकारी नोकरीत लागला होता.
रामदास मरण पावला होता. परंतु तो मरण पावताच विश्वकोटीचं दारिद्रय कचरुच्या वाट्याला आलं. कसं जगावं, कसं नको हे कचरुला समजेनासं झालं. आई तशी पाहता म्हातारीच होती. गावाला शेती होती. परंतु ती करण्यासाठी कचरुजवळ पैसेही नव्हते. ना आता बैलाची जोडीही. त्याला प्रश्न पडला होता. अशातच आता पोट ही महत्वाची बाब असल्यानं कचरुची आई कामाला जावू लागली होती.
कचरुचं शिक्षणाचं वय होतं. त्याच शिक्षणाच्या वयात कचरुचा बाप देवाघरी निघून गेला होता. हालत गंभीर होती. जणू असं वाटत होतं की शिवधनुष्य आहे. परंतु ते चालवता येणं शक्य नाही. तशीच गोष्ट घडली होती कचरुच्या जीवनात. मात्र कचरुनं हार मानली नाही. तो लढतच राहिला नियतीशी.
काही दिवस निघून गेले. कचरुचं शिक्षण पुर्ण झालं होतं. त्याचबरोबर त्याच्यात शिवधनुष्य पेलविण्याचं सामर्थ्य आलं होतं. त्यातच त्याला एका ठिकाणी सरकारी नोकरीही चालून आली आणि तो सरकारी नोकरीत लागला.
ती सरकारी नोकरी. ती सुखाची सरकारी नोकरी होती. त्या सरकारी नोकरीत त्याला काहीच समस्या नव्हती. सगळं सुखच सुख पायाशी लोळण घेत होतं. मात्र ती सरकारी नोकरी जरी सुखाची असली तरी कचरुला त्या नोकरीत सारस्य वाटत नव्हतं. त्या नोकरीत करमत नव्हतं. त्यामुळंच की काय, त्यानं ती नोकरीच सोडून देण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला शेती आवडत होती.
शेती ही शेतकऱ्यांची माय होती. परंतु ती पिकत नव्हती. त्यामुळंच कोणीही शेती करायला धजत नव्हते. सगळे सरकारी नोकरी करु पाहात होते. परंतु सरकारी नोकरी शेतकऱ्यांच्या लेकरांना मिळेल तेव्हा ना. कचरुला तर चालत चालत अगदी निःशुल्क नोकरी अन् तिही सरकारी नोकरी आली होती. त्या नोकरीवर त्यानं पाणी फेरलं होतं. त्याची ही कृती चांगली नाही असे सगळेजण म्हणत होते. म्हणत होते की त्याला पुढील काळात पश्चातापाची वेळ येईल. परंतु कचरुला त्यात काहीएक वाटत नव्हतं. उलट आनंद वाटत होता.
अलिकडील काळात शेतकरी वर्गाला सन्मान मिळत नाही. त्यांची सतत हेळसांड केली जाते. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. जरी तो उत्पादनकर्ता असला तरी. समजा त्यानं जर माल उत्पादीतच केला नाही तर सबंध जगच उपाशी राहिल वा उपासमारीनं तडपून मरेल यात शंका नाही.
शेतकरी जीवन. अतिशय दुःखाचं असतं शेतकरी जीवन. हे जीवन जो जगतो, त्यालाच कळत असतं. म्हणूनच आजचे शेतकरी आत्महत्या करु लागले आहेत. कारण अलिकडील काळात शेती ही परवडत नाही. त्याचं कारण आहे. शेतीत होत असलेलं नुकसान. शेतीत एवढं अतोनात नुकसान होत असतं की कोणीही शेती करायला पुढं येत नाही.
शेतीत नुकसान होतं. कोणतं नुकसान होतं? तसं पाहता सगळेच जण म्हणतात की शेती परवडत नाही. मग काही भागात शेतकरी मालामाल का असतात बरे?
खरे शेतकरी मुळात मालामाल नसतात. कारण त्यांना शेती करतांना बऱ्याचशा गोष्टीला समोर जावं लागतं. जसे रात्रीला शेताला पाणी देणे. त्यातच रात्रीला विंचू, साप चावण्याची भीती असते. कधी कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो. कधी वीज पडते तर कधी गारा. या सर्व गोष्टीनं शेतकरी मरण पावतो. शिवाय कधी कधी शेतातील उभं पीक करपतं. त्यामुळंही शेतीचं अतोनात नुकसान होत असतं. कधीकधी शेतात अनेक तृण खाणारे प्राणी येत असतात. ते खाणं कमी व नुकसानच जास्त करुन जात असतात. कधी कधी माल निघत असतांना अवकाळी पाऊस येतो व कधी गारा येतात व संबंध मालाचं नुकसान होतं. एवढा निसर्गाचा कोप होवूनही जेव्हा शेतातील माल हातात येतो. तेव्हा मात्र भाव पडलेले असतात. त्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही. लावलेला खर्चही निघत नाही व अवकळा येते. त्यातच ज्यावेळेस शेतकरी शेतात पीक लावतो. तेव्हा भाव तणलेले असतात. लागत म्हणून लागणारा माल अर्थात बियाणे हे डबल तिब्बल किमतीचे असतात. त्याला लागणारं रासायनिक खत, किटकनाशक हेही जास्त महाग असतात. कधी कधी हा खर्च विकलेल्या मालातूनही निघत नाही. यातूनच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते.
शेतकरी हा हवालदील असतो. साऱ्याच समस्या त्याच्यासमोर आ वासून उभ्या राहतात. परंतु तो स्वतःच त्या समस्यांचा निपटारा करतो. कुणालाही मदतीसाठी हाक देत नाही. स्वतःच कुढत कुढत जीवन जगत असतो. ना त्याला मदत करायला परीजन धाव घेत. ना त्याला मदत करायला सरकार कामात येत.
महत्वाची बाब ही की आपल्या या शेतकऱ्यांच्या समस्या पाहिल्या तर त्या कितीतरी प्रमाणात जास्त आहेत. त्यामानानं दुःखही शेतकऱ्यांसाठीच निर्माण झालं की काय, असंच वाटायला लागतं. तरीही तो कोणत्याच समस्येबाबत ना कुरकूर करत, ना कोणत्याच समस्येबाबत तक्रार करत. तो सदैव आनंदात असतो. आनंदात जगतो. जगणे शिकवतो. मग आपण कोण आहोत की जे त्यांना त्रास देतो. त्यांच्या निर्माण केलेल्या मालात उणीवा काढतो. त्यांच्या मालाला व्यवस्थीत भाव देत नाही. त्यांना हिन लेखतो. त्यांच्याबद्दल आपल्या मनात हिनतेची भावना ठेवतो. एकंदरीत सांगायचं झाल्यास आपणही शेतकऱ्यांबाबत सहानुभूती बाळगावी. सहानुभूतीपूर्वक व्यवहार ठेवावा. त्यांचीही काळजी घ्यावी. आपल्या मनात त्यांच्याबद्दल हिनतेची भावना ठेवू नये. व्यक्त तर अजिबातच करु नये. त्यांनाही सन्मान द्यावा. सन्मानपूर्वक व्यवहार ठेवावा. कारण ते आहेत, म्हणून सगळे लोकं आहेत. सगळे लोक जीवंत आहेत. जर त्यांनी कोणताच माल उत्पादीत केला नाही वा उत्पादीत करण्याचा प्रयत्न केला नाही तर कोणताच मनुष्यजीव आज जीवंत दिसणार नाही हे तेवढंच खरं आहे. कारण उत्पादनकर्त्याशिवाय कोणताच माल उत्पादीत होत नाही आणि मानवाला खायला लागणारा सर्व माल हा शेतकरीच निर्माण करतो. दुसरा कोणी नाही. म्हणूनच शेतकऱ्यांचीही इज्जत व्हावी. त्यांचाही सन्मान व्हावा. त्यांचाही आज सन्मान होण्याची गरज आहे. यात शंका नाही.

**************************************

कचरु शेती करु लागला होता. जी शेती परवडत नव्हती व ज्या शेतीवर कोणत्याच स्वरुपाची इज्जत मिळत नव्हती. अशाच शेतीत राबत होता तो. त्यातच कोणीही शेती करायला पुढं येत नव्हता. त्या काळात कचरु शेती करायला समोर आला. शिवाय शिकलेली मंडळी शेती पिकत नाही. म्हणून शेती करीत नव्हते. त्याच शेतीवर कचरु एवढा शिकूनही राबत होता. एव्हाना सरकारी नोकरीवर लागलेली मंडळी कधीच शेतीत राबायचा विचार करीत नव्हते. त्याच शेतीत कचरु आता सोनं पिकवू लागला होता.
कचरुनं शेती हा व्यवसाय निवडला होता उदरनिर्वाहासाठी. तो उत्पादन काढत होता आपल्या शेतीतून. आता त्यानं बैलं घेतली नव्हती. तर तो आता ट्रॅक्टरनं शेती करु लागला होता. त्याचा उद्देश होता शेतीचं आव्हान स्विकारणं.
लहानपणापासूनच त्यानं शालेय जीवनात हस्तगत केलं होतं भविष्यवेधी शिक्षण. त्या शिक्षणानुसार स्वतः प्रेरीत होणं. स्वतःत जिज्ञासा निर्माण होवू देणं. तसंच आव्हान स्विकारणं. ह्या गोष्टी कचरुनं हस्तगत केल्या होत्या. त्यानुसार त्यानं आता शेतीचे आव्हान स्विकारले होते व तो आता शेती करीत होता. मात्र आजही शेतीतून पाहिजे त्या प्रमाणात सन्मान मिळत नव्हता. त्यामुळंच की काय, त्यानं शेती करीत असतांना शेतीला पुरक व्यवसाय म्हणून बकरीपालन सुरु केलं. परंतु त्याचं बकरीपालन हे कसाई स्वरुपाचं नव्हतं तर तो त्याच्या लेंड्यांचा वापर लेंडीखत म्हणून करीत होता. शिवाय ते लेंडीखत एवढं कामाचं होतं की ते शेतात टाकल्यावर त्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू लागलं होतं.
कचरु अभ्यास करुन शेती करीत असे. तो अभ्यास करीत असे की शेजारील शेतकऱ्यानं कोणता माल लावला. त्यांनी जर शेतात कापूस लावला असेल तर तो आपल्या शेतीत दुसराच माल लावत असे. त्यामुळं साहजीकच त्यानं लावलेला माल जास्त पैशात जात असे. त्याचं कारण होतं मालाची कमतरता. उत्पादीत झालेला तो माल अतिशय कमी प्रमाणात उत्पादीत व्हायचा. त्यामुळं साहजीकच त्याचं मुल्य जास्त असायचं. मात्र ह्या गोष्टी इतर शेतकरी वर्गांना समजत नव्हत्या.
ती एका वर्षाची गोष्ट. त्या वर्षी टमाटर स्वस्त झाले होते. लोकांना टमाटर आपल्या बैलांना चारावे लागत होते. एवढं प्रचंड प्रमाणात नुकसान केलं होतं टमाटरनं की लावलेली लागतही निघाली नव्हती. त्यामुळंच की काय, यावर्षी लोकांनी टमाटर लावले नव्हते. कचरुनं हीच गोष्ट हेरली व त्यानं यावर्षी टमाटरची शेती केली. त्यातच यावर्षी टमाटर कमी प्रमाणात उत्पादीत झाले होते व अचानक भाव वाढला. ज्यातून कचरुला फार मोठ्या प्रमाणात फायदाच झाला होता. कारण बाजारपेठेत टमाटर कमी प्रमाणात होते व मागणी जास्त प्रमाणात होती.
कचरुला अतोनात टमाटर उत्पादनातून झालेला फायदा पाहून लोकांनी यावर्षी टमाटर लावले होते. परंतु कचरुनं यावर्षी शेतात टमाटर लावले नाहीत. त्यानं यावर्षी शेतात औषधी वनस्पतीची लागवड केली होती. त्या औषधी वनस्पती, ज्याला प्राण्यांनीही तोंड लावलं नव्हतं. यावर्षीही कचरुलाच फायदा झाला होता.
कचरु शेती करीत होता. त्याच्या शेती करण्याचं तंत्र वेगळं होतं. ते तंत्र त्यानं अभ्यासातून हस्तगत केलं होतं. कधीकधी तो शेतकरी लावत असलेला माल लावायचा तर कधीकधी तो वेगळाच माल लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का द्यायचा. तसं पाहता कचरु आपल्या शेतात एकच एक माल पेरत नव्हता तर तो कधी वेगवेगळ्या प्रकारचा माल पेरायचा. शिवाय तो आपल्या शेतजमीनीचे काही भाग पाडायचा. त्यात तो एकाच हंगामात वेगवेगळा माल टाकायचा. या तंत्रानुसार समजा एखादा माल बुडालाच तर त्यात नुकसान होत असे. तेच नुकसान तो दुसऱ्याच पेरलेल्या मालातून भरुन काढत असे. या त्याच्या तंत्रानुसार त्याला कधीच शेतीतून नुकसान झाले नाही. फायदाच फायदा होत गेला होता.
कचरुला शेती ही नोकरीपेशापेक्षाही फायद्याची वाटू लागली होती. कारण तो यांत्रीक शेती करु लागला होता. परंतु त्याला ती शेती करतांना कधीकधी नुकसानही शोधावं लागत होतं. त्याचं कारण होतं. निसर्गाची अवकृपा. तो विचार करीत होता त्यावर. निसर्गाची अवकृपा होणार नाही यावर काहीतरी उपाय करण्याचा. तसं पाहता तो संशोधनार्थी शेती करु लागला होता.
निसर्गाची अवकृपा होणार नाही व कोणत्याही मोसमात शेतीवर गारांचा वर्षाव होणार नाही. यावर काय करता येईल. क्षणातच त्याला आठवलं होतं की निसर्ग हा अवकृपेनंच बरसतो. याचाच अर्थ असा की अवकाळी पाऊस जेव्हा येतो. तेव्हा पिकांना तो सहन न झाल्यानं पीकं करपतात. गारा येतात, तेव्हाही गारांचा मारा सहन न झाल्यानं पीक कोलमडून पडतं व नुकसानच होतं. यावर उपाय म्हणजे आच्छादन. जर वरुन आच्छादन टाकलं तर........विचारांचा अवकाश त्यानं लहान लहान वाफे तयार केले व त्या वाफ्यांना अवकाळी पावसापासून वाचविण्यासाठी वरुन आच्छादन दिलं परंतु यात त्याचं तीव्र नुकसानच झालं होतं. कारण या प्रयोगात त्यानं तयार केलेल्या वाफ्यांवरच्या आच्छादनानं सूर्यप्रकाश वाफ्यापर्यंत न पोहोचल्यानं पुर्ण वाफेच कोमेजले होते.
अवकाळी पावसाची भीती. त्यानं आतापर्यंत प्रयोग करीत करीतच शेती केली होती. कधी वेगवेगळी पीकं लावली होती आलटून पालटून तर कधी औषधीची झाडं लावली होती. तसं नुकसान झालं नव्हतंच. परंतु तो एक वर्ष त्यावर्षीच्या खरीप हंगामात अवकाळी पाऊस बरसल्यानं पिकांचं नुकसानच झालं होतं. कारण शेतात जो माल होता. त्या भरल्या मालाला अंकुर फुटले होते तर रब्बी हंगामात आलेल्या गाराच्या अवकाळी पणानं पीक कोलमडून गेलं होतं. परंतु कचरुनं हिंमत हारली नाही.
कचरु विचार करु लागला होता. संपुर्णतः अवकाळी पावसावर विजय मिळविण्याचा. त्याला वाटत होतं की शेती परवडते जर अवकाळी पावसाला थांबवलं तर. त्याचाच विचार करुन तो पावलं टाकत होता. तो विचार करु लागला. किडीचं नियंत्रण करायचं झाल्यास त्यावर किडनाशक फवारता येतं. पीक चांगलं येण्यासाठीही औषध्या आहेत. तसं अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस थांबविण्यासाठीही वरुन टिनाच्या पत्र्याचं आच्छादन देता येईल. परंतु सूर्यप्रकाश. तो कसा द्यावा. त्याच विचारात तो रात्रंदिवस गढून राहात होता. परंतु जेव्हा त्याला त्याच्या आईनं त्याच्या वयाची कल्पना दिली व म्हटलं की कचरु तुझं वय झालंय. आता माझ्याच्यानंही कामं जमत नाहीत. तेव्हा त्यानं तो विचार तूर्तास मागं ठेवला व आता तो विवाहासाठी मुली शोधू लागला होता.
कचरुचं वय झालं होतं. परंतु विवाह करावा असा विचार तो करीत नव्हता. अशातच त्याच्या आईनं म्हटलेले शब्द त्याला बोचले व तो विवाहासाठी तयार झाला आणि मुली शोधू लागला. परंतु कचरु जरी जास्त शिकला असला तरी त्याला मुली मिळेना. कारण होतं त्याचं शेती करणं. मोठमोठ्या उच्च शिक्षण घेतलेल्या मुली म्हणत होत्या की शेती करणं अनपढाचं काम असतं. एखादा अडाणी माणूसही चांगली उत्तम शेती करु शकतो.
त्या मुलींचंही बरोबर होतं. कारण शेती ही अडाणी व्यक्तीही शेजाऱ्यांना विचारुन करीत असे. त्याचे कारण होते त्यांना असलेला अनुभव. ते जरी शिक्षणानं मागं टाकले असले वा त्यांना लिहिता वाचता येत नसलं तरी त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या शेती करण्यात गेल्या होत्या. तोच वारसा त्यांना लाभला होता. त्यामुळंच त्यांना शेती चांगली करता येत होती. जणू त्यांच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे ती माणसं अनुभवाच्या वर्गात शिकली होती. ते पुस्तकी किडे नव्हते तर अनुभवाचे किडे होते.
शेती महत्वाची होती. तिथं अनुभव महत्वाचा होता. तशा अनुभवाच्या जोरावर बाकीचे शेतकरी शेती करीत. ते फक्त अनुकरणाला प्राधान्य देत. दुसरा शेतकरी काय करतो. तसंच ते करीत. परंतु स्वतःच्या मनानं शेती करीत नसत. मात्र कचरु शिकला असल्यानं तो काही कुणाच्या अनुकरणाने शेती करीत नव्हता.
कचरुनं निरीक्षण केलं होतं की बरीचशी मंडळी शेती करणं परवडत नसल्यानं शेती विकत असतात. ती शेती भुमाफिया घेत असतात. ते त्याच चांगल्या राबत्या शेतीला बंजर बनवीत असतात व सरकारला दाखवीत असतात की त्या शेतीत काहीच पीकत नाही. ती बंजर आहे. त्यामुळंच त्या शेतीचा वापर आम्हाला वसाहत टाकू देण्यासाठी करु द्यावा. मग सरकारी माणसं त्या शेतीची पाहणी करीत. तपासणी व चौकशीही करीत. त्यानंतर त्या शेतीच्या वसाहतीसाठी वापराची परवानगी देत. अशा बऱ्याचशा शेत्या आज बंजर झाल्या होत्या. भुमाफियातील लोकं शेतकऱ्यांना शेतीचे भरपूर पैसे देत. बदल्यात त्याच जमीनीवर वसाहतीचे प्लॉट पाडून कितीतरी जास्त प्रमाणात कमाई करुन जात. परंतु त्यात एक समस्या होती. ती म्हणजे जमीनीची आधीच जमीनी कमी होत्या. त्यात त्या जमीनी पीकत नसल्यानं व बंजर होत असल्यानं त्या कमी होत चालल्या होत्या. त्यामुळं कचरुला चिंता पडली होती भावी पिढीची. भविष्यात अशाच शेतीत पडणाऱ्या अवकाळी पावसाला कंटाळून लोकं शेती विकतील व शेती विकल्यानं जमीनी कमी होतील व जमीनी कमी झाल्यानं अन्नधान्य कमी पीकेल. तसंच अन्नधान्य कमी पीकत असल्यानं वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा करता येणार नाही. ही संभाव्य भीती कचरुच्या मनात होती. त्याचाच विचार करीत असता तो त्या संभाव्य भीतीसाठी पावलं उचलीत होता. म्हणूनच तो शेतकरी बनला होता.
कचरुला वाटत होतं की आपण शेतीला चांगले दिवस आणून द्यावेत. जेणेकरुन प्रत्येकजण शेती करु लागेल. प्रत्येकाला शेती हवीहवीशी वाटेल, आवडेल. तसं पाहिल्यास त्याचं आतापर्यंत निरीक्षण होतं. शेतकऱ्यांचीच मुलं शेती करतात. बाकी लोकं शेती करायला धजत नाहीत. परंतु शेतकऱ्यांची मुलं जेव्हा शिकतात. ते उच्च शिक्षण घेतात. त्यानंतर अशी उच्चशिक्षीत झालेली शेतकऱ्यांची मुलं शेती करीत नाहीत. ती मुलं शेती करणं ही गोष्ट शरमेची बाब समजतात. ते नोकरी करु पाहतात. तशी त्यांना एखाद्या कंपनीत नोकरी मिळाली की ते ती शेती विकून टाकतात. काही काही मुलं तर शेती आपल्याला सरकारी नोकरी लागावी म्हणून विकूनही टाकतात. अशानं शेती करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे व शेतीही कमी होत चालली आहे. आपण शेती कमी होवू द्यायची नाही. शेती करणाऱ्यांचीही संख्या कमी होवू द्यायची नाही. त्यासाठी उच्चशिक्षीतांनी शेतीत यावं. त्यांनी शेती करावी. जेणेकरुन शेतीला जास्त महत्व येवू शकेल. जो तो शेती करु शकेल व शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकेल. जेव्हा अशा प्रकारचं जास्तीत जास्त उत्पादन शेतीतून मिळालं की आपोआपच शेतीचं महत्व वाढेल. असं कचरुला वाटत होतं. म्हणूनच तो उच्चशिक्षीत असूनही शेतीत आला होता. त्यातच त्याला सरकारी नोकरी लागलेली असतांनाही केवळ शेती करण्यासाठी त्यानं सरकारी नोकरी सोडली होती.

************************************************

आज काळ बदलला होता. शिक्षण सर्वांना खुलं झालं होतं. जो तो शिक्षण शिकू लागला होता. मग ती मुलं शेतकऱ्यांची असली तरी, ती मुलं शेती करीत नसत. ती शिकू लागली होती. उच्च शिक्षण घेवू लागली होती. परंतु ती उच्चशिक्षीत झाली की त्यांचा कल शेती करण्याकडे नसायचा. हेच हेरलं होतं कचरुनं. त्याला वाटत होतं की त्यांनी शिकावं. उच्चशिक्षण घ्यावं. उच्चशिक्षीतही व्हावं. परंतु शेतीला सोडू नये. कारण शेती ही आपल्याच आईसारखी आई आहे. आपली आई जशी आपल्याला दूध पाजून पोषते. तशीच शेतीही आपल्याला अन्न देवून पोषते.
शेतीचा ध्यास काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. अशातच त्याची आई त्याला विवाह कर असंही म्हणत होती. त्यातच त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. आईचं ऐकावं की शेतीचे प्रयोग करावेत. विचारांती त्यानं विचार केला की शेतीचे प्रयोग जीवनभरच करायचे आहेत. आधी विवाहासाठी मुलगी पाहावी.
शेतीचा ध्यास कचरुनं मागं टाकला व तो आता आपला विवाह करण्यासाठी मुलगी शोधू लागला. परंतु त्याला मुलगी चांगली सापडेल तेव्हा ना.
मुलगी.........मुलगी शोधत असतांना एक मुलगी त्याला विवाह करण्यासाठी सापडली. तसं पाहता तो उच्चशिक्षीत असल्यानं कमी शिकलेलीही मुलगी त्याचेशी विवाह करु इच्छीत नव्हती. अन् जास्त शिकलेल्या मुलीही तो शेतकरी असल्यानं विवाह करु पाहात नव्हत्या. शेती म्हणजे निदानची भीक नाहीतर कास्तकारी शिक असे मानत होत्या. त्यांचे आईवडीलही अगदी तसंच समजत होते.
शेतीला महत्व नव्हतं. शेतीत राबणारा प्रत्येक जीव सांगत होता की शेती परवडत नाही. तशी वास्तविकता कृतीत दिसत होती. शेतकरी लोकं सर्रासपणानं आत्महत्या करतांना दिसत होते. काहींच्या आत्महत्या शेती न पिकण्यानंच होत होत्या तर काहींच्या आत्महत्या वेगळ्याच कारणानं. परंतु त्याला शेतीची जोड दिली जात होती.
शेतीला महत्व नसल्यानं व शेती परवडत नसल्यानं शेतकऱ्यांशी विवाह करायला त्या काळातील मुली धजत नसत. त्याचं कारण होतं शेती पीकत नसल्यानं होत असलेली आत्महत्या. परंतु त्याला एक मुलगी अशीही सापडली की जिची शेतकरी मुलांशीच विवाह करण्याची इच्छा होती. तिही उच्च शिकलेलीच होती. तिच्या आईला वाटत होते की जर खाजगी नोकरी वा काम करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालाच तर मुलीला पदर खोचून कामाला निघावं लागतं. परंतु शेती जर असली तर ती शेती विकून तरी मुलगी पोट भरु शकते वा शेती भाड्यानं देवून तरी मुलगी पोट भरु शकते. त्या मुलीचं नाव रंजना होतं.
रंजना तिचं नाव. ती मुलगी वाह्यात होती. ती मुलगी वाह्यात असल्यानं तिचा अजूनपर्यंत विवाह झाला नव्हता. तसा तिच्या वाह्यातपणाचा इतिहास होता.
तो आठवीचा वर्ग.......तो आठवीचा वर्ग होता की तिचं प्रेम एका मुलाशी झालं होतं. ते एकतर्फी प्रेम होतं. प्रेम त्याला नव्हतं तर ते प्रेम तिलाच होतं. त्याचं हासणं बोलणं चांगलं होतं. तसा तो दिसायला देखणा होता. त्याचं नाव अखिल होतं.
अखिल लहानाचा मोठा झाला होता आणि रंजनाही. दोघंही एकाच वर्गात होते. तसे ते लहान असतांना एकमेकांशी बोलत असत. परंतु केव्हा ते वयात आले ते त्यांना कळलंच नाही. अशातच रंजना त्याचेवर प्रेम करु लागली होती.
रंजना पाहायला तेवढी चांगली नव्हती. मात्र अखिल सुंदर होता पाहायला. शिवाय अभ्यासातही हुशार होता. त्याला वाटत होतं की तिनंही अभ्यास करावा व चांगले गुण घ्यावे.
अखिलला आवडत होती चांगली मुलं. त्याचं कारण होतं आदर्शपण. आदर्शपणाच्या झंझावातात मुलं घडत असतात. मुलांवर चांगले संस्कार होत असतात, असं त्याच्या बापानं सांगीतलं होतं. तसेच चांगले संस्कार ज्याच्यावर असतात. अशाच मुलांशी मैत्री करावी असंही त्याच्या बापानं सांगीतलं होतं. व्यतिरिक्त सांगीतलं होतं की पहिलं आपलं शिक्षण पाहावं. त्यानंतर आपली नोकरी पाहावी. मग प्रेम करावं. त्यामुळंच की काय, तो ना रंजनाशी प्रेम करीत होता. ना कुण्या मुलीवर. तो केवळ बोलत होता. मनोरंजन म्हणून. परंतु रंजनाचं ते प्रेम करणं वाटत होतं. तसं तिला त्याचा स्वभाव पाहून वाटायचं की त्यानं तिच्यावर प्रेम करावं.
ते तिचं वयात येणं. त्यातच ते शरीराचं आकर्षण. तसं आकर्षण वयात येतांना प्रत्येकच मुलामुलीत असतं. जे रंजनातही होतं. रंजनानं अखिलवर प्रेम करुन पाहिलं. परंतु अखिल भाव न देत असल्यानं रंजनानं आपला मोर्चा वळवला व ती आता दुसऱ्याच मुलाच्या नादात लागली. त्यानंतर ती अशीच प्रेम करीत करीत अनेक मुलांशी तिनं गट्टी जमवली. त्यातच तिनं आपल्या आशा आकांक्षाही पुर्ण केल्या. ती बोलत होती प्रत्येक मुलांशी आत्मियतेने. कारण तिला जळवायचे होते अखिलला. परंतु अखिल काही तिच्या वागण्याचं जळत नव्हता. ना तिच्या हरकती त्याला जळवणाऱ्या होत्या. कारण त्याच्यासमोर ध्येय होतं शिक्षणाचं. जे त्याच्या बापानं त्याच्यासमोर ठेवलं होतं.
रंजना आठवीतून नववीत गेली. पुढं ती दहावी, बारावी व महाविद्यालयातही. परंतु तिचा तो मिस्कीलपणा आणि स्वच्छंदीपणा तिला भोवत होता. तिचं वागणं जरी चांगलं असलं तरी ते वागणं वाह्यात वागण्यासारखं दिसत होतं. ती कधीकधी वडीलांसोबत समाजातील नात्यातील लोकांच्या विवाहसमारोहाला जायची. त्यातच तशी ती जात असतांना तिला आठवायचं तिचं ते एकतर्फी प्रेम. आजपर्यंत तिला प्रेम मिळालं नसायचं. त्यामुळंच ती आपल्याच नातेवाईकाच्या विवाह समारोहातही असेच प्रेमाचे जाळे टाकून पाहायची. परंतु ते द्वितर्फी प्रेम तिच्या प्रारब्धातच नव्हतं. मग कसं होणार द्वितर्फी प्रेम? याच द्वितर्फी प्रेमातून ती बदनाम झाली होती.
संस्कार.......आदर्श संस्कार.......संस्काराच्या बाबतीत कोणीही म्हणतात की माणसानं आदर्शवादी बनावे आदर्श संस्कार ठेवावे. आदर्श असावे.
आदर्श, आदर्श, आदर्श......नक्कीच या शब्दाची कोणालाही चीड येईल. कारण आज आदर्शपणा तरी आहे का समाजात? तर याचं उत्तर नाही असंच येईल. आजचा समाज हा आदर्श दिसत नाही. आदर्श वाटत नाही. अन् आदर्श बनायचा विचारही करीत नाही. कारण आज अशी आदर्श बनविणारी केंद्र नाहीत. अपवाद शाळा.
शाळा हे आदर्श बनविण्याचे केंद्र आहे. असे मानले जाते. तिथं संस्कार फुलवले जातात असं मानलं जातं. परंतु अलिकडील काळात शाळेनंही आपले नियम बनवले आहेत. शाळेशाळेत आज स्नेहसंमेलन होत आहेत व त्या स्नेहसंमेलनातून अलिकडे ढिंग क चिका किंवा विभत्स स्वरुपाची गाणी लावून त्यावर नृत्य बसवलं जातं व त्या नृत्यावर भोळ्याभाबड्या मुलांना नाचवलं जातं. कारण विचारताच सांगीतलं जातं की आता समाजाची मांग आहे तशी. समाजाच्या मागणीनुसार आम्हाला शाळेतील स्नेहसंमेलनातून अशा गाण्यावर नृत्य बसवावं लागतं. तसाच हा प्रश्न ज्यानं विचारला. त्याची अशा स्वरुपाचं उत्तर देवून टिंगल टवाळकी केली जाते. म्हटलं जातं की हा व्यक्ती किती जमान्याच्या मागं आहे.
शाळा......शाळा हे संस्कार निर्माण करणारं केंद्र. त्या शाळेतून कुसंस्कार फुलवलेच जात नाहीत. मग जिथं कुसंस्कार फुलवली जात नाहीत. तिथं अशी विभत्स स्वरुपाची गाणी का बरं लावावीत? असा प्रश्न पडतो. खरं तर शाळेतील जाणाऱ्या प्रत्येक मुलांचं वेळापत्रक तयार केलं असता दिवसाच्या चोवीस तासातून अगदी दोन ते तीन वर्षाची असणारी शाळेत जाणारी मुलं त्या शाळेतील शिक्षकांच्या सानिध्यात पाच ते सहा तास राहतात. ती पालकांच्या सानिध्यात पाच ते सहा तास राहतात. उरलेल्या बाकी तासात ती मित्रांसोबत राहतात व काही तास ते झोप घेत असतात. अलिकडे तर असा काळ आला आहे की त्या काळात मुलं हे झोपण्याच्या काही वेळेचा उपयोग मित्रांशी मोबाईलवर बोलण्यात घालवतात. काही मुलं मायबापासमोर बोलतात तर काही मुलं मायबापामागं. कधी ते व्हाट्सअपवर बोलत असतात तर कधी ते मेसेंजरवर बोलत असतात. काही मुलं तर फोन लावूनही बोलतात. व्हाट्सअप किंवा मेसेंजरवर बोलणं सोपं असतं. ते कुणाला दिसतही नाही आणि पटकन डीलीट मारता येतं. असली हुशार पिढी. आज या पिढीची मुलं थोडीशी मोठी झाली आणि ती शाळेत जावू लागली आणि शाळेत समजा स्नेहसंमेलन असलं की त्यांना मजा येते. त्याचं कारण असतं त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर पडणं. ती दाखविण्याची संधी असते त्या मुलांना. त्यातच ती मुलं स्वतः आपल्या शिक्षकांनी कोणत्या गाण्यावर नृत्य बसवावं याची आवड करीत असतात आणि शिक्षकही त्यांना निराश न करता त्यांच्या गाण्याची आवड जोपासत असतात. त्याचं कारण असतं त्यांना राग येवू न देणं. मग मुलं वात्रट गाणंच शोधतात व शिक्षकही शाळेत वर्षातून एकदाच ते संमेलन होतं म्हणून त्या गाण्यांना मंजूरी देत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की अशी गाणी लावली तरी त्यातून काय शिकता येतं? सुसंस्कार की कुसंस्कार? नक्कीच बिभत्स स्वरुपाची गाणी स्नेहसंमेलनातून लावली गेली तर त्यातून कुसंस्कारच वाढीस लागतील. सुसंस्कार नाही. मग हे कुसंस्काराचे गाणे लावायला मुलं शाळेतील शिक्षकांना सांगतात कसे? त्या गाण्यांची निवड पालक करतात का? त्या गाण्यांची निवड शिक्षक करतात का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. कोणताही शिक्षक हा शिला की जवानी वा काटा लगा वा डोला रे डोला या गाण्यांची निवड स्नेहसंमेलनाच्या नृत्यासाठी करीत नाही. जरी ती मुक्त अभिव्यक्ती असली तरी. मग ह्या गाण्याची निवड कोण करतो? अर्थातच मुलं. मुलांना अशी गाणी फार आवडतात. मग तीच गाणी त्या मुलांना का आवडतात? मायबाप तसे सांगतात का? शिक्षक तसे सांगतात का? नाही, ते सांगत नाहीत. जरी बालपणापासूनच मुलं आईच्या सानिध्यात पाच ते सहा तास असली तरी. तीन वर्षानंतर तीच मुलं पाच ते सहा तास शिक्षकांच्या सानिध्यात असली तरी. मग कोण सांगतं ती गाणी निवडायला? तर त्याचं उत्तर आहे आपले मित्र आणि हेच उत्तर शंभर प्रतिशत खरं आहे.
आपला विकास चांगला व्हावा. आपण आदर्श बनावं. आपल्यात चांगले विचार यावेत. चांगले संस्कार फुलावेत यासाठी आपल्याला स्वतःला तसा विचार करण्याची गरज आहे. हे आदर्शपण आपल्याला ना कोणी मायबाप जपायला शिकवणार, ना कोणता शिक्षक. आपण बिघडलो तर नुकसान आपलंच होणार. आपल्या मायबापाचंही नाही आणि आपल्या शिक्षकांचही नाही ना आपल्या मित्राचं. कुसंस्कार फुलवायचेच असेल आपल्यात तर शाळेत जाण्याची गरज नाही. जास्त शिकण्याचीही गरज नाही व आपल्या मायबापाचा पैसाही विनाकारण खर्च करण्याची गरज नाही. आपले मायबाप आपल्याला शाळेत टाकतात. आपण चांगले बनावं म्हणून. अन् शिक्षक आपल्याला शिकवतात. कारण आपण कोणत्याच क्षेत्रात मागं पडू नये म्हणून. त्याचा मोबदला शिक्षकांना मिळतो. परंतु आपण जर चांगले निपजलो ना अन् सुसंस्कार आपल्यात फुलले तर त्याचा आनंद मायबापांना तर होतो. व्यतिरिक्त शिक्षकांनाही त्याचा आनंद होतो. आपल्यावर कुसंस्कार फुलण्यासाठी आपणच स्वतः दोषी असतो. ना आपले आईवडील ना आपले शिक्षक. महत्वाचं असते आपली संगत. आपली संगत कुणाशी आहे.
पुर्वी स्नेहसंमेलनातून चांगल्या गाण्यावर मुलं नृत्य करायची. जे गाणे शिक्षकांनी निवडलेले असायचे व त्या काळातील शिक्षकही तसेच असायचे. त्यांचा पेहराव, केससज्जा चांगली असायची. त्यात बिभत्सपणा व आतितायीपणा नसायचा. तसेच मायबापही तसेच असायचे. त्यांचा पोशाखही साधा आणि केससज्जाही. त्यांना कोणी अडाणी म्हटलं तरी चालेल. तसंच त्या शिक्षकांना जुन्या पिढीतील शिक्षक म्हटलं तरी चालेल. आज काळ बदलला व बदलत्या काळानुसार आपल्या संगती बदलल्या व संगतीचा परिणाम असा की स्नेहसंमेलनातून बिभत्स गाणी गायली जावू लागली. त्यावर नृत्य केले जावू लागले. आजच्या या बदलत्या काळानुसार शिक्षकानं आपला पेहराव बदलवणे गरजेचे नव्हते संस्कार फुलवतांना. परंतु आजचा शिक्षक तेही विसरला. विसरला की आपण शिक्षक आहोत. बऱ्याचशा शिक्षकांची शाळेत केससज्जा, पोशाख रुपरेषा, वाखाणण्याजोगी असते. ते असा विचारच करीत नाहीत की आपण असा पेहराव केल्यास मुलंही तसाच पेहराव करतील. जो पेहराव भविष्यात गुन्हेगारी घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल.
विशेष सांगायचं म्हणजे मुलांवर संस्कार टाकणारी तीन माध्यमं अगदी महत्वाची आहेत. पहिलं माध्यम म्हणजे त्यांचे आईवडील. आईवडील जर चांगले असतील. ते चांगले वागत असतील. तर मुलं चांगली होतीलच. याचाच अर्थ असा की ते संस्कारी निघतीलच. तशीच त्यांची शिक्षकमंडळी जर चांगली असली तरही त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होणार व ते संस्कारी बनतील आणि तिसरा परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मित्र. ज्या गोष्टी मुलं शाळेतून शिकत नाहीत. ज्या गोष्टी मुलं मायबापांकडून शिकत नाहीत. त्या गोष्टी ते मित्रांकडून शिकत असतात. कारण मायबाप जीवनभर पुरत नाहीत. शाळेतील शिक्षकही जीवनभर पुरत नाहीत. परंतु मित्र हे मरेपर्यंत सोबत असतात. ते जर चांगले असतील तरच आपले दिवस चांगले जातात. जर मित्र वाईट असतील तर आपले दिवसही वाईटच जातात. म्हणूनच मित्र चांगले हवे. मित्र जर दारु पिणारे असतील तर आपण कितीही विचार केला की मी दारु पिणार नाही. तरीही कधी ना कधी माणूस दारुच्या आहारी जातो. तसाच तो जर शिव्या देत असेल, गांज्या फुकत असेल तर त्याचा मित्र देखील एक ना एक दिवस गांज्या फुकेलच. शिव्या देईलच यात शंका नाही. म्हणतात की हंसानं कावळ्याची संगत करु नये. कारण कावळा केव्हा मांसाच्या आवडीनं हंसाचा जीव घेईल ते काही सांगता येत नाही. दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास सापाचं देता येईल. साप हा असा प्राणी आहे की त्याची दोस्ती परवडत नाही. तो केव्हा दंश करेल वा केव्हा गिळंकृत करेल हे सांगता येणे कठीण आहे. म्हणूनच आपले मित्रही अशा सापासारखे वा कावळ्यांसारखे नसावेत की आपल्याला वाईट गोष्टी शिकवतील व ज्यातून आपलाच विनाश होईल. आपले मित्र मांजरीसारखेही नसावेत की जे स्वतःचाच स्वार्थ पाहतील. महत्वाचं म्हणजे आपले मित्र हे हंसासारखे वा श्वानासारखे असावेत. कारण ते प्रामाणिक असतात व आपल्याला संकटातून वाचवत असतात नव्हे तर आपली सुरक्षा करीत असतात.
विशेष बाब अशी की आपले मित्र हे आदर्श असावेत की ज्या मित्रांच्या संगतीनं आपल्याला आदर्श बनता येईल. आपले मित्र जर आदर्श नसतील तर आपल्यातही आदर्शपणा येणार नाही व आपला कार्यभाग बुडेल. मित्रांच्या संगतीनेही कुसंस्कार येतील. तेव्हा तसं होवू नये म्हणून आपण त्याच गोष्टीचा स्वतः विचार करुन मैत्री करायची झाल्यास आदर्श मित्राशीच करावी. जेणेकरुन आपल्यातील आदर्शपण आपल्याला सिद्ध करता येवू शकेल हे तेवढंच खरं आहे.
रंजना बिघडली नसेलही कदाचीत. परंतु ती बिघडल्यासारखी वाटत होती. त्याला कारणीभूत होते तिचे मित्रमंडळ. तिच्या मैत्रीणी पार बिघडलेल्या होत्या व त्या मैत्रीणीच्या संगतीनं रंजनाही बिघडल्यासारखी वाटत होती. तीच गोष्ट समाजात सर्वदूर पसरली होती व बिरादरीतील विवाह करणारे तरुण तिच्या घरापर्यंत फटकत नव्हते.
रंजनाला शेती आवडत नव्हती. ना शेतीत राबणं आवडत होतं. तिला आवडायचा नोकरीवाला पती. परंतु तसा पती मिळायलाही प्रारब्धच लागत होतं. तसा पती तिलाही मिळाला असता. कारण ती शिकली होती. उच्चशिक्षण घेतलं होतं तिनं. तसं पाहता त्या गोष्टीला तीच कारणीभूत होती. ती तशी वागली नसती तर कदाचीत तिला पती तसा चांगलाच मिळाला असता.
रंजनाला कोणताच रिश्ता येत नव्हता. तसं पाहिल्यास ती शिकतच होती अजुनही. त्यातच तिला कचरुचा रिश्ता गेला व मायबापानं तिला रिश्ता येत नाही असं मनात धरुन व कचरु एक उच्चशिक्षण घेतलेला तरुण आहे हे पाहून तिला देवून टाकलं त्याला.
रंजनाचा कचरुशी विवाह पार पडला. परंतु ती नाखूश होती त्याचेसोबत. तसं पाहता तिला नोकरीवालाच मुलगा हवा होता. परंतु तो वय वाढत असतांना न मिळाल्यानं मजबुरीनं तिनं शेतकरी माणसाशी अर्थात कचरुशी विवाह केला होता. मात्र कचरु तिला अतिशय खुश ठेवत असे. तिला शेतीवरही नेत नसे. तिला घरातच ठेवत असे.
रंजना घरी राहात होती. तिला करमत नव्हतं घरी. कारण होतं तिला कोणतंच काम नसणं. त्यातच त्यानं तिला एक बदलत्या काळानुसार करमणूक म्हणून स्मार्टफोन घेवून दिला होता. आता रंजना दिवसभर स्मार्टफोनवर राहात असे व रात्री पती घरी आल्यावर त्याचं जेवनखावण बनवीत असे. मात्र तिला स्मार्टफोन जरी त्यानं घेवून दिला असला तरी ती स्वतःला आनंदी समजत नव्हती. अशातच तिची मैत्री फेसबुक पाहात असतांना एका फेसबुक पाहणाऱ्या मित्राशी झाली.
रंजनाची झालेली फेसबुक पाहणाऱ्या मित्राची मैत्री. ती मैत्री होताच तिला त्याचेशी तासनतास बोलावसं वाटत असे. तशी ती कचरुच्या शेतात जायचीच वाट पाहायची. तो शेतात जाताच तिचं मोबाईल प्रेम सुरु व्हायचं. शिवाय त्यात तिचं घरात लक्ष नसायचं. तसं त्याचंही लक्ष घरात नव्हतंच. तोही शेतीत प्रयोगच करीत असायचा. त्याला वाटायचं की शेतकरी वर्ग सुखी व्हायला हवा.
कचरुचं वागणं चांगलं होतं. तसं वागणं तिचं नव्हतं. तिचं वागणं चांगलं नव्हतं. तो शेतकरी असल्यानं तिचं वागणं अधिकच बिघडलं होतं. त्यातच ती आता फेसबुक मित्राशी प्रेम करु लागली होती. त्या मित्रानंही तिचा बायोडाटा काढला होता व तिच्याकडून माहिती काढून घेतली होती की तिला नोकरीवाला आवडतो व तिचा पती नोकरदार नाही.
तो फेसबुकवरचा मित्र. तो मित्र काही नोकरीवाला नव्हता. तो रिकामटेकडाच होता. परंतु त्यानं तिच्याकडून माहिती काढल्यामुळं व तिला नोकरदार मुलगा आवडतो हे त्याला माहीत झाल्यामुळं तो स्वतः सरकारी नोकरीवर आहो असं तिला सांगू लागला. त्यामुळं तिचा त्याचेवर विश्वास बसला. तो वृद्धिंगत होत गेला व एक दिवस ती कचरुला माहीत न होता पसार झाली.
कचरुची पत्नी बनलेली रंजना. ती पत्नी बनली कशी व ती गेली कशी? हे त्यालाच कळत नव्हतं. जो फेसबुकचा मित्र होता. तो मित्र रिकामटेकडाच होता. मात्र त्यानं असा खेळ खेळला होता की त्या खेळात ती भावली होती व फसली होती. शिवाय ती त्याचेसोबत जेव्हा पळून गेली, तेव्हा ती आपल्यासोबत कचरुच्या घरचा पैसापाणी, सोना नाणा घेवून गेली. त्यातच काही दिवस बरे गेले. जोपर्यंत तिच्याजवळ पैसा होता. परंतु जेव्हा पैसे संपले. तेव्हा मात्र तिचे उपासाचे फाके पडत होते. तिला त्यानंतर वास्तविकता कळली आणि आता तिला कचरुची आठवण येत होती. त्याच्याशिवाय तिला जगणं असह्य झालं होतं. परंतु आता वेळ निघून गेली होती.

***********************************************