defeated undefeated in Marathi Book Reviews by गिरीश books and stories PDF | पराजित अपराजित

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

पराजित अपराजित

ऑपरेशन ऐंटेबी नंतर मी वाचले ते पराजित अपराजित. श्री.वाळींबे एक मुरब्बी लेखक आहेत. त्यांची लेखनशैली मला आवडते. 'पराजित अपराजित' म्हणजे १८७० ते १९७० पर्यंत चा फ्रेंच देशाचा इतिहास होय. या पुस्तकाचा पुर्ण आढावा घेणं शक्य नाही तसेच या पुस्तकातून आंतरराष्ट्रीय राजकारणावर जो प्रकाश पडतो तो समजून घेण्यासाठी त्या पुस्तकातील उतारे लिहिणे महत्त्वाचे ठरते परंतु एकंदरीत मत आणि काही खास प्रसंग लिहिणार आहे
पुस्तक वाचुन झाल्यानंतर असे वाटते की ज्या राष्ट्राला असे पराजित, कचखाऊ नेते लाभत गेले ते एक बलाढ्य राष्ट्र कसे झाले?.
अर्थात अधुनमधून लाभणारे समर्थ नेतृत्व हे त्याचे कारण असेल, संपूर्ण विनाश होईल असे वाटत असताना एखादा अपराजित वृत्तीचा नेता त्यांना लाभला. पहिल्या महायुद्धाच्या काळात 'क्लेमेन्सो' तर नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 'द गॉल'. परंतु क्लेमेन्सों पेक्षा फ्रान्सच्या प्रगतीमध्ये गॉल यांचा वाटा आहे.
फ्रान्स एक बलिष्ठ राष्ट्र रहावे हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांनी ते खरे केले. गॉल यांच्या जीवनातील चढ उतार हा एक निराळा विषय होऊ शकेल. एका लेखकाने लिहिले की
"आम्हीं फ्रेंच मोठी बेजबाबदार माणसं आहोत जेव्हा देशात अशांतता असते तेव्हा आम्हाला शांततेचा ध्यास लागलेला असतो आणि जेव्हा शांतता असते तेव्हा आम्हाला गोंधळाची, अशांततेची आस लागलेली असते." आणि या वृत्तीचा पुरावा क्षणोक्षणी मिळतो. त्यातच गॉल काही करत असता त्यांच्या पक्षाला कसेबसे बहुमत मिळाले या घटनेचा समावेश होतो. कमालीची बेजबाबदार वृत्ती सर्वच राजकीय नेत्यांची होती म्हणून च १०० पेक्षा जास्त वेळा बदललेली मंत्री मंडळं या देशात दिसतात. तिसरे प्रजासत्ताक सतत अस्थिर अवस्थेत राहिले. विटंबना सहन करावी लागली.
जोफ्र, फॉश, गॉल यासारखे खंदे सेनापती या देशाला लाभले हे भाग्य.
मानवी मनाचे मासलेवाईक नमुने यांत आढळतात. त्यामध्ये बुलांजे हा सेनापती येतो. खूप लोकप्रियता त्याने मिळवली आणि लष्करी राजवट आणण्याची संधी त्याला लाभली त्यावेळी एलिसे प्रासाद ताब्यात घेण्यासाठी जाणे जरुरीचे होते तेव्हा तो आपल्या प्रेयसीच्या महालात शिरला आणि बाहेर येईपर्यंत संधी गेलेली होती.
त्यानंतर देरूलेद नावाच्या सेनापतीला प्रजासत्ताक उलथून टाकून एलिसे प्रासादात शिरण्याची संधी मिळाली पण ज्या सेनापती ची मदत घेण्यास तो गेला तो महत्त्वाकांक्षी नसल्याने (जनरल रोजे) त्याने देरुलेदलाच अटक केली आणि प्रजासत्ताक वाचले. या दोन घटना अनुक्रमे २७ जानेवारी १८८३ व २३ फेब्रुवारी १८९९च्या.
तीसरी घटना आहे ६ फेब्रुवारी १९३४ची. या काळात राज्य कर्ते किती भ्रष्टाचारी आहेत याची जाणीव जनतेला झाली होती. अनेक प्रकरणे उजेडात आली होती. त्यामुळे प्रजासत्ताका बद्दल लोकांचे मत कलुषित झाले होते. वर्तमानपत्रांचा समाज मनावर मोठा प्रभाव पडतो. समाजमनाची जडणघडण वृत्तपत्रे करत असतात. वृत्तपत्रांनी प्रक्षोभक लेख लिहून लोकांना निदर्शने करण्यास प्रवृत्त केले.
या वृत्तपत्रांमध्ये जे एक महत्त्वाचे होते त्याचे संपादक एक मासलेवाईक नमुना आहेत. त्यांनी भडक लेख लिहिल्यावर प्रणय कविता लिहिण्यात वेळ घालवला. आणि कार्यकर्ते सल्ला मागायला आल्यावर उद्या बघू असं उत्तर दिले.
नादान नेतृत्व कार्यघात करतेच, पण आपल्या अनुयायांना फशी पाडते.
चाळीस हजार निदर्शक''प्रजासत्ताक मुर्दाबाद' अशा घोषणा देत प्रतिनिधी सभागृहाच्या दारावर धडका होते.
या परीस्थितीचा फायदा करून घ्यावा हे या नेत्यांना कळले नाही. हे नेते लपून हुकूम सोडत होते ही एक आश्र्चर्य जनक गोष्ट होती. आणि कहर म्हणजे हा की प्रतिनिधी सभेच्या दारात लोक पोहोचल्यावर त्यांच्या नेत्याने चक्क माघार घेण्यास सांगितले की जे अत्यंत मुर्खपणाचे होते. या माघार घेण्याला कारण नव्हते, सरकारी प्राबल्य संपले होते. अशा रितीने या मानवी मनामुळे तीसरे प्रजासत्ताक परत वाचले.
फ्रान्सच्या इतिहासात " द्रेफ्यु "प्रकरणाला महत्व आहे. जवळ जवळ १२ वर्षं हे प्रकरण चिघळत राहिले होते. हा काळ जातियवादाची भयानकता दर्शवणारा आहे.
केवळ द्रेफ्यू हा ज्यू असल्याने त्याला दोषी ठरविण्याचा केला गेलेला प्रयत्न म्हणजे नैतिक अध:पतनाची परिसीमा आहे.
या काळात सरकारी प्रतिष्ठेचे धिंडवडे निघत होते.
सर्वजण या गोंधळात असताना राजनिष्ठ गटाने सत्तेसाठी प्रयत्न केले पण अयशस्वी.
या काळात देशकारणाकडे शासन संस्थेचे दुर्लक्ष झाले. फ्रान्सच्या आर्थिक प्रगती चा वेग मंदावला होता. समाजकल्याणाच्या कार्यक्रमाना चालना मिळाली नाही. परराष्ट्रीय धोरणाची उपेक्षा झाली.
पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी "पेतॉ " सारख्या पराजित वृत्ती च्या पंतप्रधानामुळे जर्मनी पुढे शरणागती पत्करली.
पण " गॉल " सारख्या अपराजित वृत्ती च्या नेतृत्वामुळे फ्रान्स सर्वनाशातुन वाचलाच पण नंतर प्रगती झाली व फ्रान्सला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
गिरीश