Darshan in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | दर्शन

Featured Books
Categories
Share

दर्शन

दर्शन - 

एखादा माणूस  जेव्हा देवळात किंवा तीर्थक्षेत्राला जाणार असतो तेव्हा  देवदर्शनाला चाललोय असे म्हणतो. त्याच्या दृष्टीने दर्शन महत्वाचे आहे. मानसपुजा ही मनाने दर्शन‌ घेण्याची पद्धत आहे. 

दर्शन म्हणजे बघणे, पाहणे. सकाळी पुजा झाल्यानंतर फुलांनी, अलंकारानी  सजलेल्या  मुर्तींचे दर्श़न हा एक सुखद अनुभव असतो. मुर्तीकडे बघताना ती मुर्ती आपल्याकडे बघत आहे असे वाटते आणि हेच आहे दर्शनाला जाणेचे मुळ कारण. 

आपण देवाला भेटत आहोत तो आपल्याकडे पाहत आहे  असे वाटते. आणि आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा हे दर्शन तत्व प्रेरणादायी असते. समोर साक्षात देव उभा आहे असे वाटते. 

आपल्या देवांच्या मुर्तीमध्ये डोळे घडवणेला फार महत्व आहे अगदी अलीकडेच अयोध्येतील राम मुर्ती घडवताना पण हा अलौकीक अनुभव ऐकला आहे.

आपल्या मते देव त्या मुर्तीत असतो आणि मुर्तीचे दर्शंन घेण्याने आणि नमस्कार केल्याने देव आपल्याकडे बघून आशिर्वाद देत आहे असे वाटते. कोणी जेव्हा तिरुपती, गिरनार, बद्रिनाथ अशा कोणत्याही ठिकाणी जाणार असतो तेव्हा आपण देव दर्शनाला चाललोय असे सांगत असतो. 

उंच टेकडीवर असलेल्या देवळात आपण जातो तेव्हा आपण प्रेक्षणीय स्थळ बघायला चाललेलो नसतो तर देव दर्शन महत्वाचे असते. भारतात अनेक तीर्थक्षेत्रं आहेत. काहीना तीर्थ काहीना धाम काहीना पीठ असे म्हटले जाते. 

प्रत्येक देवळात जी मुर्ती असते ती केवळ एक मुर्ती नसते तर आपल्या मनातील एक दैवी प्रतिमा असते. तीर्थक्षेत्राला जाउन देव दर्शन झाल्यावर तेथील देवाशी संबंधीत अशी ठिकाणे पाहणे हा पण एक हेतू असतो. हिमालय हे देवाचे वस्ती स्थान आहे म्हणून किंवा स्वर्गातून‌ पृथ्वीवर आलेल्या गंगा नदीचे दर्शन घेण्यास लोक जात असतात. नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून शुद्ध होणेचा पण हेतू असतो.

दर्शन हे फक्त देवळातील प्रतिमा व पवित्र स्थानांचे नाही तर संत, साधू, संन्यासी , यांचे पण दर्शन घेणे साठी लोक जात असतात. देव आणि भक्त यांच्यामधील संवाद हा डोळ्यामार्फत असतो.

असे म्हटले जाते की देव मानव रुपात फिरत असतात तेव्हा त्याना ओळखण्याची खुण म्हणजे त्यांच्या पापण्या लवत नाहीत. त्यांची बघण्याची पद्धत म्हणजे क्षणभरही डोळे न मिटता बघत असतात. आणि या दृष्टीत अफाट ताकद असते. आणि ही दृष्टी दयाळू व प्रेममय असते.

मुर्तिंंचे डोळे मोठे असतात. जगन्नाथ पुरी मधील मुर्ति डोळ्यासमोर येत असेल ना? तसेच महादेवाना आपण त्यांच्या तिसऱ्या डोळ्यासहीतच पाहत असतो.

देवाच्या या पवित्र आणि मनाला शांती देणाऱ्या डोळ्यांचे महत्व अशासाठी आहे की एखाद्याच्या वाईट नजरेमुळे काही वाईट घडत असते असे आपण मानतो. यालाच बुरी नजर किंवा दृष्ट लागणे असे म्हणतात. एखाद्याच्या मनातील असुया किंवा दुष्ट भावना ही डोळ्यामार्फत समोरच्या माणसावर वाईट परीणाम करते. आणि देवाची किंवा संतांची ,गुरुंची पवित्र अशी दृष्टी आपल्यावर आपल्यावर सकारात्मक लहरी निर्माण करते व आपण स्वताला भाग्यवान समजतो.

एखादा माणूस देवाच्या अथवा गुरुंच्या दर्शनासाठी गर्दीत उभा राहून मान वर करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा गुरुंची ,देवाची दृष्टी आपल्यावर पडावी या ईच्छेनेच पाहत असतो. 

आणि देवाच्या ,गुरुंच्या डोळ्यांकडे पाहीले की ते आपल्याकडेच पाहत आहेत असे वाटते. या दृष्टीभेटीने त्याच्या मनात भक्तिभाव जागृत होउन माणूस नमस्कार व प्रार्थना करतो.

तसेच प्रेमातही या पाहण्याला महत्व आहेच. प्रथमदर्शनी प्रेम म्हणजे पाहताक्षणीच जडलेले प्रेम असते. कोण आपल्याकडे रागाने पाहतयं आणि कोण अनुरागाने हे पण लगेच कळते. पण या पाहाण्याला आपण बघणे किंवा नजरानजर असे म्हणतो. दर्शनातील प्रेममय भक्तिभाव यात नसतो .

पण भावनांचे प्रकटीकरण या बघण्यातून अधिक होत असते हे खरे.g.

डोळ्यांच्या भाषेला आपल्या संस्कृत साहीत्यात खुप महत्व आहे. पाहण्यातून, दर्शनातून स्पर्शाचा भाव पण असतो. पूर्वी सामाजिक नियमांमुळे नवराबायकोमध्ये पण या डोळ्यांच्या भाषेला महत्वपूर्ण स्थान होते.

पाहणे किंवा बघणे यातून ज्ञान होत असते. आणि हे ज्ञान अधिक स्पष्ट असते. जर एखादा वाद चालू असेल आणि एकजण मी ऐकले म्हणत असेल आणि एक पाहीले म्हणत असेल तर , जो पाहीले म्हणत असेल त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जातो. 

 म्हणजेच पाहणे किंवा दर्शन याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. G