Murder Weapon - 6 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | मर्डर वेपन - प्रकरण 6

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मर्डर वेपन - प्रकरण 6


मर्डर वेपन
प्रकरण ६
रती जाताच पाणिनीने कनक ओजस ला बोलावून घेतलं.
“ कनक, तुला एक तातडीने काम करायचं आहे.माझ्या ड्रॉवर मधे मी रिव्हॉल्व्हर ठेवलं होतं. ते चोरीला गेलंय काल रात्री किंवा आज पहाटे किंवा सकाळी.”
“ किती घाई आहे?”
“ कनक, माझ्या अशीलाच्या ड्रॉवर मधून पळवलं गेलेलं रिव्हॉल्व्हर मला भलत्याच बाईने कदाचित चोराने इथे माझ्या ऑफिसात आणून ठेवलं, सर्वांच्या नकळत, आणि तेच माझ्या ताब्यातून चोरीला गेलंय.”
“ आता हे ऐकल्यावर सरकारी वकील खांडेकर तुझ्यावर कुभांडच रचतील.” कनक म्हणाला.
“ अगदी बरोबर.”
“ कोणी चोरलं असेल काही अंदाज?” –कनक
“ मला संशय तर माझ्याच अशिलावर आहे. रती रायबागी वर ! ” पाणिनी म्हणाला. “ कारण तिलाच या रिव्हॉल्व्हरचं महत्व माहिती होतं. पण कनक,सकृत दर्शनी इथे शोधाशोध केल्याचं काही आढळत नाही.”
“ या आपल्या इमारतीत येताना खालच्या सिक्युरिटी कडे रजिस्टर मधे नोंद केल्याशिवाय कोणीच वर नाही येऊ शकत,पाणिनी.” कनक म्हणाला.
“ तेच म्हणायचंय मला, तू आज पहाटे दोन वाजल्यापासूनच्या रजिस्टर मधल्या नावांचा तपास कर.”
“ ते रजिस्टरच मी इथे घेऊन येतो हवं तर.” कनक म्हणाला.
“ आणखी एक काम आहे, ”
“ माझी अशील रती रायबागी चा पती पद्मराग चा खून झालाय.त्याची प्रथम पत्नी आधीच मेली आहे, दुसरी बायको मैथिली रायबागी हिने त्याला घटस्फोट दिलाय.या मैथिलीची संपूर्ण माहिती हव्ये मला.”
ठीक आहे म्हणून कनक बाहेर पडला.पाणिनीने अस्वस्थपणे येरझऱ्या घालायला सुरुवात केली.
“ सौंम्या, आपल्या मजल्यावर सफाईच्या कामाला माणसे केव्हा येतात?”
“ सकाळी येते बाई.तीच बाई खालच्या मजल्यावर रात्री येते.” सौंम्या म्हणाली.
“ या बाईला बळीचा बकरा करून किंवा लाच देऊन कोणी हे काम करवून घेतले असू शकते का?”
“ लाच दिली जाण्याची शक्यताच नाही.कारण खूप प्रामाणिक माणसे असतात एजन्सीची. बळीचा बकरा केले जायची शक्यता नाकारता येत नाही.” सौंम्या म्हणाली.
पाणिनी पुन्हा येरझऱ्या घालायला लागला.तेवढ्यात कनक ओजस रजिस्टर घेऊन आत आला.
“ पाणिनी,तुला माहित्ये, माझं ऑफिस चोवीस तास उघडं असतं कारण माझे गुप्त हेर कायम कुठल्या न कुठल्या कामावर असतात आणि त्यांचे कामाचे अहवाल देण्यासाठी ते ऑफिसात येत असतात. या रजिस्टर मधे सकाळी सहा वाजता सूरज विश्नोई नावाच्या माणसाने नाव लिहून सही केली आहे. माझ्या ऑफिसला यायचं आहे म्हणून.पण या नावाचा माझा कोणीही गुप्तहेर नाहीये. याहून अधिक धक्का हा आहे की माझ्या ऑफिसात सूरज विश्नोई नावाचा इसम आल्याची नोंदच नाहीये.कारण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद माझ्या ऑफिसात होतं असते. म्हणजे तळ मजल्यावरच्या सिक्युरिटी च्या रजिस्टर वर माझ्या ऑफिसात जायचे आहे अशी नोंद करून वर आलेला माणूस माझ्या ऑफिसात आलाच नाही.तुझं ऑफिस सुद्धा याच मजल्यावर आहे .......”
“ त्याची सही आहे रजिस्टर वर?”
“ ही पहा.” कनक ने सही दाखवली.
“ कनक,ऑफिस झाडणाऱ्या बाईला गाठ.तिला आणि आपल्या लिफ्ट चालवणाऱ्या माणसाला विचार सूरज विश्नोई चं वर्णन.” पाणिनी म्हणाला.
“ मी ते आधीच केलंय पाणिनी. जो लिफ्टमन सकाळी ड्युटीवर होता,त्याला मी विचारलं.तो म्हणाला त्याच्या सूरज विश्नोई चांगलाच लक्षात आहे.उंचपुरा, सूट घातलेला,हातात ब्रीफ केस घेतलेला आणि गडद रंगाचा गॉगल घातलेला माणूस होता तो. सकाळी सहा ही वेळ गॉगल घालायची नाही.त्यामुळे त्याच्या लक्षात राहिला तो.”
“ ठीक आहे सफाई करणाऱ्या बाईला.....” पाणिनी म्हणाला.
“ ते ही काम झालंय पण फोन वर बोललोय तिच्याशी.तिचं नाव आहे मोहिनी मालुसरे. ती म्हणाली की सकाळी सहाला पाच दहा मिनिटे असतांनाच तिने तुझं ऑफिस स्वच्छ करायचं काम सुरु केलं तेवढ्यात एका रुबाबदार माणसाने बेल वाजवली. तो उंच ,रुबाबदार होता.हातात ब्रीफकेस होती.गॉगल होता, तो स्वत:च्याच ऑफिसात यावं तसा आत आला आणि म्हणाला, मला अचानक कोर्टाच्या कामासाठी बाहेरगावी जायला लागतंय सकाळी लवकर. आणि पेपर इथेच ऑफिसात राहिल्यामुळे ते घ्यायला तो वर आलाय.घरून निघताना घाई झाल्यामुळे ऑफिसच्या चाव्या विसरून आलो त्यामुळे बेल वाजवायला लागली.तिला तो खूप सज्जन वाटला.तिच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल त्याने तिलाच सॉरी म्हंटले आणि पन्नास रुपये बक्षिसी देऊन तो निघून गेला. ” कनक ने माहिती दिली.
“ आपण पाणिनी पटवर्धन आहोत असं त्याने तिला सांगितलं?” पाणिनीनं विचारलं
“ सांगितलं नाही थेट शब्दात,पण आपल्या कृतीतून तसा आभास निर्माण केला नक्की. हे बघ, ती बाई रोज सकाळी सहाला येऊन साफ सफाई करून जाते.तू तिला कधी बघिलेलं नाहीस की तिने तुला. शिवाय या बायका दर चार महिन्यांनी बदलतात.एजन्सी तर्फे.” कनक म्हणाला
“ या मोहिनी मालुसरे. बाईला पुन्हा फोन कर आणि इथे बोलावून घे.तिला म्हणावं जरा वेळ काढूनच ये.पैशांची काळजी नको करू.ताशी पाचशे रुपये या दराने तिला पैसे मिळतील” पाणिनी म्हणाला.
“ हे जमवता येईल.आणखी काही हवंय? ” कनक ने विचारलं.
“ नाही.सध्या तरी नकोय काही.”
कनक गेल्यावर पाणिनी सौंम्याला म्हणाला, “ रती ज्या स्वरात किंवा ज्या पद्धतीने अंगिरस खासनीस शी बोलत होती ते नीट ऐकलस का?”
“ हो, माझ्या लगेच लक्षात आलं ते.अगदी खास जवळकीच्या नात्यानं.आपलेपणानं ” सौंम्या म्हणाली.
“ बरोब्बर. तर आता आपण आपल्या ऑफिसात पाणिनी पटवर्धन भासवून आलेल्या माणसाबद्दल बोलू. असं बघ,रायबागी जो माणूस आपल्या ऑफिसात आला, त्याने अवघ्या दहा मिनिटात सगळा प्रकार उरकला. म्हणजे दार वाजवलं, आत गेला, आतल्या सफाई करणाऱ्या बाईशी बोलला, तिथून आत गेला, ड्रॉवर मधली रिव्हॉल्व्हर घेतली,आणि बाहेर पडला. सगळं दहा मिनिटात ! ” पाणिनी म्हणाला.
सौंम्या ने मन डोलावली.
“ ज्या पद्धतीने आणि आणि आत्मविश्वासाने त्याने ड्रॉवर मधून रिव्हॉल्व्हर घेतली त्यावरून मला वाटत की त्याला रिव्हॉल्व्हर कुठे आहे हे नेमकेपणाने ठाऊक असणार.” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे?” सौंम्या ने विचारलं.
“ हे बघ, रिव्हॉल्व्हर शोधायला वेळ लागेल असं त्याला वाटलं असतं तर त्याने काय केलं असतं? बाईला सांगितलं असतं की मला इथे महत्वाचं काम करत बसायचं आहे,मला डिस्टर्ब करू नका. किंवा तुम्ही गेलात तरी चालेल. पण त्याने असं नाही केलं.” पाणिनी म्हणाला.
“ ओह सर, लक्षात आलं मला. याचा अर्थ त्याला माहीत होतं की रिव्हॉल्व्हर कुठे आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाहीये.”
“ आता कसं बोललीस ! ”
“ म्हणजे...सर.. ”
“ बरोबर विचार करत्येस तू सौंम्या, तुझ्या मनात जी व्यक्ती आहे तीच ... रायबागी च्या ऑफिसात फोन लाव. अंगिरस खासनीस अजून तिथे आहे का बघ.” पाणिनी म्हणाला. सौंम्या ने फोन लावला, अंगिरस फोन वर येताच तिने फोन पाणिनीकडे दिला.
“ अंगिरस, नमस्कार.मला कल्पना आहे तुझा आजचा दिवस फार तणावपूर्ण गेला असेल,पण मला तुझी मदत लागणारे, अर्थात रती ला सहकार्य करायची तुझी तयारी असेल तरच. ”
“ त्याची काळजीच करू नका पटवर्धन.माझे आणि रायबागी सरांचे खूप जवळचे संबंध होते.शिवाय मिसेस रती रायबागी या सुद्धा लग्नापूर्वीपासून इथे नोकरीला होत्याच की.त्यानाही मी चांगलंच ओळखतो. त्यांच्यासाठी काहीही मदत करीन मी.” अंगिरस म्हणाला.
“ तर मग माझी विनंती आहे तुम्हाला, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय, जरा अर्जंट आहे. जेवण झालंय का तुमचं? ” पाणिनीनं विचारलं
“ नाही झालंय.मी असं करतो,पटकन जेऊन घेतो.... नाहीतर थांबा जरा, मी आधीच येतो तुमच्या ऑफिसात, नंतर जेवेन मी.”
त्याने फोन बंद केला.पाणिनी सौंम्या ला म्हणाला, “ लक्षात आलं तुझ्या? त्याने मला आपलं ऑफिस कुठे आहे ते विचारलंच नाही.याचाच अर्थ त्याला पत्ता माहिती आहे.नाहीतर तो म्हणाला असता, पटवर्धन साहेब, येतो मी मला पत्ता द्या तुमचा. ”
सौंम्या ने मानेने संमती दिली. “आता एक काम कर, कनक ला निरोप दे त्या कामवाल्या मालुसरे बाईला तातडीने इथे बोलाव.आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला म्हणावं जेवायची सुट्टी अत्ताच घे.तू तिच्या जागी बस रिसेप्शनला.मालुसरे बाई यायच्या आधी खासनीस आला तर त्याला आत घेऊन ये. आणि पुन्हा मालुसरे ची वाट बघत रिसेप्शनला थांब.ती आली की मला कळव.”
“ ओके सर. याचा अर्थ लक्षात आला का ? गतीला तुम्ही जेवायला बाहेर पाठवताय,ते ही नेहेमीच्या सुट्टी पूर्वी आणि मला मात्र रिसेप्शनला बसवताय.पाहुणे येऊन जाई पर्यंत माझी सुटका नाही आता.” लटक्या रागाने सौंम्या म्हणाली.
“ अग बये,आपल्या दोघांना मी इथेच आणि अत्ताच ग्रिल्ड सँडविच मागवणारे. आणि ते ही ऑफिसच्या खर्चाने.” पाणिनी म्हणाला. आणि त्याने खालच्या रेस्टॉरंट ला फोन लावला.
(प्रकरण ६ समाप्त.)