Objection Over Ruled - 11 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 11

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 11

प्रकरण ११

“ मॅडम खात्री ने सांगतो , कोणीही आपला पाठलाग करत नाहीये. कुठे घेऊ गाडी?” टॅक्सी ड्रायव्हर ने सौम्याला विचारले.
“ मेन स्टॅण्ड ”
त्याने तिथे गाडी थांबवली आणि आपले कार्ड तिला दिल. “ तुम्हाला पुन्हा कुठे जायचे असेल तर मला फोन करा. पाठलाग होऊ न देता मी तुम्हाला हवं तिथे नेईन.”
“ आभार.” सौम्या म्हणाली त्याचं बिल दिल आणखी वर बक्षिशी दिली.समोरच्या फोन बुथ जवळ तिला काया उभी असलेली दिसली.
“ पाणिनी पटवर्धन सरानी मला खास सूचना देऊनच तुझ्या कडे पाठवलंय ” सौम्या तिला म्हणाली. “ आणि तू अगदी तसेच करायचे आहेस.”
कायाहसली. “ मी स्वतः त्यांना वकील म्हणून नेमले आहे म्हणजे त्यांचे न ऐकण्याचा विषयाच येत नाही.”
“ तुझे वडील कुठे आहेत?” सौम्याने विचारले
“ मी पण त्यांनाच शोधत्ये.”
“ पालेकरला भेटायला ते गेले नव्हते ना शुक्रवारी?” सौम्याने विचारले
“ शुक्रवारी तर शक्य नाही कारण त्याचं दिवशी सर्फ अँण्ड सन हॉटेलात सर्व राजकारणी लोकांबरोबर मीटिंग नव्हती का त्यांची?”
“ बर ते असो, तू माझ्या बरोबर यायचे आहेस. पुढील सूचना पाणिनी पटवर्धन यांचे कडून मिळे पर्यंत तू संपर्काच्या बाहेर राहायचे आहेस. ”
“ वर्तमान पत्र वाल्यांपासून दूर का? ” कायाने शंका विचारली.
“ मी नाही विचारले सरानां मला आवडत नाही ते विचारणे ”
“ खरे आहे.पटवर्धन यांचा झपाटा आणि वेग एवढा मोठा असतो की त्यांना मधेच असे प्रश्न विचारून त्यांचा वेग कमी करणे उचित नाहीच.”काया म्हणाली.
“ आपण कॅब करू.” सौम्याम्हणाली.
“ मी माझा स्वेटर आणि हात मोजे घालते.थंडी आहे खूप.” असे म्हणून काया पर्स मधून तिचे हातमोजे काढत असताना एक पुठ्याचा तुकडा पर्स मधून पडला.सौम्याने तो पहिला आणि काया च्या चेहेऱ्याकडे बघितले.तिचा चेहेरा एवढा शांत होता की असे काही पडले आहे याची तिला बिलकुल कल्पना नव्हती
पण एक बाजूने जाणारा माणूस पुढे आला आणि त्या दोन तरुणींवर छाप टाकण्यासाठी त्याने वाकून तो तुकडा उचलला.प्रसंगावधान राखून सौम्या ने पटकन आपला हात पुढे करून तो तुकडा त्याच्या कडून घेतला आणि पटकन आपल्या ड्रेस च्या खिशात टाकला.
कॅब घेण्याकरता त्या चालत असताना सौम्या पुढे आणि ती मागे अशी स्थिती झाली तेव्हा ती वस्तू काय आहे हे तिच्या नकळत बघण्याची संधी सौम्या ला मिळाली. बस स्टँड मधे तात्पुरत्या काळासाठी प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी लॉकर ची सोय होती. पर्स मधून पडलेली वस्तू म्हणजे अशाच एका लॉकर मधे समान ठेवल्याची पावती होती.
“ अर्र... काया थांब जरा मी पटकन सराना फोन करते. आज मी नाहीये तर आजच्या कोर्टातल्या दाव्यांच्या फाईल्स कुठे आहेत हे सांगून ठेवायला विसरले होते मी. ”
सौम्याने पाणिनी ला फोन करून सर्व वृत्तांत कथन केला. “ सौम्या ती पावती किती वेळा पूर्वी घेतली आहे? ”पाणिनी ने विचारलं
“ साधारण दीड-दोन तासापूर्वीची ” सौम्याम्हणाली”
“ तिला माहिती झालेले नाही ना? ” पाणिनी ने विचारलं
“ नाही माहिती.”
“ तू एक काम कर , तुझ्या पर्स मधे एखादे पाकीट असेल तर त्यात ती पावती टाक आणि माझे नाव आणि आपल्या ऑफिस चा पत्ता त्यावर लिहून ते पाकीट वूडरिज हॉटेल च्या रिसेप्शन मधे देऊन ठेव. मी तिथून घेण्याची व्यवस्था करतो आणि लॉकर उघडून बघतो की काय आहे त्यात. ”पाणिनी म्हणाला.
सौम्याने लगेच पाकीट तयार करून त्यावर नाव लिहून पर्स मधे टाकले.
दोघी जणी टॅक्सी स्टँड कडे गेल्या .तिथे प्रवाशांना बसवणारा आणि टॅक्सी वाहतूक नियंत्रित करणारा एक होता.
“ आम्ही दोघी एकत्रच आहोत ” सौम्याम्हणाली
“ ही शेअरटॅक्सी आहे आणखी एक तरी पाहिजे प्रवासी. तुम्हाला कुठे जायचं होत?” नियंत्रकाने विचारलं
“ वुडरिज हॉटेल.”सौम्याम्हणाली.
“ हे मिस्टर कुठे जायचंय तुम्हाला? वुड रिज वरून पुढे जायचं का? असेल तर बसा.” मागच्या माणसाला उद्देशून नियंत्रक म्हणाला. नशिबाने त्या माणसाला वुड रिज च्या पुढेच जायचे होते. तो चांगलाच गप्पिष्ट आणि अघळ पघळ निघाला.त्या दोघींची तो चांगलीच चौकशी करत होता पण सौम्या ने फारशी माहिती त्याला दिली नाही. हॉटेल आल्यावर त्याला अच्छा करून त्या उतरल्या. रिसेप्शन पाशी आल्या.रिसेप्शनिस्टने सौम्या समोर रजिस्टर ठेवलं
“ मी पाणिनी पटवर्धन यांच्या ऑफिस मधून आल्ये.”
हळू आवाजात सौम्या म्हणाली.
“ माहित्ये मला , तुमचे बुकिंग व्यवस्थित झालय.”
“ काया, मी बुकिंग ची प्रक्रिया पूर्ण करते. तू हो पुढे मी आलेच. आणि हो, तुझं मधलं नाव काय आहे? ” सौम्याने सहज विचारले.
“ रेयांश , पण मी फारसे वापरत नाही ते.”
सौम्याने का..रे.प्रजापति अशी तिच्या नावाची नोंद केली.
रिसेप्शनिस्टने त्यांचे समान नेण्यासाठी एका वेटर ला हाक मारली.
सौम्याने आपल्या जवळचे पाकीट रिसेप्शनिस्ट कडे दिले.
“ हे पाणिनी पटवर्धन साठी आहे. ते घेऊन जातील थोड्या वेळाने.” सौम्याम्हणाली.
“ ते स्वत: येणार आहेत की कोणाला पाठवणार आहेत? आम्ही......”
त्याचे बोलणे अर्धवट राहिले कारण तेवढ्यात एक माणूस घाई घाईत त्याच्या जवळ आला आणि लक्ष वेधून घेण्यासाठी खोकला.
“ थांबा जरा , मी या बाईंचे काम करतोय ना ? ”रिसेप्शनिस्ट म्हणाला.
“ एक मिनिट ! ” तो माणूस उद्गारला. त्याचा अरेरावीचा स्वर सौम्या ला आवडला नाही. तिने पहिले तर त्या माणसाने रिसेप्शनिस्ट कडे दिलेल्या पाकिटाचा ताबा घेतला होता.तो माणूस म्हणजे त्यांच्याच बरोबर शेअर टॅक्सी ने आलेला सह प्रवासी होता.त्याचा मगाच चा गप्पिष्ट पण आता कुठल्या कुठे गायब झाला होता.
“ काय आचरटपणा आहे हा? ” खवळून सौम्या म्हणाली.
“ तुम्हा दोघींना पोलीस स्टेशनात यावे लागेल.मगाशी ज्या टॅक्सी ने आपण प्रवास केला ना त्याच टॅक्सी ने आपल्याला पुन्हा जायचय. तू या दोघींकडे लक्ष दे तो पर्यंत मी त्या पाकिटात काय आहे बघतो. तू त्याला जा घेऊन पोलीस स्टेशनात, मी तिथे येतो.” तो माणूस आपल्या सहाय्यकाला म्हणाला.
“ मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाहीये.” काया चिडून म्हणाली.
“ उलट तू कोण आहे हे आम्हाला कळलं आहे म्हणून आम्ही हे करतोय. बऱ्या बोलाने टॅक्सीत बसताय की पोलिसांच्या गाडीत घालून नेऊ ?”
“ मला माझ्या वकिलाशी बोलायचंय ” सौम्या म्हणाली.
“ जरूर बोल. पोलीस चौकीत भरपूर फोन आहेत आणि तिथे तुला पुरेसा वेळ ही मिळेल बोलायला. तिथून कर, अत्ता इथून नाही. ”
“ मी आत्ताच इथून करणार .कोण मला रोखतय बघू ” सौम्याम्हणाली.
“ पोरी , तुला याच पध्द्धतीने हवं असेल तर तसेही.” तो माणूस म्हणाला आणि त्याने सौम्या ला ओढत बाहेर काढले.
( प्रकरण ११ समाप्त)