Objection Over Ruled - 12 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 12

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 12

प्रकरण १२

पोलीस चौकीत आल्यावर सौम्याने पुन्हा निक्षून सांगितलं , “ मला फोन करायचाय.”
त्या पोलीस अधिकाऱ्याने तिच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. “ आम्ही तुझ्यावर आरोप पत्र दाखल केलं की मग तुला फोन करता येईल तुझ्या वकिलाला.”
“ माझा हक्क तुम्ही हिराऊन घेऊ शकत नाही.” सौम्यापुन्हा म्हणाली.
“ पुन्हा तेच तेच बोलून काही उपयोग नाही होणार ” पोलीस म्हणाला.
“ मी माझ्या हक्काची मागणी केली आहे हे तुम्ही ऐकलेच आहे.या संदर्भात कायदा आहे.”
“ तुम्ही इन्स्पेक्टरला सांगा हे.”
“ ठीक आहे सांगते मी त्यांना.” सौम्याम्हणाली.
“ साहेब मोकळे झाल्यावर भेटतील तुम्हाला.”
“ माझे वकील आणि मालक दोन्ही पाणिनी पटवर्धन आहेत.आणि त्यांना आवडणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा विषय हाताळताय”
“ पाणिनी पटवर्धन ना आवडेल की नाही या गोष्टीला इन्स्पेक्टर काडी इतकी किंमत देत नाहीत.” पोलीस म्हणाला.
“ पाणिनी पटवर्धन ना जेव्हा एखादी गोष्ट आवडत नाही,तेव्हा ते नक्कीच तो विषय तडीस नेतात. ते कदाचित तुमच्यावर आरोप ठेवतील.” सौम्याम्हणाली.
“ कसले आरोप? ”
“ वकिलाशी संपर्क करू न देणे, तातडीने कोर्टात प्रकरण दाखल न करणे ”
“ हे बघा , अजून तुमच्यावर आरोप ठेवलेला नाही.” पोलीस म्हणाला.
“ मग मला कशाला थांबवून ठेवलय? ” सौम्या ने विचारलं
“ सरकारी वकिलांना तुमच्याशी बोलायचय.”
“ मला नाही बोलायचं त्यांच्याशी.”
“ ते तुमचे दुर्दैव आहे.”
“ म्हणजे मला इथे साक्षीदार म्हणून आणलय?” सौम्याने विचारले.
“ तसचं काहीसं.” पोलीस म्हणाला. “ एका गुन्ह्याचा तपास चाललाय.”
“ मी साक्षीदार असेन तर मला अशा प्रकारे थांबवण्यासाठी तुमच्याकडे कोर्टाचा आदेश हवा.आणि जर मला अटक होणार असेल तर जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे मला तातडीने घेऊन जा.” सौम्या म्हणाली.
“दंडाधिकाऱ्याकडे जाण्यासाठीच आपण अंमळ थांबलोय.” पोलीस म्हणाला.
“ तुझ्या मना प्रमाणे होऊ दे. नंतर असं म्हणू नको की मी तुला आधी कल्पना दिली नव्हती म्हणून.तुझी पोलीस म्हणून अजून बरीच कारकीर्द बाकी आहे.माझ्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतलास आणि मला माझ्या हक्क पासून वंचित ठेवलस तर त्याची परिणीती तुला निवृत्ती नंतरचं पेन्शन न मिळण्यात होवू शकते ”
“ अहो काय बोलताय तुम्ही? मी फक्त मला वरिष्ठांनी दिलेले आदेश पाळतोय.”
“ मला माझ्या वकिलाशी बोलायचा हक्क असताना तो डावलून मला इथे थांवावून ठेवा असे आदेश आहेत का? ”सौम्याने विचारले. “ जेव्हा पाणिनी पटवर्धन हा प्रश्न तुमच्या वरिष्ठांना करतील ना तेव्हा तुझे वरिष्ठ तुझ्या बाजूने राहणार नाहीत. ते म्हणतील आम्ही फक्त सौम्या ला बसवून ठेव म्हणून सूचना दिली होती.तिच्या अधिकारापासून वंचित ठेव असे आम्ही कसे आदेश देऊ ? ”
“ ठीक आहे तुम्हाला फोन करायचा आहे ना ? या इकडे, दुसऱ्या खोलीत , तिथे फोन ची सोय आहे. ” असे म्हणून पोलिसाने तिला दुसऱ्या खोलीत नेले.तिथे तारकर बसला होता.
“ मला पटवर्धन ना फोन करायचाय ”. ती म्हणाली.
“ मला, तुला आधी काही प्रश्न विचारायचे आहेत.” तारकर म्हणाला.
“ मला पटवर्धन ना फोन करायचाय ”. ती पुन्हा म्हणाली.
“ नीट ऐक सौम्या, मला तुला त्रास द्यायचा हेतू नाही पण पाणिनी पटवर्धन जर तुला आगीत ढकलू पाहत असेल तर माझा इलाज नाही.मी पाणिनी शी संपर्क करीन पण जे काही झालंय त्याचा विचार केला तर तुझ्याच समोर संपर्क करणे इष्ट.” तारकर म्हणाला.
“ काय झालंय? ” सौम्याने विचारले.
“ तुम्हाला सांगायला हवं का वेगळ? तुम्ही दोघांनी पुरावा लपवायचा प्रयत्न केलाय.” तारकरम्हणाला
“ वा, वा ! ऐकावे ते नवलच.” सौम्याम्हणाली
“ काया प्रजापति ला झपाट्याने कुठेतरी आणि कुणाला दिसणार नाही अशा तऱ्हेने गायब करायचा तुमचा डाव होता.”
“कशी भाषा करताय ? आम्ही दोघी हॉटेलात आलोय आणि स्वत:च्या नावाने रजिस्टर केल्या खोल्या.तुम्ही फक्त रजिस्टर चाळले असते तरी पुरेसे होते.” सौम्या म्हणाली.
“ फार चातुर्याने केलेस तू हे , पण त्याचा हेतू तिला लपवणे हाच होता.”तारकर म्हणाला
“ सिद्ध कर ” सौम्याने आव्हान दिले.
“ दुर्दैवाने ते करता येत नाहीये मला कारण तू तिच्याच नावाने रजिस्टर केलीस खोली.” तारकर म्हणाला
“ मग मला कशाला थांबवून ठेवलय?” सौम्याने विचारलं
“ पुरावा लपवला म्हणून ”तारकर म्हणाला आणि नाटकी पणाने त्याने आपल्या टेबलाच्या कप्प्यातून बुटाची जोडी बाहेर काढली.स्त्री चे बूट !
“ आता तू म्हणशील की मी हे पहिलेच नव्हते ”तारकर म्हणाला
“ नव्हतेच पहिले.” ठाम पणे सौम्या म्हणाली
“ दुर्दैवाने, सौम्या, तुझे हे म्हणणे मान्य होण्यासारखे नाही.पाणिनी पटवर्धन ने कायाला सांगितलं की हे बूट पेपरात गुंडाळून स्टँड वरच्या लॉकर मधे ठेव. तिने तसे केले.त्याची पावती तिने तुला दिली.तू ती पावती पाकिटात घालून पाणिनी पटवर्धन ला देण्यासाठी हॉटेल च्या रिसेप्शनिस्ट कडे ठेवलीस. ”तारकर म्हणाला
“ काय झालंय त्या बुटाना? ” सौम्याने विचारले.
“ बुटामध्ये काही प्रोब्लेम नाहीये ” हातात भिंग घेऊन बुटांचा चामडी तळ तपासता तपासता तारकर म्हणाला. “ प्रोब्लेम तुझ्यात आहे सौम्या.... हे बूट ....”
तेवढ्यात धडकन दार उघडले गेले आणि पाणिनी पटवर्धन आत आला.
बाहेरच्या पोलिसाने दारातून डोकाऊन तारकर ला विचारले, “ तुम्ही बोलावलं होतं काय याना? ”
“ अजिबात नाही ” तारकर म्हणाला
“ बाहेर व्हा तुम्ही ” पोलीस पाणिनी पटवर्धन ला म्हणाला.
पाणिनी पटवर्धनला बघताच प्रसंगावधान राखून सौम्या पटकन म्हणाली , “ हे माझे वकील आहेत.माझ्यावर काही आरोप ठेवणार असल तर हेच बोलतील माझ्या वतीने.माझ्यावर काहीही आरोप ठेवणार नसाल तर कोर्टाचे समन्स असल्याशिवाय साक्षीदार या नात्याने मला काहीही सांगायचे नाही.”
“ या दोघींचा मी वकील आहे.” पाणिनी म्हणाला. “ आणि माझा आग्रह आहे की सर्वात जवळच्या कोर्टात त्यांना नेण्यात याव, तातडीने.”
तारकर हसला. “ पटवर्धन तू विसरतो आहेस, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस.सोमवार शिवाय काहीच नाही घडणार तुझ्या मनासारखं.”
“ मी इथे येतानाच न्यायाधीश मिस्टर सुधांशु रुद्र यांना विनंती करून आलोय.ते कोर्टात जायला निघालेत.”पाणिनी म्हणाला.
पाणिनीने दोघींना खूण करून उठून जायला सांगितले.
“ म्हणजे आम्ही जाऊ शकतो ? ” कायाने आश्चर्याने विचारले.
तारकर ने त्यांना काही उत्तरं दिले नाही , त्यांच्या कडे बघितले पण नाही.पाणिनी ने दर उघडले आणि त्यांना बाहेर नेताना त्याला आवाज आला
“ ठीक आहे , पाणिनी, या वेळी जिंकलास तू.पण लक्षात ठेव आज पुन्हा मध्यरात्रीच्या आत त्या दोघी इथे असतील आणि त्यांचा मुक्काम इथे असेल.”
आपल्याला जणू काही काहीच ऐकू आले नाही असे भासवून पाणिनी पटवर्धन त्या दोघींना घेऊन बाहेर पडला.
( प्रकरण १२ समाप्त)