Punha Navyane - 9 in Marathi Women Focused by Shalaka Bhojane books and stories PDF | पुन्हा नव्याने - 9

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

पुन्हा नव्याने - 9

भाग ९
मावशी मीराच्या केसांना मनापासून तेल लावत होत्या. मीराला तिच्या आईची आठवण आली." माझी आई पण माझ्या केसांना असचं तेल लावून द्यायची. " मीरा मावशी ला म्हणाली. राजीव साठी तिने आई बाबांना दुखावले होते याची तिला खंत वाटत होती.

मावशी, " आई ती आईच असते तिच्या मायेची सर कशालाच नसते. तिच्या इतकी माया आपल्या वर कुणी च करत नाही. "

मीरा, " मावशी तुम्हाला एक विचारू रागवणार नाही ना? "
मावशी, "अहो ताई, असं कायं बोलताय तुमच्या वर मी कशाला रागवेन.? तुम्ही माझ्या अन्नदाता आहात. *

मीरा, " तुम्ही जेव्हा माझ्या घरी आलात तेव्हा मी सांगितलेल्या अटी तुम्ही लगेच मान्य केल्या. तुम्ही लगेचच होकार दिला. तेव्हा मला असं जाणवलं की , तुम्ही खूप अगतिक आहात. खरचं असं काही होतं का? "

मावशी, " हो तुम्ही अगदी बरोबर ओळखले. मी खरोखरच खूप अगतिक होते. मी १८ ची झाले तेव्हा आईने माझं लग्न माझ्या पेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाशी लावले. घरात कमालीची गरीबी होती. आई आणि मी दोघीचं राहत होतो. वडिलांना तर मी कधी बघितलच नाही. मी सहा महिन्यांची होते तेव्हा च माझे वडील वारले. त्यामुळे सगळे मला अपशकुनी समजायचे. आईने कधीच मला अपशकुनी समजलं नाही. ती चार घरची धुणी, भांडी करायची आणि मला खायला घालायची. ती जिथे जिथे काम करायची तिथल्या बायका तिला उरलेल्या जेवण द्यायच्या.
मी सतरा वर्षांची झाले तशी मी पण आईच्या मागे कुठेतरी काम शोधण्यासाठी लागले. आईने मला एक घरकाम बघुन दिले. ती बाई, तीचा नवरा आणि तिची सासू असे तिघे होते. ती बाई कामाला जायची तीचा नवरा पण कामाला जायचा . मग फक्त त्या आजी आणि मी आम्ही दोघीच असायचो. माझं काम झालं की, मी त्या आजीच्या पायांना तेल लावून देत त्यांच्याशी गप्पा मारायची. पण एकदिवस त्या बाईचा नवरा घरी होता. मी किचनमध्ये काम करत होते. आजी त्यांच्या बेडरूम मध्ये झोपल्या होत्या. त्यांचा मुलगा त्यांच्या बेडरूममध्ये काहीतरी काम करत होता.
मी किचनच्या कामात व्यस्त होते. इतक्यात मला जाणवलं की, माझ्यामागे कोणीतरी उभे आहे. मी मागे वळून बघितले तर त्यांचा मुलगा माझ्या अगदी जवळ उभा होता. मला काही कळायच्या आतच त्याने माझ्या तोंडावर हात दाबला. मी घाबरले काय करायचे मला सुचत नव्हते.
मी खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. मी ओरडायचा प्रयत्न करत होते तर त्याने मला चाकूचा धाक दाखवला. काय करु सुचत नव्हते. तो मला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता.
मी किचनची भिंत घट्ट पकडली होती. ती सोडताना तिथे काहितरी पडल्याचा आवज आला. आजी औषध घेऊन झोपायच्या म्हणून त्या काही उठणार नाही हे जाणवलं आणि आता आपलं आयुष्य संपले असे वाटले. त्याने मला बेडवर ढकलले आणि बेडरूम चे दार लावून घेतले. तो माझ्या अगदी जवळ आला. मी माझ्या अंगात होतं नव्हतं तेवढं बळ एकवटून त्याला ढकललं. तो कशावर तरी आपटला. आणि काही तरी फुटलं. ते बघून तो खूप रागवला त्याने माझ्या कानाखाली मारली. त्याच्या अशा अनपेक्षित माराने मी भेलकांडले.
तो परत माझ्या जवळ आला. इतक्यात दार जोरजोरात वाजू लागलं. आजी उठली होती. दार खूप जोरात वाजत होते. मी पटकन जाऊन दार उघडले.आजी मला बघून काय समजायचे ते समजली. तिने आपल्या थरथरत्या हाताने त्याच्या एक मुस्काटात लगावली.
मी तिथून तडक निघाले आणि घरी आले. घरी येऊन आईला बिलगले. झाला प्रकार आईला सांगितला. पण आम्ही गरीब होतो. त्याच्या वर काहीच कारवाई करू शकलो नाही. आई ने मला शांत केलं. ह्या प्रकाराची वाच्यता कुठे ही करू नकोस असं सांगितलं.
मी आई ला विचारले," का ग आई तू असं का बोलत आहेस? "
आई,"अगं तू कितीही कोणाच्या कानी कपाळी ओरडून सांगितले तरी सगळे तुलाच खोट्यात काढतील.‌तुझ्यावर अतिप्रसंग झाला हे च सगळे समजतील. पैशासाठी आपण हा आरोप करत आहोत असे बोलतील ‌ . गरिबांचा कुणी वाली नसतो. पावलोपावली अशी‌ लोकं तुला‌ भेटतच राहतील. "
आजी स्वतः मला भेटायला आल्यावर शोधत शोधत. माझी माफी मागू लागल्या‌ . " मला माफ कर पोरी.". आजी म्हणाल्या.
"तुम्ही कशाला माफी मागताय आजी . त्या दिवशी तुमच्यामुळे च मी वाचले. "
मी म्हणाले.
आजी,"सांभाळून रहा पोरी. येते मी."
आईची परत हिम्मत च झाली नाही आणि माझी पण नाही झाली. परत कुठे कामाला जायची. मग आलेल्या स्थळाशी आईने माझं लग्न लावलं. तिचं म्हणणं होतं की माझ्या साठी स्थळ आलं हेच मोठे. मी १८ ची तर ते ३५ वर्षांचे होते. दिसायला ठिकठाक होते पण घर भाड्याचे होते. देवळात साध्या पद्धतीने माझं लग्न झालं. त्यांनंतर दोन च महिन्यात आई गेली. माझे दिवस तसे चांगले चालले होते. दोनवेळा चांगले आणि पोटभर जेवण मिळत होते.‌आमचा संसार चांगला चालू होता पण मुलं काही झाली नाही . पण त्यांनी कधीही मला एका शब्दाने पण दुखावलं नाही. पण माझं नशिब च खराब होत. एकदा कामावरून येता येता त्यांना ॲटॅक आला आणि ते जागेवरच गेले. मी माझ्या या बहिणीकडे आले. ही माझ्या दुरुस्त्या नात्यातील बहीण होती.
ती खूप चांगली आहे पण तिचा नवरा चांगला नव्हता. त्य घरत राहणं मुश्किल झालं होतं. म्हणून मी तुमचं काम पटकन स्विकारले.


हा‌. भाग. तुम्हाला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी नक्कीच मोलाच्या आहेत.