Punha Navyane - 10 in Marathi Women Focused by Shalaka Bhojane books and stories PDF | पुन्हा नव्याने - 10

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

पुन्हा नव्याने - 10

भाग १०
किती दुख: असतना एखाद्या च्या आयुष्यात तरीही ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. मावशी ना बघून कोणाला वाटणार ही नाही त्यांनी किती सोसलयं ते.
उद्या गुढी पाडवा होता. दुसऱ्या दिवशी मीरा लवकरच उठली खरतरं रात्रभर तिला नीट झोपेच लागली नाही. तिला सतत तिच्या स्टुडिओ च ओपनिंग च दिसत होते. मावशींनी मस्त इडली सांबार चा नाश्ता केला होता. तो खाऊन ती मावशींना म्हणाली, " मावशी तुमचं पण आवरून घ्या राजीव आणि मुलं येतील त्यांच्या बरोबर या. जास्त उशीर करु नका. "
जीमचा परिणाम थोडाफार तरी झाला होता. मीरा खूप छान नटली होती. डार्क रेड कलरची पैठणी ती नेसली होती. तिला साजेसा मेक अप केला होता. तिचे ठेवणीतले दागिने तीने घातले होते. ती स्टुडिओ ला पोहोचली. तिच्या घरापासून फार तर पंधरा वीस मिनिटांचे अंतर होते. ती आज खूप खूश होती. रागिणी पण आली. रागिणी ने तिला मिठी मारली. ती पण खूप खूश होती कारण मीरा तिच्या आयुष्यात पुढे काहीतरी करतेय ह्याचा तिला आनंद वाटत होता.
अमेय पण आला होता त्याने पण मीराचं अभिनंदन केले. राजीव, मावशी आणि मुलं पण आली होती. आता फित कापायची होती. तीने रागिणी आणि रीयाला फित कापायला सांगितले. रागिणी ने रीया आणि राहुल दोघांना घेऊन फीत कापली. सगळे च खूप खूश होते. राजीव तर मीराला बघतचं बसला होता. मीरा खूप सुंदर तर दिसतच होती पण खूप कॉन्फिडन्ट वाटत होती. ही मीरा एकदम वेगळीच होती. तिला फसवल्या च त्याला वाईट वाटत होते. इतक्यात तीने त्याला खुलवून फोटो काढायला बोलवत होती. रागिणी, अमेय, राहुल, रीया, मावशी, मीरा असे फोटो काढत होते. राजीव ला पण तीने बोलवून घेतलं. सगळ्यांचे फोटो झाले .
उद्घाटन झालं सागळंछान झालं. दुसऱ्या दिवशी पासून तिची खरी कसरत होती. रागिणी चा तिला सकाळी सकाळी फोन आला.

रागिणी, " हॅलो, मॅडम रेडी झाल्या की नाही? आजपासून खरी सुरुवात होणार आहे. "

मीरा, " हो झाले रेडी. आता मला घरचं तितकेच टेन्शन पण नाही आहे. मावशी सगळं व्यवस्थित हऍन्डल करत आहेत. "

रागिणी, " मीरा ही तर सुरूवात आहे. सुरवातीला गर्दी कमी असेल. पण एकदा का फेमस झालीस ना की, मग बघ. तुला मी बोलले होते तसे हॅन्डबील बनवले स का ❓
ते घरोघरी टाकायला दे. म्हणजे आजूबाजूला परिसरात स्टुडिओ बद्दल कळेल .
हल्ली सगळ्या प्रोग्रॅम साठी मेक अप लागतो. तो सुद्धा प्रोफेशनल. बघ च तू थोड्याच दिवसात तुला बोलायला पण फुरसत नसेल . "

मीरा, " थॅंक्यु, रागिणी तुझ्या मुळे मी हे करू शकले. "

रागिणी, " मैत्रीमध्ये नो सॉरी नो थॅंक्यु. ओके. बाय ऑल द बेस्ट. "

मीरा, " थॅंक्यु बाय. "

राजीव पण आवरुन ब्रेकफास्ट करत होता. मीरा ने देवाला नमस्कार केला. मावशींना पण नमस्कार केला. मावशींनी मीरा च्या हातावर दही ठेवले. मावशी आता तिच्या घरच्या सदस्य बनल्या होत्या. राजीव ने मीरा ला आवाज दिला. तीला वाटलं त्याला काही तरी त्याच्या वस्तूंबद्दल विचारायचे असेल. म्हणून ती त्याला बोलली." रूमाल, कपडे, वॉलेट, बेल्ट, साॅक्स सगळं काढून ठेवले आहे. "

राजीव, " ते राहू दे. तू जरा इकडे ये. "

मीरा त्याच्या जवळ गेली.

राजीव, " आज तुझा पहीला दिवस आहे. पुन्हा नव्याने तू एक सुरूवात करत आहेस त्यासाठी ऑल द बेस्ट. "असे बोलून राजीव ने मीरा या चेहरा आपल्या ओंजळीत पकडला आणि तिच्या कपाळावर किस केले.
मुलं पण तयार होऊन आली आणि त्यांनी टिव्ही वर गाणं लावले.

माना के मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर.
तु जो रुका तो रूकेगी मंजिल आएगी ना फिर
कदम कदम बढाऐजा
गगन गगन झुकाऐजा
रक हौस ला
कर फैसला
तुझे वक्त बदलना है

दोघेपण एकदम ओरडले ,"ऑल द बेस्ट मम्मा. "

मीरा तर खूपच खूष झाली. मीरा च्या दिवसाची सुरुवात चांगली झाली होती. मीरा स्टुडिओ त गेल्या गेल्या च मेक अप आणि हेअरस्टाईल साठी दोन ऑर्डर आल्या. पण त्या दोन दिवसानंतर च्या होत्या.
जशी संध्याकाळ झाली तश्या खूप जणी येऊन चौकशी करून गेल्या. काही ऑर्डर देऊन ॲडवान्स पैसे देऊन गेल्या.
राजीव च्या बोलण्याने मीरा सुखावली होती. अनया फक्त पैशासाठी त्याच्याजवळ आली होती. तिने त्याच्याशी पैशासाठी संबंध जोडले होते. जसा त्याच्या कडून येणारा पैसा बंद झाला तशी ती तो जॉब सोडून गेली. तीने तिचा नंबर पण चेंज केला. त्यामुळे राजीव कळून चुकले की आपण किती मोठी चूक केली.
मीरा ने जर रागाने घर सोडले असते तर आज परिस्थिती काही वेगळी असती. मुलांचे हाल झाले असते. त्यांची मानसिक स्थिती ढासळली असती. दोघांच्या भांडणात मुलांचे हाल झाले असते.
मीरा खूप नशीबवान होती. रागिणी सारखी मैत्रीण तिला भेटली होती.

एका वर्षानंतर
मीरा स्टुडिओ चालवत असताना मेक अप संदर्भात असणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत होती. तीने भाग घेतलेल्या स्पर्धा पैकी एका स्पर्धेत तीचा पहिला क्रमांक आला होता. त्याचे बक्षिस वितरण होते. त्यासाठी सर्व परिवार आला होता. रागिणी आणि मावशी पण आल्या होत्या.
पहिला क्रमांकाचे बक्षिस जात आहे. मिसेस मीरा राजीव यांना. मीरा स्टेजवर गेली.
मीरा, " मला मिळालेल्या या बक्षिसामध्ये खूप जणांचा मोठा वाटा आहे. सगळ्या त आधी माझी मैत्रीण रागिणी जीने मला स्टुडिओ काढण्यासाठी प्रेरणा दिली. माझ्या मावशी ज्या मी नसताना माझं घर उत्तम रीत्या सांभाळतात त्यामुळे मी निर्धास्त पणे माझे काम करू शकते. माझे पती राजीव त्यांनी मला आर्थिक दृष्ट्या पाठबळ दिले. माझी मुलं जी सतत मला मोटीवेट करत असतात. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत पोहचू शकले. धन्यवाद.
राजीव चा ऊर अभिमानाने भरून आला. आपण खूप चुकीचे वागलो याची जाणीव होऊन त्याचे मन भरून आले.
मीरा आणि तो दोघे बेडरूममध्ये होते. तेव्हा राजीव ने मीरा ची माफी मागितली.

राजीव, " मीरा मला माफ कर. मी तुझा खूप मोठा अपराधी आहे. मी तुझं मन दुखवले.मी पुन्हा कधी च असं वागणार नाही.

मीरा, " तुमची चूक तुमच्या लक्षात आली हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ती मान्य केली यात च सगळे आले. झाले गेले विसरून पुन्हा नव्याने आपल्या संसाराला सुरूवात करुया. "

अशा तऱ्हेने मीरा ने आपला संसार वाचवला.

तुम्हाला ही कथामालिका कशी वाटली. त्यात काय चुका झाल्या आहेत तसेच ह्या कथेतील कोणती गोष्ट तुम्हाला आवडली. हे आपल्या प्रतिक्रियेतून नक्की सांगा . तुमच्या प्रतिक्रिया माझ्या साठी खूप मोलाच्या आहेत.

कथामालिका आवडली असल्यास स्टिकर्स द्यायला विसरू नका. माझी कथामालिका वाचली त्याबद्दल खूप आभार.