Julun yetil Reshimgathi - 1 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 1

Featured Books
  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 1

भाग - १

{विनायक सोसायटी}

(पेडणेकरs)

.

.

.

सावी - बाबाsss पिंकीsss या लवकर नाश्ता तयार आहे....

सतीश - आलो गं आलो...

गुड मॉर्निंग चिऊ!💭

सावी - शुभ सकाळ बाबा! घ्या सुरु करा..

सतीश - वाह! आज ढोसे...मज्जा केलीस हा आमची...

सावी - त्यात काय मज्जा बाबा...बरं पिंकी कुठंय?

सतीश - खोलीत तिच्या..

सावी - बरं आले मी बोलावून...

सावी खोलीकडे जाते......तर दरवाजा उघडा होता.....आतून गाण्याचे जोरजोरात आवाज चालू येतं होते....सावी आत गेली तर साची स्वतःला आरशात पाहून हसत बसलेली......एकदम स्वतःला हरवून...

एक मी एक तू.....

शब्द मी गीत तू....

आकाश तू आभास तू....

साऱ्यात तू.....

स्पर्श मी मोहोर तू....

स्वप्नात तू सत्यात तू.....

साऱ्यात तू....

 

कां कळेना कोणत्या क्षणी

 

हरवते मन कसे.....?

 

 

 

सावी - मन हरवलंय माझ्या पिंकीच??

 

रेडिओ बंद करताना ती म्हणाली.. 😂

 

साची - हाsss अअअअअ चिऊ ताई...

 

भानावर येताना....🙄

 

सावी - हो मीच चिऊ...काय गं एवढ्या सकाळी सकाळी अशी गाणी? भजन तरी लावत जा....

 

साची - काय गं ताई तू ना बोर आहेस बग...

 

सावी - त्यात बोर काय तुझ्यासारखं सकाळी सात वाजता अशी गाणी तरी नाही लावत मी..कामं करते उठून तुम्ही पण करा जरा....

 

साची - ताई गं सकाळी सकाळी स्वयंपाक यावर चर्चा नको....

 

सावी - हो हो...बरं काल पेपर झाला ना? मार्क्स?

 

साची - हो हे घ्या पेपर...

 

सावी - वाह पिंकी तुला तर 100/95 मिळाले गं उत्तम...Very Good बेटा.... हा शेवटचा होता ना...

 

साची - हो तायडे....

 

सावी - तुझा हे शेवटचं वर्ष उत्तम पणे जाऊदे... आमची काळजी मिटली....

 

साची - जाईन गं..

 

सावी - हम्म चला आता नाश्ता करायला...

 

साची - हो...

 

गुड मॉर्निंग बाबा...

 

सतीश - मॉर्निंग पिंकी...

 

चल लवकर आवर...

 

साची - मला नाश्ता नको आज लवकर जायचंय माझी मैत्रीण वाट पाहतेय..

 

सावी - कोण गं? रोज हॉर्न वाजतो, फोन येतो तू जातेस काय चाललंय हू?

 

साची - असं काही नाही चिऊ ताई...मैत्रीण मित्र हे कॉमन आहे ना गं आता..

 

सतीश - असुदे गं चिऊ..जा पिंकी तू...

 

साची - बाय बाय...

 

सावी - बाबा तुमच्या याच लाडाने ती शेफारले...

 

सतीश - असुदे..मला माझ्या मुलींवर खात्री आहे साची पण काही असेल तर नंतर सांगेल ना..? आपली बंदी नाही आहे तिला हे माहिते...माझ्या मुली चुकीचं कधीच नाही करणार इतका धाक तर आहेच....

 

सावी - हम्म तुम्ही पण ना... चला आता निघूया...

 

सतीश - हो हो चला....

 

.

 

.

 

.

 

{विजया सहकारी बँक}

 

विदुला - बोला काय मदत करू आपली??

 

ग्राहक - काय मदत करू नकोस, माझा नुकसान झालंय ते बग आधी...😡

 

विदुला - तुम्ही चिडलायत कां इतकं?

 

ग्राहक - अग माझे पैसे अजून अकाउंट ला नाही आले...किती दिवस झाले फेऱ्या घालते.... अशी कशी तुमची बँक... मला आता कामं करून हवं माझं आणि माझं अकाउंट मी क्लोज करते इकडून....

 

विदुला - अहो मॅडम शांत व्हा ना..

 

आजोबा - अग बाळा माझे पेन्शन ची रक्कम ही अजून आली नाही....चेक मोडून महिना उलटला....

 

ग्राहक - बगा ना कशी ही बँक आहे मला ठेवायचा नाही खात इकडे...

 

आजोबा - हो आता मला ही... नाही ठेवायचं...

 

विदुला - अहो सगळ्यांनी शांत रहा....अहो..कुणी ऐकत नाही माझं...हा तिलाच बोलवते.....

 

आत मध्ये पळत येताना.....

 

सुनील सर - अरे देवा काय हा घोळ घालतलास विदुला....बाहेर किती आरडाओरडा आहे...अग आज बँकेत नवीन व्यक्ती जॉईन होणारे त्याच्या समोर हे असं दृश्य....

 

विदुला - सर मी काय करू सगळ्यांच्या कामाचं बिल माझ्यावर फाडतात सगळे... 😔

 

सुनील सर - अरे देवा हो कां...असो आता रडू नका तुम्ही...मला टेन्शन आलंय आता...सावी कुठे आहे सावी तीच यातून.....अरे बाहेरून आवाज यायचा कमी झाला.....

 

बाहेर बघताना........

 

विदुला - हो ना...

 

सावी - काकू...काकू...थोडं शांत होता....प्लिज काकू माझ्याकरता.....दादा अहो दादा जरा सगळ्यासाठी फकडं चहा बनवून आना लवकर.....काकू घेणार ना चहा....

 

काकू - हो आता तु बोलतेस तर....

 

सावी - बोला कोणतं कामं नाही झालं तुमचं...

 

काकू - अग माझ्या मुलाने पैसे पाठवले गं मी किती दिवस झाले येते.....माझं अकाउंट मध्ये पैसे आलेले सांगत नाहीत दाखवत नाहीत....काही पत्ताच लागेना....

 

सावी - अच्छा इतक कामं होय, ठीके तुमचं पासबुक दाखवा...हा पाच मिनिटं थांबा हा काकू लगेच येईल बगा....

 

तीच कामं करतं करता.......🖥️🖱️⌨️

 

काकू - हो बाळा...चहा मस्त आहे हो....

 

सावी - हो ना तुम्हाला बरं वाटलं ना..मग झालं तर..☺️काकू झालं मेसेज आला कां पहा...

 

गोड हसतच ती म्हणाली........

 

काकू - अ हो आला गं पोरी....

 

सावी - काकू आम्हाला क्षमा करा हा...आमच्याकडून थोडी चूक झाली...कामात हळगरंजीपणा झाला...म्हणून तुमचं कामं राहील....माफ करा खरंच पण पुन्हा असं खात बंद करायच बोलू नका काकू...आम्ही आमच्या कडून सर्व काही देतं असतो....फक्त आजच अशी चूक झाली याआधी झालं कां असं? नाही ना...मग आता माफ करा हम्म....

 

काकू - हो बाळा...सॉरी

 

सावी - काकू सॉरी नका म्हणू ओ...बरं एक सुचवू कां? तुमची हरकत नसेल तर...

 

काकू - हो हो बोल ना..

 

सावी - तुमच्या मुलाने दीड लाख पाठवलेत ही कमी रक्कम नाही.....ही जर तुम्हाला आताच काढणं गरजेची नसेल तर याची FD करून चांगल हफ्ता तुम्ही घेऊ शकता..... चांगला व्याज घेऊ शकता आमच्याकडे खूप चांगल्या स्कीम आहे.....

 

काकू - अम्म हो तस जास्त गरज नाही...चालेल मला....

 

सावी - अरे वा मस्त...अअअ राहुलss राहुल यांना FD च सांग जरा...ओके.....

 

राहुल - हो नक्कीच या ना काकू.... बसा...

सावी - आता तुम्ही बोला आजोबा...काय म्हणता?

 

आजोबा - अग माझा चेक मोडून खूप दिवस झाले आले कां माझे पैसे मला कॅश हवी आहे....

 

सावी - मी बघून सांगते हा... मग काय म्हणता तुमचा नातू आज सोबत नाही आला?

 

आजोबा - नाही शाळेत गेला तो....अग त्याच्यासाठी तर पैशे काढायला आलोय....फि भरायची ना....शिकतोय....आता दहावी ला आहे....

 

सावी - अरे वाह!!हम्म हे घ्या झालं....आजोबा पूर्ण पन्नास हजार आहेत....ते आमचे कॅशियर आहेत त्यांच्याकडून घ्या.....अ प्रशांतsss जरा यांना दया कॅश मी मेल केलंय....

 

प्रशांत - हो सावी....या आजोबा इकडे या....

 

आजोबा - थँक्यु बाळा!!

 

सावी - वेलकम आजोबा....या तुम्ही या आता भाऊ......

विदुला - सावी...

 

सावी - विदु ये बस..केलंय मी सगळं सॉल्व हम्म आता शांत हो तु...

 

सावी - थँक्यू सावी...

 

सावी - हम्म हे बग विदुला तुझ्या पर्सनल प्रकरा मुळे तु डिस्टर्ब् आहेस ठीके मी समजते पण कामात असं बेजबाबदार राहणं योग्य नाही......कामाच्या बाबतीत आपण तत्पर असावं....कधीच आशा चुका नको करू सावरायला दरवेळी मी येणार कां...

 

विदुला - हो समजलं सॉरी....

 

सावी - हम्म आता बस आणि कामं आवर मी आले जरा हम्म...

 

विदुला - हो..

 

सुनील सर - अटेंशन......मंडळी आज मी तुम्हाला आपल्या नवीन मेम्बरची ओळख करून देऊ इच्छितो.....जे आजपासून आपल्या बँकेत कामं करणार आहेत.....हे आहेत अ.....अअअ अरे कुठे गेले ते....??एक मिनिटं मी आलोच त्यांना घेऊन.....(त्यांना शोधत......)



सावी किचनमधून (Pantry Room) बाहेर आली.........डाव्या बाजूने वेगाने येणाऱ्या एका व्यक्ती सोबत तिची टक्कर झाली.......सावी चा तोल जाऊन ती पडणार होती.......पण त्या व्यक्तीने तिला सावरले.......दोघांची नजरानजर झाली👀

 

सावीने तर डोळे बंद करून घेतले होते.......तो व्यक्ती काही क्षण तिलाच पाहत राहिला......

 

"आँखो से वार कर दे ना👀"
"सिने मे प्यार भर दे ना" 💘



सावी - सॉरी सॉरी सॉरी सॉरी.....
(त्याच्यापासून वेगळं होताना...)

 

व्यक्ती - अ अ अ त तुम्ही सॉरी नका म्हणू चूक माझी आहे.....मी खूप वेगाने येतं होतो..... सॉरी हू...(तिकडून निघून जात )

 

सावी - हम्म

 

विदुला - सावे अग चल सुनील सर कसली अनुनसमेंट करतात....

 

सावी - हो चल...

 

सुनील - माफ करा मगाशी असच निघून जाण्यासाठी......तुम्हाला सांगितलं तस,आपले नवीन मेम्बर......जे आपल्या बँकेत Bank Manager म्हणून आलेले आहेत.....काहीही अडचणी असेल....यांना विचारायचं....यांच्या अंडर आहात तुम्ही आता....समजलं...आजवर मी मॅनेजर नसूनही सर्व कामं बघत आलो कारण आपली बँकेची शाखा नवीन होती पण आता आपले बॉस आपले ही सर आलेले आहेत......आता सर्वानी त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या.....

 

प्रशांत - हो सर..

 

राहुल - हो...

 

विदुला - हो सर पण ते आहेत कोण??

 

सुनील - सांगतो....हे आहेत.... अर्जुन अविनाश कुलकर्णी....
(समोरील व्यक्ती कडे बोट करून...)

 

अर्जुन - Hello Everyone

 

प्रशांत - हॅलो सर...

 

राहुल - हॅलो...

 

विदुला - हॅलो सर...

 

सावी - अरे हे तर ते? आता वाले...🙄(मनातच)

 

अर्जुन - i hope तुम्हाला माझ्यासोबत ही कामं करायला नक्की आवडेल.....माझा कस आहे कामं नीट परफेक्ट असेल तर आवडत....नाहीतर माझा राग सावरायला कायम तयार राहा....बाकी सगळं चालत मला....मस्ती थट्टा....पण कामं ही हवं....

 

सगळे - हो सर...

 

अर्जुन - हम्म

 

सुनील - बरं चला सगळ्यांनी आपापली माहिती सांगा......नाव सांगा.....

 

प्रशांत - हॅलो अर्जुन सर मी प्रशांत नगरकर...कॅशियर आहे....

 

अर्जुन - हॅलो...

 

राहुल - हॅलो सर मी राहुल पवार,लोन & FD डिपार्टमेंट मध्ये आहे.....

 

अर्जुन - हाय!

 

विदुला - हॅलो सर मी विदुला कदम, मी सुद्धा सेम डिपार्टमेंट आहे....

 

अर्जुन - हम्म हॅलो हॅलो...नमस्कार
आता अजून कुणी राहील कां??

 

सुनील - हो अहो सर आमच्या बँकेची हुशार स्टाफ राहिली....सावे....

 

सावी - अ हॅलो सर मी सावी सतीश पेडणेकर...मी लोन,चेक,& न्यू अकाउंट डिपार्टमेंट मध्ये आहे...

 

सुनील - खूप हुशार आहे हा सर ही...सगळी कामं करते

 

अर्जुन - हो खरंतर मी यांच कामं मगाशी पाहिलं खूप उत्तम प्रकरे हॅन्डल केलंत तुम्ही मगाशी सगळ्यांना....खूप छान....चांगल कॉमयुनिकेशन स्किल ही आहे तुमच्याकडे....आवडल मला....

 

सावी - थँक्यु सर

 

अर्जुन - सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा मिस पेडणेकर साठी.....

 

सगळे - ये ये....👏

 

सावी सगळ्यांच्या बोलण्याने हसायला लागते......तीच हसणं बघून अर्जुन ला वेगळंच काहीतरी फील होतं.....कां??....

 

.

 

.

 

.

 

.

 

{चिंतामणी निवास}

(कुलकर्णीs)

अर्जुन - आई....आज्जी....आजोबा.....अप्पू...
(घरात येताना)

 

संगीता - आलास कां बाळा?? ये बस....

 

अर्जुन - हो आई....

 

भागीरथी - हे घे पाणी घे...

 

अर्जुन - थँक्यु आज्जी.... ❤️

 

भगवान राव - अर्जुन बाळा जा फ्रेश होऊन ये मग मस्त गप्पा मारू....तोवर अप्पू पण बाहेरून येईल....

 

अर्जुन - हो लगेच आलो आजोबा...

 

रात्री जेवण झाल्यावर सगळे गच्चीवर बसतात......आणि मन खोलून गप्पा मारतात.....

 

अर्जुन - आजोबा खूप छान स्टाफ आहे हा....उत्तम...कामसू स्टाफ आहे....

 

आजोबा - चला हे एक बरं झालं....

 

आज्जी - हो ना माणसं कामसू असली की कोणतीही बाजी सहज मारता येते...

 

संगीता - हो ते आहेच...आणि माझा अर्जुन पण तसा आहे कामं करून घेणारा...

 

अर्जुन - हो आई आज जेवण मस्त झालेला...पोट गच्च भरलंय.... तुझ्या हातची चव नाही गं कुणाला....

 

संगीता - हो कां...थँक्यु बरं...

 

अपूर्व - हम्म मस्का मारतोयस ना 😂

 

अर्जुन - गप रे 😂

 

आजोबा - ठीके अ अर्जुन बेटा ऐक जरा....मला बोलायचंय...

 

अर्जुन - बोला ना आजोबा...

 

आजोबा - गावावरून तुझ्या सदा मामाच फोन आलेला...त्याच्या शेजारचे आहेत ना त्याने तुझ्या लग्नासाठी नीलम ची मागणी टाकले....

 

अर्जुन - निलम कोण?? सदा मामा चे कोण शेजारी??

 

आज्जी - अ अरे ती शेवगेंची....निलू.....

 

अर्जुन - हा हा ती होय...अरे यार आज्जी आजोबा आई अहो ती निलम शी माझं लग्न....No way....तिला स्वतःच असं मत ही नाही.....नेहमी लहान पोराप्रमाणे वागते,बोलते....एकदम शेम्बडी...मी तिच्याशी लग्न करू 😂



आज्जी - अरे 😂😂

 

आजोबा - हम्म बोलतोयस तर खरं 😂

 

संगीता - आई बाबा अहो असं कां बोलताय त्याला मग तो ही तेच बोलेल ना....निलम चांगली तर आहे....

 

अर्जुन - काही चांगल नाही तिच्यात....मला नाही आवडत ती....मला फोर्स नका करू....मला माझ्या मर्जीने करुद्या....

 

अपूर्व - हो ना...अग आई कशी आहे गं ती...बालिशपणा करते.....आणि नाकातल्या नाकात बोलते......Attitude Queen म्हण......चेहरा तर इतका भोळा करते की विचारून सोय नाय......

 

आजोबा - हम्म चेहरा भोळा अन लफडी सोळा 😂



अर्जुन - माझं जबरदस्ती लग्न लावलत तर...तर तुम्हाला नातवंड पण पाहायला नाही मिळणार.... थांबा मग अप्पूच्या लग्ना पर्यंत..... 🙄😂

आज्जी - नको नको असं नको.....

आजोबा - विषय संपला....

संगीता - अरे देवा.....बरं राहील मग तुझ्या आवडीची मुलगी तरी सांग....

 

अर्जुन - सांगायचं काय त्यात....मी घेऊन येईन ना...पण भेटली की.... हम्म 😂

 

आज्जी - नुसता विषय टाळतो लग्नाचा....

 

अपूर्व - मग तुम्ही कां काढता विषय.... 😂

 

आजोबा - कधी हा सुनमुख दाखवणार....छोटी छोटी नातवंड दाखवणार काय माहित.....

 

अपूर्व - मी तयार आहे आजोबा पण तुम्ही नुसतं मला लहान आहेस म्हणून पळवून लावता..... 😏

 

आज्जी - बाई बिनलाज्या...गप जरा 🤣किती पांचट बोलशील....

 

अपूर्व - अरे यात काय मी खरं सांगितलं 😂



आजोबा - तुझा मला टेन्शनच नाही रे अप्पू...😂



अपूर्व - Oh My God 😂

 

आजोबा - टेन्शन मला माझ्या अर्जुना च आहे....माझ्या अविनाश सारखाच आहे अर्जुन..जितका रागीट कामसू तितकाच प्रेमळ आणि भोळा आहे खूप.....तू तर आमच्या पैकी कोणावर नाही गेलास अप्पू.... 😂

अपूर्व - आजोबा ब्रँड आहे आपण.... 😎

संगीता - गप मुर्खा 😂

अर्जुन - हो आजोबा लवकरच दाखवेन सुनमुख......पण आता हा विषय नको.......कारण माझ्यासाठी लग्न म्हणजे आयुभराची जबाबदारी मग ती अशीच कुणाची ही घ्यायची कां?.......लग्न म्हणजे पवित्र बंधन........लग्न म्हणजे दोन जीवांचं दोन कुटुंबांच मिलन......लग्न म्हणजे मैत्री, हक्क, रुसवा, चिडणं.......लग्न म्हणजे त्याग असतो.......तो कधीतरी नवऱ्याने किंवा कधीतरी बायको ने करायचा असतो......लग्न म्हणजे लहानस सुखी कुटुंब......आणि मला ही ती आवडली पाहिजे, तिला ही मी........ज्यावेळी माझं मन बोलेल ही तीच आहे.....तेव्हा मी जरा ही वेळ न घालवता तिच्याशी लग्न करेन....

 

संगीता - हा आणि ह्याच बोलण.......गोड बोलून आम्हाला गप्प बसवतोस.....असो....😂🙄

 

अपूर्व - हा मग पण दादाचे लग्नाच्या बाबतीत विचार भारी आहेत हा....😂

 

अर्जुन - 😂😂

 

आज्जी - 😂😂

 

********************

 

 

{विनायक सोसायटी}



सतीश - चिऊ....बरं वाटतय कां बाळा??
(तेल मालिश करताना......)

 

सावी - हो बाबा उत्तम....👀💆

 

सतीश - अ चिऊ मी काय म्हणत होतो? आपल्या गावच्या नारायण ने तुझ्यासाठी एक मुलगा....

 

सावी - ह्म्म्म पुढे?? बोला थांबलात कां...
(बोलण मधे तोडत......)

 

सतीश - तर आपण त्याचा विचार करायचा कां??

 

सावी - नाही...बाबा मला लग्न हा विषयच नको आहे...मी माझ्या हालत मध्ये चांगली आहे....माझ्या जखमा अजून ओल्या आहेत.....त्यावर लग्न म्हणजे जळजळत मीठ.....ज्याने मला फक्त भीती आणि त्रास देणार बाकी काही नाही...

 

सतीश - अग सावे असं काही नाही गं..एकदा तु..

 

सावी - बाबा एकदा? मी एकदा? नाही शक्य नाही....माझ्या भूतकाळच्या आठवणी बघता माझं लग्नाबद्दल मतच बदलून घेलय..लग्न म्हणजे फक्त पैशाचा खेळ, पैसे दया मुलगी घ्या....लग्न म्हणजे फक्त त्रास दुःख....त्याग तो ही फक्त स्त्रीने करायचा....होणारी शारीरिक मारहाण....हिरमोड....फक्त काटेरी वळण....लग्न म्हणजे स्वप्नाचं मृत्यू...लग्न म्हणजे फक्त तडजोड, दुःखच दुःख.....लग्न म्हणजे आयुष्याची बरबादी💔😭(ती रडतच म्हणाली......)

 

सतीश - अग चिऊ शांत हो...गप माझ्या बाळा...🙁(तिला मिठीत घेऊन.......)

 

साची

- ताईsss 🙁

 

सतीश - पिंकी अग तु??

 

साची

- ताई तु रडतेस कां??

 

सावी - अग नाही गं पिंकी..ते आईची आठवण आली गं...

 

साची

- अच्छा..मला तर येतच नाही कारण माझ्या आधीच आई देवाकडे गेली ना....

 

सावी - हम्म..असो बरं पिंके कसा गेला आजचा कॉलेजचा दिवस...?

 

सतीश - बरं ऐका तुम्ही गप्पा मारा मी आलोच...

 

साची

- हा....अग ताई तुला काय सांगू....कॉलेज मध्ये एक मुलगा आहे गं.....आहे चांगला....हँडसम कॉमेडीयन...पण माझ्या मनात त्याच्या बद्दल मैत्री शिवाय बाकी काही भावना नाहीत.....तरी तो माझ्यावर खूप मरतो.....

 

सावी - पिंकी ही कसली गं भाषा माझ्यावर मरतो वैगेरा....😂

 

साची

- सॉरी म्हणजे त्याला मी आवडते....मी साफ साफ नकार दिला त्याने विचारलं तेव्हा....

 

सावी - मग त्रास देतोय कां तुला?

 

साची

- छे गं तसला तो नाहीच...मी नाही बोलें समजवळ त्या नंतर पुन्हा कधीच नाही बोला त्यावर....अजूनही माझा मित्र म्हणून आहे...आम्ही एकत्र अभ्यास ही करतो....मज्जा करतो.....

 

सावी - अरे वाह! अशी मुलं कमी आहेत मग या जगात जे नकार ही पचवतात....नाहीतर काहींना नकार म्हणजे खूप मोठा पराभव वाटतो....त्या रागातच तर ऍसिड अटॅक होतात...

 

साची

- हो न..पण भारी आहे हा तायडे तो...जोक्स तर असले मारतो ना 😂😂

 

सावी - हो कां..😂 असा एखादा मित्र असावा जो हसवेल....

 

साची

- हो 🤧

 

सावी - मी काय म्हणते पिंकी...आपण या रविवारी ना शॉपिंग ला जाऊया....?

 

साची

- ग्रेट...नक्की जायचा?



सावी - हो मग नक्की...

 

साची

- पिंकी प्रॉमिस?(बोट दाखवत.....)

सावी - येस पिंकी चिऊच प्रॉमिस.....😂

साची

- ये थँक्यु तायडे 😂❤️....

क्रमश

माझ्या नवीन कथेला सर्वानी स्पोर्ट करावा अशी इच्छा आहे........

या कथेत बघूया? कोण असेल कुणाचा जिवलगा?लग्नाच्या विषयी वेगळीच मत असलेली माणसं? यांचे जोडीदार कोण असतील??? कशा जुळतील रेशीमगाठी?

भाग कसा वाटलं कमेंट्स करा.....Keep Supporting 🙏.

©®Pratiksha Wagoskar