Devayani Development and Key - Part 17 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग १७

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १७

    देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

 

 

 

 

 

 

 

भाग   १७

भाग  १६ वरून  पुढे  वाचा ................

 

“ऐक राजू,” देवयानी पुन्हा नेटाने म्हणाली-

“हे बघ, खरी गोष्ट ही आहे की, मीच विकासला हेरलं. मीच त्याला जाळ्यात ओढलं आणि मीच त्याच्या गळ्यात पडले. मलाच विकास आवडला होता, त्यानी तर मला  झिडकारूनच टाकलं होतं. पण मी हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळालं. मलाच तो प्रथम आवडला होता. त्याला नाही. त्यानी तर माझ्याकडे साधं  वळून सुद्धा पाहीलं नव्हतं. म्हणून मी मघाशी म्हंटलं की तू जे समजतो आहेस ते चूक आहे. आता तूच सांग अश्या परिस्थितीत, म्हणजे जे मिळवण्यासाठी एवढे कष्ट घेतले आहेत मी, ते निव्वळ तू म्हणतोस म्हणून कस सोडून देऊ? शक्य नाही ते. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मनात  तुझ्या बद्दल कसल्याही भावना नाहीत.”

देवयानीचं बोलणं ऐकल्यावर सुप्रियाला पण दचकल्या सारखं झालं. तिला पण हे आत्ताच कळत होतं. ती आ वासून बघतच राहिली. पण लवकरच स्वत:ला सावरत ती म्हणाली की

“एवढं ऐकल्यावर तरी आता भानावर ये राजू, आणि देवयानीचा नाद सोड. अरे तुला सुंदर मुलगीच मिळो पत्नी म्हणून, अशी मी प्रार्थना करीन देवा पाशी.”

राजू आता चवताळला. म्हणाला

“आता माझ्या लक्षात यायला लागलय. विकास श्रीमंत आहे आणि  त्याने पैशाच्या जोरावर तुम्हा सगळ्यांना विकत घेतलं आहे. देवयानी तू या विकल्या गेलेल्या लोकांच्या सापळ्या मधे फसली आहेस हे तुला कसं कळत नाही? हा सगळा या विकासचा बनाव आहे. फार हुशारीने त्यानी प्लॅनिंग केलं आहे. लक्षात घे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सावध हो.”

हे अपमानास्पद बोलणं ऐकल्यावर सुप्रियाचे दोन्ही मित्र उठले. त्यांच्या आविर्भावा वरून स्पष्टच दिसत होतं की ते राजूला आता सोडणार नाही म्हणून, पण विकास ने त्यांना थांबवलं. विकास अजूनही शांतच होता. सर्वांनाच त्यांच्या शांत पणाचं आश्चर्य वाटत होतं. पण सुप्रियाला आठवलं, देवयानी काय म्हणाली ते. विकास कधीही पॅनीक होत नाही म्हणून. तिला विकासचं कौतुकच वाटलं. खरं तर विकास केव्हाही राजूचा चोळामोळा करू शकत होता पण त्याने तसं काही केलं नाही.

एवढं झाल्यावर आता विकास उठला आणि राजूला म्हणाला.-

“हे  बघ राजू, सुप्रीम कोर्टाने म्हणजे देवयानीनी आत्ताच  अंतिम निकाल दिला  आहे. तिला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाहीये. तेंव्हा आता तू येथून  निघ. याच्या पुढे देवयानीचं नाव देखील काढायच नाही.”

“विकास, तू म्हणतोस की सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. पण मला आता एकदा अपील करायचं आहे. आणि ते मी करणारच.” राजू अजूनही हार मानायला तयार नव्हता. त्याला इतकं निर्लज्जा सारखा बोलतांना पाहून सर्वांना वाटलं की आता विकासचा संयम संपला आणि राजू मार खाणार. पण विकास अजूनही शांतच होता. म्हणाला –

“ओके जर देवयानी ऐकून घ्यायला तयार असेल तर माझी हरकत नाही. Go ahead”

“थॅंक यू,” अस म्हणून राजू देवयानीला म्हणाला –

“देवयानी तू इथे सर्वांच्या प्रभावाखाली आहेस. तू सारा सार विचार विचार करण्याची बुद्धी गमावून बसली आहेस. आपण असं करू बाहेर कुठे तरी कॉफी शॉप मधे जाऊ आणि तिथे  एकांतात बोलू. जिथे ही मंडळी असणार नाहीत.”

आता मात्र कमाल झाली. राजू आपला हेका सोडायला अजिबात तयार नव्हता. तो विकासच्या संयमाची जणू काही परीक्षाच घेत होता. विकासला सुद्धा क्षणभर वाटलं की एक थप्पड  पुरेशी आहे, याला चूप बसवायला. पण तो शांत राहिला. त्यानी विचार केला की देवयानीच्या उत्तरानंतर बघू काय करायचं ते. देवयानीनी त्याच्याकडे बघितलं आणि त्यानी मान हलवून संमती दर्शक सिग्नल दिला. मग देवयानीनी बोलायला सुरवात केली.

“पुन्हा एकदा कॉफी शॉप? हे बघ राजू, तुला जे काही बोलायचं होतं ते आठ दिवसांपूर्वी कॉफी शॉप मधे आपण भेटलो होतो तेंव्हा बोलून झालं आहे. आणि त्याच वेळेला मी त्याचं उत्तर पण दिलं आहे. आता पुन्हा रीपीट टेलिकास्ट करण्यात मला अजिबात इंट्रेस्ट नाहीये. आता मी काय सांगते आहे ते ऐक. मला तुझ्याशी मुळीच संबंध ठेवायचा नाही. इतके दिवस तुला सहन केलं ते तू सुप्रियाचा मित्र आहेस म्हणून. पण आता नाही. माझं लग्न झाल्यावर माझ्या घराची वाट धरायची  नाही. जर दिसलास तर विकासला मी रोखू शकणार नाही. तुझ्या तब्येती साठी ते नक्कीच चांगलं असणार नाही. तेंव्हा आता माझं नाव सुद्धा तू विसर. हे शेवटचं तुला निक्षून सांगते आहे. Now leave.”

“देवयानी” राजुनी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहिला.

“Leave, at once. आता आपला  संबंध कायमचा संपला आहे.” – देवयानी 

राजूने एकदा सर्वांच्या कडे नजर फिरवली आणि त्याला समजलं की आपण इथून जाण्यातच शहाणपणा आहे. तो चालला गेला.

त्यानंतर थोडा वेळ घडलेल्या प्रसंगावर चर्चा झाली. आणि मग सुप्रियाचे मित्र पण पांगले. सुप्रिया विकास ला म्हणाली की

“विकास तू खूपच शांत होतास, तुला असं नाही वाटलं का की राजूला चांगली समज द्यावी म्हणून?”

“मला पहायचं होतं की देवयानी कसं हाताळते हे प्रकरण. जर गोष्टी हाताबाहेर जात आहेत असं वाटलं असतं तर कंट्रोल आपल्या हातात घ्यायला मी होतोच की इथे. पण तशी वेळच आली नाही. तिने फार धैर्याने आणि संयमाने हाताळलं हे प्रकरण.” – विकास.

“मग आता काय करायचा विचार आहे?” – सुप्रिया.

काही नाही. वेट अँड वॉच. एवढंच करायचं. मी आणि देवयानी जरा बाहेर फिरून येतो फ्रेश वाटेल.

देवयानी आणि विकास बाहेर पडले. पुढच्या चौकात सिग्नल वर थांबले असतांना शेजारी पोलिसांची जीप थांबली. विकास ने वळून पाहिलं तर इंस्पेक्टर शीतोळे.

देवयानी जेंव्हा अडकली होती तेंव्हा हेच शीतोळे आले होते. नंतर सुद्धा विकास त्यांना भेटला होता आणि त्याच्या आणि देवयानीच्या ओळखीची माहिती त्यांना दिली होती आणि धन्यवाद पण दिले की त्यांनी पॉजिटिव रीपोर्ट दिल्या मुळेच  देवयानीशी ओळख वाढली म्हणून. त्या नंतर सुद्धा तो इंस्पेक्टर साहेबांना सहज भेटला होता. आज ते जेंव्हा दिसले तेंव्हा हाय, हेलो झालं आणि शीतोळे म्हणाले “की सिग्नल पार करून जरा थांबा वहिनींची ओळख करून द्या. असे कसे जाता आहात”.

मग चौक पार करून विकास आणि शीतोळे थांबले.

“काय साहेब, देवयानीला तुम्ही ओळखताच, नवीन काय सांगणार?” – विकास 

“कसं चाललंय? लग्नाला बोलवायचं विसरू नका बरं.” – शीतोळे 

“नाही नाही, अहो तुम्हाला कसं विसरू? तुम्हीच आमच्या भेटीचे पहिले साक्षीदार आहात. लग्न डिसेंबर मधे आहे. येईनच मी आमंत्रण द्यायला.” – विकास

“बाकी कसं काय? सगळं ठीक आहे न?” – शीतोळे

“अं, थोडा प्रॉब्लेम झाला आहे साहेब, तुम्हाला सांगू की नको असा विचार करतोय.” – विकास 

“सांगून टाका मनात ठेऊ नका. वेळ निघून गेल्यावर भारी पडेल.”- शीतोळे 

“ओके सांगतो पण कुठे सांगू, इथेच ?” – विकास

“समोर एक छोटं हॉटेल दिसतं आहे तिथेच बसू. चला.” शीतोळे म्हणाले.

इंस्पेक्टर शीतोळे, विकास आणि देवयानी तिघंही हॉटेल मधे एका कोपर्‍यांतल्या टेबल वर बसले.

“हं सांगा विकास साहेब, काय प्रॉब्लेम आहे.” शीतोळे म्हणाले.

मग विकासने त्यांना आठ दिवसांपूर्वी देवयानीचा राजू सोबत कॉफी शॉप मधे झालेला संवाद सांगीतला . आणि नंतर आदल्या रात्री घडलेला प्रसंग सुद्धा सविस्तर सांगीतला. त्यानंतर आज दुपारी काय बात चित राजू बरोबर झाली ते सुद्धा सांगितलं. सगळं सांगून झाल्यावर मग विकास म्हणाला

“काय आहे साहेब, आम्हाला पोलिस कमप्लेन्ट करायची इच्छा नाहीये. कारण एक तर देवयानीची बदनामी होईल आणि दुसरं म्हणजे त्या मुलाला शिक्षा झाली तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याला बरबाद करण्यात आम्हाला काडीचा इंट्रेस्ट नाहीये. किती  झालं तरी तो सुप्रियाचा मित्र आहे. आम्हाला फक्त आमचा संसार निर्विघ्न सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे. आता तुम्हीच सांगा काय करावं ते.”

“तो मुलगा, तुम्ही म्हणता, सगळं ऐकून घेतल्यावर चालला गेला, पण त्यानी हे अॅक्सेप्ट केलं आहे का? भविष्यात तो देवयानीला त्रास देणार नाही यांची खात्री आहे का?” शीतोळयांनी विचारलं.

“माहीत नाही साहेब.” – विकास 

“तुम्ही काही मारपीट केली का त्याला?” – शीतोळे

“आज नाही. पण तुम्हाला सांगितलं की” विकास म्हणाला “काल रात्री देवयानीला सोडवण्यासाठी त्या दोघा मित्रांनी त्याला दोन ठेवून दिल्या म्हणून.

“मुलगा कसा आहे?” - शीतोळे

“साहेब, धारवाडचा आहे, इंजीनियर आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे. सगळं चांगलं आहे पण या बाबतीत वेड्या सारखा वागला.” – विकास

“आपण एक काम करू.” शीतोळे देवयानीला उद्देशून म्हणाले “देवयानी तुम्ही आजच्या तारखेत एक निवेदन द्या. त्यात काय घटना घडली ते, म्हणजे आता तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व तारीख वार  लिहा. ते पत्र आम्ही फाइल ला लावतो. तुम्ही म्हणता म्हणून त्यावरून आत्ताच काही अॅक्शन घेत नाही. जर त्या मुलाने काही त्रास दिला नाही तर ते पत्र आमच्या फाइलीला लागून राहील. पण जर जरूर पडली तर त्याचा उपयोग होईल. उद्या पोलिस स्टेशन ला या. आणि मग वाट बघू. तुम्ही मात्र मला अपडेट देत रहा.”

“ओके. उद्या किती वाजता येऊ?” – विकास.

“दुपारी बारा नंतर फोन करा मग मी सांगेन केंव्हा यायचं ते. पण सगळं व्यवस्थित लिहून आणा म्हणजे झालं.” – शीतोळे. 

“ठीक आहे साहेब.” – विकास. 

“चिंता करू नका. आम्ही आहोत तुमच्या मदतीसाठी. काहीही झालं तरी कायदा हातात घेऊ नका. चलो. चलते हैं.” आणि असं म्हणून शीतोळे निघाले.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.