Haiwan a Killer - 8 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 8

The Author
Featured Books
  • कहानी हमारी - 4

    धीरे-धीरे आश्रम मुझे अपना सा लगने लगा था।इतने सालों से जो सु...

  • सनम - 6

    अवनि की ज़िन्दगी अब Yug Pratap Singh के इर्द-गिर्द घूमने लगी...

  • चेहरा - 2

    आरव इस साल इंजीनियरिंग कॉलेज के सेकंड ईयर में था। पुणे के एक...

  • Dastane - ishq - 7

    So ye kahani continue hongi pratilipi par kahani ka name sam...

  • जवान लड़का – भाग 4

    जवान लड़का – भाग 4 जैसे कि हमने पहले के भागों में देखा कि हर...

Categories
Share

हैवान अ किलर - भाग 8

भाग 8

लब्दी ट्रैवल बसच्या विंडोग्लास मधुन, गोलसर चंद्र व बसच्या सफेद हेडलाईटच्या प्रकाशात खालचा हायवे आणि ती सफेद रेष अगदी वेगाने बसच्या खाली जाताना दिसत होती. लब्दी ट्रैवलच्या बसेस हाईक्लास होत्या. ड्राइव्हरुम मधोमध एक काळी भिंत होती ज्यामुळे आत कितीजण बसलेत, किंवा बस कोण चालवत आहे ? हे मागच्या प्रवाशाना कळन असंभव होत.ड्राइव्हरुम मध्ये आत येण्यासाठी एक दरवाजा होता..जो उघडून आत बाहेर जाव याव लागायच.ड्राईव्ह रुममध्ये दोन सीट दिसत होते डाव्याबाजुच्या सीटवर वामन उर्फ वाण्या मायराचे वडिल बसलेले त्यांनी नेहमीप्रमाणे हातात रुद्राक्षाची माल घेतलेली आणि ओवीत बसलेले.कारण एकच होत..प्रवास सुखाच होवो. पन तो आज होणार का? या पाहुयात पुढे. उजव्या बाजुच्या ड्राईव्हसीटवर मायरा बसलेली. दोन्ही हातांनी धरलेली गोल काळी स्टेरिंग व स्टेरिंग खाली स्पीडोमीटर मध्ये एकशे साठच स्पीड दाखवल जात होत.एक उर्वरित गियर राहीलेला जो दोनशेचा गल्ला गाठणार होता. पन मायराने आजतागायत दोनशेच्या स्पीडशी दोस्ती केली नव्हती..कारण वामन उर्फ वाण्या नेहमी तिला दोनशेच्या जवळ जाण्यापासुन आडवत असायचे. मायरा दोन्ही हातांनी ट्रकची स्टेरिंग फिरवत होती.

" ओ पप्पा! तो बघा फळा." मायरा ड्राईव्हसीटवर बसुन पुढे हेडलाईटच्या प्रकाशात दिसणा-या मोठ्या फळ्याकडे पाहून म्हंणाली.

हायवे 405 विलेज: 10 कीमी

सीटी: 90 कीमी

अस त्या फळ्यावर लिहीलेल. 

" हाईवे 405 विलेज ?" वामनरावांनी मोठ्या आश्चर्यकारक नजरेने त्या फ्ळ्याकडे मग मायराकडे पाहिल.

" काय झालं पप्पा?"

" अरे बेटा ह्या हायवेवरुन मी कित्येक वेळा गाडी घेऊन आलो असेल.

पन ह्या हायवेवर पाच तासांपर्यंत साध पेट्रोलपंप नाहीये..! मग ही विलेज कुठून आली असेल?" वामनरावांच्या प्रश्नावर मायराने जास्त काही विचारमग्ण भाव दाखवले नाहीत. उलट ती म्हंणाली.

" अहो पप्पा! कशाला खाली फुल्ली टेंशन घेताय हा ! आपल्याला काय करायचंय ! की तुम्हाला ती विलेज विकत घ्यायचीये ?"

मायरा आपल्या वडीलांची चेष्टा करावीशी वाटली.

" हो घ्यायची ये ना ! तुझ्या लग्नात मोठ मांडव घालण्यासाठी.!"

वामनरावांनी मायराची फिरकी घेत मोठ- मोठ्याने हसु लागले. त्यावर मायराचा चेहरा बारीकसा झाला. चिडल्यासारखा.

××××××××××××××××

ड्राईव्हरुम मागे कॉलेज तरुणांचा कल्ला सुरु होता. कोणी मोठ-मोठ्याने

क्रशकडे पाहून गाण म्हंणत तिला इंप्रेस करत होत, तर कुठे कोणाच्या खोड्या मस्ती सुरु होत्या.तर कोणी चौकलेट बॉय मोठ्या स्टाईलने पोरींवर लाईन मारत होता. त्यातलेच हे चार जण होते. सोज्वळ प्रणया दोघेही लव्हबर्डस..जरासे हटके वागणारे. ह्या व्यव्हारी दुनियातप्या लोकांची चिंता वगेरे न करणारे. की हे लोक आप्ल्याबदल म्हंणतील काय नाही! आर्य्ंश एक खोडकर मुलगा, पाहाव त्याच्या खोड्या काढन, दुस-यावर खलखलून हसणन फक्त जोक्स करण बस्स! सागर एक बॉडीबिल्डर टू पेक्स असलेला बलदंड तरण्याबांड देहाचा चॉकलेट बॉय, पाहव तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुलींच्या मागे लागलेलाच. त्याच्या बोलन्याची स्टाइल, हाई यार मुली फिदा व्हायच्या. अशी ही चार जणांची मैत्री ही तितकीच घट्ट होती.

पन लवकरच ह्या घट्ट मैत्रिला एका काल्या काजळी हैवानाची नजर बसणार होती. 

×××××××××××××××××××

" मिस्टर मार्शल! मला एक सांगा तिथे गेल्यावर त्या सैतानाशी तुम्ही एकटे लढणार आहात का? की तुमचे अजुन काही जोडीदार मागाहून येणार आहेत?"निळ म्हंणाला.त्याच्या ह्या वाक्यावर मार्शलने काळ्या चौकोनी फ्रेमच्या चश्म्यासहित त्याच्याकडे पाहिल.

" आमच्या सीक्रेट कंपनीकडून मला एकट्यालाच ह्या मिशनवर धाडल आहे. बाकीचे मेंबर्स दुस-या मिशनवर रेडी आहेत. आणि हो जर मला काही झालच! तर माझ्या पाठित एक चिप बसवलीये. जी मी मरताच

एक हैल्प मेसेज माझ्या सीक्रेट कंपनीला पाठवेल.मग तो मेसेज माझ्या

कंपनीला मिळताच तिकडून तातडीने हालचाली केल्या जातील. बट डोंन्ट वरी..! मी एकटाच काफि आहे त्या सैतानाला हरवण्यासाठी."

मार्शलने निलच्या खांद्यावर हात ठेवत जरास हलकेच दाबल.

" पन तुमची हत्यारे वगेरे कोठे आहेत? " निल ने पुन्हा एक प्रश्न समोर ठेवला.

" का तुला हवी आहेत का ?" मार्शल म्हंटला.त्याच्या ह्या वाक्यावर निल उसने आवसान आणत हसला व म्हणाला.

" अं नाही तस नाही म्हंणजे! अं..! मी कधी बंदूक पाहिली नाही ना !"

" अच्छा !" मार्शल ने पुन्हा निलच्या खांद्यावर हात ठेवला. व दुस-या हाताने काळ चष्मा काढुन घेत त्याच्या घा-या डोळ्यानी निलकडे पाहत बोलला.

" मग लवकरच पाहायला नाही! तर वापरायलाच मिळेल..तुला!"

" ती कशी?" निल आवाक होउन पाहत बोलला.

" कारण मिशन मध्ये तुझीही गरज लागेल ना मला!"

मार्शल ने पाहिल्यांदाच निलकडे पाहुन एक डोळा मारला व गालांत हसुन पुन्हा चष्मा डोळ्यांवर चढवुन...सीटला मान टेकवून सरल बसला..

" आईशप्प्थ ! मी आणि मिशनमध्ये!" निलचा चेहरा काळा निळा पडला.हात पाय थरथरु लागले. बोलतीच बंद झाली. पन त्याच्या ह्या घाब-या गुब-या अवस्थेवर मार्शल मनातच मोठमोठ्याने हसु लागला.

××××××××××××××××××××

विलेज 405 मध्ये त्या ख्रिश्चन म्हातारीच्या घरात पहिल्याच हॉलमध्ये..

शायना एका लाकडी खुर्चीत बसलेली. दोन्ही पाय एकमेकांना जोडुन आणि हात सुद्धा एकमेकांना जोडुन पाठ थोडी पुढे सरकवुन...थरथरणा-या देहासहित ती एकटक शुन्य नजरेने खाली जमिनीकडे पाहत बसलेली. तिच्या नजरेस तो रामचंदचा चेहरा दिसत होता..त्याचा तो खर्जातला आवाज तर अद्यापही बाहेरुन ऐकु येत होता. बुटांची टोक टोक कानांवर पडत होती. ह्याचा अर्थ तो हैवान अजुन ही तिथेच होता.लोख्ंडी गेटच्या जवळ येरझ-या घालत होता. 

" ए म्हातारे सोड तिला सोड..!" पुन्हा एक आवाज आला.. शायनाच पुर्णत शरीर नखशिखांत हादरल.

" शांत हो डिकरा! टेंशन नाय लेनेका! मै हाई ना तुझ्या सोबत..!" त्या म्हातारीने आपला एक हात पुढे केला. हातात एक पाण्याचा ग्लास होता. जो शायनाने आपल्या हाती घेऊन एकाच घोटात पिवून टाकला.

पाण्याच्या स्पर्शाने तिला थोडी तरतरी येताच शायना बोलू लागली.

" काय आहे... काय हे ? आणि ते ही ह्या काळात? असल भयानक! "

शायनाच्या प्रश्नरुपी वाक्यावर ती म्हातारी एकदमच गंभीर झाली.

त्या हॉलमध्ये एक मेंनबत्ती पेटत होती. ज्या मेंबत्तीचा तांबरट प्रकाश

संपुर्णत हॉलमध्ये भक्कासपणे पहूडलेला.

" काय सांगु डिकरा तुला बहुत भयानक गोष्ट हाई!"

" पन तरी ही मला सांगा! प्लीज."

" अरे हो हो ! सांगते प्लीज वगेरे बोलु नकोस." ती म्हातारी हळुच शायनाच्या बाजुच्या खुर्चीवर बसली.

" तु आता ज्याला पाहिलस. तो माणुस नाही.तर एक हैवान आहे...

डेव्हिल आहे तो. माणसाच्या रक्ता मांसासाठी हवरटलेला नरभक्षक आहे."

" बापरे ! म्हंणजे माझ्या गाडीला ज्या ट्रकने धडक दिली..तो हाच होता. रामचंद!" शायना त्या ट्रकच्या मागच नाव उच्चारत बोलली.

" नाही डिकराब त्याच खर नाव रामचंद नाही. उलट रामचंद नाव देवाच आहे. ह्या हैवानाच खर नाव कोणालाच माहीती नाही. फक्त त्या ट्रकवर असलेल्या रामचंद ह्या नावावरुन लोकांनी ह्या सैतानाच नाव रामचंद ठेवलय. आणि हो हा हैवान म्हंणजे चोर आहे चोर" ती म्हातारी रागातच बोलली..

" चोर ?" शायनाने न समजुन त्या म्हातारीकडे पाहिल.

 " हो चोरच! ह्या हैवानाला कोणातीही गोष्ट आवडली. की हा त्या मांणसाच बळी घेऊन ती हिरावून घेतो. आणि हो " ती म्हातारी काहीतरी लक्षात आल्यासारखी म्हंणाली.

" विलेजची लोक म्हंणतात..हा हैवान नराकातुन बाहेर येतो. दर पंचवीस वर्षांनी. आणि हा हैवान फक्त आठवडाभर ह्या पृथ्विवर राहू शकतो..आणि आम्ही ही!"

" काय ?" शायना पुन्हा विस्फारलेल्या नजरेने त्या म्हातारीकडे पाहत म्हंणाली.

" होय डिकरा! ह्या हैवानाने आमच्या गावाला श्रापच दिलाय तसा. की दर पंचवीस वर्ष जो पर्यंत मी ह्या पृथ्वीर येत नाही तो पर्यंत हे गाव गायब असेल. "

" अच्छा, तरीच मी म्हंटल की इथे अचानक गाव कोठुन आल?"

" येस डीकरा! असच क्युशन सगल्यांना पडत. पन पाहणारा ह्या गावाबदल दुस-या माणसाला सांगु शकत नाही! "

" का बर अस का?"

" कारण रामचंद तस होऊ देत नाही! ह्या सात दिवसात जो कोणी हायवे नंबर 405 वरुन प्रथम सीमारेषापार करुन आत येतो त्याला हायवेची शेवटची सीमा ओलांडता येत नाही.. कारण तो पर्यंत तो माणुस रामचंदच खाद्य झालेल असतो. आणि ह्या हैवानाच्या तोंडात नेहमी एकच वाक्य येत असत..खाऊ का रे तुला! हवरट मेला!" त्या म्हातारीने

हाताची पाचही बोट कडकड करत मोडली.

" अरे माझ्या देवा ! हे तर खुपच भयानक आहे. पन याला थांबवण्याच किंवा मारण्याच उपाय नाहि का?"

" तेव्हढ काय मालुम नाय डिकरा. पन हा हैवान काळ्या कुत्र्यांना मात्र घाबरतो ! म्हंणुनच मी नेहमी बाहेर जाताना मायकलला सोबत घेते"

शायनाने हलकेच कपाळावर हत ठेवले.

" शट मला इथे यायलाच नको हव होत. निल बरोबरच म्हंणत होता."

शायनाच्या तोंडून एक हुंदका बाहेर आला.

" अरे डिकरा नशिबात जे लिहिलय ना ते होणारच ! त्याला कोण अडवु शकत नाय बघ.!" त्या म्हातारीने शायनाच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर देत म्हंटल.

×××××××××××××××××××

हायवे नंबर 405 मधोमध अडिज तासांवर विलेज 405 लागत होती. आणि सर्वप्रथम विलेजचे हायवेवर दोन हॉटेल्स दिसत होते.. दोन्हीही हॉटेल्स पुढे दोन तपकीरी रंगाचे लोख्ंडी खांब दिसत होते..खांबांवर काळ्या रंगाच्या वायर्सच्या ऑन लाईन सुरु होत्या. खांबांवर आकडे टाकून आजुबाजुच्या लोकांनी आपल्या घरांना, हॉटेल्सना लाईट घेतली होती. परंतु लाईन ऑन असतांना सुद्धा गाव अंधारात का होत? का सर्वजन घरात मेंबत्तीच उजेड पेट्वून रहायचे? अशी कोणती भीती होती.? असो! तपकीरी रंगाचा एक लोख्ंडी खांब अगदी ठामपणे जागेवर उभा दिसत होता. त्या खांबापासुन पुढे हायवेचा सरळ सफेद रंगाच्या पट्टीचा रस्ता दिसत होता. नी आकाशातला गोल चंद्र ही दिसत होता. की तेवढ्यात दोन अंधुक-अंधूकश्या सफेद रंगी एल ई.डी हेडलाईटस सहित एक बस पुढुन विलेजच्या रोखानेच येताना दिसला.

काहीवेळातच ती बस नेमकी त्या खांबापासुन तीस मीटर अंतर ठेवुन..

तीच्या मोठ-मोठाल्या काळ्या टायर्सना हळुवारपने जागेवर थांबवत इंजीन बंद होत थांबली. तसा बस थांबताच मागुन एक विशीष्ट प्रकारचा मोठा फस्सस्सस्स आवाज झाला.

××××××××××××××××××××

एक अशक्त म्हातारा दिसत होता. डोक्यावर मधोमध पांढरट पातळसर दहा बारा केसांशिवाय काहीही दिसत नव्हत. चेहराही वय झाल्याप्रमाणे सुरकुतलेला, डोळ्यांतली नजर अशक्त बुभळ आत गेलेली, डोळ्यांभोवती काळसर वर्तुळ उमटली होती. गालांवर पांढरट दाढी उगवली होती. काटकुळ्या शारीरीक यष्टीवर एक निळसर नाइट सुट घातलेला होता त्यावर खाली एक सफेद पेंट होती. आप्ल्या घरातल्या किचनमध्ये मेंनबत्तीच्या उजेडात एका हातात धारधार टोकधारी मोठा सुरा घेऊन, पुढे असलेल्या पांढरट भिंतिकडे तो टक लावुन शुन्य नजरेने पाहत होता. त्याचे ते खोल गेलेले लहानसर काळे डोळे अशक्त वाटत होते. शरीरही काटकुल होतं चेहराही प्रेतासारखा पांढराफट्ट दिसत होता. आजुबाजुला घरात विलक्षण शांतता पसरली होती. म्हाता-याच्या मागे किचनपुढे अंधारा हॉल दिसत होता. टिपॉय, सोफा, टेबल, लाकडी खुर्च्या, साक्षात भगवंत येशूची मूर्ती सुद्धा अंधाराने गिळलेली दिसत होती. 

बाहेरुन अंधारातुन रातकीद्यांचा आवाज आत येत होता. एका पुतळ्यासारखा पांढरट चेह-याचा तो म्हातारा हातात सुरा घेऊन स्तब्ध उभा होता. शारीरीक तत्वांची, चेतातंतुची, काडीचीही हालचाल होत नव्हती जणु ते मानवी हालचाल काय असत? हे त्या म्हाता-याला ठावुक नव्हत किंवा तो कोणि सायकॉ, वेडा असावा असंच म्हंणुयात आपन.

त्या म्हाता-या च्या पांढरट चेह-यासमोर केमेरा स्थिरावला आहे..तो म्हातारा अद्याप शुन्य नजरेने डोळ्यांभोवती उगवलेल्या काळ्या वर्तुळांसहित पुढेच पाहत आहे.त्या म्हाता-याच्या चेह-यावर केमेरा हलकेच थोड हलकेच झुम होत पुढे जात आहे.. घरातली विलक्षन शांतता, आणि बाजुला जळत असलेल्या मेंनबतत्तीच्या उजेडात त्या म्हाता-याची काटकुळी सावली जी की मागे भिंतीवर उमटलेली दिसत होती..ती सावली मेंनबत्तीची ज्योत हलताच मागे भिंतीवर अभद्रपणे वाकडी तिकडी होत नाचत आहे. पुढुन भिंतीवरशी हलकेच एक पाल वाकडी तिकडी चालत पुढे आली. येऊन एकटक त्या म्हाता-याच्या स्तब्ध पांढ-याफट्ट चेह-याच्या आकृतीकडे पाहत राहीली. 

पुढुन येणारी केमेरा एंगल त्या म्हाता-याच्या चेह-यावर झूम होत आहे..

की अचानक त्या म्हाता-याचे अशक्त कचकड्यासारखे डोळे हलकेच मेंनबत्तीसमोर आलेल्या त्या पालीवर मंद गतीने वाकडे होते..स्थिरावले..! तोंडाचा हलकेच आवासला..जी हालचाल..ती थोडीशी हालचाल पाहताच ती पाल सावध झाली, मागची शेपूट हलवत, बारीकसे पाय तूरुतूरु चालवत वेगाने ती माघारी फिरली की तेवढ्यात येवढवेळ शांत उभ्या त्या म्हाता-याच्या हातातला सुरा वेगाने सप्पकन भिंतीवर आदळला..दोन तुकडे होत ती पाळ खाली काचेच्या एका गोल थाळीत कोसल्ली.

थडफड करत त्या शेपटीचा पाहिला भाग व त्या पालीचे हात पाय दुसरा भाग थाळीत हालत होते. ज्या तडफडणा-या पाळीला पाहून तो म्हातारा कुत्सिक हासत होता. त्याचे ते दोन चिनी गोटीसारखे कचकडी डोळे आणि त्यांखाली असलेले काळसर वर्तुळ भयान दिसत होत ते रुप. त्या म्हाता-याने ती काचेची सफेद गोळ प्लेट हलकेच उचल्ली. 

ज्यात त्या मृत पाळीचे दोन तुकडे दिसत होते. एका हातात ती डिश, मग दुस-या थरथरत्या हाताने एक काटेरी चमचा, त्याने उचलुन त्या डिश मध्ये ठेवला.

" डीनर रेडी आहे डियर!" ती डीश दोन्ही हातांत धरत तो म्हातारा

हलके हलके चालत.कीचन मधुन बाहेर आला, मग उजव्या बाजुला वळला..! समोर अंधारात एक सहा फुट चौकलेटी दरवाजा होता.

डिश एका हातात धरुन, त्या म्हाता-याने दुसरा हात वाढवुन तो दरवाजा उघडला. दरवाज्याच्या बिजाग-यांना तेल न मिळाल्याने त्या वाजल्या..

तो कर्रकर्रणारा आवाज पुर्णत हॉलच्या कोणाकोनांत घुमला.दरवाजा उघडताच सर्वप्रथम आतली घाणेरडी उग्र मांस कुजळेली आत दबुन राहिलेली हवा बाहेर आली. तो वास इतका अफाट होता..की सामान्य, सवय नसलेला माणुस ओकणारच.पन हा म्हातारा हसतच त्या खोलीत शिरला. खोलीत सर्वप्रथम एकूण तीस चाळीस मेंनबत्त्यांचा झगमगाटी प्रकाश दिसत होता.त्या प्रकाशात आतल दृष्य दिसत होत. तीन फुट टेबल, आणि भिंतीवर असलेल्या पंख्यावर लावलेली गळफासा ची दोरी. पुढे एक मोठा पलंग दिसत होता. पलंगाच्या मागे भिंतीवर एक फ्रेम लावलेली होती. ज्यात हा म्हातारा आणि दुसरी एक म्हातारी ऊभी होती..नक्कीच त्याची बायको असावी. पलंगाबाजुलाच एक झुलणारी खुर्ची दिसत होती. लाकडी झुलणारी खुर्ची आणि त्यावर कोणितरी पांढ-या केसांच झुलत बसल होत.कारण ती खुर्ची मंद गतीने पुढे मागे हालत होती. तिचा तो कुई, कुई, कुई आवाज त्या खोलीतल्या भिंतींवर आदळत होता. छातीत चर्रचर्र करत होता. मेंनबत्तयांच्या उजेडात अगदी ब्लैक ऐण्ड व्हाईट दृष्य दिसत होत.

" डार्लिंग हैप्पी बर्थडे!" तो म्हातारा खोल गेलेल्या आवाजात म्हंणाला.हलकेच त्या खुर्चीच्या दिशेने जाऊ लागला. तसा तो वास अगदी वेगाने येऊ लागला. पन त्या म्हाता-याला त्याचा काहीच फरक पडत नव्हता. जणु त्याला सवय झाली होती. सात आठ पावल चालून तो म्हातारा खुर्ची जवळ आला. हातातली डिश ती पाळ समोर धरुन म्हंणाला.

" डीयर यू आर स्पेशल डिश!" तो म्हाता-या त्या खुर्चीत एक काळी मेक्सी चढ़वलेल्या, सांगाड्याच्या, पांढरट कवटीकडे पाहून म्हंणाला. त्या कवटीचे मोठ मोठाल्या रिकाम्या खोबण्या, विचकलेला तो जबडा,

आणी त्या उघड्या जबड्यात कोंबल्या होत्या, शेकडो मृत पाळी, ज्या पालिंवर लहानसर, अळ्या, वळवळत होत्या. नेहमीप्रमाणे त्या म्हाता-या प्रमाणे काटेरी चमचाने ती पाळ पुन्हा त्या सांगाड्याच्या जबड्यात ठेवली..मग काहीवेळाने त्या सांगाड्याशी गप्पा मारुन..तो सांगाडा हलकेच दोन्ही हातांत ऊचल्ला..हळकेच पलंगावर झोपवला..

खाली असलेली पांढरट चादर हलकेच त्या सांगाड्याच्या कमरेपर्यंय सरकवली.

" गुड नाईट डियर !" त्या म्हाता-याने त्या सांगाड्याच्या पांढरट केसांवरुन प्रेमाने हात फिरवला..मग जिथे तो टेबल होता.तिथे चालत आला. हळकेच टेबलावर चढला..! समोरच पलंगावर ठेवलेला तो सांगाडा त्या म्हाता-याच्या कृतीकडे दात विचकत पाहत होता..जणु त्याला मजा येत असावी. आजुबाजुचा मेंनबत्त्यांचा प्रकाश त्या म्हाता-याच्या सुरकुतलेल्या चेह-यावर पडला होता. रातकिड्यांच आवाज मृत्युगीत गात होत..! म्हातारा मरणारा जो होता..कुछ मीठा तो बनता हे ना! खिखिखी. गळ्यात भोवती गोल फास अडकवुन त्या म्हाता-याने, पलंगावर झोपलेल्या आपल्या बायकोच्या मृत सांगाड्याकडे पाहिल..! तरुणपणी घालवले बायकोसोबतचे क्षण, मग ती गेल्यानंतरच ते दुख..! एक छोठीशी चित्रफित झळकली..डोळ्यांसमोर.. ! नी मग हळकेच एका टाचेने टेबलाला त्या म्हाता-याने धक्का दिला. तसा तो टेबल एका बाजुला झुकला जात खाली कोसलळा.. दोन्ही पाय टेबलावरशी बाजुला झाले. एक मिनीट सुद्धा लागल नाही प्राण जायला. फक्त तीस सेकंद बस्स. सर्वप्रथम खालचे दोन पाय हळले..मग डोळे सताड खोंबण्यातु बाहेर आलें, जीभ जबड्यातुन हळकेच डोकाऊन पाहू लागली. बस्स खेळ संपल होत.

आता त्या घरात त्या म्हा -याच प्रेत तसंच झुळत राहणार होत..कायम.

क्रमश :