Haiwan a Killer - 9 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | हैवान अ किलर - भाग 9

The Author
Featured Books
  • कहानी हमारी - 4

    धीरे-धीरे आश्रम मुझे अपना सा लगने लगा था।इतने सालों से जो सु...

  • सनम - 6

    अवनि की ज़िन्दगी अब Yug Pratap Singh के इर्द-गिर्द घूमने लगी...

  • चेहरा - 2

    आरव इस साल इंजीनियरिंग कॉलेज के सेकंड ईयर में था। पुणे के एक...

  • Dastane - ishq - 7

    So ye kahani continue hongi pratilipi par kahani ka name sam...

  • जवान लड़का – भाग 4

    जवान लड़का – भाग 4 जैसे कि हमने पहले के भागों में देखा कि हर...

Categories
Share

हैवान अ किलर - भाग 9

भाग 9

त्या ख्रिश्चन म्हातारीच घर म्हंणायला एक भल मोठ हॉल होत. त्या हॉलमध्येच एक सिंगल बेड दिसत होता..बैडबाजुला भिंतीवर येशू भगवंताच चित्र लावलेल, चित्रापुढे एक फळी ठोकलेली, त्यावर एक मेंबत्ती जळत होती. येशूदेवाच्या पोस्टर खाली एक तीन ड्रोवर असलेला चार फुट लांबीचा चौकलेटी रंगाचा टेबल होता. त्या टेबलापासुन उजव्याबाजुला

लाईटवर चालणारी एक शेगडी ठेवलेली दिसत होती.त्या शेगडी बाजुलाच खाली प्लास्टिकच्या टोपल्यांत लसूण, कांदे, आणि पारदर्शक बरण्यांच्यात भाज्या वटाणे, मुग, मुगडाळ, तुरडाळ, इत्यादी. पुढेच एक अंड्यांचा स्टॉल दिसत होता. हॉलमध्ये एक छोठस चार लाकड खुर्च्यांच डायनिंग टेबल सुद्धा दिसत होत. त्याच टेबलाच्या खुर्च्याँवर शायना उजव्याबाजुला तर, डाव्याबाजुला ती म्हातारी बसलेली दिसत होती.टेबलावर मधोमध एक मोठी मेंबत्ती पेटवुन ठेवलेली जिचा प्रकाश दोघांच्या चेह-यावर पडत होता. त्या मेंबत्तीची प्रज्वलीत वात जशी हळली जायची तस त्या दोघांचीही भिंतीवर उमटलेली सावली, लहान मोठी व्हायची.

" आज्जी एक विचारु ? " शायना त्या म्हातारीला प्रथमच आज्जी म्हंणाली. तिच्या तोंडून आज्जी हे शब्द ऐकून त्या म्हातारीच्या डोळ्यातुन नकळत अश्रु ओघळत खाली आला.

" काय झाल आज्जी ! तुम्ही रडत का आहात?" शायनाने त्या म्हातारीचे डोळे पुसले.

" काही नाही ग डिकरा! " बाकीचे अश्रु ती म्हातारी पुसत बोलु लागली.

" माझी एकुलती एक नात सुद्धा मला अशीच हाक मारायची! म्हंणुन तिची आठवण आली जरा!"

" मारायची म्हंणजे ? !" शायनाने जरा चमकुन पाहिल.

" मारायची म्हंणजे, ह्या हैवानाने जिव घेतला तिचा." ती म्हातारी सांगु लागली..आणि शायना एकटक ते ऐकु लागली..आतापर्यंत बाहेरुन येणारा तो पावलांचा, गुरगुरण्याचा आवाज थांबला गेलेला-केव्हापासुन लोखंडी गेटपाशी पाहून भुंकणारा मायकल केव्हाच झोपुन गेलेला. बाहेर वाजणा-या रातकीड्यांची किरकीर..कोण्या श्वापदाच्या( व्हूऽऽऽऽऽऽ) भयाण विव्हळ सुराला साथ देत होती. रात्रीचा थंड बोचरा वारा..अगदी स्मशानशांतता पसरवत होता..त्याच शांततेत कोण्या भयाण श्वापदाचा, तर कधी रामचंदच्या हातुन मरणा-या मानवाच्या किंकाळीचा आवाज अभद्रपणे घुमत होता. टेबलावर ठेवलेल्या मेंबत्तीच्या वितळणा-या मेनासहित ती म्हातारी शायनाला घडी हुई..हकीकत ऐकवत होती.

"दुपारचे बारा वाजलेले, आकाशात सूर्य तळपत बसला होता. पन लहान मुलांना दिवस काय रात्र काय ! ते कोणत्याही मोसमात खेळतातच थकलेकी मग निजतात.अशाच एके दिवशी ठिक बारा वाजता.! माझी लेक प्रिया उर्फ पियु..! दिसायला एकदम परीसारखी गोरी, पान. स्वभावाने अगदी खोडकर, खट्याळ बच्चा बघ !"

त्या म्हातारीच्या सुरकुतलेल्या गालांवर एक हसु आल. शायना एकटक तिच्या त्या चेह-याकडे पाहून ते सर्व ऐकत होती." कालच बर्थडे होता तिचा, म्हंणुन मीच एका दुकानातुन सफेद रंगाचा फुटबॉल खेळायला घेऊन दिलेला-आणि त्याच्यासोबतच इथे अंगणात एकटीच खेळत बसलेली.मी इथे स्वयंपाक घरात काम करण्यात मी गुंतली गेलेली.की अचानक !" ती म्हातारी बोलताना मध्येच थांबली. काहीक्षण ती अगदी शुन्यात नजर लावुन बसली..जणु ती आठवण उफाळून आलेली.जिच धक्का पुन्हा एकदा काळजात रुतला गेलेला.

" पुढे काय झाल आज्जी!?" शायनाने गंभीरपणे म्हंणाली.

" पुढे!" त्या म्हातारीने आपल्या लहानसर काळ्या डोळ्यांनी शायनाकडे पाहिल. " अचानक तिची एक आर्तकिंकाळी माझ्या कानी ऐकू आली! 

स्वयंपाक घराच काम टाकुन, मी धावत पळत बाहेर आले. आणि बाहेर येताच मला हा ! हैवान दिसला. त्यावेळेस मी सुद्धा ह्या हैवानाला प्रथमच पाहिल होत. म्हंणुन मला सुद्धा खुप भीती वाटली. त्याच ते धिप्पाड़ मेलेल्या कलेवरासारखा देह. तीच ती हिरवट जहरी नजर. त्याच्या एका बलदंड हातात पियुला एका खेळण्यासारख पकडुन दात विचकत माझ्याकडे पाहूनच हसत होता.एवढीशी लहानशी छोकरी ती मोठ मोठ्याने मला मदत करण्यासाठी हाका मारत होती.आज्जी, आज्जी..

पन मी काहीच करु शकले नाही ! " त्या म्हातारीने मोठ्या खेदाने मान डावीउजवीकडून हलवली..घश्यात आलेला हुंदका कसा तरी थांबवुन ठेवला. मी दारात येताच त्या सैतानाची नजर माझ्यावर सुद्धा पडली होती....तसा तो दात विचकत हसत माझ्या रोखाने चालून आला..

त्याला पाहून माझ्या काळजात धस्स झाल.पाय जमिनीला रुतले..

कोनत्याही क्षणी तो मला मारणार की तेवढ्यात एक काळा लहानसर डॉगचा बेबी म्हंणजेच लहानसर मायकल भुंकत मधोमध आला..

शंभर मांणसांची शक्ति असलेला तो सैतान एका छोठ्याश्या पिलल्याला

घाबरला. कीती चमत्कारीक म्हंणायच. तो हैवान मायकलला पाहून मागे मागे जाऊ लागला. माझी पियु मला ओरडत होती..मदत मागत होती. आज्जी वाचव ! आज्जी वाचव. पन मी काहीच नाही करु शकले. तो हरामजादा माझ्या उभ्या डोळ्यांसमोरुन माझी लेक घेऊन गेला...आणी मी फक्त पाहत बसले. फक्त पाहत बसले..!"

त्या म्हातारीच्या डोळ्यांतुन नकळत एक अश्रुबाहेर आला.

" तुम्ही टेंशन घेऊ नका आज्जी ! तो आहे ना " शायनाने आपल्या हाताच एक बोट वर केल. " तो पाहतोय. तो त्याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की देइन." शायना पुढे काही बोलणार होतीच की तोच एका बसने खुप लांबचा पल्ला गाठल्यावर , इंजीन खुप तापमानात गरम झाल्याव एक विशिष्ट प्रकारचा फुस्स् आवाज निघाला जातो तसा आवाज शायनाच्या कानांवर पडला.

" हा आवाज तर बसचा वाटतोय.? म्हंणजे नक्कीच कोणीतरी आलय वाटत? " ही सर्वघटना तेव्हा घडली जेव्हा ल्बदी ट्रैवलसची बस विलेज 405 मध्ये येऊन थांबली.

××××××××××××××××××××

 " काय झाल माया बस का थांबवलीयेस ? अजुन तर खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे!" वामन मायराकडे पाहत बोल्ले.

" ओह पप्पा! लांबचा पल्ला गाठूच आपण. पन आधी थोड खाऊन तर घेऊयात! खुप भुक लागलीये. आणि हो आधी मी खालती जाऊन पाहते...मग त्या पोरांना बोलवुयात. एकतर त्यांच स्टॉप अजुन आल नाही! आणि ह्या कॉलेज पोरांनी काही झा××प्ंती करायला नको खाली उतरुन..नाहीतर आपल्याच डोक्यावर पडायच. !" शायना थोड्या हटके विचारांची होती..शिव्या देण स्वभावात लहाणपनापासुनच होत..पन सध्या ती कधी कधी अगलिच्छ शब्दांचा वापर कमीच करायची. ड्राइव्ह बाजूच दार उघडून शायना बाहेर गेली.तसे वामनराव ड्राईव्हरुमच दार उघडून बाहेर आले. 

" पोरांनो बसमध्ये थोडस प्रोब्लेम झालय! पाच मिनीटात ठिक होईल. म्हंणुन बस थांबवलीये! तर कुणीही खाली उतरु नका !" वामनराव हसत सर्वांकडे पाहत बोल्ले.

" ओह काका ! तुमची बस जादूची आहे का? नाही म्हंणजे तुम्ही इथे असताना बस दुरुस्त कशी होईल नाही का !"

आर्य्ंश नेहमीप्रमाणे खोडी काढतच म्हंणाला. आणि त्याच्या ह्या खोडीवर बाकीचे हसु लागले.

" ओह काका ? बस हॉटेलपाशी थांबवुन..आम्हाला गंडवायला काय बारीक बच्चा समजता का ? " ह्यावेळेस सागर आपल्या मित्राची पाठराखण करत म्हंणाला. 

" हेय बॉयझ !" सीटवरुन उठुन उभे राहून वामनरावांकडे पाहत बोलणा-या सागर आर्यंश दोघांच्या मागुन एक भारदस्त आवाज आला..जो ऐकुन दोघांनीही मागे वळून पाहिल. काला सुट आत व्हाइट शर्ट, काळी पेंट पायांत चकचकीत बुट, डोळ्यांवर ब्लैक फ्रेम चष्मा. हातात स्मार्टवॉच. डोक्यावरचे केस मागे चोपुन बसवलेले.

" कोणी रिस्पेक्ट देऊन बोलत असेल. तर नेहमी रिस्पेक्ट रिस्पॉन्स देऊन बोलायच ! कळल." मार्शल आपल्या कडक आवाजात म्हंणाला. त्याच वेश बोलन पाहून सागर आर्यंश मूग गिळूनच गप्प बसले. 

मार्शल त्या दोघांवर एक कटाक्ष टाकत हलकेच बसच्या दरवाज्या ज्वळ आला.

" ऑनलय टू मिनिटस ! " मार्शल इंग्लिष मध्ये म्हंणाला.

" अं!" वामनरावांना इंग्लिष नाही समजली.

 " दोन मिनीटात परत येतो ! तो पर्यंत थांबा !" मार्शल मराठीत म्हंणाला व हलकेच बाहेर आला. निललाही बसमध्ये बसुन करमत नव्हत..तसा तोही मार्शल मागून मुलांच्या सीटच्या रांगेतुन चालत आला.

" ऑनलय टू मिनीटस! दोन मिनीटात परत येतो ! तो पर्यंत थांबा !" 

निल मार्शलची कॉपी करत म्हंणाला. व हळकेच दारातुन बाहेर पडला..

तसा वामनरावांनी एकवेळ कॉलेज तरुणांकडे पाहिल व कपाळावर हात मारुन घेत आल्या पावळे माघारी वळून ड्राईव्ह रुममध्ये शिरले.

×××××××××××××××××××××××

हायवे नंबर 405 विलेजची घर मागे सोडल्यावर एक ख्रिश्चन मंदिर दिसत होत. मंदिराचा दरवाजा उघडा होता. त्या उघड्या दरवाज्यात त्या अंधारामुळे एक कालोखी पोकळी निर्माण झाली होती. ज्या पोकळीत ह्या ब्रम्हांडाची सीमारेषा संपत होती..आणि एका वेगळ्याच जगाची सीमा रेषा सुरु होत होती. एक वेगळाच प्रदेश एक वेगळच जग ..ज्या जगात -मानवी जिवांचा अंश नव्हता. तिथे फक्त पाश्वी, क्रुर, निच, क्प्टी, अघोरी अंशाचा वारसा सुरु होत..होता. ह्याच अंधारी भुगर्भातुन रामचंदच जन्म झाल नव्हत का? त्या उघड्या दरवाज्याच्या अंधारी पोकळीआतुन बुट घातलेल्या पावलांचा आवाज येऊ लागला.

टप, टप, टप, नी पुढच्याचक्षणाला, त्या दरवाज्याच्या दोन झापा विरुद्ध दिशेने खुलल्या जात रामचंद बाहेर आला. त्याच्या एका हातात कुदळ होती..तर दुस-या हातात खांद्यावर एक शवपेटी ठेवलेली. एका सामान्य माणसाला न झेपणार काम हा सैतान एकटाच करत होता! नाही का? आला तसा तो सैतान उघड्या दरवाज्यातुन पडला. खांद्यावर ती शवपेटी तशीच ठेऊन मंदिराच्या मागच्या बाजूने जिकडे कब्रस्तान होत तिकडे निघाला. तसाचा त्याच्या चकचकीत बुटांचा आवाज..

टप, टप, टप, टप करत एका लयीत कमी कमी होतांना ऐकू येत होता..

क्रमश :