Night Games - Episode 16 in Marathi Horror Stories by prajakta panari books and stories PDF | रात्र खेळीते खेळ - भाग 16

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

रात्र खेळीते खेळ - भाग 16

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. ती ने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त्याशिवाय त्याला त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचणच शक्य होणार नव्हत.
आणि जरी तिच्यासोबत तो मित्रांपर्यंत पोहोचला तरी त्याच्या मित्रांसमोर आणखी एक अडचण उभी झाली असती अस त्याला वाटत होत. त्याला त्याच्या मित्रांना अडचणीत आणायच नव्हत. त्याला मनोमन अस वाटत होत आपण इथून बाहेर पडू अगर न पडू पण आपले मित्र सुखरूप बाहेर पोहोचले पाहिजेत. याच विचारातून त्याने एक निर्णय घेतला कि या स्त्रीला आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचूच द्यायच नाही. हा धोका आपण आपले मित्र बाहेर पडेपर्यंत आपल्यासोबतच ठेवायचा. काहीही करून हिला आपल्यासोबतच गुंतवून ठेवायच. हिला कळूच द्यायच नाही कि आपल्याला ती कावेरी नाही हे समजलय ते.....
अस स्वतः शी ठरवत अधिराज मनातली भिती घालवून तिच्यासोबत पुढे पुढे जावू लागला......
ती स्त्री मनोमन खूप खूष होती बर झाल आपण कावेरीच्या रूपात आलो जरी आपण याच्यासोबत याच्या मित्रांपर्यंत पोहोचलो तरी आपल काम सोप होईल आपल्या हाती अनेक सावज लागतील. आणि जरी नाही पोहोचू शकलो तरी याला मित्रांपासून दूर ठेवल्यामुळे आपले स्वामी खूष होतील..
ये कावेरी तुला हि जागा बघितल्यासारखी वाटते काय ग? अधिराज विचारू लागला...
ती पण खोट हास्य चेहऱ्यावर आणत अरे हो रे अस वाटत तर आपण आधी इथे आलो होतो पण नक्की आठवत नाही...
आणि मनातच म्हणते. अरे ये मुर्खा तुम्ही तर येथे आला होता तुमच्यामुळेच तर आमचा धंदा बंद पडला. नाहीतर किती पैसे मिळवता यायचे आम्हाला आता बघच तुझे मित्र आणि तू कस इथल्या काळोख्या मातीत गढून जाता ते.....

ये अनू आपल्याला हे पुस्तक तर मिळवता आल पण ही भाषा किती वेगळी आहे कस समजायच यार आपल्याला हे पुस्तक मिळवून पण काय उपयोग करता येणार याचा त्या वाड्यातून पळत पळत वीर अनूला विचारत होता...
ये वीर काय यार तू तोंड गप्प ठेव ना तुला पळता पळता बोलायला कस जमत रे मला तर एक एक शब्द बोलण पण जड झालय..‌ अनू म्हणाली..
हो ना म्हणून तर आम्ही मुल भारी असतो बघ काहीही करू शकतो... वीर अनूला चिडवत म्हणाला....
हो का म्हणूनच तर त्या राजाने दाखवलेला मार्ग पण नाही समजला तुला... अनू वीरला चिडवत म्हणाली...
अग ते मला समजलेलच पण तुला समजलय का ते तपासत होतो.... वीर म्हणाला...
ये बास बास बास झाल हा स्वतः ची हुषारी सांगण बोलण बंद कर आणि चल लवकर बाकिच्यांपर्यंत पोहचायच आहे.. अनू म्हणाली...
हो ग अनू पण खरच तुला भेटून इतक भारी वाटल ना खूप वर्षांनी असा संवाद साधता आला अस वाटत आहे आज मला.... वीरच्या डोळ्यात अश्रू तरळतात...
हो रे वीर मला पण वाटत आलेल कि आता आपली भेट होते कि नाही अस पण बघ आपल्या मैत्रीतल्या प्रेमामुळे ते शक्य झाला आता लवकरात लवकर बाकिच्यांची पण भेट होवू दे... अनूश्रीच्या मनात भावना दाटून येतात तसच तिच्याही नकळत डोळ्यांत अश्रू येतात....
हो ग अनू चल लवकर आपली बाकिच्यांशीही भेट लवकर होईल अस म्हणतच वीर गती वाढवतो अनूश्रीही आपली गती वाढवते... पण ते यापासून अनभिज्ञ असतात कि अजूनही त्यांचा पाठलाग सुरू असतो... आणि त्यांचा पाठलाग करणारा व्यक्ती जास्तच तापलेला असतो ती दोघ एकत्र आल्यामुळे तो परत त्यांना वेगळ करण्यासाठी सज्ज झालेला असतो.... पण त्याला याची कल्पना नसते कि ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांसाठी काहीही करायला तयार होतात.. अगदी दोघ जरी एकत्र आली तरी....

अचानकच अधिराजच्या समोर झाडावरून पक्षी खाली पडतात तस अधिराजच्या मनात भय दाटून येत. कावेरीला पण घाम सुटतो याला आपल सत्य कळल तर या विचाराने त्याला काही कळू नये म्हणून ती घाबरण्याचे नाटक करते आणि म्हणते ये अधिराज काय रे हे अस अचानक पक्षी कसा काय खाली पडला लय भिती वाटतीया खरच आपले मित्र सुरक्षित असतील ना रे.....
अधिराजला तर तीच वागण बघून झटकाच बसला क्षणभर तर ही कावेरीच आहे कि काय असच भासल त्याला पण नंतर तो परत सावध झाला कारण कावेरी अधिराज अस त्याला कधीच बोलवत नव्हती ती त्याला ये कळकुट्या असच म्हणायची आणि कधीतरी इतर मित्रांसारख अधी म्हणायची पण त्यांच छोट्या छोट्या गोष्टींवरून खोडकर अस भांडण व्हायच...
तो पण नाटक करू लागला हो ग कावू आता मला पण भिती वाटत आहे.....
ये अधिराज मी पण ना स्वतः पण घाबरले आणि तुला पण घाबरवल अरे आपल्याला घाबरून नाही चालणार त्यांना शोधल पाहिजे ना.... ती स्त्री म्हणाली..
हो ग चल आपण इथून जावूया..
अधिराज मनातच म्हणाला कोठे आहात रे यार तुम्ही कधी वाटलच नव्हत लपाछपी खेळता खेळता खरच आपण कायमचे एकमेकांपासून हरवून जावू इतक कि एका भेटीसाठी पण तळमळाव लागेल. खूप इच्छा झाले रे तुम्हाला भेटायची. पण काय करू मी आता जिच्यासोबत आहे तिच्यासोबत पोहोचलो तर तुमच बाहेर पडण अधिकच अवघड होईल त्यामुळे आपली भेट होवू नये अशीच प्रार्थना करावी लागत आहे मला देवाकडे....पण खरच तुम्ही सुखरूप पोहोचा....

वीरला आणि अनूश्रीला गुरगुरण्याचा आवाज येवू लागला तस परत त्यांच्या उरात धडकी भरली. त्यांच्या समोरून एक जंगली गुरांची झुंबडच्या झुंबड येवू लागली. ते वेगानेच येत होते ते बघून वीरने वेगाने अनूश्रीचा हात पकडला आणि अनूश्रीनेही वीरचा हात घट्ट पकडला त्यांना आता काहीही झाल तरी एकमेकांपासून दूर व्हायच नव्हत. ते तसच एकमेकांचे हात घट्ट पकडत पळू लागले.. पण दोघांची पळण्याची गती वेगळी असल्यामुळे पळण अवघडच होत होत.. तरीही ते एकमेकांचा हात सोडत नव्हते.. त्या माणसाला आता अजूनच राग येवू लागला. त्याने परत रागातच तिथे जोरात फुंकर मारली तस तिथ जोराच वादळ उठल. ते वादळ अनूश्रीच्या आणि वीरच्या मधोमध आल तस त्यांचे हात सुटू लागले..

कावेरी पुढे पुढे जात होती. तिला समोर कोणीतरी बेशुद्ध अवस्थेत पडल्याच जाणवल ती पुढे त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्याकडे जावू लागली तोवर तिला जोरात कोणीतरी मागे खेचल. त्याबरोबर तिचा तोल गेला पण तरीही ती लगेच उठली आणि पुढे बघते तर त्यांचा पाठलाग करणारा तो माणूस तीच्या समोर होता. त्याला पाहून तिला भितीने कंप सुटला...