Aaropi - 11 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | आरोपी - प्रकरण ११

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

आरोपी - प्रकरण ११

प्रकरण ११
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाणिनी च्या ऑफिस मध्ये ,पाणिनी, सौम्या, कनक कॉफी पीत बसले होते.
“ कनक तुझ्या माणसांकडून काय समजलं? त्या सारिकाच्या घरात कोणी आलं होतं?”
“ नाही. रात्र तशी भाकड गेली,पाणिनी.काहीच घडलं नाही.”
तेवढ्यात कनक ला फोन आला. बराच वेळ तो बोलत राहिला. “ नाही, त्यांना काम चालूच ठेवायला सांग.” कनक फोन मधून सूचना देत म्हणाला.
“ पाणिनी, ती अंध महिला पुन्हा आपल्या कामावर हजर झाल्ये !”
“ का sssय ! ” पाणिनी ओरडला.
“ मला अत्ता ओच फोन आला होता,पाणिनी.”
“ कुठे हजर झाल्ये कामावर?”
“ नेहेमीच्या जागी.ग्लोसी कंपनीच्या आवारात.”
“ दोघींपैकी जाण्या सारखी स्त्री म्हणजे सारिका हीच आहे.दुसरी कोमा मधेच आहे.” पाणिनी उद्गारला. “ पण कनक, तुला कसं समजलं? तुझी माणसं तर सारिकाच्या घरी नजर ठेऊन होती ना? ” पाणिनी ने विचारलं.
“ हो.त्यांनीच कळवलं मला. सारिका मणिरत्नम पुढच्या दाराने काठी घेऊन बाहेर आली. दारात भाड्याची गाडी तिला न्यायला तयारच होती. ती पटकन त्यात बसली आणि ग्लोसी कंपनीच्या आवारात उतरली.”-कनक
“ खरंच ती,तिच्या फ्लॅट च्या पुढच्या दाराने ती बाहेर आली ?” पाणिनी ने विचारलं.
“ बरोबर.”
“ नाही होऊ शकत तसं, तुझी माणसं नजर ठेऊन होती ना तिथे?” पाणिनी ने विचारलं.
“ माझी माणसं होती तिथे ,दोन्ही दारावर नजर ठेऊन.तरी सुध्दा असं घडलं याचं एकाच स्पष्टीकरण असू शकतं.”-कनक ओजस म्हणाला“
काय ?”-पाणिनी ने विचारलं.
“ आपण त्या घराची तपासणी केल्या नंतर आणि बाहेर पडल्यावर मी मागच्या दारावर माणूस नेमला होता. या बाईने काय केलं असावं ,सांगतो, तुला पाणिनी.ती बाई मागच्या दाराने बाहेर पडली असावी,तिला तिथून कोणीतरी बाहेर घेऊन गेलं असावं.नंतर ती मागच्याच दाराने परत आत आली असावी, अशा वेळेला,जेव्हा आपण घराची तपासणी संपवून बाहेर पडलो होतो पण मी मागच्या दारावर नजर ठेवायला माणूस नेमण्यापूर्वी.ती मागच्या दाराने तिचे काम संपवून आत आल्यावर तिने मागचे दार आतून बंद केले असावे आणि झोपली असावी.तिला इकडे काय घडलंय याची कल्पना नसणार.आज सकाळी भाड्याच्या गाडीने पुन्हा कामावर हजर झाली.”-कनक
“ तिच्या कामाच्या जागी म्हणजे ग्लोसी च्या आवारात तिच्यावर नजर ठेवायला तुझा एकाच माणूस पुरेसा आहे आता कनक, पण, तिच्या घराच्या दोन्ही बाजूला मला तुझी दोन माणसे लागतील. तिला घराच्या मागच्या बाजूच्या गालीतून कोण घेऊन जातं ते मला शोधायचंय. ती व्यक्ती मधुरा महाजन असू शकत नाही,सद्य स्थितीत.मग कोण?स्वतःला सोफियाच्या वतीने काम करतोय म्हणणारा माणूस? ” पाणिनी म्हणाला.
“ तुला काय म्हणायचयं? साहीर सामंत?” –कनक
“ मी त्याचाच विचार करतोय कनक ! ”
सौम्या ने तिघांचे कप पुन्हा गरमागरम कॉफीने भरले. कॉफी पिऊन होई पर्यंत सर्व शांत होते.
“ मला लक्षात आलं कनक !” अचानक पाणिनी म्हणाला.
“ काय ते?”
“ आपण सापळा लावलाय कनक, पण त्यात अजून कोणी अडकलं कसं नाही कोणी? हे लक्षात आलयं ” पाणिनी म्हणाला.
“ का नाही अडकलं कोणी?”
“ उन्दारासाठी आपण पिंजरा आणला म्हणून त्यात उंदीर शिरत नाही.”
कनक ने ण समजून मान हलवली.
“नुसत्या सापळ्यात अडकत नाही कोणी, जो पर्यंत आपण त्यात आमिष लावत नाही. उंदराला मोहात पाडण्यासाठी भाजलेलं खोबरं, भजी असं त्यात टाकायला लागतंच ” पाणिनी म्हणाला.
“ तुझं आमिष कोण आहे पाणिनी?”-कनक
“ सौम्या, तुझी वही घे हातात, तुला एक पत्र डिक्टेट करतो.” पाणिनी म्हणाला.
सौम्या तयार झाली.
“ सौम्या, हे पत्र ग्रीष्म महाजन ला उद्देशून लिहायचं आहे आणि या पत्राची तारीख ही त्याच्या मृत्यू च्या चार दिवस आधीची टाकायची. सुरु कर सौम्या, प्रिय ग्रीष्म महाजन यांस..........”
“ काय चाललंय पाणिनी? मेलेल्या माणसाला उद्देशून पत्र ?”
“मेलेल्या माणसाला उद्देशून पत्र.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्या लक्षात येत नाहीये.”
“ समजेल. सौम्या, घे लिहून. ‘ स्वतः चे अक्षरातील अधिकृत इच्छापत्र कशाला म्हणतात या बाबत तुम्ही केलेल्या चौकशीच्या संदर्भात तुम्हाला कळवण्यात येते आहे की, स्वहस्ते लिहिलेल्या, सही केलेल्या आणि तारीख आकालेल्या इच्छापत्राला अधिकृत इच्छापत्र समजले जाते,अशा इच्छापत्राला साक्षीदाराची सही गरजेची नाही. मात्र त्यासाठी काही बंधने काटेकोर पणे पाळली गेली पाहिजेत.हे इच्छापत्र पूर्ण पणे इच्छापत्र करणाऱ्याच्या हस्ताक्षरातच असायला हवे.एका पेक्षा जास्त माणसांची हस्ताक्षर असता कामा नयेत. लेटर हेड वापरले गेले असेल तर त्या वरचे छापील हेडिंग सुध्दा इच्छापत्राचा भाग असता कामा नये. त्यावर तारीख सुध्दा हस्ताक्षरातच असली पाहिजे.ताराखेचा शिक्का चालणार नाही, एवढेच नाही तर काही ठिकाणी सालाचे पाहिली दोन अंक छापलेले असतात व त्या पुढचे दोन अंक हाताने लिहायचे असतात उदा. २०२२ साल असेल तर २०—असे छापलेले असेल आणि त्यावर २० च्या पुढील दोन रिकाम्या स्थानावर २२ असे हाताने लिहिले असेल तर ते चालणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे इच्छापत्र हे शेवटचे इच्छापत्र असल्याचा उल्लेख त्यात असायला हवा.या पूर्वीची सर्व इच्छापत्रे या नवीन इच्छापत्रा द्वारे रद्द झाली आहेत असा उल्लेख त्यात केला असला पाहिजे. ज्या माणसाना तुम्हाला इच्छापत्रा मधून वगळायचे आहे, त्यांचा उल्लेख इच्छापत्रा मधे असावा की त्यांना तुम्ही काहीही देऊ इच्छित नाही. शेवटी हे इच्छापत्र हे तुमचे शेवटचे इच्छापत्र आहे आणि ते तुमच्या स्वतः च्या हस्ताक्षरात आहे असा उल्लेख करून सही करावी.
अपेक्षा आहे की तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची तुम्हाला समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत.’ ” पाणिनी ने आपले डिक्टेशन पूर्ण केलं.
“ सौम्या, तू हे टाईप करून आण.मी ते सही करून देतो.” पाणिनी म्हणाला.
“ मला काही कळत नाहीसं झालंय.” कनक म्हणाला.
“ मला सांग कनक, तू एखादी गोष्ट शोधतो आहेस, आणि ती सापडली तर तू काय करशील?” पाणिनी म्हणाला.
“ शोध थांबवीन.”
“ नंतर तुला पुन्हा वाटलं की तुला हवं होतं ते सापडलं नाहीये, तर काय करशील?”
“ पुन्हा शोधायला लागेन.” –कनक म्हणाला.
“ तर मग पुन्हा शोधायला लाग कनक ओजस.” पाणिनी म्हणाला.
“ ओह ! आलं लक्षात ! ”
“ जर शेफाली ला त्या ऋतू बंगल्यात ग्रीष्म ने साधारण वर्षा पूर्वी केलेले इच्छापत्र सापडले असेल तर तिला एवढेच करायचे होते की ते सापडलेले इच्छापत्र जाळून टाकणे. तसे केले की तिला वारसा हक्काने पत्नी म्हणून ग्रीष्म ची संपत्ती मिळणार हे उघड होते.पण समज, तिला असं वाटलं की ग्रीष्म ने मृत्यू पूर्वी काही दिवस आधी स्वतः च्या हस्ताक्षरात नावे इच्छापत्र केलंय, आधी केलेलं इच्छापत्र त्यातून रद्द केलंय,आणि शेफाली ला त्यात काहीही ठेवलेले नाही , तर काय होईल? ” पाणिनी ने विचारलं.
“ तिला संशय येऊ न देता, तुझ्या पत्राकडे तिचं लक्ष जाईल हे तू कसं जमवणार? कारण तुला या प्रकरणात रस आहे हे तिला माहित्ये. ” –कनक
“ तू शेफाली वर नजर ठेवत होतास, तू सांगितलस मला,त्यावेळी की त्या क्रिकेट क्लब ने ग्रीष्म मेल्याची बातमी शेफालीला कळवली होती.आठवतंय?” पाणिनी म्हणाला.
“ बरोवर. एवायसी क्रिकेट क्लब.”
“ करेक्ट, त्याला फोन लाव, सौम्या.” पाणिनी म्हणाला.
सौम्या ने क्लब ला फोन लावला.
“ मी पटवर्धन म्हणून बोलतोय. क्रिकेट शिकवणाऱ्या कोच पैकी एखाद्या जुन्या आणि वरिष्ठ कोच ला मला जोडून दयाल का?”
थोडावेळ फोन मधून वेगवेगळे आवाज उमटले.फोन लाईन दुसरीकडे जोडल्या गेल्याचे आवाज, कोणीतरी कोणालातरी बोलावल्याचे आवाज.शेवटी एका माणसाने फोन उचलला.आणि पाणिनी च्या कानात आवाज आला.
“ यस्, कोण बोलतंय?”
“ मी पटवर्धन म्हणून बोलतोय. मला माझ्या पूर्व स्मृतींना उजाळा द्यायचाय. ” पाणिनी म्हणाला.
“ मी समजलो नाही ”
पाणिनी हसला. “ मी खूप वर्षापूर्वी , तुमच्या क्लब च्या मैदानात खेळायला यायचो. तेव्हा क्लब नव्हता अस्तित्वात आला. आम्ही कॉलेजातली मुलं खेळायचो. नंतर आम्ही पुन्हा भेटलोय, कुणाच्या तरी डोक्यात आलं की आपण सर्व एकत्र येऊन पुन्हा त्याचं मैदानात एक दिवस खेळूया. पण त्यावेळी क्लब कुठे होता? कोणीही यावं आणि खेळावं अशी स्थिती होती. आता आम्हाला तिथे पुन्हा एखादा दिवस खेळायचंय, नुसतं खेळायचं असं नाही तर खेळ झाल्यावर खेळाडूंसाठी राखून ठेवलेल्या पॅव्हेलीयन मधे बसायचय, आतल्या ग्रीन रूम मधे वावरायचंय. खेळाडू आपलं सामान कुठे ठेवतात ते बघायचंय. मला माहिती आहे की तुम्ही जुने क्रिकेट किट म्हणजे ग्लोव्ज, पॅड वगैरे विकायला ही ठेवता.जमलं तर आम्ही ते घालून खेळू ! मला माहित्ये की माझी मागणी फार म्हणजे फारच विचित्र आहे. पण नॉस्टेलजिया ! आम्ही बाल वयात जे करू शकलो नाही ते अत्ता करायची सुप्त इच्छा आहे. अत्ता आम्ही सर्व सधन आहोत, कुठल्याही महागड्या क्लब ची वर्गणी भरून आम्ही सभासद होऊ शकतो आणि त्या मैदानात खेळू शकतो पण आमच्या आठवणी आहेत तुमच्या मैदानाशी निगडीत. दुसऱ्या क्लब च्या मैदानात तो आनंद कसा मिळणार ?”
पलीकडचा माणूस गप्प राहिला. पाणिनी ने जरा अंदाज घेतला आणि पुढे म्हणाला, “ मला माहित्ये की हे तुम्हाला शक्य नाहीये. क्लब चे देणगीदार असल्याशिवाय तुम्ही प्रवेश देत नाही, त्यामुळे तुमच्या वरिष्ठाला पटवणे हे तुम्हाला जमणार नाही, पण करू शकलात तर फार आनंद होईल.कुठलाही मोकळा दिवस सांगा, दीड दोन तासच खेळू इच्छितो आम्ही.”
त्याच्या अहंकाराला डिवचण्याची युक्ती पाणिनी च्या फळाला आली.
“ पटवर्धन, तुम्हाला माझा इथे किती वठ आहे माहीत नाही. मी ही क्रिकेट वेडा आहे. नशिबाने परवा मैदान मोकळ आहे. ग्रुप जमवा तुम्ही.”
“ वाव ! ” पाणिनी उद्गारला. “ जमवा जमाव करतो आम्ही, नाहीच आलं कोणी तरी पूर्ण फी भरून आम्ही एक दोन जण येऊन खेळू.”
“ तुम्हाला एक नाव आणि नंबर देतो, तिथे पैसे जमा करा तो सांगेल तेवढे, संध्याकाळी चार ते सहा तुमच्यासाठी ठेवतो.”
त्या माणसाने पाणिनी ला नाव आणि नंबर देऊन फोन ठेवला.
“ काय डोक्यात आहे तुझ्या पाणिनी?” कनक ने गोंधळून जात विचारलं.
“ हा ग्रीष्म खेळत असतांना च गेला. हो ना?” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ एखादा माणूस मैदानातच जातो तेव्हा काय होत?”
“ मला नाही माहिती, मी कधी अशा प्रकारे मेलो नाही.” –कनक
“ मी पण नाही, पण माझ्या मनात कल्पना आहे.” पाणिनी म्हणाला.
“ त्या दिवशी काय घडलं असावं या वाबत?” –कनक
“ हो. त्याच्या टीम मधले लोक तो पडल्यावर धावले असतील.त्यांनी त्याला शुद्धीवर आणायचं प्रयत्न केलं असेल. त्यात यश येत नाही म्हंटल्यावर त्याला उचलून पॅव्हेलीयन मध्ये नेलं असेल.कोणीतरी बोलावलं म्हणून डॉक्टर आले असतील. त्यांनी तपासून त्याला मृत घोषित केलं असेल आणि नातलगाना बोलावून घ्यायला सांगितलं असावं.काही जणांनी त्याचं सामान ,म्हणजे ग्लोव्हज, बॅट, बॉल वगैरे, त्याच्या लॉकर मध्ये ठेवले असेल, किंवा मग त्याचा लॉकर नसेल तर कॉमन काउंटर वर ठेवले असतील. आता नातलग म्हणून त्याच्या बायकोला, शेफाली ला बोलावले गेले असेल , तिने त्याचे प्रेत ताब्यात घेताना, त्याच्या वस्तू सुध्दा ताब्यात घेतल्या असतील. त्याच्या लॉकर मधल्या वस्तू, त्याने त्यात कपडे ठेवले असतील तर त्याचे खिसे तिने तपासले असतील.त्यातल्या वस्तू तिने घेतल्या असतील आणि लॉकर रिकामा केला असेल. त्यांची क्रिकेट बॅटस् आणि त्या ठेवायची मोठी बॅग हे तिने क्लब ला देऊन टाकल्या असतील.”
“ थोडक्यात जुने कॉलेज चे नॉस्टॅल्जिक मित्र म्हणून मी उद्या काही जणांना घेऊन तिथे खेळायला जायचा बहाणा करायचाय.” –कनक
“ बरोबर. सौम्या ने अत्ता टाईप केलेलं पत्र आपण जरा चुरगाळून आणि जरा त्याला धूळ चारून जुने वाटेल असं करुया. मग ,कनक तू ते पत्र त्या मैदानात गेल्यावर, त्या क्लब च्या ग्रीन रूम मध्ये जाऊन ग्रीष्म च्या बायकोने ने ठेवलेल्या क्रिकेट बॅटस् ठेवायच्या मोठ्या बॅगच्या कप्प्यात ठेवायचे . जणू काही ग्रीष्म ला ते पत्र क्लब मध्ये जायला निघतांना मिळालं होतं आणि त्याने ते घाई घाईत वाचून बॅगच्या कप्प्यात खुपसले असावे.” पाणिनी म्हणाला.
“ पाणिनी तुला वाटतंय खरंच की आपण ते पत्र त्या बॅग मध्ये ठेवलं तर शेफाली ला आपण ते केल्याचा संशय येणार नाही? ”
“ पैज लाव. ” पाणिनी म्हणाला.
“ नको. अत्ता पर्यंत मी हरलोय.” कनक म्हणाला.

( प्रकरण ११ समाप्त.)