Aaropi - 3 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | आरोपी - प्रकरण ३

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

आरोपी - प्रकरण ३

प्रकरण तीन
“किती पैसे होते त्यात?” - पाणिनी
“काही सांगता येणार नाही पन्नास,पाचशे आणि दोन हजाराच्या च्या नोटा होत्या सगळ्या.”
“आणि इतर खोक्यात काय होतं?”
“मला माहित नाही. मी खोकं बंद केलं आणि कपाटाचं दार ही बंद केलं. मला भीती वाटते पटवर्धन सर, जर का काही चोरी दरोडा पडला घरात..... आम्ही दोघीच बायका घरी राहतो. म्हणजे लक्षात येत आहे ना... आणि अगदी दरोडा किंवा चोरीच सोडा जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारची रोख रक्कम खोक्यांमध्ये भरून घरी ठेवतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी सुद्धा ही रक्कम ठेवलेली असू शकते. जर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कळलं तर काय होईल?”
“म्हाताऱ्या माणसांना आपल्या घरात रोख रक्कम ठेवायची थोडी सवय असते. आणि या गोष्टीची जाणीव इन्कम टॅक्स च्या लोकांना असते त्यामुळे तशी काळजी करायचे कारण नाही.” - पाणिनी
“हो पण ती तशी नाहीये. ती काय म्हातारी नाहीये फक्त पन्नास-पंचावन्न वय आहे तिचं. ती फक्त कपडे जुनाट घालते म्हणून म्हातारी दिसते तिने छान कपडे घातले तर ती चाळीस-पचेचाळीस ची वाटेल.”

“तुला तिचा टॅक्सीच्या सवयीचं कसं कळलं ?”
“एकदा मलाही माझ्या काही गोष्टी खरेदीसाठी मार्केट मध्ये जायचं होतं म्हणून मी एका मॉलमध्ये जायला निघाले तर तेवढ्यात आत्या टॅक्सीतून उतरताना दिसली.”
“ आणि ती टॅक्सी ड्रायव्हरला बाहेर तशीच उभी करून मॉलमध्ये खरेदीला गेलेली दिसली”
“तू काय केलं स मग?” - पाणिनी
“मी बाहेरच एका आडोश्याला लपून बसले. थोड्यावेळाने, दहा पंधरा मिनिटांनी ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कसलं तरी एक छोटं पॅकेट होतं. बहुतेक बिस्किटाचा पुडा वगैरे. ती टॅक्सीत बसली आणि निघून गेली ती. माझ्या जवळच टॅक्सी वळली तेव्हा मला दिसलं की टॅक्सीत इतरही काही पॅकेट होती.”
“घरातून निघताना आणि घरी परत येताना की टॅक्सी वापरत नाही?” - पाणिनी
“अजिबात नाही. घरातून निघाली ती बस स्टॉप वर जाते आणि घरी परत येताना पुन्हा जवळच्या बस स्टॉप वरून उतरून चालत घरी येते. येताना तिच्या हातात खरेदी केलेली पॅकेट्स असतात.”
“हा सगळा प्रकार तुला विचित्र वाटतो म्हणून तुला माझ्याशी बोलायचं होतं का?” पाणिनीने विचारलं
“पटवर्धन सर मला तुमचा सल्ला हवाय. मला अशी इच्छा आहे की मी तिला सोडून जाते असं तिला वाटतं कामा नये, पण त्याच बरोबर मला त्या घरी राहायचं पण नाहीये.”
“का तुझ्या आत्याला असं का वाटेल की तू तिला सोडून चाललीस?”
“काय आहे, कि तिने आतापर्यंत बरीच दुःखही भोगली आहेत. माझे वडील हे तिचे एकुलते एक भाऊ होते माझ्या शिवाय तिला दुसरं कोणी नातेवाईक नाही त्यामुळे मला तिच्याबद्दल तसं वाईट वाटतं.”
“ऋतुगंध बंगल्याचा पुढे काय झालं?” पाणिनीने अचानक विचारलं
“शेफाली राहते तिथे . ग्रीष्म महाजनची विधवा या नात्याने तिला सर्व हक्क मिळावा म्हणून तिने अर्ज केलाय कोर्टात”.
“ग्रीष्म महाजन ने मृत्यूपत्र नव्हतं केलं?”
“नक्कीच केलं होतं. ऋतुगंध बंगल्यातच ग्रीष्म महाजन चं ऑफिस होतं तिथे मृत्युपत्र ठेवलेलं होतं. पण त्याच्या मृत्यूनंतर ते शेफाली ला मिळालं आणि ते तिने नष्ट करून टाकलं.”
“ग्रीष्म महाजन ला दुसरा कोणी नातेवाईक नाही?” - पाणिनी
“नाही. शेफाली च आधी लग्न झालेलं होतं आणि त्या लग्नापासून तिला एक एक मुलगाही आहे. त्याचं नाव आहे चंद्रवदन विखारे. तो एकुलता एक मुलगा आहे. बाकी कोणीही नातेवाईक नाहीत. तिने ग्रीष्म महाजन ची जी जी प्रॉपर्टी हडप केलीये ती प्रत्यक्षात ग्रीष्म ने माझ्या आत्याने दिलेल्या पैशातूनच खरेदी केली होती.”
“तुझ्या आत्याने शेफाली च्या या कृत्यावर काही हरकत नाही घेतली?”
“छे, छे, माझी आत्या म्हणजे एखाद्या मांजरा समोर चा उंदीर. आत्या असं भासवते आहे की जणू काही तिच्या हातात काही तरी हुकुमाचे पान आहे पण मग तरी सुध्दा ती असलं घाणेरडं काळजी चे जीवन का जगते आणि त्या दुमजली झपाटलेल्या बंगल्यात का राहते हे मला समजत नाही असं झालंय.”
“झपाटलेल्या?” - पाणिनी
क्षितीने आपली नजर खाली वळवली. “ सॉरी मिस्टर पटवर्धन माझ्या तोंडून चुकून तो शब्द गेला खरं तर मी सांगणार नव्हते तुम्हाला काही.”
“अरे ! झपाटलेली घर म्हणजे माझ्या आवडीचा विषय आहे. आणि तुझ्या आत्याचं घर जर झपाटलेलं असेल तर मला त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायला आवडेल” - पाणिनी
“तुला ते घर झपाटलेला वाटतं म्हणजे तुला नक्की काय ऐकू येतं? ओरडण्याचे आवाज किंकाळ्या की पावलांचे आवाज?”
“पावलांचे आवाज रात्री च्या वेळेला.” क्षिती म्हणाली
“कशाप्रकारे पावलं वाजतात?”
“चालताना ची पावले. पण ती अशा ठिकाणी चालल्याचे आवाज येतात की त्या ठिकाणी कोणी माणूस चालूच शकणार नाही.”-क्षिती
“का बरं?”- पाणिनी
“जिन्यावर चढताना आणि उतरताना चे आवाज. नंतर कॉरिडॉर मध्ये अंधारात चालताना चे आवाज. कधीकधी थांबून मध्येच कुजबुजला चा आवाज आणि पुन्हा चालताना चे आवाज.”
--क्षिती
“कदाचित तुझ्या आत्याकडे कोणीतरी गूढ पणे भेटायला येणारा पाहुणा असावा”
“ते शक्य नाही. एवढ्या अंधारात कोणीच येऊ शकणार नाही. आणि चालू शकणार नाही. एकदा मी अचानक दार उघडून पावलांचा आवाज कुठून येतो याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला होता पण मला कोणी दिसलं नाही.”
पाणिनी पटवर्धन या सगळ्या वस्तुस्थितीचा शांतपणे विचार केला आणि क्षितीला म्हणाला,
“ क्षिती, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, हे जे काही तू सांगतेस ते मला आवडले नाही. तू ज्या परिस्थितीत आत्ता आहेस ती मला आवडली नाही. मला असं वाटतं की तू तिथून बाहेर पडलं पाहिजेस” - पाणिनी
“कधी?”
“आत्ता लगेच. जोपर्यंत परिस्थिती याहून अधिक चिघळलेली होणार नाही तोपर्यंतच बाहेर पड”
“आणि मी मधुरा आत्याला काय उत्तर देऊ? तिला हे सांगू कि ती त्या खोक्यात नोटा ठेवत असल्याचं मला माहिती झालं. आणि.....”
“तिला असलं काहीही सांगू नकोस. एवढंच सांग की तुला समवयस्क अशी एक मैत्रीण भेटली आणि तिच्याबरोबर तू दुसरीकडे एकत्र राहायला जायचे ठरवले आहेस.”
“अहो पण या गोष्टीला वेळ लागेल आणि आता मी जेवढे पैसे कमावते त्यापेक्षा जास्त खर्च मला त्यामुळे येईल”
“खर्च वगैरे गोष्टी नंतर च्या. त्या कशा बसवायच्या ते आपण नंतर बघू. पण तू मला तातडीने ती जागा सोडायला हवी आहेस.”
“तातडीने म्हणजे?”- क्षिती
“तू कामावर कधी जातेस?”
“आज माझी ड्युटी साडेअकरा ची आहे. म्हणजे साडेअकरा ते साडेतीन. साडेतीन ते पाच आम्हाला मधली सुट्टी असते पाच नंतर पुन्हा नऊ वाजेपर्यंत काम.”
“मधल्या सुट्टी च्या वेळेला तू पुन्हा घरी जातेस?”--- पाणिनी
“नाही तिथे आम्हाला एक खोली दिलेली आहे फ्रेश होण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी. थोडावेळ आम्ही तिथेच घालवतो एखादी डुलकी काढतो आणि पुन्हा कामावर रुजू होतो.”
“ठीक आहे. रात्री नऊ वाजता, जेव्हा तुझी ड्युटी संपेल आणि घरी येशील तेव्हा तुझं सगळं सामान भर आणि तिथून बाहेर पड.”
“पण कुठे जाणार? मी.. मी. नाही जाऊ शकत...”
“एखाद्या हॉटेल वर जा. पण त्या घरात न थांबता लगेच बाहेर पड. आजच. अन्यथा त्यात तर धोका आहे. म्हणजे त्या घरात असलेले पैशावर बाहेरच्यांचा डोळा असू शकतो आणि तसंच झालं तर सगळ्यात प्रथम संशयित म्हणून तुझं नाव पुढे येईल.” आत्ता जरी तुझी आता तुझी मधूरा आत्या तुझ्याशी चांगली वागत असली तरी तूही तुझं कर्तव्य पार पाडत आहेस नोकरी करून पैसे कमावते आहेस. तिला घरकामात मदत करते आहेस. त्यामुळे तिला सोडून जाताना तुला अवघडल्यासारखं वाटायचं कारण नाही.” - पाणिनी
“पटवर्धन सर मी विचार केला होता कि मधुरा आत्या चा पाठलाग करण्यासाठी एखादा गुप्तहेर नेमावा की काय?”
पाणिनीने आपली मान हलवली. “ नाही अजिबात नाही. त्याचा आर्थिक खर्च तुला परवडणार नाही आणि मधुरा आत्या.ला जर कळलं की तू तिच्या मागे गुप्तहेर लावला आहेस तर फार विचित्र परिस्थिती होईल तुझी. तसं काही नको. तू तुझ्या आत्याला फोन करून सांग की तू तिथून बाहेर पडून तुझ्या मैत्रिणीबरोबर दुसरीकडे राहायला जाणार आहेस आणि तू आज रात्रीच जाणार आहेस. मला वाटतं तुझ्याकडे फार काही सामान नसावं” - पाणिनी
“खूपच कमी आहेत वस्तू माझ्या. मी माझं घर सोडलं तेव्हा फक्त माझे कपडे, प्रवासाचं काही सामान एवढेच बरोबर घेतलं होतं. दोन सुटकेस आणि एक हॅन्ड बॅग. मी मुद्दामूनच कमी सामान घेतलं त्यावेळी. बरोबर पैसे नसताना सुद्धा कसं जगायचं हे त्याकाळात मी शिकले एकंदर ते दिवस कठीण होते परंतु मी कसबसं सांभाळल.” क्षिती म्हणाली.
“त्या घराच्या बाहेर पड जेवढं लवकर शक्य आहे तेवढं . इथे सौम्या कडे एक चिठ्ठी लिहून ठेव. त्याच्यावर तुझ्या आत्याचं नाव आणि पत्ता लिहून दे. तुला राहण्यायोग्य हॉटेल मिळालं की त्या हॉटेल्स नाव पत्ता आणि फोन नंबर मला कळवायची व्यवस्था कर” - पाणिनी

“मी तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या वेळेत भेटू शकते ना?”

“ऑफिस च्या वेळेला तू भेटू शकतेस आणि ऑफीस नसताना तू मला कनक ओजस याच्या ऑफिस मार्फत भेटू शकतेस. माझं सगळं गुप्तहेर म्हणून काम मी कनक ओजसला देतो त्याचा ऑफिस याच इमारतीत याच मजल्यावर आहे आम्ही दोघेही बालपणापासून मित्र आहोत तो गुप्तहेर झाला आणि मी वकील एवढाच फरक” - पाणिनी

“हो खरंच ! मी लिफ्ट ने येत होते तेव्हा मला त्याचं नाव दिसलं या मजल्यावर. माझ्या मनात ते नाव बघूनच अस आलं की माझ्या आत्यावर नजर ठेवायला एखादा गुप्तहेर बघावा.”

“तसा विचार आता करू नको. तू तुझा प्रॉब्लेम मला सांगितला आहेस ना? आता मी सांगेन तसेच वाग. तुझ्या आत्याला फोन कर आणि तिला कळवून टाक कि तू आज रात्रीच घर सोडतेआहेस आणि जेव्हा तू घरी पोचशील तेव्हा लगेचच तुझे कपडे आणि आवश्यक त्या वस्तू बागेत भर आणि तिथून नीघ. सरळ टॅक्सी कर आणि जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन राहा तुझी मधुरा आत्या राहते त्या घराचा पत्ता काय आहे?”

क्षिती ने आपल्या पर्समधून एक कार्ड काढलं आणि ते पाणिनीच्या हातात ठेवलं. पाणिनीने तिने दिलेला पत्ता नीट वाचला
“आत्ता तू जिथे राहतेस तुझ्या त्याच्या घरी तिथपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर एका चौकात बऱ्यापैकी हॉटेल दिसतील तुला. ती मिळून जातील. आणि तू आता ऑफिसला जाताना ज्या बस ने जातेस त्या बसच्या रुट वरच ही हॉटेल आहेत.”

“पण आता जाताना मात्र टॅक्सीने जा. बस ची वाट बघू नकोस कारण तोपर्यंत रात्र होईल उगाच रस्त्यात एकटी थांबू नकोस बस करता”

“हो सर नक्कीच टॅक्सी करूनच जाईन.”

“काय ग, तुझी ही मधुरा त्या साधारण दिसायला कशी आहे ?” - पाणिनी

“ती साधारण पाच फूट तीन इंच आहे पन्नास-पंचावन्न वय पण दिसते पंचेचाळीस ची. मध्यम बांधा आहे घारे डोळे आणि कुरळे केस साधारण 60 किलो वगैरे वजन असेल. दिसायला एकदम तरतरीत आहे ती. छान व्यवस्थित राहिली चांगला ड्रेस अंगात घातला तर ती पस्तिशीची सुद्धा दिसेल पण ती साधेच कपडे घालते त्यामुळे जास्तच वृद्ध वाटते”

“ठीक आहे ठीक आहे. अंदाज आला मला. मला फोन करून कळव कुठल्या हॉटेलमध्ये राहिली आहेस ते. मी तुला कुठे भेटायचे ते.” पाणिनी पटवर्धन म्हणाला आणि त्याने तिला निरोप दिला.

क्षिती ऑफिसच्या बाहेर पडल्यावर पाणिनीने सौम्या कडे कपाळावर आठ्या घालून बघितल "सौम्या, मला सांग, एखादी बाई कुठे पैसे वाचवता येतील, खरेदी करताना हे बघण्यासाठी पेपर का वाचत असावी? आणि ते वाचून खरेदीला जाताना मात्र टॅक्सी भाड्याने करून खरेदी होईपर्यंत टॅक्सी एंगेज का ठेवत असावी? खरेदी पेक्षा टॅक्सी खर्च जास्त का करत असावी? त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे घरून निघताना ती टॅक्सी करत नाही आणि केलेली टॅक्सी परत घरापर्यंत आणत नाही ती बस स्टॉप पर्यंत सोडते आणि घरी येताना बस करून येते ही काय भानगड आहे?"
सौम्या ने आपली मान होकारार्थी हलवली." माझ्या लक्षातच येत नाहीये. मला पण नेमके हेच प्रश्न पडलेत" ती म्हणाली.
"हां, मी हे समजू शकतो की ती मधुरा महाजन काहीतरी एक मोठा खेळ खेळत्ये.सौम्या, जरा कनक ला फोन करून इकडे बोलावून घे."

"सर तुम्ही हा तर प्रयत्न करत नाहीयात ना...?..."

"तुझ्या जे मनात आहे तोच माझा प्रयत्न चाललाय सोम्या. आपलं हे अशील एका फार मोठ्या अडचणीत सापडल्ये.त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तिला काही पैसे खर्च करायला लागणार आहेत. तिच्याकडे मात्र ते नाहीयेत . आपल्यालाच तशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल तिच्यासाठी. त्या साठी काहीतरी करावं लागतं. तिला बिचारीला गुप्तहेर नेमणे शक्य नाहीये पण तिच्या साठी मी मात्र नेमू शकतो."

"सर तुम्ही जेव्हा क्षिती ला तिच्या मधुरा आत्याच सविस्तर वर्णन करायला सांगत होतात तेव्हा तुमच्या डोक्यात हेच होत ना?"- सौम्या.

पाणिनी हसला "आपल्या सेक्रेटरी पासून काही लपवून ठेवता येत नाही आणि ठेवू पण नये. मानलं तुला तू माझ्या मनातलं ओळखलस. कनक ला बोलावून घेतेस ना?"

सौम्या सोहोनी ने इंटर कॉम वरून ओजस च्या ऑफिस मध्ये फोन लावला आणि त्याला पाणिनीने बोलल्याचं सांगितलं थोड्याच वेळात कनक चा एक विशिष्ट प्रकारचा दारावर केलेला टकटक आवाज आला.सौम्या ने त्याला आत घेतलं. "हाय पाणिनी, हाय चिकणे ," त्याच्या खास शैलीत कनक ने पाणिनी आणि सौम्याला अभिवादन केलं.
" माझ्यासाठी काय काम आहे की काय आज?"

"हो, खास काम आहे. तुला एकाचा पाठलाग करायचा आहे आणि असा पाठलाग करायचा आहे की पाठलाग करणारा तुझा गुप्तहेर पकडला जाता कामा नये. एक वेळ ज्याचा पाठलाग तो करणार आहे ती व्यक्ती त्याला हुलकावणी देऊन गेली तरी चालेल."
मधुरा महाजन नावाच्या एका बाईचा. हा तिचा पत्ता." पाणिनी म्हणाला आणि त्यानं विजिटिंग कार्ड ओजस कडे दिलं.

"हे नक्की काय आहे ?म्हणजे, अपार्टमेंट आहे का बंगला आहे? की,रोव हाऊस?" कनक ने विचारलं

"एक दुमजली बंगला आहे. खूप जुना बंगला आहे. आणि बंगल्याचा आकार जेवढा आहे त्याच्या पाचपट जवळजवळ प्लॉट आहे."

"ज्याचा पाठलाग करायचा आहे त्याचं वर्णन कर जरा" - कनक

"साधारण पन्नाशीची स्त्री आहे. चेहऱ्याने वयापेक्षा बरीच कमी दिसते पण कपडे फार जुनाट घालते एकदम चांगली फिगर असलेली बाई आहे. पाच फूट तीन इंच उंची, साधारण आणि साधारण साठ किलोच्या आसपास वजन असेल." पाणिनी ने वर्णन केलं.

"कनक तुला आणखीन एक टीप देऊन ठेवतो, त्या बाईच वागणे विचित्र आहे. म्हणजे ती घरातून बाहेर पडते बसच्या लायनीत उभी राहते, बस पकडते नंतर तिच्या इच्छित स्थळी जाते. बस मधून उतरल्यावर टॅक्सी करते. वेगवेगळ्या मॉलमध्ये आणि दुकानात जाऊन खूप खरेदी करते. खरेदी होईपर्यंत टॅक्सी एंगेज ठेवते. परत त्याच टॅक्सीत बसते. बस स्टॉप वर येते आणि बसमध्ये बसून परत घरी येते. म्हणजे बस स्टॉप पाशी उतरते घराजवळच्या.आणि तिथून चालत घरी येते."

"अरे बापरे विचित्रच आहे सगळं " कनक म्हणाला.

"तेच सांगतोय मी ." पाणिनी म्हणाला
" हेच सगळं काय भानगड आहे हे मला शोधून काढायचंय"

"हे सगळं शोधून काढण्याचा हेतू काय आहे पण ?"

तो हेतू काय आहे हेच मला "शोधून काढायचंय"

"आता मला तुझ्या अशिला बदल जरा सांग."

कनक पाणिनी ला म्हणाला.

"तुला खरं सांगायचं आत्ता माझा अशील नक्की कोण असणार आहे मला माहीत नाही. मी माझी उत्सुकता म्हणून हे शोधून काढायचे ठरवले. त्यामुळे हे शोधून काढण्यासाठी तू मला अति खर्चात टाकू नकोस. उलटपक्षी तुझा उत्कृष्ट असा माणूस या कामावर नेम. आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीला आपला पाठलाग होतोय हे अजिबात कळता कामा नये."

"ठीक आहे काही हरकत नाही." कनक म्हणाला.
"तुझा अंदाज काय पाणिनी? तुझी ती बाई तिच्या त्या गुप्त मिशनवर आजच बाहेर पडेल?"

"ती पडणार नसली तरी मी आज बाहेर पडून तिला बाहेर काढीन.मला वाटतंय तुला अत्यंत तातडीने काहीतरी हालचाल व्हायला हवी आहे, या प्रकरणात अगदी तातडीने. म्हणजे आत्ताच" पाणिनी म्हणाला.
"ठीक आहे माझ्याकडे एक चांगला माणूस आहे. हे काम करणारा. त्याला नेमतो. पुढच्या काही मिनिटातच तो आपल्या कामगिरीवर बाहेर पडेल" कनक म्हणाला.
प्रकरण ३ समाप्त.