Navra baaykoche rusve-fugve - 2 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...२

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...२

रितू रस न घेता रागारागात माझ्याकडे बघत, तिच्या मैत्रिणी कडे बघुन मी येतेच ग...! असं बोलून बाईक जवळ जाऊन थांबते...
तर पुन्हा येतच नाही...😁 कारण नाकावर मोठा राग...😜

आता तिचा पारा चढलाय...
आता आगीत हात घालने बरोबर नाही त्यासाठी उसाचा थंड रस पिवुन डोक शांत केलेल... केव्हाही बरंच परंतु शेवटी बायको रागात असेल तर तुम्ही कितीही थंड प्या हो डोक्याला काय थंड वाटत नाही... काय मंडळी बरोबर ना...!!😜

रस वगैरे पिऊन मस्त तिची मैत्रीण आणि मी आणि आमचं छोटसं बाळ... बाहेर निघालो तिची मैत्रीण आणि माझं बाळ.. पुढे गेले आणि मी बिल पेमेंट करण्यासाठी थांबलो..
आता काय सांगू तुम्हाला.... बायको सोबत असल्यावर नवऱ्याच्या खिशात पैसे असता का...? सर्व पैसे तिच्या पर्समध्ये‌..😜😜

डोक्याला मोठा ताप.🤦‍♂️ आता ही देते की नाही पैसे, तोच मोठा संताप...

पण माझी रितु लईच भारी राव.... आधीच पेमेंट पेड करून गेली होती...
रागात असू द्या हो.. प्रत्येक वेळेला कसं वागायचं ते तिला कळतं हेच मला आवडतं😘😘😘

"लय लय लय भारी वाटलं.
आणि
भांडे घासण्यापासून वाचलं...."😜😜

तरी सुद्धा असे किस्सै होऊ नये म्हणून बायको रागात असेल आणि तिच्याकडे सर्व पैसे असले... तर त्यासाठीच बँकांनी नवर्या लोकांसाठी फोन पे, भीम, या ॲप बनवल्या... पण राव ऐका... तरीसुद्धा आजच्या बायका लय हुशार☹️..... अरे😳... जॉईन खात्यात पेमेंट टाकायला लावतात... म्हणजे इथं फोन पे आणि या ॲपचा विषय संपला... आमच्या भावाने बनवलेला या पर्यायावर या बायका लोकांनी पाणीच फिरवलं..... असो आता काय सांगा.... तेवढं जेवण मिळतं ते तरी बर आहे बाबा.... नशीब 😜😜

आता इला मनवायचं कसं हाच लय मोठा प्रश्न होता... लगेच टूप पेटली आणि माझ्या मनाला बरं वाटलं... 🤩

त्यात जाता जाता तिची मैत्रीण बोलून गेली.... वो पाहुण नेक्स्ट टाईम सुद्धा आपण इथे येऊ. आणि इथला उसाचा रस पेवु... मला खूप आवडला..🤗

हे ऐकताच.... रितूने मानीला झटका देत पुढची केस मागे फेकले आणि तोंड विरुद्ध दिशेला केल...

आता तर ती अजून संतापली...😠

आता तिला अजूनच मोठा संताप आला... तरी माझी पेटलेली टुप ची कमाल दाखवत..मि विनाकारण मोबाईल काढला आणि कानाला लावला...😜

अरे सचिन काय म्हणी रायना रे...? कशीकाय आठवन उनी रे तुले आजले...?
अरे अस काय म्हणतो...!!
तुझ्या बायकोला स्वयंपाक निट करता येत नाही का..? अरेरे चवच नाही लागत का खायला....?

अरे सचिन.... तुला काय सांगायचं तुझी वहिनी ना असलं भारी जेवण बनवते ना तुला कसं सांगु..?
अरे मी माझे बोट सुद्धा चाटून पुसून खातो... एवढी चव आहे तिच्या हाताला.. तू एकदा येच आपल्या घरी आणि वहिणीच्या हातचं जेवण खाऊन बघ.. आणि येताना माझ्या वहिणीला घेऊन ये, म्हणजे रीतु तिला शिकवेल तरी जेवणाचं कसं बनवायचं ते तुझ्या बायकोला.

आणि ऐक ना... माझ्या सासूने ( मामि ) तिला खूप छान स्वयंपाक शिकवला आहे आणि आता सुद्धा शिकवत आहे...... लाडाची बायको लय भारी यार माझी..😘

मी असं बोलन खुप मोठ मोठ्यान बोलत होतो. आणि तिने हे ऐकल...😜 अशी खुश झाली ना राव... तिच्याजवळ गेल्यावर एवढ्या ओपन स्पेस मध्ये तिने माझ्या गालावर किसच केली... तेव्हा कुठे जीवात जीव आला बाबा, तेव्हा कुठे जीवात जीव आला...😜

आता तुम्हाला काय सांगू.. तरी सांगतो ऐका...!!
एखादी लेडीज दुसऱ्या लेडीजला शिकवते ना तेव्हा तिला अस वाटते मीच काय...😜😜 वाटतं ना ..?? खरं खरं बोला... लाजू नका, लाजू नका....🤣🤣..

आता काय...
बसलो माझ्या लाडक्या गाडीवर ..
माझ्या लाडक्या रितू बायकोला घेऊन....🤣🤣...

ती जाम खुश ... आणि मी तर जामच खुश...😜
घरी पोहोचल्यावर गाडी वगैरे पार्किंगला लावली.. आणि तिच्याकडून घराची चावी घेऊन तिला बोललो.. आज ना माझ्या बायकोला कुलूप उघडायच सुद्धा काम करू देणार नाही... सर्व काम हा तुझा लाडका नवरा करेल रितू डार्लिंग...🤩😍😍😍 मस्तपैकी कुलूप उघडून घरात गेलो... झाडू वगैरे हातात घेतला आणि झाडायला सुरुवात केली... मी वाटच बघत होतो कि.... हि केव्हा मला म्हणेल "अहो राहू द्या हो तुम्ही" मी झाडेल ना..😜

पण तसं काही झालं नाही... शेवटी झाडाव लागला बाबा घर....☹️. आता बोललो होतोच कुलूप उघडायचं सुद्धा काम करू देणार नाही... असो झाडाव लागत कधी कधी...
तुम्ही सांगा रे दादांनो कोण कोण झाडत घर.... नाहीतर नाव पोस्ट करेल गुपचूप सांगायचं कळलं ना...🤣🤣😜.

आता घर वगैरे झाडुन झालं आणि बेडवर जाऊन निपचित पडलो.. आणि मोबाईल वर बघत राहिलो तेवढ्यात सासूचा (मामि )फोन आला..
एकदा आला रिसीव्ह नाही केला...
दुसऱ्यांदा आला रिसीव्ह नाही केला...😜

सासुबाई वैतागल्या आणि लँड लाइन्ड वर कॉल केला... आणि रितुने रिसीव्ह केला.
अगं रितु जावईबापू कुठे गेलेत ग...? फोन रिसीव्ह करत नाहीत ते...
रितूने माझ्या हातात मोबाईल बघितला आणि डोळे मोठे मोठेच केले..
आणि तिच्या आईला बोलत....
अग आई... मोबाईल इथं पडलेला आहे आणि आमचं बाळ मोबाईलवर खेळत आहे. आणि मला असं वाटतं मोबाईल सायलेंटवर आहे म्हणून रिसीव नाही झाला... त्यांचं बोलणं वगैरे सुरू होतं...

मनात विचार आला... "काय पन असो राव बायको आपली बाजू पकडते" तिच अस ऐकूण खुपच छान वाटलं..😍😍 मनातल्या मनात...love you च रितू....😍😘

पण तिचे मोठे मोठे डोळे बघून आणि तिने धारण केलेला कालिंका देवीचा अवतार बघून जीवच घाबरला तिने फोन ठेवला न जावुच द्या तुम्ही .......😜😜



शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव
क्रमश: