Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - - Part 5 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ५

Featured Books
Categories
Share

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ५

राज्याभिषेक सोहळ्याला जो खर्च झाला होता.तो जवळजवळ एक कोटी होन इतका होता. एक कोटी होनचे सध्याचे भारतीय रुपयात चलन म्हणजे एकहजार साडेआठशे कोटी रुपये. त्यामध्ये सगळा खर्च आला. अगदी संभाजीराजांनी कलावंतीणीना दिलेली देणगी सुध्दा धरली गेली होती.
संभाजीराजांना कलावंतीनीचे नृत्य पहाण्याचा नाद जडला होता. त्या कलावंतीणींला संभाजी राजे राज्याभिषेकाच्या वेळी विसरले नाहीत. त्यांनी त्यांना बिदागी देऊन त्यांची योग्य प्रकारे रवानगी केली. राजे एक कोटी होन खर्चाबद्दल विचार करून एक दिवस सर्वांना म्हणाले .

दिलेरखान औरंगजेबाचा खजिना घेऊन चाललेला आहे. त्या खजिना मध्ये एक कोटी होन पेक्षा जास्त रक्कम आहे. घोडे आहेत सोने-चांदी आहे. ते जर आपण स्वराज्यात आणले तर आपला राज्याभिषेकाचा खर्च भरून निघेल . लगोलग या मोहिमेवर त्यांनी विचार करून शेवटी एक कोटीहून औरंगजेबाचा खजिना लूट करून स्वराज्यात आणला. यावरून शिवाजी महाराजांची जमाखर्चाबाबतची भूमिका आणि दक्षता दिसून येते. शिवराज्याभिषेक सोहळा केला होता त्याबद्दल आता त्यांना जराही आता खर्च आला नव्हता कारण एक कोटी होनाची भरपाई आता झाली होती.

शिवाजी राजांनी राज्याभिषेकानंतर होन या चलनाची निर्मिती केली होती आणि एक होन नाणे म्हणजे अडीच ग्रॅम सोने. म्हणजे होन नाणे सोन्याच्या चलनात होते. सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच राहते. त्यामुळे होनाची किंमत सतत वाढत राहणार. याचा विचार राजांनी केला होता.

एक प्रकारे आताच्या अमेरिकन डॉलरला तोडीस तोड असे हे होनाचे चलन होते. अमेरिकन डॉलर प्रमाणेच होनाची किंमत सुद्धा जास्त होती. त्याबाबत शिवाजीराजांची दूरदृष्टी किती दूरवर होती. याची चुणूक मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी इंग्रज अधिकारी सुद्धा हजर होते. इंग्रज वकीलाने राजांना नजराणा म्हणून एक अंगठी दिली होती. तलवारी दिल्या होत्या. मोतीसुद्धा दिले होते. त्यातलीच एक अंगठी शिवाजी महाराज वापरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा मध्ये जो इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्या इंग्रज वकीला सोबत त्याचा दुभाषा नारायण शेणवी होता.तो इंग्रज वकील एक प्रकारे इंग्लंडच्या राणीचा गुप्तहेर होता. राजांची श्रीमंती बघून त्याची मती गुंग झाली असणारच. त्याने त्या श्रीमंतीचा अहवाल लगोलग इंग्लंडमध्ये त्याच्या राणीला पाठवला असणारच.
इंग्रज भारतामध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करीत होते. राजे इंग्रजांची ही चाल चांगलेच ओळखून होते. आपल्या दरबारात आलेला इंग्रज अधिकारी हा पाहूणा नसून गुप्तहेर आहे. त्याची भिरभिरती नजर काय शोधते आहे. राजांनी हे चाणाक्षपणे ओळखले होते... तो कुठची खबर काढण्यासाठी आलाय.
कशासाठी आला आहे .याची सुद्धा त्यांनी पारख केली होती.

राज्याभिषेकाच्या वेळी देवीचा गोंधळ घालण्यात आला.

उदे ग अंबे उदे ..उदे ग अंबे उदे...
उदे उदे उदे...

त्यानंतर भारुड. कीर्तन प्रवचन सुद्धा झाले. सर्वात शेवटी भजन झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या कला असणाऱ्या लोकांना तिथे संधी दिली गेली. त्याचप्रकारे त्यांना मानवस्त्रे आणि दक्षिणा व देणगी सुद्धा दिली. त्यांच्या बिदाग्या पूर्ण करण्यात आल्या. सर्वत्र आनंदी वातावरण होते. राज्याभिषेकाचा उत्सव सोहळा दिमाखात पार पडत होता.
६ जून सोळाशे १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला .त्यावेळी त्या दिवसापासून शिवाजीराजांनी नवीन कालगणना सुरु केली आणि नवा शिवराज्याभिषेक शक सुरू केला..
ते ऐकून औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यापुढे सर्वांनी शिवाजी महाराजांना राजे म्हणायला सुरुवात केली होती. शिवाजीराजे आता जनतेचे पोशिंदे झाले होते त्यामुळे ते आपल्याला वरचढ ठरतील या भीतीने त्याने शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजराणा पाठवला नव्हता. उलट तो शिवाजीमहाराजांवर जास्तच चिडला होता.

राज्याभिषेकाच्या वेळी गागाभटांच्या आदेशाप्रमाणे छत्रपती बनलेल्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या पत्नीशी लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले होते. हीच प्रथा हल्ली काही वेळा आपल्याला पाहायला मिळते मात्र ती गोष्ट शिवाजीराजांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी केली होती.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या निमित्ताने अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या पुढे नंतर महाराष्ट्रामधील प्रथा म्हणून पुढे आल्या. त्याप्रमाणे लोक वागू लागलीत. एक समाज सुधारक या भूमिकेत शिवाजी महाराज शिरले होते. अनेक चांगल्या प्रथा, चालीरीती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाचे वेळी निर्माण केल्या गेल्या होत्या. त्यानंतर जपल्या सुद्धा गेल्या होत्या. अर्थात त्याचा फायदा नंतर पुढील जनतेला झाला.

शिवराज्याभिषेकाचा सोहळा आटोपला. गडावरचे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. शेवटच्या दिवशी गडावर समर्थ रामदास स्वामी आले . महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांना आनंद झाला. समर्थांचे दर्शन घडलं. राज्याभिषेकाच्या दगदगी मध्ये आईसाहेबांची प्रकृती बिघडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा करून राजांनी आईचे ऋण फेडले होते. रात्री आई साहेबांची प्रकृती आणखीनच बिघडली. रामदास स्वामींचे दर्शन घेऊन आईसाहेब शांतपणे पहूडल्या. त्याच रात्री आईसाहेबांनी या जगातून महाराजांचा निरोप घेतला. गडावर दुःखाची छाया पसरली. शिवाजी राजांच्या शोक तर अनावर झाला .त्यांच्या मनाचे बांध फुटले होत. त्यांना पोरकेपण झाले होते. संभाजीराजे सुद्धा ओक्साबोक्सी रडत होते. सोबत राजाराम राजे सुद्धा रडत होते.

रामदास स्वामी गडावर येताच हे कसं काय घडलं. अशी चर्चा तिथे उमटली . रामदास स्वामींचे दर्शन शुभ की अशुभ याबाबत तिथे खल झाला. मात्र राजांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते दुःखामध्ये बुडून गेले होते. मां साहेबांच्या आठवणीने राजांचे दुःख वाढले होते. त्यांचे अंतःकरण जड झाले होते. त्यांच्या मुखातून हुंदका फुटत होता. मात्र हळूहळू राजे सावरले आणि स्वराज्याच्या कार्यात पुन्हा सक्रिय झाले.... जिजाबाईंचा मृत्यू श्वास लागून झाला होता. त्यावेळी रात्रीची वेळ होती. आताच्या सारखे उपचार त्या काळी नव्हते. जर असते तर त्या रात्री जिजाबाई निश्चित वाचल्या असत्या. आता प्रमाणे ऑक्सिजन लावता आला असता तर... परंतु त्याकाळी रुग्णांसाठी ऑक्सिजनचा उपचार नव्हता. महाराजांच्या डोळ्यात दुखाश्रू साचले होते. गडावरच्या सर्वानाच जिजाबाईंचे असे एकाएकी जाणे. मनाला चटका लावून गेले होते...

छत्रपती शिवाजी महाराजांनी मदारी मेहतरला 32 मण सोन्याच्या सिंहासनाची व्यवस्था करण्यासाठी नेमले होते. त्यावेळी मदारी मेहतर सद्गदीत झाला. त्याला प्रेमाने जवळ घेऊन छत्रपती राजे म्हणाले.
मदारी तुझ्यामुळेच आज आम्ही सुवर्ण सिंहासनावर बसू शकलो .कारण तु नसतास तर दिल्लीतल्या आग्र्याच्या बंदिवासातून मी सुटलो नसतो... त्याचीच ही परतफेड .... हा सन्मान तु मोठ्या मनाने स्वीकार... शिवाजीराजांचे बोलणे ऐकून मदारी मेहतरच्या अंगावर मूठभर मांस चढले. त्याने शिवाजी महाराजांची विनंती मान्य केली...

शिवाजीराजांनी आपल्याजवळील लोकांची वतनदारी बंद केली. त्याबदल्यात पगारदारी चालू केली. राजांच्या सेवेत असलेले अधिकारी ,कर्मचारी आता वतनदार नव्हते तर पगारदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्या नंतर ' होन ' हे चलन वापरात आणले. त्याच होन चलना मार्फत त्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील म्हणजेच अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांना कोटी कोटी रुपये पगार दिले वार्षिक... म्हणजे अनेकांना तर आठ - आठ कोटी पगार होता. वार्षिक. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री मंडळाच्या निर्णयाने व सल्ल्याने राज्याचा कारभार चालवायचा. याची मुहूर्तमेढ घातली. मात्र हीच गोष्ट शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांना खटकत होती. कारण संभाजीराजांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय होती.

मंत्रीमंडळ त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास आडकाठी निर्माण करत होती. असा समज संभाजी राजेंना होता. त्यांचे आणि मंत्रिमंडळाचे अनेकदा खटके उडत. संभाजीमहाराज मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करत नाही. म्हणून अष्टप्रधान मंडळातील राजाराम महाराजांच्या बाजूचे मंत्री संभाजीराजांवर नाराज होते. ही गोष्ट संभाजी राजांसाठी पुढे खूपच घातक ठरली. संभाजी राजांना शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्याभिषेक न करता त्यांचे भाऊ राजाराम महाराज यांना राज्याभिषेक केला गेला. त्यामुळे स्वराज्याच्या राजगादी मध्ये ठिणगी पडली. यामध्ये दोन गटांची भर पडली होती .एक संभाजी राजांचा गट आणि दुसरा छत्रपती राजाराम महाराजांचा गट. असे दोन गट शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या वारसामध्ये निर्माण झाले होते. नंतर नंतर हे भांडण खूपच विकोपास गेले. जे मंत्री शिवाजी महाराजांच्या वेळी शिवाजी महाराजांसाठी जिवाचे रान करायला तयार होते .तेच मंत्री आता घरगुती राजकारण करू लागले.घरगुती राजकारणामुळे, मंत्रिमंडळातील राजकारणी मंडळींच्या स्वार्थ बाजीमुळे स्वराज्याची एकसंध फळी दुभंगली. ती कायम दुभंगलीच...

स्वराज्यातील मावळ्यांचा गनिमी कावा त्या वेळी खूपच नावारूपास आला होता.गनिमी कावा याचा अर्थ गुप्तकट किंवा शत्रूला फसवून ,बेसावध करून त्याचा धुव्वा उडवणे. आपल्याला अनुकूल पूरस्थिती निर्माण करून शत्रूला त्या परिस्थिती पर्यंत आणून नंतर शत्रूची दाणादाण उडवायची. असा या गनिमीकावा पद्धतीची एक पद्धत होती. गनिमी काव्याचे अनेक प्रकार होते आणि पद्धतीसुद्धा होत्या. प्रसंगानुरुप आणि परिस्थिती अनुरुप भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन आयत्या वेळी कोणती गनिमीकावा पद्धती युद्धासाठी वापरायची याचा निर्णय घेऊन त्या प्रकारे गनिमी कावे करणारे मावळे किंवा सैनिक त्याचा वापर करीत आणि विजय प्राप्त करीत... यासाठी गनिमी काव्याचे प्रशिक्षण देणारी संस्था शिवाजी महाराजांकडे होती. त्याच्याच सहाय्याने शिवाजी महाराज नवनवीन गनिमी काव्याचे अनोखे शिक्षण आणि प्रशिक्षण तरुणांना देत.

यामध्ये जे तरुण गनिमी काव्याचे शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असत त्यांच्या याद्या तयार केल्या जायच्या. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र दिलेली आहेत यांची सुद्धा माहिती गनिमी काव्याच्या प्रशिक्षण वर्गामध्ये ठेवलेली असायची. ती माहिती खूपच अद्यावत असायची... शिवाजी महाराज अनेकदा स्वतःहून अशा तरुणांना त्या प्रमाणे बोलून शिक्षण देऊन आणि प्रशिक्षणाच्या वेळी अनेक बारकावे व विविध गोष्टी सांगून त्यांचे समुपदेशन करीत असत. आज कालच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये शेवटच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी ज्या प्रमाणे प्रशिक्षण संपल्यावर शुभेच्छा द्यायला अथवा त्यांचे कौतुक करायला जसे नामवंत लोकं प्रक्षिक्षण गृहात येतात. त्या प्रकारे शिवाजी महाराज नवीन तयार होणाऱ्या मावळ्यांवर दुरून लक्ष ठेवून होते. त्यांची पारखी नजर नवीन प्रशिक्षण घेतलेल्या मावळ्यांना हेरून ठेवायची. नंतर वेगवेगळ्या लढाईच्या वेळी त्यांचा उपयोग कुठे कसा करायचा हे ठरवून ठेवायचे. तशी सूचना ते जुन्याजाणत्या मावळ्यांना देऊन ठेवत.

अत्यंत कमी सैनिक बळावर गनिमी कावा पद्धती वापरणे खूपच फायद्याचे ठरते. त्यासाठी महाराष्ट्रातील निसर्ग फारच अनुकूल होता. गनिमीकावा पद्धतीत कमी सैनिक असताना .तिथे भरपूर सैनिक आहेत असा शत्रू पक्षाला भास निर्माण करून द्यायचा किंवा खूपच कमी सैनिकांची संख्या दाखवून शत्रूला गाफील ठेवायचे. आजूबाजूला असलेल्या जागेत अधिकचे गनीमी काव्याने युद्ध करणारे व गनिमी शस्त्रे वापरणारे मावळे किंवा सैनिक लपवून ठेवायचे .

योग्य वेळ येताच त्यांच्या साह्याने शत्रूवर तुटून पडायचे अशी पद्धत गनिमी काव्याच्या आधारे त्या काळी प्रचलित होती . त्यात शिवाजी महाराजांची गनिमी कावा पद्धती खूपच निर्दोष आणि आधुनिक होती. ती खूपच सोपी होती. भरवशाची होती .त्यांचे मावळे खूप वेगाने शत्रूवर हल्ला करायचे आणि त्याच वेगाने सुरक्षित स्थळी जाऊन थांबायचे. जगात अशा अनेक गनिमी पद्धती वेगवेगळ्या राष्ट्रात त्यावेळी अस्तित्वात होत्या.


शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दोन हजार सैनिक स्वराज्यासाठी दिले होते. या दोन हजार सैनिकांच्या बळावर राजांनी स्वराज्याची घोडदौड सुरू केली . स्वतःची अशी माणसे त्याला जोडली. स्वतःचे मावळे त्यामध्ये मोठ्या हुद्यावर नेमले. शिवाजी महाराजांचा वडीलांवर आणि शहाजी महाराजांचा शिवाजी महाराजांवर खूप विश्वास होता आणि प्रेम सुद्धा होते. धन्य धन्य ते पितापुत्राचे प्रेम ....

ज्या शहाजी राजांनी त दोन हजार सैनिक दिले होते. त्या सैनिकांची संख्या राजांनी हळूहळू एक लाख लष्कर अशी वाढवली आणि ती वाढतच राहिली. शिवाजीराजे हे प्रतिहल्ला करणारे राजे होते. त्यांनी मावळ्यांमध्ये स्वराज्याची शिकवण देऊन राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी निर्माण केली.

शिस्तबंद लष्कर , सुसंघटित यंत्रणेच्या बळावर राजांनी सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले होते. त्यांच्या लष्कराच्या हालचाली अत्यंत वेगवान होत्या . आश्चर्यजनक प्रकारे त्यांचे मावळे गनिमीकावा करून शत्रूला चकवून पुन्हा सुरक्षित जागी परत जात होते.

राजांनी स्वराज्याच्या राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर सुरू केला. जे फारशी शब्द होते ते टाळून त्यांच्या जागी मराठी शब्द वापरण्याची सुरुवात केली . इतरांना सुद्धा तशाच प्रकारची शिकवणी त्यांनी दिली. भाषा सुधारणा करायला शिवाजीराजांनी कडक आदेश दिले. त्यासाठी राज्यव्यवहार कोश करण्याची सुद्धा सूचना दिली . त्याप्रमाणे अष्टप्रधान मंडळ आणि पंडित यांनी त्यामध्ये लक्ष घालावं असं राजांनी सुचवलं होतं. त्याप्रमाणे सर्वजण कामाला लागले होते. आता थोड्याच दिवसात भाषा सुधारणा होणारच होती. परदेशी शब्द मराठी भाषेतून बाहेर पडणार होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम शिक्षक, प्रशिक्षक होते हे वेळोवेळी सिद्ध होते...

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या झेंड्यासाठी लाल रंगाची निवड केली नाही .तर भगवा रंग त्यासाठी त्यांनी निवडला. याचा अर्थ शिवाजी महाराजांना रंगांचे विविध ज्ञान होते. कोणता रंग कशासाठी वापरला जातो याची त्यांना निश्चितच उत्तम प्रकारे माहिती असावी.
ते रंगपारखी होते.
रत्नपारखी होते.
शिवाजी महाराज रंग पारखी होते.
हे शिक्षकी पेशाला निश्चित भूषणावह होते. एक शिक्षक चांगले रंग ओळखू शकतो.
तो साधा शिक्षक असला तरी अथवा चित्रकार शिक्षक असला तरी.
किंवा शिल्पकार शिक्षक असला तरी...
शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षक हा पेशा नव्हता. तर तो शिक्षकी धर्म होता. शिक्षकांचा धर्म. स्वराज्य रक्षक शिवाजी महाराजांचे बुध्दी मिश्रण शिक्षकी धर्मात दिसत होते.

देवळामध्ये लाल रंगाची फुले वाहिली जातात.
पांढऱ्या रंगाची फुले वाहिली जातात.
पिवळ्या रंगाची फुले वाली जातात .
शिवाजी महाराजांचे आजोबा
शिवाजी महाराजांची आजी.
लाल रंगाची व विविध रंगाची वस्त्रे वापरत होती. शिवाजी महाराजांच्या सणासुदीचे कपडे सुद्धा छान रंगाचे आणि वेगळ्या रंगाचे होते. महालात वावरणाऱ्या स्त्रिया विविध रंगाच्या साड्या आणि लुगडी वापरत होत्या .
त्यामध्ये गुलाबी रंग .
हिरवा साडीचा रंग सुद्धा होता.
अनेकजण फेटा गुलाबी रंगाचा वापरत.
शहाजीराजांनी खास दहा माणसे शिवाजीराजांच्या मदतीसाठी पाठवली होती. त्यामध्ये एक माणूस होता माणकोजी दहातोंडे... त्या नावावरून शिवाजी महाराज शहाजीराजांना नेहमी विनोदाने म्हणत की आबा तुम्ही मला दहा माणसं दिलीत्. परंतु ती दहा संख्या माझ्या लक्षात राहावी म्हणून तुम्ही दहातोंडे आडनावाचा सुद्धा एक सरदार मला दिलात.
यावर शहाजीराजे आणि शिवाजी महाराजे आणि दहातोंडे नावाचा सरदार सुद्धा दिलखुलास हसे. माणकोजी दहातोंडे शहाजीराजां सोबत वावरलेला होता. शहाजीराजे कोणते निशाण वापरतात. हे त्याला माहीती होतं.

शिवाजी महाराजांनी भगवा रंग वापरला . शहाजी राजांनी दोन वेळा स्वराज्य स्थापनेचा असफल प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्याकडे निशान होतं भगवा... तेच निशान शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतले.
भगवा रंग किंवा शेंद्री रंग आहे तो जास्त प्रसिद्ध आहे कारण शेंदूर हनुमानाला सुद्धा जास्त प्रिय आहे . हनुमान म्हणजे महाशक्तीचे प्रतीक .
त्यामध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणी रामकृष्णांच्या कथा सांगितल्या. त्या मध्ये सुद्धा रामभक्त हनुमानाला शेद्रि रंग म्हणजे भगवा रंग प्रिय आहे हे त्याला दिसून आले. भगव्या रंगाचे निशाण शिवाजी महाराजांच्या हाती त्यांच्या वडिलांनी दिले होते शहाजीराजांनी...

मुसलमानांच्या झेंड्याचा रंग हिरवा होता. त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळे सरदार वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेऊन किंवा निशाण घेऊन लढाईला जात असत.मात्र स्वराज्याच्या झेंड्याचा रंग भगवा होता जो शिवाजी महाराजांनी निवडला होता.
भगवे निशाण...
भगवे वस्त्र...
भगवी फुले...
भगवा गंध ...
अशा गोष्टीमधून स्वराज्यासाठी भगव्या रंगाची निवड करण्यात आली होती.

भारताच्या तिरंग्याचा रंग केसरी आहे. परंतु स्वातंत्र्याच्या काळात तिरंग्यातील रंग हा केशरी नव्हता. केशरी रंगाच्या स्थानी भगवा रंग होता.
मात्र त्यावर संशोधन होऊन त्या वेळच्या नेत्यांनी चर्चेअंती भगव्या रंगाच्या जागी केशरी रंग घेतला . नंतर केशरी रंग भारताच्या झेंडा तिरंग्यावर विराजमान झाला. त्याला कदाचित प्रादेशिक विचार कारणीभूत असावेत केशरी रंग मानणारे त्या वेळी देशाच्या राजकारणात जास्त होते .त्यामुळे भगवा रंग जाऊन त्या ठिकाणी केशरी रंग भरला गेला होता. असे असले तरी तिरंगाची शान कमी झाली नव्हती.
भगवा रंग हा सर्व मंदिरात व अध्यात्मिक आश्रमात लावला जातो .साधुसंत यावेळी भगव्या रंगाचे निशाण वापरत होते .

यात्रेला, जत्रेला जाताना वारकरी खांद्यावर भगव्या रंगाचा झेंडा घेत होते. श्रीकृष्ण आणि अर्जुन सुद्धा भगव्या रंगाचा झेंडा त्यांच्या रथावर लावत होते. उगवत्या सूर्याचा रंग सुद्धा भगवा आहे . बौध्द भिक्षुक भगवा रंग वापरत असत. भगवा रंग म्हणजे एक प्रतिक आहे .
तो रंग ..
.त्याग
बलिदान....
ज्ञान...
सेवेचे प्रतीक आहे .
यासाठी शिवाजी महाराजांनी भगवा रंग आपल्या स्वराज्याच्या झेंड्यासाठी निवडला होता. त्यामागे त्यांचा किती मोठा वैचारिक दृष्टिकोन होता. हे दिसून येते .असा वैचारिक दृष्टिकोन शिक्षकाच्या मुशीतून तयार झालेल्या प्रशिक्षक राजाकडे असू शकतो. बोलताना सुद्धा माझा महाराष्ट्र मी पूर्णपणे भगवा करीन असे बोलल्यामुळे त्या ठिकाणी एक वेगळेच वातावरण तयार होते. स्वराज्य भगवती शिकवण्यासाठी शिवाजी महाराज अनेक युक्त्या करीत होते. त्याप्रमाणे ते त्यांच्या सहकार्‍यांच्या मनावर बिंबवत होते .त्यांना शिकवत होती.
शिकवतो तोच जो खरा शिक्षक असतो. वेळोवेळी शिवाजी महाराजांचे शिक्षकी गुण दिसून येतात.
भगव्या रंगाचे निशाण किंवा झेंडा दूरवरुन घोडे स्वारांना दिसत असे. गडाच्या उंचावर लावलेला भगवा ध्वज गडाच्या पायथ्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांना भरपूर स्फूर्ती देत होता. गडावरती झेंडा लावलेला आहे .त्या झेंड्याच्या रक्षणासाठीच आपण लढतो आहे अशी भावना त्यांच्या जागी होत असे.
शत्रूच्या तावडीतून निसटून सुरक्षित स्थळी यायचे झाल्यास किल्ल्याला लावलेल्या भगव्या झेंड्या यावरून त्यांना अंदाज घ्यायचा . जवळचा कुठचा किल्ला आहे . कितीवेळा मध्ये आपण त्या किल्ल्यामध्ये सुरक्षितपणे पोहोचू शकतो. असाही एक उपयोग भगव्या झेंड्याचा होत असे. खरं म्हणजे भगवा झेंडा दूरवरून स्पष्ट दिसत असायचा...

बोलतानासुद्धा माझा महाराष्ट्र मी पूर्णपणे भगवा करीन बोलल्यामुळे त्या ठिकाणी वेगळा भाव तयार व्हायच्या. .. जर लाल झेंडा भगव्याच्या ठिकाणी असता तर मी माझा महाराष्ट्र पूर्णपणे लाल रंगाचे करीन .असे म्हटले गेले तर ते ऐकायला विचित्र वाटते.

लाल रंग हा रक्ताचा आहे. त्यामुळे त्यातून वेगळा संदेश जाऊ शकतो. ऐवढे रंगसंगतीचे ज्ञान शिवाजी महाराजांना उत्तम प्रकारे अवगत होते....

शिवाजी महाराजांनी त्यांच्या झेंड्यासाठी भगवा रंग निवडला...
त्यांना भगव्या रंगाचे आकर्षण कसं काय निर्माण झालं.
भगव्या रंगांमध्ये तेजस्विता आहे. भगवा रंग सरसकट सर्व लोक परिधान करत नाहीत .स्त्रीयाही भगव्या रंगाच्या साड्या सहसा घालत नाहीत. पुरुष सुद्धा जास्त भगव्या रंगाचे कपडे व्यवहारात वापरत नाहीत. भगवा रंग कोणालाही शोभून आणि उठून दिसतो. भगवा रंग एक वेगळाच रंग आहे. असा त्याचा अर्थ होतो . त्याचा अपमान सतत होत नाही. यासाठी शिवाजी महाराजांनी भगवा रंग निवडला असावा...

जर निरीक्षण बुद्धी शाबूत असेल तर पाहणाऱ्याच्या असे लक्षात येईल की पायाखाली लाल रंग आल्यावर काही वाटत नाही. परंतु भगवा रंग पायाखाली आला तर लोकं त्याच्यावर पाय ठेवत नाहीत. श्रद्धापूर्वक बाजूला सरकतात.

सध्याच्या काळात पाहिले तर असे दिसून येईल. तीन चाकी, चार चाकी, दुचाकी वाहने आहेत .इतर गाड्या आहेत. मोठ्या एसटी बसेस आहेत .त्यांचे रंग सहसा भगवे नसतात . क्वचितच एखादी गाडी भगव्या रंगाची दिसते. मात्र भगवा रंग विशिष्ट रंग असल्यामुळे तो धर्माच्या बाबतीत भाग्यशाली आहे .त्यामुळे त्याची निवड शिवाजी महाराजांनी स्वतंत्र स्वराज्यासाठी व झेंड्यासाठी केली असावी. ज्याप्रकारे तिरंगा रंग स्वातंत्र्याचा वाटतो.तसा भगवा रंग सुद्धा निर्भयतेचा आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भगवा रंग सर्व ठिकाणी वापरला जात नाही. लाल रंग वापरला जातो. त्याचप्रमाणे जर कुठे भगव्या रंगाची पट्टी अचानक नजरेला पडली तर ती एकदम उठून दिसते. थोडक्यात भगव्या रंगावर नजर खिळून रहाते.भगवा रंग स्वराज्य अस्मितेचा रंग आहे. राजांना हे पूर्वीपासून ठाऊक असणार . भगवा रंग रहस्यमयी आहे. त्याचे रहस्य म्हणजे तो रंग संमोहनकारक वाटतो. त्या रंगाच्या अधीन जर कुणी गेला तर त्या रंगात रंगून जातो. त्या रंगाचा होऊन जातो. सारा परिसर भगवामय होऊन जातो. पहाणार्‍याला एकदम छान बदल जाणवतो. भगव्या रंगाची लाट लहरत जाते असा पहाणाऱ्याला भास होतो...