Shivaji Maharaj ek uttam shikshak aani pratikshak hote - - Part 7 - Final Part in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ७ - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ७ - अंतिम भाग

शिवाजी महाराज स्वतः औरंगजेबा सोबत लढाई करायला उत्साहीत झाले होते... त्यांनी सर्वांना आदेश दिले. सर्व सरदारांना दक्ष राहायला सांगितले. औरंगजेब दक्षिणेकडे येतो आहे मोठी संधी आहे. औरंगजेबाचा खातमा करून त्याला महाराष्ट्रातच गाडायचा आहे. असा संदेश त्यांनी त्यासोबत पोहोचला होता. मावळ्यांच्या अंगात सुद्धा विरश्री संचारली होती. शिवाजी महाराजांसोबत असलेले मावळे आता वयस्कर झाले होते .त्यासोबत शिवाजी महाराजांचे वय सुद्धा वाढले होते शिवाजी महाराज सुद्धा वयस्कर झाले होते. मात्र त्यांचे लढण्यासाठी मनगट अजूनही शिवशिवत होते....

महाराष्ट्रामध्ये औरंगजेब औरंगाबाद मध्ये तळ ठोकून होता. तो आता दक्षिणेकडे येणार होता. मावळ्यांनी लढाईची तयारी खूप मोठ्या प्रमाणात केली होती. शस्त्रांची जमवाजमव झाली होती. शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे नवीन आणि तरुण मावळ्यांची भरती सुद्धा स्वराज्याच्या सैन्यामध्ये सुरू झाली होती. प्रत्यक्ष औरंगजेबाशी आमने सामने लढाई करून खुद्द औरंगजेबाला गनिमी काव्याचे पाणी पाजायचे होते. जो गनीमी कावा शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता तो गनिमीकावा प्रत्यक्ष याची देही याची डोळा औरंगजेब अनुभव घेणार होता. गनिमी काव्याचे पाणी त्याला पाजायचे होते. शिवाजी राजांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा प्रसाद औरंगजेबाला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या हाताने मिळणार होता. शिवाजी महाराज आणि औरंगजेब दोन्ही युद्धासाठी आतुर झाले होते... औरंगजेब दक्षिणेत येणार.
पण तो तुळजापूर मार्ग येणार याचा शिवाजी महाराजांनी विचार केला होता. तुळजापूर मार्गे कोल्हापूर मार्गे आणि शेवटी राजापुरातून तो येणार होता .त्याच्या मार्गक्रमणाची पुर्ण कुंडली शिवाजी महाराजांनी त्यांच्या गुप्त हेराकडून आणि नजरबाजा कडून काढून घेतली होती... त्याच वेळी मंत्रिमंडळाकडून औरंगजेबाचा कसा खात्मा करायचा याच्या आखण्या सुरू झाली होत्या.
परंतु अनाजींना हाताशी धरून राजाराम महाराजांवर युवराज पदाच्या शिक्का मारण्यासाठी सोयराबाईंची धावपळ चालली होती. राजाराम महाराजांसाठी सोयराबाई युवराज पदासाठी स्वराज्यावर हक्क सांगत होती. त्यासाठी तिने मंत्रिमंडळतल्याच काही मंत्र्याची चाचपणी करून ठेवली.

याबाबत संभाजी महाराज जरी मोठे असले तरी राजाराम महाराजांना युवराज करायचे याबाबत तिला काहीच वाटत नव्हते. दिवसेदिवस सोयराबाई त्याबाबत खूपच महत्वाकांक्षी बनत चालली होती. याचं दुसरं कारण म्हणजे शिवाजी महाराजांची तब्येत.
शिवाजी महाराजांची तब्येत अधून मधून बिघडत होती.सोयराबाई संभाजी महाराजांना गडावर येऊ देत नव्हती . गडावरून खाली मेणा पाठवून पुतळाबाईना वर आणीत नव्हती. पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. शिवाजीराजांना या गोष्टी कळत होत्या. राजांनी ती गोष्ट एक दोन वेळा सोयराबाईंना बोलून सुद्धा दाखवली होती . पण सोयराबाईंनी वेळ मारून नेली होती. हळूहळू गृह कलह वाढू लागला होता. शिवाजी राजांना जे नको होते. तेच उलटपणे घडत होते.

त्यातच औरंगजेब लढाईला दक्षिणेकडे कूच करीत होता. औरंगजेब आणि शिवाजी यांची दुश्मनी खूपच पुरानी होती. त्याच्या हिशोबाची वेळ आता जवळ आली होती. औरंगजेबाचा कायमचा हिशोब आता होणार होता.

शिवाजीराजांच्या प्रशिक्षण केंद्रात .ज्यांनी प्रशिक्षण घेतले होते .ते शिवाजी महाराजा पेक्षा दुप्पट प्रमाणात स्वराज्यरक्षक झाले होते. त्याच प्रमाणे ते तिप्पट कडवे मावळे झाले होते. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये असे अनेक मावळे होते. जे मास्टर मांईडचे काम करायचे. त्यापैकी एक होता. महाराजांचा गुप्तहेर प्रमुख .ज्याच्या हाताखाली तीन हजार गुप्तहेर काम करायचे. तो हिरोजी फर्जद.

हिरोजी फर्जंद हा खतरनाक गुप्तहेर होता. त्याचे प्लान अफलातून असायचे. शत्रूला हुलकावण्या देण्यात तो पटाईत होता आणि शिवाजी महाराजांना सुरक्षित स्थळी नेण्यात तो अव्वल होता. हिरोजी फर्जद कोणाला आपला चेहरा दाखवत नव्हता. त्याला कोण जास्त ओळखत नव्हते. त्याला फक्त शिवाजी महाराजच जास्त ओळखत होते .कोणाच्या बाजूला येऊन तो उभा राहिला कोणत्याही वेशभूषामध्ये तरी तो कुणालाही ओळखू येत नव्हता. मात्र शिवाजी महाराज त्याला चांगले ओळखत असत. याचे कारण तो आपली ओळख लपवून ठेवायचा. फक्त शिवाजी महाराजांना ओळख दाखवायचा.... त्याने बनवलेल्या योजना प्रत्येक वेळी यशस्वी झाल्या होत्या. सुरतेला दोनदा लूट महाराजांनी केली होती. त्या लूटीचा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे हिरोजी फर्जदचा हात होता.
लूटीसाठी जाताना ...
कसे जावे... केव्हा जावे
कधी लूट करावी
याचं ही सगळी खडानखडा माहिती. त्याने शिवाजी महाराजांना देऊन ठेवली होती. शिवाजी महाराजां शिवाय आयुष्यात हिरोजी फर्जंदला फक्त एकाच माणसाने ओळखले होते .तो होता इंग्रजांचा वकील... हा तोच वकील होता .जो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी हजर होता.
कोकणामध्ये राजापूरच्या लूटीला सुद्धा हिरोजी फर्जंदने मूर्त स्वरूप दिले होते. शिवाजी महाराजांच्या आसपास तो कोणत्या न कोणत्या वेषात असायचा. परंतु त्यांच्या मावळ्यांना सुद्धा कळायचे नाही की हिरोजी फर्जंद कोण आहे ,
तो कुठे राहतो,
कुठून येतो ,कुठे जातो,
कसा दिसतो.... इतकी बेमालूम पणे तो त्याची वेशभूषा आणि रंगभूषा करायचा. अनेकांना तो चकवा द्यायचा. हिरोजी फर्जंदच्या अनेक कामगिरीमुळे शिवाजी महाराजांच्या योजना यशस्वी बनल्या होत्या. मोगली सैन्य हिरोजी फर्जदचा चेहरा ओळखण्यासाठी जंग जंग पछाडलत होते .परंतु त्यांच्या हाताला तो एकदाही लागला नाही. त्याची हालचाल खूपच वेगवान होती. त्याच्याकडची शस्त्रे सुद्धा आधुनिक होती.

हिरोजी फर्जद सहसा शस्त्राचा वापर करत नसे. तो चुका सुद्धा सहसा करायचा नाही. इतका तो कट्टर गुप्तहेर होता. त्याचे गुप्तहेतू तो फक्त शिवाजी महाराजांना कोणी नसताना सांगायचा आणि कोणी आले की लगेच गायब व्हायचा. शिवाजी महाराजांच्या महालात तो वेगवेगळी रूपे घेऊन जायचा. कधी भिकारी घेऊन जायचा तर कधी ज्योतिषी बनून जायचा...
छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून सुटका मोठी मदत केली. त्यावेळी शिवाजी महाराज संन्यासी बनले होते. मजल-दरमजल करीत काशी मार्गे ते महाराष्ट्रात परत होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी काशी विश्वेश्वराच्या देवळात स्वतः संन्यासाचा रूप घेतले असताना सुद्धा. काशीच्या देवळातल्या दानपेटी मध्ये चार पाच रत्ने टाकली. ते बघून त्यांना आश्रय देणाऱ्या काशीच्या देवळातल्या पंडिताने त्यांच्यावर संशय घेतला होता. कुणाला जर कळले असते की हा संन्यासी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्या पंडीताच्या जीवाला फारच धोका निर्माण झाला असता... शिवाजी महाराजांना आपली चूक कळली होती. आपण संन्यासाचे रूप घेतले असून एवढी महागडी अनमोल रत्ने त्यांच्याकडे कशी काय.?.. असा प्रश्न त्या पंडिताने केला होता... त्याच क्षणी हिरोजी फर्जदने त्याच्या माहितीनुसार शिवाजीराजांना तिथून निसटण्याचा सल्ला सांगितला. शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जंदचा सल्ला ऐकला ... चार-पाच जणांच्या लवाजम्यासह शिवाजीराजे तिथून निघाले. सुखरूपपणे पुढच्या ठिकाणी मार्गक्रमण करू लागले.

सर्वत्र जगावेगळ्या राजाचा जयजयकार चालला होता. अनेक नवनवीन सुधारणा शिवाजी महाराजांनी जगण्यामध्ये आणि स्वराज्यामध्ये केल्या होत्या. हे बघून निसर्गामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झाले होते. यामध्ये सर्वात पुढे आघाडीवर होता सह्याद्रीचा डोंगर.... त्या डोंगराला ही ठाऊक होते . जेव्हा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा सह्याद्री डोंगराचे नाव सर्वात आधी घेतले जाईल... स्वराज्याच्या कार्य परिसरामध्ये सह्याद्रीला भरपूर महत्त्व दिले जाईल. तिथले पर्वत ,झाडे, भौगोलिक परिस्थिती यांचा पुन्हा पुन्हा उच्चार होत राहील. सह्याद्रीच्या आजूबाजूच्या परिसरामधील डोंगर-दऱ्या, खिंड यांची नोंद इतिहासकार घेतील . इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांमध्ये इथल्या परिसराची माहिती
लिहिली जाईल ,
वाचली जाईल ,
शिकवली जाईल ,
पाहिली जाईल.
स्मरणात ठेवली जाईल
यात अजिबात शंका नव्हती.

कदाचित सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये जिथे मोठी लढाई झाली स्वराज्यासाठी. तिथे तिथे येऊन इतिहास प्रेमी लुटूपुटूची लढाई निर्माण करून घडलेल्या घटनांची तालमी घेऊन. त्या तालमी नुसार त्या घटनांचा बारकाईने अथवा त्या लढाईचा अभ्यास सुद्धा करतील. त्या रोमांचक क्षणाचा आस्वाद घेतील... स्वतः शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शिरून आणि मावळ्यांच्या भूमिकेत शिरून अनेक प्रसंगाचे संशोधन करतील.
हे भविष्यात नक्की घडेल .असा विश्वास सह्याद्रीच्या पर्वताला असावा. म्हणूनच त्या क्षणांची वाट बघत सह्याद्रीच्या पर्वतरांगा आज पर्यंत ताठ मानेने उभ्या आहे... येणाऱ्या, पाहणाऱ्या, लिहिणाऱ्या, शिवप्रेमी, इतिहासप्रेमीं किंवा इतिहासाची नोंद घेणार्‍या दुर्गप्रेमी लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी...

किल्ले प्रेमींसाठी.स्वराज्य प्रेमींसाठी.महाराष्ट्र प्रेमींसाठी

छत्रपती शिवाजी महाराजांचा भोसले वंश
त्यांचे आजोबा मालोजीराव भोसले ,.
शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले ,
स्वतः शिवाजी महाराज भोसले यांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये उत्तरेतील सिसोदिया घराण्यातून आला होता.



लेखकाचे मनोगत:


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहावे असे अनेक वर्षांपासून वाटत होते. परंतु योग येत नव्हता आणि अचानक या विषयावर लिहावे असे वाटू लागले. वरील विषयावर जेव्हा लेखन होऊ लागले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल खूपच प्रेम आहे. ते सुद्धा खूप जुने आहे असे समजू लागले. पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई शिवडीला मी राहत होतो .त्या वस्तीचं नाव न्यू शिवाजीनगर असं होतं. शिवाजीनगर नावाच्या दोन वसाहती होत्या. त्यावेळी एक जुनं शिवाजीनगर आणि दुसरे नवीन शिवाजी नगर असे होते. जुने शिवाजीनगर ही मध्यमवर्गीय लोकांची वस्ती होती आणि नवीन शिवाजीनगर म्हणजे चक्क एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीमध्ये दर वर्षी न चुकता शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जायची. ती जयंती म्हणजे एक मोठा सण होता. मोठा महोत्सव होता.
त्या दिवशी अनेक प्रकारच्या स्पर्धा होत होत्या. पूजा होत होती.महिलांचे हळदी-कुंकू समारंभ व्हायचे. अनेक कार्यक्रम त्या दिवशी होत असल्यामुळे तो एक जीवनक्षण होता असे भासायचे. त्यामुळे लहानपणापासूनच शिवाजी महाराज या नावाचा एक ऋणानुबंध जुळला होता. त्यामुळे अनेक वर्षांची इच्छा या लिखाणाने पूर्ण झाली....

चंद्रकांत पवार ....चंद्रेय...
शिवराज्याभिषेक दिन
१.६.२०२१
टिटवाळा... ठाणे....
९० पाने...