Reshmi Nate - 30 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 30

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

रेशमी नाते - 30




पिहु गॅलरीत फोनवर बोलत बसली होती.....विराट एक नजर बघून फ्रेश होऊन येतो...अजून पिहू फोनवरच बोलत होती तो स्टडी मध्ये जातो.....

विराट जोरात पिहु ला हाक मारतो...पिहु पन थोडक्यात बोलून आत येते अहो किती जोरात हाक मारता....

तुला किती वेळा सांगितले रूम क्लीन करताना समोर थांबत जा हे बघ फाईल कसे ठेवलेत...त्याने सगळ्या फाईल रागात बाहेर काढल्या होत्या....

अहो मी समोरच होते...अणि...ते...ते.....मीच लावले होते...पिहु हळू आवाजात त्याच्या जवळ येत बोलते...

ओह्ह, ग्रेट मस्त काम केले.....मला वाटले फोनवरच बिझी असतेस...त्याने फाईल नीट रॅक मध्ये प्रॉपर गॅप ठेवत लाइन मध्ये ठेवल्या....

पिहु,बारीक डोळे करून रागात त्याने लावलेल्या फ़ाइल ढकलून देते....

पिहु sss,😠 वेड लागलेय,... तो परत लावत बोलतो....ते बुक्स नीट ठेव......(तो टेबलावर नजर टाकत बोलतो).... फक्त सगळीकडे पसारा ठेवायचा आणि फोन आला की तसच सगळे ठेवून तासभर बोलत बसायचे.....


स्वतः तर कधी मोबाईल हातात घेत नाही असे बोलतात....आल की तुमच्या मागे पुढे केल की खुश असता हुहु.....

तुला माहित आहे मला माझ्या कुठल्याही इम्पोर्टेट वस्तूला हात लावलेले आवडत नाही...



तिकडे गेल्यावर कोण येणार नाही तुमच्या वस्तूला हात लावायला...पिहु सगळे बुक्स नीट ठेवून फुगून😣 बाहेर जाऊन बसते.....

विराट एक नजर बघून जे जे महत्वाच्या फाइल्स तो घेऊन जाणार होता ते बॅग मध्ये ठेवतो....

पिहु, तो हाक मारतच बाहेर येतो.....

काय, अजून काय इम्पोर्टेट वस्तू हरवली का....

हो,

अहो, मी फक्त ते काढून लावलेत.....कुठेही नाही ठेवले...पिहु चिडून च बोलते......

विराट तिला मिठीत घेतो...सॉरी 😘😘 तो गालावर किस करत बोलतो....

ती रागाने गाल पुसत बाजूला सरकते...विराट गालात हसत तिला मागून मिठीत घेतो....

हात काढा, मला झोपू द्या....आल की फक्त ओरडायच माहीत आहे......राहिलेत आठ दिवस थोड टाइम पण देता येत नाही......प्रेमाने बोलायच सोडून एकच गजर चालू असतो...हे अस का ते तस का......सारख काय तेच करत जायच का.. तुमच्या सारख परफेक्ट नाहिये जमत ....

किती बोलते गं.....तो तिच्या ओठांना चावतो अहाहा...तिला उचलून घेऊन लाइट ऑफ करतो....😍😍😍

..

.
.
.वीराचा बर्थडे असतो. ....

दादा व्हॉट आर यू गोविंग टू गिव्ह इन गिफ्ट ??...वीरा आल्यापासून कुणकुण करत विराट च्या मागेच फिरत होती....

बच्चा ,यु विल गेट टू नो व्हॉट इट इज विराट हसत तिच नाक ओढत बोलतो....

प्लीज़ ना...वीरा लाडीगोडी लावत बोलते....सगळे हसत होते...

वहिनी डू यू नो? ..पिहु हसत नाही म्हणून मान हलवते....

😒 ह्म्म्म, कोणाला नाही सांगायच ठीक ये...वीरा पाय आपटत फुगून रूम मध्ये जाते.....

रात्री बाराला छोट सेलीब्रेट करतात......सकाळी वीरा ला औक्षण करतात....वीरा पाया पडून आशीर्वाद घेते.....

दादा, सगळ्यांनी गिफ्ट दिले....तू अजून देतोय वीरा चिडचिड करत बोलू लागली......

वीरा, किती घाई असते....सुमन वैतागतच बोलतात...

मॉम, ओरडू नको ना.......बेबी ओन्ली टेन मिनिट्स...विराट हसत वीरा ला जवळ घेत बोलतो ...त्याचा फोन रिंग होतो...तो बाहेर बोलायला गेला.

वीरा, आज नाही येणार गिफ्ट बहुतेक नमन तिला चिवडत बोलतो....

ब्रो sss तू शांत बस ....ती त्याला मारायला त्याच्या मागे पळते.....

बाहेरुन विराट वीरा ला हाक मारतो....सगळे बाहेर येतात.....

न्यू कार बघून वीरा तर जोर जोरात उड्याच मारत होती.....वीरा पळत विराटला जाऊन हग करते...थँक्यू थँक्यू 🤩🤩🤩🤩 विराट हसत तिच्या कपाळावर किस करतो......

विराट कार ची की विराच्या हातात देतो....


ओन्ली वीक मधून टू टाइम भेटणार आहे तुला ड्राइव करायला.....नमन बोलत विराच्या हातून चावी घेत स्वतः जाऊन बसतो....

दादा 😫😫😫😫 माझी कार आणि तोच जाऊन बसला....

माझ्या चॉईस ने घेतली नमन दात काढत बोलतो.....

दादा तो कधी हात पण लाऊन देत नाही.....नमन कार स्टार्ट करतो....

नमन का त्रास देतोय रोहिणी ओरडून बोलते......

नंतर बघ कार ...साईन कर पाहिले ....,विराट मानव कडून फाईल घेत तिला आत घेऊन येतो.....कसले पेपर, विराट .... सुमन मागे येत बोलतात.....त्याने विराच्या नावाने आश्रमसाठी जागा घेतली होती.

नमन रिषभ ने मस्त दोघांनी एक एक राइड मारली....

वहिनी तू चालव ये...नमन पिहुच्या जवळ येत बोलतो....

नमन मला येते...पण भिती वाटते

मी आहे ना.....तू चल तो तिचा हात पकडून बोलतो...पिहूला हि इच्छा होते...तशी होतीच ती कार बघताच क्षणी डोळ्यात भरत होती.....पण भीती ही वाटत होती.....नमन येईल ना...पिहु बोलतच होती. की रोहिणी बोलली....

नमन, अरे तिच्या हातात नको देऊ....तिने कधी चालविली नसेल महागाची कार .....पिहु डोरला हात लावणार च होती...रोहीणीच ऐकून ती मागे सरकली ....

आई, काय बोलते...... नमन ओरडून बोलतो....

मागून विराट , सुमन, वीरा मानव पण बाहेर आले होते....रोहिणी बोलतच होती की विराट ला बघून शांत झाली......मानव ला राग आला होता पण तो बोलू शकत नव्हता.....

तस नाही, रे....तिला येत नाही म्हणते ना ..म्हणून म्हंटले......पहिले नीट शिकू दे मग तिला ही घेऊच नवीन कार हो ना विराट ....

विराट ला खटकली होती पण वीरा चा birthday म्हणून तो स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवत काहीच न बोलता रोहिणी ला इग्नोर करत वीरा बरोबर कार मध्ये बसला.....

वहिनी चल...नमन बोलतो...

पिहु जा बाळा सुमन तिचा चेहरा उतरलेला बघून बोलतात...

नाही राहू द्या मी नंतर जाईल....पिहु वरवर हसत बोलते. ..

वीरा ची घाई चालली होती कधी कार चालवू... विराट ही वीरा बरोबर निघून गेला....तसच तो ऑफिस ला ही जाणार होता.....वीरा नमन परत घरी येणार होते......ते सगळे गेल्यावर पिहू नाराज होऊन रूम मध्ये गेली.....

ताई, मला तुमच हे बिलकुल पटत नाही...अस सारख का बोलता...

सुमन ,अग नवीन गाडी अजून वीराने चालवली पण नाही .मी तिला बघितले पण नाही चालवताना....आणि बस झाल तिची साइड घ्यायची....

सुमन पुढे बोलणार की पिहु ला बघून शांत होतात. ..

रात्री बर्थडे पार्टी आहे तयारी झाली का विचार मॅनेजरला
.आलीशा ला मी सांगितले आहे ...तस.....


तिला का, सुधा आत येत बोलते...

अग, पार्टी वैगेरे छान अरेंज करता येते ना....माझी किटी तिने किती छान अरेंज करून दिली होती....रोहिणी खुश होतच बोलते....सुधा डोळे फिरवत सुमन कडे बघते....

पिहु, प्रांजल येणार आहे ना.....

कन्फर्म नाहिये ,दुपारी सांगते बोलली.....

ह्म्म, तिला सांग आज इकडेच ये....जस आली मुंबईत मानव कडेच जाते.....सुमन तिचा मूड ठीक करण्यासाठी बोलत होत्या....

पिहु हलक हसून हो अशी मान हलवून म्हणते.....

पिहुला कळत होते..महाग गाडी असच कोणी ही द्यायला विचार करेल च ना...आणि तू ही निर्लज्ज सारखी लगेच चालली..तीच डोक उठले होते विचार करून.....राहून राहून मन ही दुखत होते.....

संध्याकाळी सगळे पार्टी साठी तयार होत होते.....पिहु ने ब्लॅक कलरची डिजाइनर नेटची साडी घातली होती....विराट रूम मध्ये येतो....पिहु वर नजर टाकतच तिला मागून हग करत गालावर किस करत आवरायला जातो...पिहू हलक हसत खाली बघून साडी नीट करते.... विराट ने हि ब्लॅक कलर चा सूट घातला ..... त्याने तिला मिठीत घेतले.....तिचा चेहरा सांगत होता....ती हिरमुसली आहे.....आणि कारण तर विराटाला सांगायची गरजच नव्हती.. पिहू यू लूक स्टनिंग

तिला आज हसू पण येत नव्हते....ती शांत त्याच्या छातीवर डोक टेकून थांबली होती.......(तिला कोण काही बोलल की ती शांतच होती...)

निघायच तो तिच्या हनुवटीला पकडून वर करत बोलतो...पिहू मानेनेच हो म्हणते.....

पार्किंग मधून तो त्याची कार घेऊन येतो....पिहू बसणार की तो उतरतो ...तो तिचा हात धरून ड्राइविंग सीट वर बसवतो...

पिहू ब्लँक होत त्याच्या कडे बघते....

आज तू ड्राईव्ह कर तो तिला सीटबेल्ट लावत बोलतो...

ऑहहहह, पिहु चकित होत तोंड उघड करून त्याच्या कडे बघते....तो हसत तिच्या शेजारी जाऊन बसत सीटबेल्ट लावतो....


अहो, मला परफेक्ट येत नाही.....आणि ही कार......ती कार कडे नजर फिरवत बोलते...(त्याच्या कारच्या कलेक्शन मध्ये दोन फेवरेट कार होत्या त्या अजून त्याच्या शिवाय कोणीच ड्राइव केल्या नव्हत्या....ड्राइवर ने ही कधीच हात लावला नव्हता ....त्यात ही कार घेऊन महिनाच झाला होता...)

स्टार्ट पिहू ,तो नीट बसत तिचा पदर नीट करत बोलतो....

न..नको.....तुमची फेवरेट कार आहे.....आणि नवीनच आहे.....पिहू सीटबेल्ट काढत बोलते...विराट परत सीटबेल्ट लावतो...तुझ्या पेक्षा नाही.....तो तिच्या डोळ्यात बघत बोलतो.....

पिहू एकटक त्यालाच बघत होती....डोन्ट स्पाॅईल यूअर मेकअप तिच्या गालावर हात ठेवत बोलतो.....

पिहू मनापासून हसत त्याला हग करते.....आता कुठे तिचा चेहरा खुलला होता.....


पिहू अशी जर अजून माझ्या कूशीत राहशील ना.....पार्टी कॅन्सल करावी लागेल तो मागून तिच्या उघड्या कमरेवर बोट फिरवत रोमांटिक आवाजात बोलतो.

पिहू पटकन त्याला सोडून खाली बघून लाजते.....चेहरा पूर्ण लाल झाला होता....

प्रिन्सेस, निघायच का ...लाजून झाल असेल तर.....

अहो, गाडीला काय झाल तर...

मी आहे ना....तो डोळ्यांनीच तिला धीर देतो....

पिहू दीर्घ श्वास घेत ....स्टेबल होत कार स्टार्ट करते....ती एक नजर विराट कडे बघत टेंशन वाली स्माइल देते....विराट तिच्या केसावरून हलकेच हात फिरवत डोळ्यांनीच दिलासा देतो.
तिला कार ची थोडी फार माहिती देऊन स्टार्ट करायला लागली...पिहू हळूहळू गाडी चालवत गेट च्या बाहेर आणते.....

विराट ने एका हाताने स्टेअरिंग धरले होते.....अहो हात काढू नका...

हो ग....तू पुढे बघून गाडी चालव....

कुठले तरी मोठ काम झाले आहे असे फिलिंग येऊ लागली...तिच्या चेहर्‍यावर मोठी स्माइल येऊ लागली.....ती हळू तिच्या स्पीड ने कार चालवत होती....विराट ही इम्प्रेस झाला,.... येते पण घाबरते तो स्वतःशीच बोलत गालात हसत तिच्या कडे नजर फिरवतो...तिच पूर्ण लक्ष ड्राइविंग वर होते...तेव्हा त्याने हळूच स्टेअरिंगवरुन हात काढला......
.एका शब्दाने ती आज त्याला काही बोलली नाही....तुम्ही का नाही बोलला.....त्याच गोष्टीच त्याला नवल वाटत होते...ह्यात तिचा स्वभाव दिसून येत होता....आज झाले नसणार हे म्हणुन तिने जास्त रिएक्ट केल नाही हे ही विराट च्या लक्षात आले.....

अहो,...तिच्या आवाजाने भानावर येतो.....ह्म्म व्हॉट हप्पन कार का थांबवली.....

पुढे सांगा कुठे जायच.....इतकाच रूट माझ्या लक्षात आहे....पिहू हसत बोलते....

लेफ्ट ला टर्न घे...पिहू तुला रस्ते माहीत नाही तो आठ्या पडतच विचारतो...

तस नाही मला माहीत आहे पण 😕 कन्फ्युज होत.....

तो नाही अशी मान हलवून तिला रस्ता दाखवतो..🤨...

दोघे ही हॉटेल मध्ये येतात....पिहू चा चेहरा खुलला होता...तिने स्वतः कार चालवली...अहो ,मी खूप खूश आहे ईईई,ती एक्साइटेड 😁त्याला बिलगते....पिहूला तर कधी कोणाला सांगू झाले होते.....

विराट तिच्या भोवती हात घेत कपाळावर ओठ टेकवतो.... तिचा मूड त्याने एकदम छान केला होता.....दोघे पार्टी सेक्शन मध्ये आले.....पार्टी चालू झाली होती.....वीरा चे फ्रेंड्स आले होते....जवळचे फॅमिली फ्रेंड्स होते........सगळ्यांचा कल्ला चालू होता.....वीराने छान ब्लॅक कलर चा शॉर्ट वन पीस घातला होता.....दिसायला एका प्रिन्सेस सारखीच दिसत होती.....

मानव प्रांजल ला घेऊन आला..... दी...प्रांजल ने मागून तिला मिठी मारली....
पिहू तिला पुढे घेत तिच्यावर नजर टाकत....प्रांजू एक गंमत सांगायची पिहू डोळे मिचकावत सांगते....

दी....खूप खुश दिसते ....मी मासी तर बनणार आहे का....प्रांजल 😁 एक्साईट होत बोलते....

पिहू शॉक होतच बघते....😳 विचित्र हळू बोल कोण ऐकले तर ती तिच्या दंडाला मारत बोलते...

आहहह,बोल....

मी ना, कार चालवली ते ही मस्त नीट पिहू खुश होत सांगते.....

काय बोलते,जीजूने स्वतः गाडी तुझ्या हातात दिली प्रांजल शॉक लागल्यासारखी बोलते.....

पिहू हसत मान हलवत हो बोलते......

गुड, दी आय अम सो हप्पी प्रांजल पिहू च्या गालावर ओठ टेकवले ....मला पण दाखव....

किती बोलते....जा वीरा ला विश कर....पिहू तिला लक्षात करून देते....प्रांजल जीभ चावत वीरा कडे जाते ....

केक कटिंग होते....थोड्या वेळ थांबून मोठे दुसर्‍या सेक्शन मध्ये त्यांच डिनर एन्जॉय करायला गेले...

लाऊड म्यूजिक, लाऊन सगळे गोंधळ घालत होते.....विराट एक नजर टाकून.....फॅमिली फ्रेंड्स आले होते..त्यांच्या बरोबर डिनर ला जातो.....पिहू चे ही फ्रेंड आले होते......ती त्यांच्यात मशगूल होते.....
नमन प्रांजल शेजारी येतो ......दोघे ही गप्पा मारत होते.....नमन तिच्या समोर हात धरतो....प्रांजल डोळ्यांनीच काय म्हणून विचारते....तो डांस फ्लोअर नजर टाकत डोळ्याने सांगतो....

प्रांजल हसत ज्यूस चा ग्लास खाली ठेवत त्याच्या हातात हात देते......दोघेही डांस फ्लोअर वर येतात......प्रांजल बेधुंद पणे डांस करत होती.....नमन तर तिलाच बघण्यात गुंग होता....डांस करताना अचानक नमन ने तिच्या कमरेला हात लावत जवळ ओढले....प्रांजल ब्लँक होत त्याच्या डोळ्यात उघडझाप करत बघते......तिचे केस पुढे आलेले नमन तिच्या डोळ्यात बघत अलगद एका हाताने बाजूला करतो...त्याचा स्पर्श होताच प्रांजल च्या अंगातून करंट संचारली होती..तिने अलगद डोळे झाकले....त्याचा स्पर्श चेहर्‍यावर मोरपीस फिरल्या सारखे वाटू लागले.....गान चेंज झाल्यावर दोघे ही भानावर येत बाजूला सरकतात. ...प्रांजल पटकन निघून जाते.....तिलाच कळले नाही काय होत ते नक्की......नमन च्या चेहर्‍यावर वर मंद हसू आले....त्याला ही तिच्या मनातल्या भावना काळू लागल्या होत्या....

रिषभ आलीशा त्याला मागून हसत धक्का देत...नमन हसून लाजत इकडे तिकडे बघू लागला.

बस हे, आज नक्की ना....रिषभ विचार करत बोलतो....

दादा जाऊ दे ना.....नमन पिहू वर नजर टाकत बोलतो......

ह्म्म, कधी जाणार....

नमन रिषभ कडे एक लूक देतो.....मागून वीरा नमन ला टॅप करते....ब्रो मी पण आहे तुमच्या पार्टी मध्ये...

नो sss नमन रागात बघतो.....

ओके मी दादा ला सांगते...वीरा खांदे उडवून जाऊ लागते....

ये...ये...थांब....रिषभ तिला अडवत बोलतो....नमन जाऊ ना.....

रिषभ, वीराला नको.....नमन काळजी पोटी म्हणत होता....

काय रे ब्रो.....मला बघायची आहे बाईक रेस प्लीज ना...वीरा हट्ट करतच बोलते.....

हा पण वीरा......त्याच लक्ष प्रांजल कडे जाते......तो हातानेच तिला इशारा करतो....प्रांजल येते.....

ब्रो प्रांजलला का बोलवतो......वीरा बोलते......

ती पण माहिर आहे बाईक रेस मध्ये नमन वीरा डोळा मारत बोलतो.

ऑहहहह, आलिशा आणि वीरा चकित होत बोलतात

प्रांजल हसत सगळ्यांना डोळ्याने काय म्हणून विचारते .
रिषभ प्रांजल ला प्लॅन सांगतो....

Sorry ,मी येणार नाही दी ला कळले तर प्रांजल ब्लँक होत बोलते.....

तू दी ला घाबरते वीरा बारीक डोळे करतच बोलते....

घाबरत नाही, पन तिला कळले तर मम्मी ला कळेल.....जर मम्मी ला कळले तर काही खर नाही.. .उद्याच्या उद्या पुणे गाठावे लागेल......

नाही कळणार, ते गेल्यावर आपण जाऊ.....रिषभ म्हणतो.....

विराट, पिहू जवळ येतो.....पिहू गाल फुगून बघते....

कशाला आलात, हूहूहूह...

फॅमिली फ्रेंड्स होते ..... तुझे फ्रेंडस पण होते म्हणून तुला चल बोललो नाही. ...अणि हा दंगा मस्ती,लाऊड म्युझिक मला इरीटेड होते......मला आवडते.....पिहू हसत बोलते......

विराट गालात हसत तिला एका हाताने जवळ घेत वॉच बघतो....चल घरी जाऊ.....

पार्टी, ....संपली नाही....

अजून खुप वेळ चालेल ........तस माझ काम काहीच नाहिये इथे....तुला थांबायच का....

नाही, मला झोप आलीये.....पिहू तोंडावर हात ठेवत जांभळी देत बोलते.....

चल....

ह्म्म मी प्रांजूला बोलवून आणते ....
प्रांजल चल घरी मानव दादा ला सांगितले .....पिहू मागून येत बोलते......

अअअअ...ते....ह्म्म, आता प्रांजल काय बोलणार....

ते...ते....वहिनी अजून पार्टी चालू आहे ना.....रिषभ बोलतो

हह ..हो.....आम्ही घरी चाललो......तुम्ही एन्जॉय करा...

वहिनी, राहू दे प्रांजल आमच्या बरोबर घेऊन येतो....वीरा बोलतो.....

विराट वीराला तिच जॅकेट देतो....घाल गारवा आहे.....

दादा प्रांजल ला आम्ही घेऊन येतो....तू आणि वहिनी जा वीरा जॅकेट घालत बोलते......

नाही नको....पिहू पटकन बोलली....सगळे एकटक तिच्या कडे बघतात....

अम्म,ते...ते....प्रांजल ला सवय नाही जास्त वेळ जाग रहायची.....प्रांजल चेहरा बारीक करून पिहू कडे बघू लागली..पिहू डोळ्याने हा बोल बोलते....

पिहू एन्जॉय करू दे....चल आपण जाऊ.....विराट पिहूच मन कळून तो बोलला. .....

अहो,

तो नजर रोखून बघतो....

वहिनी आम्ही तिला घेऊनच येणार आहे नमन हसत बोलतो....

आता पिहू ला नाईलाज होता तिला अस एकटीला सोडून जायची इच्छा होत नव्हती....परत सगळ्यांना वेगळे वाटेल म्हणून पिहू शांत झाली. ...ती प्रांजलला लुक देत विराट बरोबर जाते....

नमन, जास्त वेळ लावू नको विराट ऑर्डर देत च बोलतो.....

तो मानेनेच हो बोलतो.....

ड्राइवर कार आणून चावी विराट च्या हातात देतो....

अहो, मी चालवते पिहू विराट च्या हातातून घेण्यासाठी हात पुढे करते....

No..no...आता नको, रात्र खूप झाली....डोळे बघ मॅव मॅव झालेत तो कपाळ तिच्या कपाळावर घासत बोलतो....त्याने तस केल्याने आपोआप डोळे तिचे जड होत बंद झाले.....पिहू गोड हसून बिलगते....तो डोर उघडून तिला बसवतो आणि कार स्टार्ट करतो...पिहू त्याच्या हाताला विळखा घालत त्याच्या खांद्यावर डोके टेकून डोळे झाकते......
पिहू चेंज करून झोप....

ह्म्म,

पिहू,नीट बस झोपू नको.....ती काहीच बोलत नाही.......विराट मान नाही अशी हलवून कार चालवतो......घर आल्यावर तो तिचा हात अलगद काढायला जातो ....तिला जाग येते....

झोपू नको बोलत होतो ......तो तिचा सीटबेल्ट काढत बोलतो...

ती डोळे चोळत त्याच्या कडे बघते.....

गेट अप ,ती मानेनेच नाही बोलते......

विराट उतरुन तिच्या साइड चा डोर उघडतो....ती लहान मुलासारखी दोन्ही हात पुढे करते.. ....विराट गालात हसत तिला उचलून घेतो..... पिहू कधी कधी बालिश पना कुठून सुचतो......हहहह,तो त्याच नाक तिच्या नाकाला टच करत बोलतो....

तुम्ही लाड करता म्हणून करू वाटते...पिहू गालात हसत लाजून बोलते....दोघे फ्रेश होऊन एकमेकांच्या कूशीत झोपून गेले.....


पार्टी संपल्यावर सगळे बाईक घेण्यासाठी घरी येतात ......
नमन कार लावतो....बाईक घेण्यासाठी गॅरेज कड़े वळतो


.लॉक कोण लावले......तो ब्लँक होत बोलतो....

मागून सर्वेंट येतो....सर मोठ्या सरांकडे चावी आहे.....

शीट, रिषभ डोक्याला हात मारत बोलतो.....

ओह्ह नो वीरा चिडत बोलते.....

जीजू ....ला .....माहित आहे....प्रांजल आवंढा गिळत बोलते.....

सगळे नाराज होत आत येतात....

दादा ला कस कळले....... वीरा विचार करत बोलते.....


.नमनच लक्ष विराच्या जॅकेट कडे जाते....तुझ्या मुळे सिली गर्ल तो तिच्या डोक्यात टपली मारत बोलतो....


ब्रो sss,माझा बर्थडे आहे ना....ती चिडत बोलते....

ओह्ह, मॅडम होता...... फुल डे संपला.....

मी काहीच बोलले नाही......

तू बोलली नाही, बच्चा हे जॅकेट दादा ने आणले तुझ्या कार मध्ये हेल्मेट जॅकेट ठेवले होते ......तुला घेऊन येता येत नव्हते......यू sss नमन मूठ आवळत रागाने बोलतो......

जाऊ दे....ना...न...नेक्स्ट टाईम जाऊ प्रांजल दोघांना शांत करत बोलत होती.....पेटल की पूर्ण घर जाग होईल.....

वीरा त्याला जोरात फटका मारत पळून जाते....तो पळणार की प्रांजलला बघून शांत उभा होत एक बॉक्स टाईप स्माइल देतो....तिच्या समोर अस बिहेव त्याला लाजल्या सारख झाले....

दोघेही शांत स्टेप चढत होते....सगळी कडे शांतता होती...डीएम लाइट चालू होत्या.... पोर्च मधून थंड वारे वाहत होते....पार्टी मधला मोमेंट आठवून दोघांचा अंगावर रोमांच उभे राहत होते.....सगळे असले की दोघ नॉनस्टॉप हसी मज़ाक करत असतात....पन आता काय बोलव हेच कळत नव्हते.....

प्रांजल,.....


प्रांजल दारापर्यंत गेलेली मागे वळत त्याच्या कडे बघते....डोळ्याने काय म्हणते....


u looking beautiful 😍

प्रांजलचा चेहरा लाल झाला होता....फर्स्ट टाइम तिला अंगावर शहारा येत होता....पोटात असंख्य बटरफ्लाय उडत होते.....ती लाजून पटकन आत जात डोर ला डोक टेकून दीर्घ श्वास घेत विचार करते .....

सकाळी विराट आवरून खाली येतो...पिहू प्रांजल ला तिच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून ज़बरदस्ती खाऊ घालत होती....

दी....डायट ची सगळी वाट लागली तू...हूहूहूह...

असू दे खाऊन घे....अणि हे ड्राय फ्रूट चे लाडू दररोज एक खात जा...किती खराब दिसतेय.....जेवण चांगले असते ना....

हो ग दी....

पिहू प्रांजल बरोबर स्वतः कडे पन लक्ष दे....सुमन हसत बोलतात....विराट हलके हसून ब्रेकफास्ट करायला लागतो....

दी ,काळजी करत जाऊ नको जास्त.....जीजू गेल्यावर तर अजून खराब होशील..

पिहू विराट कडे नजर फिरवत एकटक बघते....उद्या जाणार म्हणून भीतीने पोटात गोळा येत होता...कशी राहणार हाच डोक्यात विचार घुमत होता. मानव प्रांजलला घ्यायला आला होता....होस्टेल ला सोडून तो ऑफिस ला जाणार होता.....

विराट, येतोय ना....मानव ने विचारले....

मला वेळ लागेल ...तू पुढे जा...

ह्म्म.....

अजून सगळे उठले नाही का प्रांजल सगळीकडे नजर टाकत बोलते.....

आज सगळ्यांची मॉर्निग बारा एक ला होईल सुधा हसत बोलते....सगळे हसतात ..प्रांजल ला नमनला बघायची इच्छा होत होती....ती सगळ्याना बाय करून निघून जाते.....

सगळे आत येतात....विराट हॉल मध्ये बसत सुमन ला हाक मारतो.....

मॉम, मला बोलायच इकडे ये....

काय विराट.....

आधीपासूनच रोहिणी हॉल मध्ये होत्या.

पिहू एक नजर बघत स्टाफ बरोबर टेबलावरच आवरायला मदत करत होती....

विराट थोडा पॉज घेतो....मॉम तू आईला सांगितले होते.. लग्नाआधी पिहू बद्दल तीच स्टेटस, तीच स्टडी, फूल बायोडाटा वैगेरे ...

सगळे ब्लँक होत विराट कडे बघत होते.....सुमन ला कळतच नाही विराट आज असा का प्रश्न करतोय ...

मॉम,....

हो सांगितले होते.....सुमन रोहिणी कडे बघत बोलतात.....

विराट रोहिणी कडे नजर फिरवतो...आई, पिहू मिडल क्लास आहे हे तुला लग्ना आधी माहित होते ना.....

ह...हो सुमन ने सांगितले होते....तुला सांग बोलले होते मी पण तिने सांगितले च नाही.....

ताई तुम्हाला परिस्तिथी सगळी माहिती होती....कस लग्न झाल...

मॉम ते नंतर बोलू....मी बोलू का ....तो विषय दुसरीकडे वळतोय बघून थोडस रागात बोलला ...सुमन शांत बसल्या.....पुढे पिहू ही होती....विराट काय बोलणार हेच सुमन ला कळत नव्हते......

आई तुला पिहू आधीपासूनच आवडत नाही का म्हणजे ती मिडलक्लास आहे म्हणून का दिसायला सुंदर न नाही....म्हणजे काय कारण आहे ते स्पष्ट सांग.....

तशी रोहिणी, सुमन ब्लँकेट होत बघू लागल्या...पिहू ला घाबरून घाम फुटला होता....विराट ला आज काय झाल...

आई पिहू तुझ्या शी नीट वागत नाही का.....तिचा काय त्रास होतय का.....ते मला आज जाणून घ्यायच......


मला तिला प्रत्येक गोष्टी सांगाव्या लागतात.....तेच जर आपल्या स्टेटस ची असली असती तर....कस राहायच, काय करायचे, गेस्ट आले की कस बोलायच हे सगळे सांगाव लागल नसते........अजून ही काय घालायच काही नाही मी स्वतः तिला सांगते....साडी साधी तिला...आपल्या स्टैंडर्ड ला मॅच होईल हे पण कळत नाहि. ........सुमन ला आधीच बोलले होते....साध्या घरातली मुलगी केली तर लोक काय बोलतील......हा विचार सुमनने केला नाही.....आणि झाल आहे.....किती तरी लोक विचारतात रोहिणी चिडून सुमन कडे बघत बोलते......

विराट रागाने मुठी आवळत रागावर कंट्रोल करतो..... आई ,आता जे झाल ते झाल...त्यावर काही उपाय आहे का पिहू तुला आवडत नाही हाच प्रॉब्लेम आहे तुझा मग आता त्यात मी काय करू जेणे करून तुला त्रास होणार नाही पिहू चा ते सांग ......

काय करणार आता ..झाल ते झाल....मला तुझ्या साठी चांगल्या घरातली मुलगी हवी होती.....पन काय...

तुझी अजून आहे का इच्छा मी पिहू सोडून दूसर लग्न कराव....

पिहू चे हात थरथर कापू लागले....विराट काय बोलतो ह्यावर तिचा विश्वास च बसत नव्हता....

विराट मी तस कधी बोलले......रोहिणी दचकून बोलते.....

मग काय प्रॉब्लेम आहे सांग.....अस नको तस नको ....
तू सांगितले आणि पिहू ने नाही केल अस झाल का......तुला जस आवडते....ती राहण्याचा प्रयत्न करते.......तिला हे सगळ नविन आहे....एडजस्ट करते ना ...गेस्ट चा इनसल्ट केला का कुठल्या.... फंक्शन मध्ये तुझा इनसल्ट होईल अशी वागली का.....

पिहूला ऐकून च डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या ....

रोहिणी विचारात पडते.....विराट ला आज काय झाल ....ती मानेनेच नाही बोलते.....

मग तिच्या स्टेटस वरून बोलायचं का...तो रागाने कडक आवाजात बोलतो....


रोहिणी पूर्णपणे ब्लँक होते....आज विराट पहिल्यांदा इतक्या जोरात बोलला होता.....मी....मी कधी बोलले....पिहू ss....तू आता हे काम करते.....आमच्यात भांडण लावायच .. रोहिणी चिडून रागाने पिहू कडे बघत बोलते.....बघ सुमन विराट ला माझ्या बद्दल भडकवत बसते....ही कालची आलेली मुलगी....सुमन पिहू कडे रागाने बघतात .....आज पहिल्यांदा त्यांना पिहू चा राग आलेला.....

आईsss.....विराट जोरात बोलतो तस रोहिणी शांत होत त्याच्या कडे डोळे विस्फारून बघते.....

विराट, त्या मोठ्या आहेत बोलताना भान ठेव...आणि घरातले प्रॉब्लेम बघायला आम्ही आहोत....पिहू च ऐकून तू अस बोलतोय .....हे बिलकुल पटत नाहिये सुमन रागाने बोलते.....

आई, मी....मी काहीच बोल....बोले नाही ..पिहू पुढे येत बोलतच होती....की विराट ने हातानेच तिला थांबवले.....पिहू तुझ काहीच काम नाही ये जा रूम मध्ये तो खवळून जोरात ओरडतो ...
पिहू दचकून रूम मध्ये रडतच निघून जाते....

पिहू रूम मध्ये येते .. तिचा श्वास जड झाला होता.. अंग थरथरू लागल काहीच कळत नव्हते.....ती थरथरत्या हाताने पाणी घेत पिऊ लागली....


आई तुला जर पिहू ह्या घरात नको असेल तर तस स्पष्ट बोल.....मला गोल गोल फिरून बोलता येत नाही....

विराटsss सुमन ओरडून बोलतात.....

मॉम,तू शांत बसते का.....मी आणि आई बोलतोय ना.....

विराट काय बोलतो.....मला का नको वाटेल पिहू .....रोहिणी त्याचा राग बघून शांत होत बोलतात.....

आई, तिच चुकत असेल तर तू तिला बोल ओरड तुला कोणीही काही बोलणार नाही ......पन ती मध्यम वर्गीय आहे ह्यावरून तू सतत बोलली तर ती ही कधी ना कधी राग व्यक्त करेल.....तेव्हा मी कोणाची साइड घेऊ ते सांग......आताच काय आहे ते क्लिअर होऊ दे....मला पूर्ण आयुष्य तिच्याबरोबर घालवायच .....तुला ती ह्या घरात नको सांग मी आणि ती वेगळ राहू.....तिला आणि तुला दोघींना काहीच प्रॉब्लेम होणार नाही....

सगळे शॉक होत विराट कडे बघत होते.....

विराट काय बोलतोय भान आहे.....तू घर सोडून जाणार....पिहू च ऐकून रोहिणी ओरडून घाबरत बोलते......

ते तू ठरव मी काय करू दे....ह्या घरात सगळे कस हक्क दाखवून राहतात...तसा पिहू चा सुद्धा बरोबर हक्क आहे.....काय असेल ते एकदाच क्लिअर कर.....एकच गोष्ट दहा वेळा बोलून वाद घालत बसायला मला वेळ नाही.....काल जे तू बोली माझ्या समोर मला तेव्हाच बोलायचे होते....पण ती वेळ नव्हती.....आपल्या कडे कशाची कमी नाहिये.....मग हे असे टाॅन्ट का...????.

विराट सुमन कडे बघतो....मॉम तुला हे होणार लग्नाआधी माहीतच असेल....मग आधीच हे सगळ क्लिअर करायच....दुसर्‍याच्या मुलीला मानसन्मानने घरी आणून चार भिंतीत तिचा अपमान करायचा का.....त्यावर तिने काहीच बोलायच नाही का.???

सुमन विचारात पडतात....विराट जे बोलत होता खरच होते....

काय निर्णय केला आई तो रोहिणी कडे नजर रोखून बघत विचारतो.....

विराट तू चुकीच समजतो....म ....ला ....काहीच प्रॉब्लेम नाहिये....(त्याच बोलण कधीच सहज नसते हे रोहिणी ला चांगलच माहीत होते.....तो आर नाही तर पार असे आहे....)

तुला काही प्रॉब्लेम नाही तर तिला परत अश्या भाषेत जर तिचा अपमान होत असेल तर मी सहन करणार नाहिये.....ते सगळ तुझ्या हातात आहे......विराट त्याच ब्लेझर नीट करत उभा होतो.....

मॉम मला पिहू ने नाही आजीने सांगितले आहे.......

विराट मी पिहू ...ला...रोहिणी बोलतच होती की विराट रोहिणी समोर थांबून गुडघ्यावर बसुन हातात हात घेत बोलतो...

आई तुझा अपमान करण्याचा काहीच हेतू नाहिये....तू माझ्या साठी कायम पाहिलेच राहणार आहे ....मला फक्त एवढच म्हणायचे होते....पिहू मुळे तुला त्रास होत असेल तर सांग आपन त्यातून सोल्यूशन काढू....तुमच्या दोघींना ही त्रास होणार नाही.... (रोहिणी च्या काळजाला कोणी तरी सुई मारल्या सारखी झाली...आपण इतका त्रास देतो...पण हा कुठल्या काळजाचा आहे....सगळ सहन करून माझ्याच पायात बसला आहे.....रोहिणी चे डोळे भरून येतात....ती लगेच स्वतःला सावरत दुसरीकडे बघते ...)
सॉरी तुला हर्ट झाले असेल तर....तुम्ही सगळे माझी लाइफ आहे..तशी आता पिहू ही माझी लाइफ आहे.....परत अस काही घडू नये ह्याची तूच काळजी घे....तिला ही ह्या घरातली मेंबर मनापासून अ‍ॅक्सेप्ट कर.....विराट उठून तिचा चेहर्‍यावरून मायेने हात फिरवत कपाळाला किस करत उठतो.....तो जातच होता की सुमन हाक मारतात....

विराट ,.....पिहूशी बोलून जा.....

माॅम ,माझी मीटिंग आहे ......तो गॉगल घालत मोबाईल बघत निघून जातो.....(आता कही सांगून त्याचा काहीच फायदा नाहिये.....म्हणून तिला समजण्यात त्याला वेळ वाया नव्हता घालवायचा )

पिहू ब्लँकेट ओढून रडत होती....दाराचा आवाज आल्याने ती दाराकडे बघते......

पिहू ,मी आहे सुमन बाहेरून हाक मारत दार नॉक करतात....

तिने तिचा चेहरा नीट केला.....दार उघडले.....आई, मी खरच काही ,पिहू रडतच हुंदके देत सांगू लागली.....

अग...हो ,मग इतक रडण्या सारख काय आहे...ये आत... सुमन तिचा हात पकडून चेयर वर बसवतात......चेहरा रडून रडून लाल करून घेतला होता....हुंदके तर अजून चालूच होते.
पिहू ...शांत हो...हे धर पाणी पी.....सुमन ग्लास देत बोलतात.....पिहू पाणी पीते.....

आई, तुम्हाला खरच सांगते......मी कधीच कोणाबद्दल ...

शुशु sss....माहित आहे मला ....तू अस सांगणार नाही....सॉरी मी तुला बोलल्याबद्दल....सुमन शांततेत तिचा हात हातात घेत बोलतात....

आई तुम्ही सॉरी नका म्हणू.....ह्यांच मला काही कळतच नाही.....कधी काय बोलतील....मी एका शब्दाने काहीच बोलली नाही.......

विराट च्या डोक्यात काय कधी येईल आणि तो बोलेल कळत नाही.....मला ही राग आला होता.....पण त्याच चुकीच ही नव्हते........मी आधी पासून तुझ्या बाबतीत खंबीर राहिली असते तर ..सुमन हताश होत बोलतात......

आई.... मोठ्या आई ना अस त्यांना काय वाटत असेल.....

त्यांचा विचार करू नको जास्त......विराट आहे तो बरोबर सगळ हॅन्डल करेल....आणि ह्या पुढे ताई परत तुला त्रास होईल अश्या भाषेत कधीच बोलणार नाही.....तो निश्चित जाईल म्हणून त्याने हे सगळ केल.....

तू चेहरा कसा करून घेतला आहे....आणि तुझ्या मुळे तर काहीच झाल नाहिये....टेंशन घेऊ नको......स्टडी करत बस एक्झाम जवळ आलेत .....विराट ची पॅकिंग झाली का सुमन बॅग कडे बघत बोलतात....

पिहू मानेनेच हो बोलते......एक्झाम झाली ना मग जा केरळ ला थोडे दिवस रहायला....आता लग्नाचा वाढदिवस येतोय मग ह्या वेळेस काय स्पेशल... अजून तुझा बर्थ डे पन आहे....सुमन तीच मन वळवण्यासाठी विषय चेंज करतात....

पिहू वरवर हसत मानेनेच नाही म्हणते......

अजून आहे महिना भर.....

पिहू थोडी रिलॅक्स पण झाली ....घरातले अता कसे बोलतील डोक उठले होते तिचे.......ती दुपारी खाली जेवायला गेली रोहिणी बघून तिला काहीच सुचेना ....ती किचन मध्ये गेली बाहेर जाऊ की नको हाच विचार करत होती.....

पिहूsss ,रोहिणी चा आवाज आला तशी पिहू ची धडकी भरली हृदय बंद पडायच बाकी होत....काय बोलणार आणि विराट तर बोलून निघून गेला ....मागच कोण बघणार पिहू स्वतःशीच मानत बोलत होती...अजून एकदा रोहिणी ने हाक मारली....

पिहूsss ....

हहह..हो...आले पिहू दचकत बाहेर येत बोलू लागली.....

सुमन आजी एकमेकांना कडे बघू लगल्या

हा टाइमिंग आहे का जेवायचा.....आमच होत आल....आली ते आली अणि जाऊन किचन मध्ये काय करत होती....

म...म...मी ...पाणी

का रूम मध्ये नाही, का....जेवण कर बस....रोहिणी ठसक्यात बोलली.....

पिहू पटकन बसली.....

पिहू ,नवीन आल्यासारखी का करते......ती फक्त बसली म्हणून रोहिणी ओरडून बोलते.....

पिहू पटकन प्लेट नीट करत वाढून घेते .हात अजून थरथर कापत होते...

सगळे जेऊ लागले....रोहिणी ला विराट च डोक्यात होत...विराट जे बोलतो ते करायला एक मिनिट विचार करणार नाही ....घर सोडून गेला की पुढच विचार करून रोहिणी च्या अंगावर काटा आला....तो आहे म्हणून मला घरात किम्मत आहे.....कुठल्या गोष्टीला कमी नाही......पिहूचा काही रोहिणी ला नफा नाही तोटा नाही.....

विराट ने पिहू ला कॉल केला पिहू बघून कट करते....त्याने परत लावला....तिने परत कट केला.....तो रूमच्या आत येत परत लावतो.....पिहू बेड वर पडून स्टडी करत होती....परत तिने कट
केला.....विराट हसू कंट्रोल करत परत लावतो....पिहू कट करणार की विराट तिच्या जवळ पालथा पडत तिला जवळ ओढतो....

तुम्ही ss,इथे ....तरी फोन करता पिहू चिडून नीट उठून बसली...

फोन का कट करत होती.....विराट सरळ होत तिचा हात पकडून जवळ ओढतो......

पिहू चे डोळे भरून आले....मला तुमच्याशी बोलायच नाहिये...पिहू हात सोडून परत नीट बसते.......

विराट शांत काही न बोलता उठून फ्रेश होण्यासाठी निघून जातो....

पिहू एक नजर बघत गॅलरीत जाऊन बसते......

विराट फ्रेश होऊन त्याच सामान नीट चेक करत बसतो......पिहू एक नजर बघते....पन त्याने एकदाही बघितले नाही.....
ती ही शांत झोक्यात बसुन विचार करत बसली....दाराचा आवाज आल्यावर तिने बघितले.....विराट बाहेर गेला होता.....
ती ही उठून दार उघडत होती..तर त्याने जोरातच दार उघडले....तिच्या कपाळावर च दार लागल.....

अहा..हा...पिहू कपाळ धरत कळवळली....

पिहू ,काय करतेस त्याने पटकन तिच्या कपाळावर रब केल....

क...क....कुठे गेला होता...ती कपाळ चोळतच बोलली.... मी स्टडी मध्ये गेलो होतो.....तुला काय वाटले....

पिहू हात काढत त्याच्या डोळ्यात एकटक बघते .....ती टाचा उंचावून त्याच्या गळ्यात हात घालत बिलगते.....
तो ही तिच्या कमरेला पकडून थोड वर उचलतो....पिहू त्याच्या खांद्यावर मान टाकून मुसमुसू करतच रडत होती......
विराट तिला कवटाळून पकडत तिच्या केसांवर ओठ टेकवतो..

पिहू ,इकडे बघ तो चालत चालत बाहेर गॅलरीत येतो.

ती मानेनेच नाही बोलते.....

ह्म्म, सोड मला आवरायचा....तो एका हाताने तिचा मानेचा हात काढायला लागतो..पिहू अजून घट्ट करत बिलगते....नाही काय करायच ..ती रडत रडत च बोलते....

विराट हलक हसत तिला घेऊन झोपाळ्यावर बसतो....ती त्याच्या टीशर्ट मधे चेहरा लपवून बसली होती.....

पिहू टीशर्ट सोड सगळा ओला होतय.....ती रागाने त्याच्या कडे बघते....चेहरा सगळा रडून लाल केला होता....

वेड लागलं का....चेहरा बघ किती लाल झाला....सकाळपासून हेच केल रडण्याचा प्रोग्राम......तो झुकून समोरचा नॅपकिन घेत तिचा चेहरा पुसतो....आता जर थोड पन पाणी आल ना, मी रात्री च्या फ्लाइट ने जाईल.....

तिचे परत डोळे भरून येतात....तो कपाळावर हात मारून घेतो.....पिहू काय करू सांग म्हणजे तू हसणार आहे....हे अस रडका फेस बघून मी जाऊ का......
ती बोलणार की तो तोंडावर बोट ठेवतो....सकाळच बोलत असशील तर बोलूच नको ....तुला काहीच एक्सप्लेन करायच नाही....तो विषय माझा आणि आई चा आहे...

.तीआता काय बोलणार शांत त्याला बिलगून बसली... तो ही शांत पायाने झोका देत आकाशाकडे बघत होता......संध्याकाळ झाली होती....हवेत गारवा जाणवत होता....थंडीने ती अजून घट्ट बिलगली......तो तिच्या कडे नजर वळवतो....तिला झोप लागली होती....त्याने एक उसासा सोडला....आणि तिला उचलून बेडवर झोपवले.....सकाळ पासुन ती घाबरली च होती....विचार करून डोक आउट झाले होते ..आता कुठे ती रिलॅक्स होऊन झोपली.....विराट त्याच सगळ आवरून घेतो.....आठ वाजून गेले तरी पिहू अजून झोपली होती.....तो तिच्या शेजारी आला

पिहू .....चेहऱ्यावरून हात फिरवत तिला उठवू लागला....

पिहू ने डोळे उघडले ती एक नजर विराट कडे तर नजर घड्याळात बघून तडक करून ती उठली...अहो, ही वेळ आहे का....तुम्ही का नाही लगेच उठवले...पिहू बेडवरून उठत स्लीपर घालत घाईघाईत च बोलत होती....

विराट ने तिला जवळ ओढले आणि तिच्या गळ्यात चेहरा घुसवून तिचा सुगंध घेण्यात गुंग झाला..

अ....अहो........पिहू.....त्याच्या स्पर्शात मंत्र मुग्ध होऊ लागली....पिहू चे हात त्याच्या केसात फिरू लागले.....विराट तिचा चेहरा धरत डोळ्यात आरपार बघु लागला....पिहूने डोळे झाकले ....त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले.....एक हात तिच्या केसांमध्ये तर एक हात तिच्या पाठीवर फिरू लागला... ..विराट ने अलगद तिला बेडवर झोपवले.....दोघेही एकमेकांना मध्ये हरवून गेले......
.
.

तो पालथा डोळे झाकून पडला होता....पिहू त्याच्या केसांमधून हात फिरवत होती....अहो ,

ह्म्म ,..

डिनर करायच नाही का.....उठा....

तुझी एक छान झोप झाली, मला उठ म्हणते.....तो तिचा केसांमध्ये फिरणारा हात हातात घेत हातावर किस करत बोलतो.....

जेवण करा मग झोपा.....उठा ती त्याला गुदगुल्या करत होती....पण त्याला तर काहीच फरक पडत नव्हता.....

पिहू शांत बस....

पिहू त्याच्या पाठीवरून हळू वार हात फिरवते...तो गालात हसत तिचा हात पकडतो...पिहू तुला भूक लागली तर जा ना.....

अहो,sss उठा ना....ती पाठीवर दाताने चावायचा प्रयत्न करते......अहो, ss तुम्हाला कस काही होत नाही... ..त्याच्या भरलेल्या बॅक वर दाताचे निशाण पडलेच नव्हते....

विराट हसत सरळ होत तिला अंगावर घेतो.....तुझ्यासारखा नाजूक नाहिये......थोडासा दात लागल की लगेच फुगून बसायचय.....

चुकून लगत नाही ,मुद्दाम करता....पिहू लटक्या रागात लाजून म्हणते....


कस सांगू का...तो खट्याळ नजरेने बघत बोलतो....

ना...नको...पिहू लाजून त्याच्या छातीवर डोक ठेवते.....

डिनर रूम मध्ये करू उठ तो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो.....

ह्म्म .....दोघेही फ्रेश होतात ....

विराट ने कॉल करुन जेवण वर मागितले.....डोर नॉक झाले विराट डोर उघडणार की थांबवते...अहो sss शर्ट घाला, मी उघडते.....पिहू चिडूनच बोलते....

हो..हो घालतो....किती चिडते.... तो आत जातो....पिहू दार उघडते.....आणि डिनर घेते .....गॅलरीत घेऊन जाते.दोघांसाठी प्लेट लावते......

पिहू बारीक डोळे करूनच बघत होती....

आता घातला ना....तो तिच्या शेजारी बसत बोलतो....

उद्या पासून एकटेच आहात......म्हणून मनासासारख वागू नका.....वेळेवर जेवन करा..... ड्रिंक घ्यायची नाही .....ती त्याला भरवत लेक्चर देत होती....तो ही प्रेमाने तीच ऐकून घेत होता......सकाळी तो निघून केरळ ला निघून जातो. ......
पिहू निराश होत रूम मध्ये येते......तिला रडायच नव्हत....पण मन तिच्या हातात नव्हते......


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
कसा वाटला भाग नक्की कळवा....

वैशाली