Ahamsmi yodh - 4 in Marathi Adventure Stories by Shashank Tupe books and stories PDF | अहमस्मि योध: भाग - ४

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

अहमस्मि योध: भाग - ४

त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता..

" समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे काहीतरी लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा दिसतोय..." - दिगंबर.

समीरने ती कागदं हातात घेतला आणि निरखून पाहू लागला..त्याच्यावर नजर फिरवताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या.

" या इतक्या भयान जंगलात हा वाडा..आणि इथे हे सगळं.. आजोबांचं नाव असलेल्या या कागदा वरून हे स्पष्ट आहे की याचा आपल्याशी काहीतरी संबंध नक्कीच आहे.." समीर म्हणाला.

" बाकी अजून काही दिसत नाहीये इथे आपल्या कामाचं.." -दिग्या.

"चल बाहेर जाऊन त्या गणपत कडून अजून काही माहिती मिळते का बघू.." - समीर.

दोघंही त्या अंधाऱ्या तळघरातून बाहेर आले पाठोपाठ धावत येणारा टॉमी होताच...पण बाहेर येऊन बघितलं तर गणपत तिथे नव्हताच..!! वाड्याच्या आजूबाजूला ही तो कुठेच दिसला नाही..समीर आणि दिग्या त्याला इकडे तिकडे शोधू लागले..पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता..संध्याकाळ होत आली होती..आकाशात सूर्याची परतण्याची लगबग दिसत होती . आकाशातील पक्षांचे थवे घरट्यांंत परतत होते. मावळतीच्या विविध छटांनी आकाश भरून गेले होते.

" सम्या , मला वाटतं आपण निघायला हवं आता...थोड्याच वेळात अंधार होईल...उद्या सकाळी त्या गणपत ची वस्तीवर जाऊन चौकशी करु.." - दिग्या.

"ठीक आहे..चल निघू आपण.. " - समीर.

दोघेही झपाझप चालत निघाले..थोड्याच वेळात सर्वत्र अंधार पसरला..अंधाराच्या विवरात अडकल्याप्रमणे आजूबाजूचा अंधार अन् उंच वृक्षांशिवाय काहीच दिसत नव्हतं.कसलाही आवाज नव्हता किंवा जिवंतपणाची कसलीच खून नव्हती.दोघांनीही टॉर्च चालू केली..त्यातून निघणाऱ्या प्रकाशाचे कवडसे भवताल दाखवू लागले.वाळलेला पालापाचोळा पायाखाली तुडवत ते पुन्हा चालू लागले..

घड्याळात नऊ वाजत आले होते.. घरी पोहचून दोघं फ्रेश होऊन जेवायला बसले.

"काका..आई बाबा कुठे आहेत..." समीरने दत्तू काकांना विचारलं..

" ते..त्यासनी फोन आला आणि दुपारीच निघाले पुण्याला , आता पावतर पोचलं बी असतील..ते म्हणले की साखरपानाच्या कार्यक्रमाला चाललोय..तयारी कराया त्यासनी लवकर बोलावलं..तुमचा फोन नाय लागला..म्हून माझ्या कडं निरोप दिलाय.. "- दत्तू काका जेवण वाढता वाढता म्हणाले.

" पण अनिकेत दादाचा साखरपुडा तर परवा आहे..आजच का गेले..कॉल करून बघतो.." - समीर.

समीरने मोबाईल काढून फोन लावला...पण फोन लागलाच नाही..पुन्हा एकदा प्रयत्न केला..पण तरीही नाहीच..

" तुमी काळजी करू नगा समीरबाबा.. मालक पोचले असतील.. तुमी जेवून घ्या , जेवण थंड होईल.." - दत्तू काका.

"अच्छा.." - समीर.

जेवत असतानाच समीरला माधुरीचा मेसेज येतो.

" आम्ही पुण्याला पोचलो सुखरूप..तू काळजी घे.. गुड नाईट.."

"ओक्के..सी यू..गुड नाईट.." समीरने रिप्लाय दिला आणि फोन ठेवून दिला..

" दिग्या..तो गणपत...." - समीर.

"समीर खूप भूक लागली आहे..नंतर बोलू आपण.." - समीरला मध्येच थांबवत दिग्या म्हणाला.
आज घडलेल्या गोष्टींबद्दल समीर बोलणार इतक्यात दिग्याने त्याला आडवले..दत्तू काका जवळच असल्याने त्याने समीरला टाळलं..या गोष्टीचा मात्र समीरला राग आला. जेवण झाल्यावर दोघं ही वरच्या खोली कडे निघून गेले..

" दिग्या अरे..मी लहानपणा पासून ओळखतो त्यांना..तू त्यांच्यावर का संशय घेतोस नेहमी..?" - समीर.

"तू काहीपण बोल सम्या...पण मला तो माणूस खटकतो.."- दिग्या म्हणाला.." बरं..तू काय म्हणत होतास त्या गणपत बद्दल.."

" हा...तो गणपत सांगत होता त्या प्रमाणे त्या वाड्यात राहणाऱ्या इसमाचा शोध लवकरात लवकर घ्यायला पाहिजे...आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचं आणि आजोबांचं काय संबंध याचा ही उलगडा झाला पाहिजे.." - समीर.

"पण आता करायचं काय.." बऱ्याच वेळाने दिग्याने समीरला विचारले.

अचानक तोंडातून चित्कार काढत समीर उठला आणि आणि कपाटा कडे धावला त्यातून त्याने लॅपटॉप काढला.

" हे..लेट्स ट्राय गूगल.. व्हॉट से..!! " समीरच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.

" अरे काही काय.. गूगल वर काय शोधणार आहेस.." समीरच्या मुद्दा खोडात दिग्या म्हणाला.

"आता वाड्यात सापडलेल्या कागदावरील प्राचीन भाषाच काही सांगू शकेल..!! हा एकच क्लू आहे आपल्याकडे.." - समीर.

समीरने लॅपटॉप चालू केला..आणि वायफाय कनेक्ट केला.आणि त्या प्राचीन लिपीची छायाचित्रे काढून लॅपटॉप मध्ये ट्रान्स्फर करून घेतले.

समीरने "गूगल.कॉम" चे संकेतस्थळ उघडले. सर्च बार मधे टाईप करून सर्च चे बटन दाबले आणि थोड्याच वेळात प्राचीन भाषांची माहिती असलेल्या अनेक संकेतस्थळांचे पत्ते लॅपटॉप च्या स्क्रीन वर अवतरले.एक एक लिंक उघडुन दोघंही जण त्या स्क्रीन समोर डोकं खुपसून माहिती वाचू लागले..एका मागून एक संकेतस्थळं पालथी घालत होते आणि एका ठिकाणी ते अचानक थांबले..

" हे बघ..ह्या फोटोमधील अक्षरांचे आकार आणि आपल्याकडे असणारी कागदावरील लेख हे जवळ जवळ सारखेच दिसत आहेत.." समीर स्क्रीन कडे बोट दाखवत म्हणाला.

समीरने माहिती मिळवण्यासाठी फोटो वर क्लिक केलं..आणि एक दुसरे संकेतस्थळ उघडले..ती "ब्राह्मी लिपी" होती .साधारणतः २५०० ते १५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही लिपी वापरात असल्याचे संकेत आहेत.चक्रवर्तीसम्राट अशोकच्या काळात बांधलेल्या खडक-स्मारकांवरील शिलालेख ही त्याच भाषेत आढळतात असे त्या माहितीतून समजले..

"च्यायला.. आता ही ब्राह्मी लिपी कशी समजणार आपल्याला..आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे.." दिग्या म्हणाला.

"हम्म..ते ही आहेच म्हणा.. बरं...बघू पुढे काय लिहलं आहे.." - समीर.

समीरने पुढे वाचण्यासाठी मान खाली वाकवली..पण दोघांचेही लक्ष विचलित झालं ते बंगल्याच्या गेटपाशी अचानक झालेल्या हालचालीने.गेट उघडल्यामुळे बिजागाऱ्यांचा करकर आवाज आला होता.

घड्याळात पाहिले तर साडे बारा वाजून गेले होते..लॅपटॉप वर शोधाशोध करताना एवढा वेळ झाला हे कळलंच नाही..

"इतक्या रात्री कोण असेल..?" - समीर.

समीरने लॅपटॉप खाली ठेवला..तो उठून उभा राहिला आणि सावकाश चालत चालत खिडकीपाशी गेला. दिग्याला हाताने खूनावून त्याने बोलावून घेतलं.त्याने खिडकीचा पडदा किंचित बाजूला सरकावून खाली पहीलं... गेटपाशी कोणीतरी उभं होतं. त्याने राखाडी रंगाचा सूट, जाड कापडाचे जॅकेट आणि डोक्यावर हॅट घातलेली होती...

आणि दुसऱ्या क्षणी जे दिसलं ते पाहून दोघेही थक्क झाले.. दत्तू काका गेटच्या दिशेने जाताना दिसले..चालताना ते सगळीकडे अगदी चोरटेपणाने बघत होते..आपल्याला कोणीही बघत नाही..याची ते खात्री करून घेत होते. तो इसम दत्तू काकांना रागातच काहीतरी सांगत होता..

" हा म्हातारा काय करतोय इथे.." - दिग्या चिडून म्हणाला.

थोड्याच वेळा दत्तू काका त्या गाडीत बसून निघून गेले.. जाताना त्यांनी वर समीरच्या खोली कडे एक कटाक्ष टाकला पण खिडकीची काच पांढऱ्या रंगाची आणि पारदर्शक नसल्यामुळे बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं..

" दिग्या चल लवकर.." समीरने खाली जाण्यासाठी धाव घेतली.

" च्यायला ह्या म्हाताऱ्याच्या..तरी मी तुला सांगत होतो हा काहीतरी गोची करणार.." - दिग्या वैतागून म्हणाला.

दोघं आऊट हाऊस जवळ येऊन थांबले..समीरला काय करावं हे कळत नव्हतं लहानपणा पासून ज्यांच्या अंगाखांद्यावर तो खेळला होता त्या दत्तू काकांचे हे रूप बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.

दत्तू काका आऊट हाऊसच्या खोली मध्ये राहायचे त्यांचे काही कपडे व इतर वस्तु या तिथेच विखुरल्या होत्या..खोलीत विशेष असं काहीच नव्हतं...

समीर खोलीच्या बाहेर आला..आणि सावकाश डोळे बंद करून , तळहात जोडून रुद्रस्वामिंचे स्मरण करू लागला. तो स्तब्ध उभा होता.बराच काळानंतर त्याने डोळे उघडून समोर पाहिले.
समोरचा परिसर कसल्याश्या धुराने भरून गेला होता.त्या धूसर प्रकशात रुद्रस्वामिंची पुसटशी आकृती त्याला त्याच्याकडे येताना दिसली.

" प्रणाम..रुद्रस्वामी.." समीरच्या तोंडून अस्पष्ट उद्गार निघाला.

" आम्हास माहित आहे तुझे मन का विचलित आहे..भ्याड होऊ नकोस कारण ते तुला अनुकूल नाही.हृदयाची ही क्षुल्लक कमजोरी दूर कर आणि सज्ज हो...ह्या माणसाचं भूतकाळ शोधून काढ सगळं काही स्पष्ट होईल.." - रुद्रस्वामी.

समीरने खाली वाकून रुद्रस्वामींना नमस्कार केला आणि हात जोडून तो पुन्हा उभा राहिला.
रुद्रस्वामिंनी डोळे बंद केले आणि आपला उजवा हात समीरच्या डोक्यावर ठेवला. त्या तेजाच्या स्पर्शाने समीर मोहरुन गेला.

" यशस्वी भव..!! आता आपली भेट लवकर होणार नाही.." एवढं बोलून रुद्रस्वामी माघारी वळले आणि त्या धुराच्या वलयात निघून गेले..

समीर भानावर आला आणि पुन्हा त्या खोलीत गेला..इकडे तिकडे नजर फिरवली आणि एक फोटो त्याच्या नजरेस पडला.. दत्तू काका आणि त्यांचा मुलगा अशोकचा फोटो..

" दिग्या हा अशोक दादा दत्तू काकांचा मुलगा.. कोल्हापूरात असतो..कदाचित त्याला काही माहीत असेल..पण तो ही ह्यात सामील असला तर.." समीर दिग्याला फोटो दाखवत म्हणाला.

तेवढ्यात गेट जवळ आवाज आल्यामुळे समीर आणि दिग्या पटकन बाहेर येऊन झाडीत लपून बसले..तिकडून दत्तू काका येताना दिसले.. त्यांच्या हातात एक सुटकेस होता..जो त्यांनी छातीला कवटाळून ठेवला होता..त्यांनी सगळीकडे नजर फिरवली आणि लगबगीने खोलीच्या दिशेने गेले..आणि दार लावून घेतले.समीर आणि दिग्या दोघं चोरट्या पावलांनी येऊन खोलीच्या खिडकी जवळ दबा धरून बसले..

तेवढयात मोबाईलची रिंग वाजली..
" हॅलो..बॉस..काम झालं..तुम्ही काळजी करू नका मी स्वतः होतो तिथे.." दत्तू काकांचे हे शब्द दोघांच्या कानावर पडले.
आता समीरला पूर्ण खात्री पटली होती..की दत्तू काका या अज्ञात कटाचा एक भाग आहेत..अचानक दरवाज्याकडे येणाऱ्या पावलांचा आवाज आला आणि दोघं ही तिथून पळून गेले..

थोड्यावेळाने समीर त्याच्या खोलीत येऊन गंभीरपणे विचार करत बसला. त्याची नजर शून्यात हरवली होती..घडलेल्या प्रसंगावर त्याचा विश्वास बसत न्हवता..

" ऐऽऽ..सम्या..मी आहे तुझ्यासोबत कश्याला टेन्शन घेतोस.." दिग्या म्हणाला.

" सॉरी..दिग्या मी तुला चुकीचं समजत होतो..मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दत्तू काका असं काहीतरी वागतील.. रिअली सॉरी यार.." समीरच्या आवाजात काहीशी नाराजीची झलक होती.

" इट्स ओके ब्रो..मी समजू शकतो.. झालं ते जाऊदे..आपण पुढे काय करायचं..?" दिग्या म्हणाला.

" का कोणास ठाऊक..पण मला वाटतं की दत्तू काकांच्या गावाला कोल्हापूर ला जाऊन बघावं एकदा..काही माहिती मिळते का.."- समीर.

"बोल कधी निघायचं.." - दिग्या म्हणाला.

" सकाळी..पण मी एकटाच जाणार..तू इथे थांबून दत्तू काकांना गाफील ठेव..त्यांना कळता कामा नये.." - समीरने उत्तर दिलं.

" बररं..मी सांभाळतो इकडे..आणि त्या गणपतची पण जरा चौकशी करून घेतो.." - दिग्या.

" जे काय करशील ते सावधपणे कर..आणि काळजी घे.." - समीर.

" चल झोप आता.. पहाटे लवकर निघावं लागेल.." - दिग्या.

" आता काय झोपणार.. पहाटे ३:३०ची कोल्हापूर एक्स्प्रेस आहे त्याच ट्रेनने निघतो.." - समीर.

" अरे..पण तू थकला आहेस..आपण जंगलातून आलो तेव्हापासून तू आराम ही केला नाहीस.." दिग्या समीरच्या काळजी पोटी म्हणाला.

" आता हे सगळं काय चालू आहे हे समजल्यावरच आराम मिळेल.." असं म्हणून समीरने बॅग भरायला सुरुवात केली.

रात्रीचे दोन वाजून गेले होते..म्हणून समीर निघायच्या तयारीला लागला.. तीन वाजता निघायचं असं त्याने ठरवलं..रेल्वे स्टेशन तसं लांब होतं पण गाडीच्या आवाजामुले दत्तू काकांना जाग येईल..म्हणून समीर चालत जाणार होता.दिग्याच्या डोळ्यांवर पेंग होती..पण इतक्यात झोपायच नाही हा निर्धारच जणू त्यानं केला होता..

" चल दिग्या..मी निघतो..बाय.." समीर खांद्यावर बॅग लावत दिग्याला म्हणाला..

"बाय..फोन करून कळव..." - दिग्या.

"हम्म..ओक्के..तू इकडे दत्तू काकांना कळू देऊ नकोस.." - एवढं बोलून समीर मागच्या दारातून बाहेर पडला..

.....................................................................................................................................

क्रमशः

• समीर कोल्हापुरात पोचल्यावर त्याला अशा काही गोष्टींबद्दल माहिती मिळते ज्यामुळे गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात...या खेळाला एक वेगळचं वळण येतं.
• इकडे मुंबईत दिग्या कडे ही अशीच एक बातमी असते ज्याने त्यांच्या अडचणीत अजून भर पडणार हे नक्की..!!