Ek chukleli vaat - 8 - last part in Marathi Moral Stories by Vrushali books and stories PDF | एक चुकलेली वाट - 8 - अंतिम भाग

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

एक चुकलेली वाट - 8 - अंतिम भाग

एक चुकलेली वाट

भाग ८ अंतिम

कसल्याश्या जोरदार माराने आणि थंडगार जाणिवेने तो थरथरला. एक सौम्य गार कळ त्याच्या मस्तकात गेली आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वी तो बेशुद्ध होऊन पडला होता. आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी थंडगार पाण्याचा मारा अखंड चालू होता. त्या पाण्याने त्याचे कपडे पूर्णतः भिजून गेले होते. हलकीशी थंडगार झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. एव्हाना त्याला शुद्धीत आलेलं पाहून देसाईंनी त्याचे ओले राकट केस आपल्या हातात गच्च पकडुन ओढले. अचानक झालेल्या तेवढ्याशा वेदनेनेही तो विव्हळला. त्याने डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला... धूसर अंधारात त्याला एक ओळखीची आकृती दिसली.. त्याच्या अंधुक नजरेला ओळख पटत नव्हती.. पण.... ' अम्या... अम्या ...' ही हाक ओळखीची वाटत होती. त्याच्या सुन्न झालेल्या कानांनी ओळख पटवली... " राम्या..." तो अस्फुटस बोलला.

" त्याने आपल्या विरोधातील सारे पुरावे पोलिसांना दिलेत.." राम्या रडतच उत्तरला.

" तू आता सगळ खर बोल... नाहीतर.." आपल्या हातांनी त्याच्या केसावरची पकड अजुनच मजबूत करत मागच्या बाजूने खेचले. आपल्या मुठी वळवत त्याच्या गालावर अजुन दोन ठोसे लगावले. पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. परंतु ह्या क्षणी जिवंत राहायचं असेल तर सगळ सत्य सांगून टाकणं हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता.

" सांगतो...सगळ..." त्याने आपली दुखरी मान दोन्ही हाताने पकडली. त्याच्याच समोर खुर्चीत त्याचा मित्र राम्या, हातात बेड्या घातलेल्या अवस्थेत होता... आता अजुन आपली कातडी वाचवणं शक्य नाही हे त्याच्या लक्षात आल.. गप्प राहून जीव वाचायच्या नादात ह्या पोलिसांच्या मारानेच जीव जाईल.. दुखणारा जबडा मोठ्या कष्टाने उघडत त्याने बोलायला सुरुवात केली... " मला खूप आधीपासून सोनिया आवडायची..म्हणजे अगदी लहान असल्यापासून...." त्याच्या बोलण्यावर सारिकाच्या डोळ्यातून अश्रू घरंगळले.

" लहानपणापासून सगळेच चिडवायचे आम्हाला... लग्नात गृहप्रवेशाच्यावेळी माझ्या आईने तिच्या वडिलांकडून वचन घेतलं होत म्हणे की त्याची होणारी एक पोरगी माझ्या आईची सून बनेल... लहानपणी भातुकलीच्या खेळातदेखील आम्हीच नवरा बायको असायचो.. तेव्हापासून मनात ठसल होत की बायको बनेल तर सोनियाच... जेव्हा प्रेमाच्या वयात आलो तेव्हापासून फक्त तिच्यावर प्रेम करायचा प्रयत्न केला....आवडायची ती मला.. सारखी हवीहवीशी वाटायची... पण तिने कधी माझ्याकडे बघितलच नाही... अगदी भातुकलीच्या खेळातही मी तिला नवरा म्हणून नको असायचो... " खुर्चीत पाठीमागे रेलत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. " जशी ती मोठी होत गेली माझी तिच्याकडे बघायची नजर बदलत गेली.. परंतु तेव्हाच ठरवल की आयुष्यात कितीही पोरी येऊद्या आपली बायको बनेल ती एकच.. ती म्हणजे सोनिया... तिच्या लहानपणीच तीच अख्खं कुटुंब मुंबईला कायमच राहायला गेलं... उन्हाळ्याच्या सुट्टीत कधीमधी यायचे ते लोक गावी... मग माझा अख्खा दिवस तिला न्याहाळण्यात जायचा... गावच्या पोरींच्या मानाने ती होती पण एकदम......" त्याला काहीतरी बोलायचं होत पण अनिकेतकडे नजर जाताच त्याने तो शब्द टाळला. परंतु त्याला काय म्हणायचं ते अनिकेतच्या चांगलच लक्षात आलं होत.

" पण वर्षाआधी तिच्या वडिलांची अचानक नोकरी सुटली आणि ते सगळेच गावी शिफ्ट झाले...माझ्यासाठी ते बरच होत... मला तिला इंप्रेस करायचा मोका मिळाला होता... मी रोज मुद्दाम त्यांच्या घरी जायचो.. तिच्यासाठी स्पीकरवर कसली कसली गाणी वाजवायचो... ती गाणी ऐकून बाजूच्या पोरी माझ्या मागे मागे करू लागल्या पण सोनिया... नाही.... ती दूरच राहायची... माझ्याशी धड बोलायची पण नाही... इतकच काय तर नंतर मी दिसलो की रस्ता पण बदलायची... परंतु तीच अस वागणं मला तडफडायला भाग पडायचं..." त्याच्या अंगात एव्हाना थंडी भरून आली होती. बसल्या जागी तो थरथर कापू लागला. मध्येच एखादा पाण्याचा थंडगार ओघळ त्याच्या मानेवर ओघळायचा आणि त्याच्या अंगावर शहारा उमटायचा. त्याची अवस्था पाहून परबांनी तत्परतेने गरम चहा आणून त्याच्या समोर ठेवला. आपल्या कापणाऱ्या हातांनी कसतरी ग्लास उचलत तो घोटभर चहा प्यायला. गरम चहा पोटात जाताच त्याला जराशी तरतरी आली.

" सारखा तिच्या मागे गोंडा घोळवून मला कंटाळा आला होता.. किती काय काय करायचं एखादीसाठी..... मात्र तीच अंतर राखून वागणं मला डिवचत होत... तिचा कितीही विरोध असला तरीही मला काहीही करून ती हवीच होती... त्याचा एकच उपाय होता.... म्हणूनच घरच्यांना विश्वासात घेऊन तिच्या वडिलांच्या समोर तिच्यासाठी मागणी घातली... मी नात्यातील आहे आणि माझ्या घरचेही तयार आहेत म्हणून फारसे आढेवेढे न घेता त्यांनी तात्काळ होकार दिला.. "

" अच्छा.. शेवटी तुला पाहिजे ते मिळत होत तर... "

" मिळणार तर होत पण त्यात समाधान नव्हतं... लग्न ठरवलं तरीही सोनियाच वागणं काही बदललं नव्हत... मोजकच बोलणं, अंतर ठेवून वागणं सगळच खटकत होत मला.. मला वाटलं की आतातरी ती माझ्या जवळ येईल, आम्ही फिरायला जाऊ, थोडी मजा करू...." त्याच्या 'मजा करू'चा स्वर वेगळाच होता.

" कसली मजा....??" अनिकेतने विचारलं.

" सारिकासोबत तशी मी बऱ्यापैकी मजा केली..पण जिच्यासोबत लग्न करायचं तिला हात पण लावला नव्हता.. हात काय साधी जवळ पण यायची नाही ती...इथे बोलायचे वांधे तर बाकी काय करणार... मित्र जमले की सगळे आपल्या आपल्या गमती सांगायचे... कोणी कसे भेटले.... कोणी कसं किस केलं... कोणी तर चक्क शेतात... पण माझ्याजवळ सांगायला काहीच नसायचं. त्यावरून सगळे मित्र खिल्ली उडवायचे... सर्वांच्या गप्पात मी नेहमीच चेष्टेचा विषय असायचो... फिरून फिरून त्यांचा विषय माझ्या मर्दानगीवर यायचा... म्हणे माझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून मला ती टाळत असेल... कशीतरी ती वेळ मारून न्यायचो पण आतून मी पेटून उठायचो.. अस काय कारण असेल की ती मला दूर ठेवत होती... "

" मग... तुझ्या तल्लख बुध्दीने काय शोध लावलास तू...." अनिकेतने उपहासात्मक स्वरात विचारल.

" बरीचशी कारण वाटली... शेवटी एका रात्री सगळ्या मित्रांसोबत चर्चा करायला बसलो.. बराच विचार केल्यावर आणि बऱ्याच शंका उपस्थित केल्यावर तिचा मुंबईला कोणीतरी बॉयफ्रेंड असावा असं सर्वांचं अनुमान निघाल... नाहीतर मला टाळायचं दुसरं कारणच काय... पण तिच्या बॉयफ्रेंडच्या विचाराने माझं थरकाप उडाला.. त्या नुसत्या विचारानेच मला झोप येईना..."

" कसला विचार...?"

" तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत काही केलं असेल... मी ती मला हवी म्हणून लग्नाचा घाट घातला... पण तिला आधीच दुसऱ्याने वापरलेलं असेल तर... मला हे सत्य समजायला हवं होत... मला अशा मुलीशी लग्न करायचं नव्हतं..."

" वाह.... किती उच्च विचार आहेत... स्वतः लग्नाआधी मजा केलीस की.... मग तिने केली असेल तर काय झालं..?" अनिकेत चिडून गरजला.

" मी काहीही करू शकतो.. समाजात चालत ते... तिने बाईच्या मर्यादेत राहील पाहिजे...." त्याच्या वाक्यावाक्यात पुरुषी अहंकार झळकत होता.

" हो का... खरंच..?" अनिकेत.

" मला मनातल्या शंकेच समाधान पाहिजे होत आणि त्यासाठी कसही करून तिला एकांतात भेटायचं होत... आणि ह्या कामात मला मीनाक्षी मदत करू शकत होती. त्यासाठी मी आणि राम्याने मिळून फिरायला जायचा प्लॅन बनवला.. मीनाक्षी तर येणारच होती.. मात्र सोनिया येणं जवळपास अशक्य.. मीनाक्षीला मी बरीच गळ घातली शेवटी तिला चॅलेंज दिल्यावर ती सोनियाचा आणायला तयार झाली.....पण जायच्या दिवशी नेमका तिच्यासोबत काहीच संपर्क होत नव्हता.... तिचा फोन पण स्वीच ऑफ येत होता.... काय झालंय सोनिया तिच्यासोबत येतेय की नाही हे ही कळत नव्हत... "

" मग पुढे...?"

" कोणत्यातरी पीसीओनंबरवरून रामाच्या फोनवर कॉल आला... पलीकडे मीनाक्षी होती... तिने सांगितल की ती घरून निघालीय आणि सोनियाला पण तयार केलंय... तालुक्याला पोचून सोनियाला घेऊन ती ठरलेल्या जागी येईल... तेव्हा कुठे जरा बर वाटल.. पण डोक्यात मात्र सोनिया भेटल्यावर काय बोलेल.. खरंच तीच अस काही असेल का..हेच प्रश्न गर्दी करत होते... विचार करून डोकं फुटलं असत..."

" मग काय केलंस..?"

" डोकं गरगरत होत म्हणून मी आणि रामा आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर प्रकाश बिअर शॉपीवर गेलो....दोन बिअर पोटात गेल्यावर डोक्यातील विचार जरा शांत झाल्यासारखे वाटले.... एव्हाना मीनाक्षी तालुक्याला येऊन पोचल्याचा फोन येऊन गेला होता... मला मात्र धीर धरवत नव्हता... मिनाक्षी बोलली तर खरी की सोनियाला घेऊन येते पण सोनिया प्रत्यक्ष समोर येईपर्यंत मी विश्वास ठेवू शकत नव्हतो... म्हणून मी सहजच सोनियाला कॉल केला... ती कॉलेजमध्ये होती... तेव्हाही फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं देत होती.. ते ही नाखुशीने... आणि फोन काय झाला... माझं रिचार्ज संपल होत.. रिचार्ज करायला त्या भागात कोणतच रिचार्जवाल दुकानं नव्हतं... सोनियाच्या वागण्याच्या रागात अजुन एक बिअर पोटात गेली... बराच वेळ मिनाक्षीचा काहीच संपर्क झाला नाही म्हणून मग तिथल्या पिसिओवरून सोनीयाला कॉल केले... पण त्या नादात खिशातील कॉइन संपले...बराच वेळ झाला आणि अपेक्षीत गाडीही येऊन गेली तरी दोघींचा पत्ता नव्हता... मला कससच होऊ लागलं... काहीही करून ती यायलाच हवी होती आज.... शेवटी शॉप मालकाच्या फोन वरून त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा समजल की त्यांनी कोणाला कळू नये म्हणून दुसऱ्या गावाची बस पकडली होती जी त्याच भागातून जाते... येवढ्या संपूर्ण वेळात सोनियाच्या फोनवर मीनाक्षीच बोलत होती.. "

" अच्छा.. फोनच रहस्य अस आहे तर.. बर पुढे.." देसाई अनिकेतकडे पाहत गालात हसले.

" बऱ्याच वेळाने त्या दोघी आल्या खऱ्या पण तेव्हाही सोनियाचा चेहरा पडलेला होता... तिचा चेहरा बघून मी वैतागलो होतो पण कसतरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं.. मिनाक्षी थातुरमातुर कारण सांगून रामाला घेऊन निघत होती.. पण तेव्हाच सोनियाने तिच्यावरच ओरडायला सुरुवात केली.. केवळ अर्धा तास थांबण्यासाठी आली होती ते ही मीनाक्षीसाठी म्हणे... म्हणजे मी चु@"#... ती ऐकतच नव्हती.. मला आणि रामाला दारू प्यायलेल बघून तिला थांबायचच नव्हतं... मीनाक्षी रामा दोघेही परोपरीने तिला दोन मिनिट ऐकून घे म्हणून समजावत होते... तरीही तिला किंमत शून्य.. मी घाईने तिचा हात पकडला, तिला माझ्याजवळ खेचली आणि त्या दोघांना निघून जायला सांगितलं... मला बेस्ट लक विश करत खिदळत ते दोघेही तिथून निघून गेले... आणि मी सोनियाकडे मोर्चा वळवला... माझ्या हाताच्या विळख्यात असूनही ती बरीच धडपड करत होती.. मागचा पुढचा विचार न करता तिने माझ्या मानेचा चावा घेतला... आता माझा संयम सुटला.. आधीच बिअरची नशा माझ्या डोक्यात चढली होती.. त्यात इतके दिवस रात्र मी जिचा विचार केला ती मर्जीविरूध्द का होईना माझ्या मिठीत होती.. आणि सुटण्याच्या धडपडीत माझ्या मानेला चावा घेऊन तिने मला चेतवल...हीच संधी होती तिला माझी बनवायची...एकदा तिच्या शरीरावर हक्क मिळवला की तिचा माज आपोआप शरणागती पत्करेल "

" स्त्री म्हणजे वाटत काय रे तुला..." अनिकेतच्या हाताचा अजुन एक ठसा त्याच्या गालावर उमटला. ह्याखेपेस चांगले दोन दात तुटून बाहेर उडाले. असह्य वेदनेने तो किंचाळला. पण केवळ माणुसकी म्हणूनही कोणी दया दाखवणार नव्हतं. " काय केलंस पुढे तीच.."

" मला मिळालेली संधी सोडायची नव्हती... अजिबात.. मी तिला जबरदस्ती बिअर पाजली.. त्या नशेतही ती धडपडत पळायचा प्रयत्न करत होती... ती जितक्या त्वेषाने विरोध करत होती मला अजुन हुरूप मिळत होता... तिची प्रत्येक कृती माझ्यातील पुरुषत्वाला आव्हान देत होती... तिला मिळवण्याची माझी तहान वाढत होती... तिच्या शरीराचा इंच न इंच माझ्या ओठांनी शोषत मी माझी तहान भागवत होतो.. "
" तू जे केलंस त्याला बलात्कार बोलतात.." अनिकेत भडकला.

" तिने जर विरोध केला नसता तर मला जबरदस्ती नसती करावी लागली.." त्याने निर्लज्जपणे उत्तर दिलं. त्याच बोलणं पूर्ण होत न होत तोच फाडकन त्याच्या कानाखाली जाळ उठला. एव्हाना थोड्या कमी झालेल्या वेदनेने अजुन पेट घेतला. नुकत्याच उफाळल्या दुखण्याने त्याला विव्हळणेही जमेना.

" तुझा पुरुषी अहंकार दुखावला गेला म्हणून बलात्कार करून मारून टाकलस तिला...?" अनिकेतच्या डोळ्यात आसू साचले होते.

" मजा घ्यायची सोडून ती मूर्खासारखी ओरडत होती. तिच्या ओरडण्याने माझा मूड ऑफ होत होता... जे लग्ना नंतर करणार ते लग्नाच्या आधी करत होतो बास्स... त्यातही तिला प्रॉब्लेम...तिचा अडथळा करणार तोंड मी बंद केलं आणि तिच्यात झोकून दिलं.... आता ती माझी झाली होती... तीच रक्त गेलं म्हणून मी खूप खूष होतो.... पण एवढासा आवेगही तिला सहन झाला नाही.. त्या नादात कधी तिचा प्राण गेला कळलंच नाही... आता त्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होत... मी राम्याला कॉल करून बोलावलं... असच प्रेत सोडून दिलं तर फसून जाऊ.. म्हणून आयडिया केली..."

" दीपकला सांगून ती कुऱ्हाड मागवली आणि मृतदेहाचे तुकडे करून डोंगरमाथ्यावर विखरून दिले... बरोबर...?" अनिकेतचा प्रश्न.

" हो.. म्हणजे दीपक स्वतः कुऱ्हाड घेऊन आला... पण तीच नग्न अंग पाहून त्यालाही कंट्रोल होईना... राम्या तर तसाही उपाशीच होता... व त्या प्रेतावर आता मी काय अधिकार गाजवणार म्हणून मी ही काही बोललो नाही.. पाळीपाळीने त्यांनीही तिचा उपभोग घेतला... तिघांनी मिळुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले... खरतर ते जाळून टाकायचे होते... परंतु कितीही बिअर ओतून काडी मारली तरी ते जळेनात... म्हणून मग गोण्या आणून त्यात भरून फेकून दिले... सगळीकडे पसरलेल रक्त तीच बिअर आणि पाणी ओतून मातीत मिसळवून टाकलं... तिचे कपडे, आमच्या अंगावरचे कपडे सगळ दीपककडे विल्हेवाट लावण्यासाठी दिलेलं... पण त्या माद#*@ने स्वतःकडे ठेवून दिले... म्हणून तुम्हाला सुगावा लागला.."

" मारलस ते मारलस... वरती तिची चेनही विकून आलास..." अनिकेतच्या हाताचा तडाखा ह्यावेळी त्याच्या पोटात बसला होता. त्या मारासोबत तो रक्त उलटला. मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे विकृत भाव तसेच होते... पण थोडे रक्ताळले होते..

" सोनिया तर मेलेली... तिची ओळख पटवेल म्हणून चैन तर नष्ट करायला हवी होती... अस तस फेकून देण्यापेक्षा चैन विकून आलेल्या पैशातून पुढच्या काही दिवसांची सोय तरी होईल म्हणून मग ती चेन नीट धुवून तालुक्याबाहेर विकून आलो.. पण साला तोपण नीच निघाला... माद*#@.." येवढं सगळ स्वतःच्या तोंडाने कबुल केल्यावरही त्याला स्वतःच्या करतुदीवर पश्चात्ताप अजिबात नव्हता.

" पण मिस्टर अमित राणे... त्या दिवशीच तक्रार नोंदवायच्या दिवशीच तुझं नाटक..." देसाई उभे राहून टाळ्या वाजवू लागले..." क्लास होत क्लास एकदम... आम्हाला वाटलं सोनियाच्या वियोगात तुलाच काहीतरी होईल.."

" बर तुझे साथीदार, घरवाले आणि सोनियाचा परिवार सगळे आत आहेत. ऐकलंय त्यांनी सगळ.. त्यांच्या नजरेतील तुझ्यासाठीची घृणा हीच तुला मिळणारी सगळ्यात मोठी शिक्षा आहे.." देसाईंनी आतील सर्वांना बाहेर बोलावलं. सर्वांच्याच डोळ्यात आसू होते.... कोणाच्या डोळ्यात समाधानाचे तर कोणाच्या पश्चात्तापाचे...

" तुझ्यावर विश्वास ठेवून आमच्या पोरीची गाठ तुझ्याशी बांधायला निघालो होतो आम्ही..." सोनियाच्या वडिलांना हुंदका अनावर झाला. ".. पण तूच... जराही विचार नाही केलास आमच्या पोरीचा, आमचा, तुझ्या आई वडिलांचा... माझीच चूक झाली... आम्ही पोरींच साधं मत ही न विचारता, तिच्या भावना न समजता सरळ लग्न ठरवतो..का तर जबाबदारीपासून मुक्त होण्यासाठी...चूक तुझी नाहीये... माझी आहे.. माझ्या हाताने मी माझ्या पोरीला कसायाच्या दारात बांधली.. कत्तल तर होणारच... तिचा खरा गुन्हेगार तर मी आहे...तिच्या चेहऱ्यावर दिसणारी नाराजीच कारण समजून घेण्यास असमर्थ ठरलो.. मला शिक्षा द्या साहेब... " त्यांनी अनिकेतचे हात पकडले आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागले.

"पोरी जन्माला आल्यापासून आपण त्यांना फक्त जबाबदारी समजतो. आणि मग पुढची वर्ष तिच्या भविष्यापेक्षा लग्नाचीच चिंता.. एकदा लग्न करून दिलं की सुटका होते.. पुढे मग काहीही होऊदे.. ती आणि तीच नशीब हाच पवित्रा असतो आपला..याउलट मुलाच्या बाबतीत किती सजग असतो. पोरांच्या पोरांची लग्न झाली तरी आपल्याला आपल्या पोराची काळजी.. आपल्या आधीच्या पिढीची हीच विचारसरणी घेऊन पुढे घेऊन आपणही चाललोय की मेंढरांसारखे.. मग ह्याच संस्कारात वाढलेल्या ह्या तरुण पोरांकडून काय अपेक्षा करणार..." देसाईंनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली.

" बरं अनिकेत...." देसाई पुढे बोलू लागले. " आपल्याला काय वाटलं की किती प्लॅन करून मर्डर केला आहे. हुशार असतील हे लोक... पण नाही... ह्यांचं नशीब जोरावर होत त्या दिवशी... पुरेपूर साथ दिली होती ह्याची...घराचे फोन काय काढून घेतात..ह्याच रिचार्ज काय संपत..मस्त एकदम.. परंतु कर्म तैसे फळ... गुन्हा कधी ना कधी बाहेर पडणारच ना..."

" बर अमित, तू तर तेव्हाच पकडला गेला होतास जेव्हा आम्हाला चेनची खबर मिळाली... मी निशासोबत बोललो तेव्हा एक गोष्ट कळली की सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या गळ्यातील चैन नाहीये.. तो धागा पकडून आम्ही सगळीकडे शोधाशोध करत होतो... परंतु आम्हाला अपेक्षित अस काहीच मिळत नव्हतं... मात्र त्या दिवशी जेव्हा तू चेन घेऊन गेलास तेव्हा त्या सोनाराला तुझ्यावर संशय आला... चेनच्या आकड्यामध्ये अजूनही रक्ताचे डाग होते.. म्हणूनच तुझी बोळवण करत त्याने तडक पोलिसांना फोन केला आणि तिथेच तू अडकलास..." अनिकेतने एका दीर्घ श्वास घेत पुढे बोलायला सुरुवात केली." पण मला एक प्रश्न आहे... तू इतक्या सहजपणे कसं काय सांगितलं सगळं... " अनिकेतने अमितकडे वळत विचारलं. कधीपासून त्याच्या डोक्यात हाच प्रश्न घोळत होता.

" ते चु#*@ मला फसवत होते ना... ह्या रामाला मित्र समजलो पण त्या भा*#@ने मलाच बदनाम करायचा घाट घातला... हे पुरावे दीपकनेच मिळवून दिलेत ना.. सगळ ओकुन टाकलं असेल त्याने.. दोघांनी सगळी स्टोरी रंगवून सांगितली असेल पण स्वतःच बुड नीट ठेवलं असेल..." त्याच्या प्रश्नावर अनिकेतने नकारार्थी मान डोलावली." ह्यांनी तर मला पार गुंतवून ठेवलं ह्या प्रकरणात...मग त्यांना ना*#@ करायला नको..."

" हमम्म... शहाणा आहेस खूप..." अनिकेतने स्वतःच्याच विचारात जोरजोरात मान डोलावली. "आता थोड शहाणपण तिकडे जेल मध्ये दाखवा... तुमच्यापैकी प्रत्येकाला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. तुमच्यापैकी कोणीही सुटता कामा नये...पुढच्या गोष्टींवर आता कोर्टात चर्चा करू.." अनिकेतने देसाईंच्या साथीने केस जरी लवकर सोडवली असली तरी त्याच सार लक्ष आता कोर्टाच्या सुनावणीवर होत. त्यांच्या दृष्टीने तपास लागला तरी गुन्हेगाराला शिक्षा ही कोर्टातच होणार होती.
__________________

" इथे का आणलय मला..." अनिताने थोड भितच रोहनला विचारलं. कुठल्याशा साधारण रिसॉर्ट भासणाऱ्या लॉजमध्ये होते ते दोघे. बाहेरून दिसायला बऱ्यापैकी असल तरी अनिता घाबरली होती. रोहन तिला सरप्राइज डेटवर घेऊन आला होता. रोहनसोबत फिरायला जायचे म्हणून ती अंमळ जास्तच तयार होऊन आली होती. आजचा दिवस त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला सुख दुःखाच हितगुज करायचय होत. परंतु अचानक तो तिला अशा ठिकाणी घेऊन आला ह्याची तिने कल्पनाही केली नव्हती. तिच्या डेटच्या संकल्पनेत हे अस एखाद्या रुममध्ये चोरून भेटणं बसत नव्हतं आणि रोहनकडून हे वागणं अपेक्षित नव्हतं.

" तुझ्यावर प्रेम करायला..." रोहनने हळूच तिला मिठीत खेचलं. आजवर रोहनची मिठी तिला हवीहवीशी वाटायची पण आत्ता त्या खोलीत तिला ते सगळं नको होत.

" रोहन.." ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण रोहनने आपला हात तिच्या तोंडावर ठेवून तिला गप्प केलं. तरीही ती डोळ्याने त्याला थांबण्याचे इशारे करू लागली. मात्र त्याकडे कानाडोळा करत रोहनने मिठी अजुनच घट्ट केली आणि तिच्या डोळ्यांवर आपले ओठ टेकवले. क्षणभरासाठी ती ही त्याला बिलगली. आजवरच्या आपल्या प्रेमाचं सार्थक झाल्यासारख वाटू लागलं. आपण उगाचच त्याच्यावर संशय घेतला म्हणून तिच्या मनाने तिला टोकल.

तिच्या ओठांवरील त्याचा हात हळू हळू खाली सरकू लागला. त्या स्पर्शाने ती शहारू लागली. तिने आपले डोळे घट्ट मिटले. ती अनुभूती अभूतपूर्व होती. त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता... त्याचा हात तिच्या शरीराची वळणं चाचपडू लागला... ती भानावर आली... हे सगळं तिला हवं होत पण...

" रोहन आता नको ना प्लीज..." तिने कळवळून विनंती केली.

" का...?" त्याने नाराजीने विचारलं.

" हे सगळं लग्नानंतर करुया ना... प्लीज..."

" लग्नाचं नंतर बघू पण आधी तुला बघू तर दे..." त्याने तिला मिठीत गच्च आवळल. तिच्या होकार नकाराची वाटही न बघता तो चालू झाला. तिचा विरोध घशातच अडकला. त्याच्या वासनेपुढे तिचा प्रतिकार अपुरा पडत होता. रोहनच्या त्या किळसवाण्या स्पर्शाने तिला ओकारीच येत होती की तिच्या तोंडावर त्याचा हात पडला... तिचा श्वास गुदमरत होता... आणि प्रत्येक धक्क्याबरोबर त्याचा पुरुषी अहंकार सुखावत होता. तिच्या ओटीपोटातून वेदनेच्या लाटा वाहत होत्या. पश्चात्तापाने रडून रडून तिचे डोळे कोरडे पडले. घाबरलेली तिची छाती धापापत होती. तिने काहीतरी मनाशी ठरवलं... ते चूक की बरोबर हे विचार करायला तिच्यापाशी वेळ नव्हता... पण ते करायचंय होत.

तिने आपला डावा हात त्याच्या उघड्या पाठीवर फिरवत त्याच्या मानेला कवटाळल. तिच्या स्पर्शाने तो मनातच सुखावला. तिने त्याच्या केसात हात फिरवत त्याचा घामेजलेला चेहरा आपल्या ओरबडल्या गेलेल्या उरोजामध्ये दाबला. तिच्या प्रतिसादाने त्याच्या भावना उचंबळून आल्या.. त्याचा वेग वाढत होता.... तिने उजवा हात हवेत उंचावला. तिच्या हातात काहीतरी चमकल. तिची फेवरेट हेअर क्लिप होती.... चंदेरी रंगाच आणि चमकीच डिझाईन केलेली... तळहाताएवढी लांब आणि दुसऱ्या टोकाकडे निमुळती होत गेलेली... स्टीलची असल्याने तशी महागच होती पण तिला आवडणारी प्रत्येक गोष्ट तिच्याकडे असली पाहिजे हा तिचा हट्ट.. मग काय ही क्लिप पण आली तिच्या कलेक्शनमध्ये... आज डेटवर जायच्या निमित्ताने तिने तिची स्पेशल क्लिप लावली होती... तिने दोन क्षण श्वास रोखले...डोळे गच्च मिटले... तिचा हात किंचितसा थरथरला... आणि.... त्याची किंकाळी त्या रिसॉर्टभर घुमली...गरम रक्ताची चिळकांडी उडाली... तिच्या क्लिपच्या चमकदार निमुळत्या टोकाने त्याच्या मानेचा वेध घेतला होता...

समाप्त