Ek chukleli vaat - 7 in Marathi Moral Stories by Vrushali books and stories PDF | एक चुकलेली वाट - 7

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

एक चुकलेली वाट - 7

एक चुकलेली वाट

भाग - ७

जुनाट लाकडी खुर्चीवर ती भेदरल्यासारखी बसून होती. वाऱ्याने अस्ताव्यस्त होऊन क्लिपमधून बाहेर निघालेले केस उनाड पोरांप्रमाणे वाऱ्यावर स्वार होते. कपाळावरून ओघळणारे घामाचे ओघळ तिच्या मानेवरची वळणं पार करत तिच्या घट्ट चिकटलेल्या कपड्यांमध्ये विरून जात होते. खांद्यावरून ढळलेली ओढणी नीट करायचही तिला भान नव्हतं. आपली चोरी पकडली गेल्याने निमुटपणे आपला गुन्हा कबुल करण्यावाचून तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता.

आज अनिकेतसोबत मोरेबाईही होत्या. आपली भूमिका त्यांच्या हातात देऊन अनिकेत खुर्चीवर मस्तपैकी रेलून हातातील चणे संपवत होता.

" मिसेस मोरे... हं..." ऐटीत मान किंचितशी डोलवत त्याने मोरेबाईंना इशारा केला. मोरेबाई एखाद्या हरहुन्नरी कलाकारासारख्या आपल्या प्रवेशासाठी तयारच होत्या.

" मीनाक्षी बाई.... सगळ खर खर बोला बर...." मोरेबाईंनी मीनाक्षी कडे पाहत विचारलं.

" काय.. म्हणजे.." तिला बचावाचा प्रयत्न करायचा होता.

" बघ तू जास्त काहीतरी पकवायच्या आधी मीच काहीतरी सांगते..म्हणजे बघ तू सोमवारी कॉलेजला आली नव्हती पण तुझ्या घरच्यांकडून समजलंय की तू कॉलेजला गेलेलीस. आता कॉलेजच्या नावाखाली कुठे गेलेली ते जरा तुझ्या वडिलांनाच सांग ना.." मोरेबाईंनी इशारा करताच इतका वेळ आतल्या रूममध्ये बसून असलेले मीनाक्षीचे वडील बाहेर आले. नक्की काय चाललंय हे माहीत नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव जाणवत होता. अशा परिस्थितीत पोलीस स्टेशनला येणं त्यांनी स्वप्नातही पाहिलं नसावं.

" मिने... खर सांग ना त्यांना तू कॉलेजलाच होतीस ना सोमवारी..." आपले जड झालेले श्वास सावरत शक्य तितक्या कणखर आवाजात त्यांनी दरडावल. आपल्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये पाहून ती आधीच गर्भगळीत झाली. खर ही बोलू शकत नाही आणि काही लपवण्याची संधीच नव्हती...आजवर सर्वांशी बोललेल्या सगळ्या खोट्याचा हिशोब तिला आता पूर्ण करायचा होता. पण तिची लडलड करणारी जीभ तिला साथ देत नव्हती.

" मिने.. मी काय विचारतोय..." तिच्या वडिलांच्या स्वरात धाकाच्या जागी कातरता होती. अत्यंत व्याकुळ नजरेने आपल्या मुलीकडे पाहत ते तिच्या निर्दोषपणाची भिक मागत होते. त्यांना पुढे काहीतरी बोलायचं होत पण गळ्यात अडलेल्या आवंढ्यामुळे पुढचे शब्द गळ्यातच विरून गेले.

तिच्या चेहऱ्यावर प्रचंड पश्चात्ताप दाटून आला. आपल्या वाघासारख्या बापाला आपल्यासमोर विनंती करताना पाहून तिला स्वतःला अजुन रोखणं अशक्य होत. स्वतःच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकून अश्रू ढाळण्याखेरीज ती काहीच करू शकत नव्हती. पंख्याच्या करकरीपेक्षा तिथल्या सर्वांचेच वाढलेले हृदयाचे ठोके जास्त स्पष्ट ऐकू येत होते. तिच्या बापाने तर तिच्या तोंडून निघणार वाक्य न वाक्य ऐकण्यासाठी आपले सगळे प्राण कानात एकवटले होते.

" माझं चुकलं बाबा... मी खोटं बोलली.."

तिचा बाप नुसत्या एका वाक्यानेच उभा उभा कोसळला. आजवर गाठीशी बांधून ठेवलेल्या अभिमानाचा घडा क्षणात फुटला. शरीरातुन प्राण काढून घेतल्यासारख त्यांचं सार अंग लुळ पडल.

" शिंदे पाणी आणा पटकन..." अनिकेतने धावत जात त्यांना सावरलं. चेहऱ्यावर पाणी शिंपडल्यावर ते जरासे शुद्धीत आले पण याहून जास्त सहन करण्याची ताकद त्यांच्यात उरली नसावी. अनिकेत आणि शिंदेंनी धरून त्यांना कसबस गाडीत बसवलं. शिंदेंसह परब त्यांना घेऊन डॉक्टरकडे रवाना झाले. मीनाक्षीला पुढे जाऊन वडिलांना सावरायची हिंमतच होत नव्हती. ती स्वतःच्याच नजरेत पार उतरली होती.

" खूप मोठी चूक झालीय माझ्याकडून..... " आपल्या हाताच्या ओंजळीत आपला रडून सुजलेला चेहरा लपवत ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली.

" नक्की काय झालेले मीनाक्षी त्या दिवशी...?" अनिकेत रागाने ओरडला. तिच्या वडिलांची झालेली अवस्था पाहता केवळ एक मुलगी म्हणून तिच्यासाठी स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याएवढा ही आदर त्याच्या मनात उरला नव्हता.

" मी आणि रामा बरेच महिने एकमेकांसोबत आहोत... तो रामाचा मित्र आहे म्हणून त्याची आणि माझी ओळख... खूप आधीपासून तो सोनियाच्या मागे होता... सोनिया सतत माझ्या सोबत असायची म्हणून तिच्याशी जवळीक साधायला तो सारखा माझ्या मागे भुणभुण करायचा... सोनिया मुंबईवरून आलेली... गोरीपान, सुंदर... सगळे मुल तिच्याच मागे असायचे... आणि ती मात्र कोणाला ढुंकनही पहायची नाही... अशात त्याच्यासोबत ओळख करून देणं म्हणजे निव्वळ अशक्यप्राय गोष्ट होती... पण ते करणं गरजेचं होत.. "
" गरजेचं.. का?" अनिकेतचा प्रश्न.

" जर सोनिया त्याच्यासोबत रिलेशनमध्ये असेल तर दोघीही त्याला आणि रामाला एकत्र भेटू शकतो. सोनियासोबत आहे अस सांगितल तर घरचेही निश्चिंत राहतील. व कधी त्यांनी सोनियाला काही विचारलं तरीही ती माझ्याच बाजूने बोलेल. म्हणून कसही करून त्यांना एकत्र आणण आवश्यक होत. " तिने एक सुस्कारा सोडला.

तिच्या उत्तरावर अनिकेत हलकेच हसला. " पुढे काय झालं मग...?"

" शुक्रवारपासून रामा आणि तो दोघेही बाहेर फिरायला जाऊया म्हणून मागे लागलेले.... त्या निमित्ताने सोनिया आणि त्याची भेट होईल आणि त्याला आपल्या मनातील तिला सांगता येईल. "

" लवगुरुच काम करत होतीस...?" अनिकेतने तिरकसपणे विचारल.

" माझा प्रामाणिक विचार होता त्यांच्या एकत्र येण्याबद्दल.." ती हळूच उत्तरली. त्यातल्या त्यात तिने स्वतःची बाजू सावरायचा एक निष्फळ प्रयत्न करून बघितला.

" स्वार्थी विचार होता..." अनिकेतने स्वार्थी शब्द जास्तच जोराने उच्चारला.

" त्यात काय... " तिने थोड्या बेफिकिरीने म्हटलं.

" पुढे बोल.." अनिकेतने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं.

" मी सोनिया समोर फिरायला जायचा प्रस्ताव तर ठेवला. पण तिला यायचं नव्हतं.. बर नाही दिसत... लोक काय म्हणतील वगैरे... तिच्या काकांच्या घरीदेखील गेलेली समजवायला... पण ऐकतच नव्हती.. त्यात त्याने मला चॅलेंज केलेलं तिला घेऊन यायचं.. मग मी ठरवलं.... तिला काहीही करून घेऊन जायचच.. पण नेमक सकाळी आईशी भांडण झालं आणि तिने फोन काढून घेतला... एका अर्थी बर झाल सारखी फोन करून त्रास तर देणार नव्हती... मग पीसीओ हा एकच ऑप्शन होता माझ्यासमोर संपर्कासाठी..."

" मग तू निघताना तिला आणि रामाला दोघांनाही कॉल केलास... नंतर तालुक्याला उतरल्यावर पुन्हा त्यांना तू आल्याचं इन्फॉर्म केलस.."

" हो.. सोनियाला शॉपिंगच कारण सांगून सोबत घेतल... तो दिवसच कदाचित वाईट होता तिच्यासाठी... सतत नाही नाही म्हणणारी ती लगेच यायला तयारही झाली... थोडीफार शॉपिंग आवरून तिला शपथा देऊन कसतरी तयार केलं पहाडीवर यायला.. ती फक्त अर्धा तास थांबणार होती फारतर... त्याच अटीवर आली होती... "

" मग... तिची अट पाळलीस की नाही..." अनिकेतने पुन्हा तिरकस प्रश्न केला.

तिने ओशाळून अजुनच मान खाली घातली.

" त्यांना एकांत द्यावा आणि आम्हाला एकांत मिळावा म्हणून आम्ही दोघं... म्हणजे मी आणि रामा तिथून दुसरीकडे गेलो... ती तर ऐकतच नव्हती पण कसतरी समजावून आम्ही निघालो तिथून...."

" तुम्ही दोघं कुठे होता..?"

" आम्ही दोघं बरच दूर होतो.... आमच्या एकांतात कोणाची बाधा नको म्हणून दूरची जागा शोधली... पण त्या दिवशी माझा अजिबात मूड नव्हता... सारखं काहीतरी होईल ह्याची धास्ती वाटत होती...त्याच नादात मला रामाच्या कोणत्याच कृतीला प्रतिसाद द्यायचही भान उरलं नव्हतं... माझ्याकडून अशी थंड प्रतिक्रिया अपेक्षित नसल्याने रामा फार चिडला.. त्यावरून आमच्यामध्ये भांडण झालं आणि रागाच्या भरात मी तिथून निघाली... मात्र त्या नादात.. माझ्यासोबत सोनियादेखील आहे हे मी पूर्णच विसरून गेली.. आणि पुढच्या आलेल्या बसने मी घरी निघून आली..." तिने बिचकत एकवार मान उंचावून सर्वांकडे पाहील. अनिकेतची निखाऱ्यासारखी तप्त नजर पाहून तिला त्याच्याकडे पाहायची हिम्मत काही होईना. माणूस म्हणून त्याच्या नजरेतून प्रतीत होणारी तिच्याबद्दलची घृणा तीच्याने पाहवेना.
______________________________________________

" अजुन कुठे यायचंय..." आपल्या वैतागावर काबू ठेवत त्याने विचारलं. काल ती भेटायचं बोलल्यापासून त्याच्या उत्साहाला बरच उधाण आलेलं. तिला भेटायला पूर्ण तयारीनिशी लवकर निघाला. परंतु ती नुसतीच दिशा सांगत होती... भेटायच्या जागेच नाव तरी सांगायचं..लगेच पोचायला झाल असत... पण जाऊदे... मला तरसवण्याची शिक्षा तिला मिळेलच... तो गालातच छद्मी हसला आणि तिने सांगितलेल्या दिशेने गाडी वळवली.

दोनच मिनिटात तिने सांगितलेल्या जागी तो पोचलाही. गाडी तशीच पार्क करत पळत पळत त्याने कसतरी पाहिलं मजला गाठला. सगळ्या रूम समोरासमोर असून मधल्या मोकळ्या जागेत बराचसा काळोख होता. अर्धवट फुटलेल्या फरशीवर चाचपडत पाय ठेवत त्याने मोबाईलचा टॉर्च चालू केला. त्या प्रकाशात त्याने चहूबाजूंनी नजर फिरवली. त्याला हवा असलेला नंबर सापडला. दरवाजा ठोकावणार इतक्यात त्याला कोपऱ्यात काहीतरी हालचाल जाणवली. त्याने सहजच मागे वळत कोपऱ्याच्या दिशेने पाहिलं... काहीच नव्हतं.. पण त्याला घाई होती. त्याने गडबडीने दरवाजा लोटला. दरवाजा उघडाच होता. आत जात त्याने पटदिशी कडी लावली. त्याच्या मनातल्या अनावर झालेल्या भावना उफाळून येऊन त्याच्या नजरेतून बरसत होत्या.

ती मात्र हरिणीसारखी लटकेच घाबरून कोपऱ्यात उभी होती. अंधुकशा प्रकाशात तिच्या पापण्यांची मोहक हालचाल त्याला भुरळ घालत होती. तिच्या शरीराचा कमनीय बांधा त्याच्या अंगावर रोमांच फुलवत होता. तिचा तो नुकताच उमललेला देह आपल्या हातात चुरगळून हुंगायला तो कामातुर झाला होता. भुकेल्या वाघाने आपल्या भक्षावर झडप घालावी तशी त्याने तिच्यावर झेप घेतली. तिला विचार करायला अवसरही न देता तिच्यावर तुटून पडला होता. त्याच्या धसमुसळेपणाने जुनाट पलंग आपली किरकिर करू लागला. परंतु त्याला आता कशाशीच काहीच घेणंदेणं नव्हतं. आपल्या अंगाअंगात भडकलेली आग शांत करणं त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं होत.

तिच्याशी झटापट करण्याच्या नादात त्याच्या पाठीला कशाचातरी स्पर्श झाला. त्या अचानक झालेल्या स्पर्शाने त्याच्या डोक्यात स्वार असलेली धुंदी झटकन ओसरली. मनात नसतानाही तो भानावर आला. काय आहे ते पाहण्यासाठी तो मागे वळला.... मागे पाहताच.... भीतीची एक लहर सरकन त्याच्या अंगातून लहरून गेली. क्षणापूर्वीच्या धुंधीचा विसर पडून हातपाय लटलट कापू लागले. घशाला कोरड पडून त्याला बोलता येईना.

" पुढच्या गोष्टी आपण पोलीस स्टेशनला जाऊन बोलूया.." त्याची कॉलर पकडत अनिकेतने त्याला दरवाजाच्या दिशेने खेचले.

______________

पोलीस स्टेशन रोजच्या इतके शांत असले तरी सर्वांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर खळबळ माजवत होती. देसाई शांतपणे खुर्चीत बसून असले तरी त्यांची जळजळीत नजर त्यांच्या मनाचं चित्र स्पष्ट करत होते. त्याच्या मागे उभे राहून शिंदे तर अगदी थर्ड डिग्री द्यायच्या तयारीत होते. परब मात्र हाताची घडी घालून चुळबुळत उभे होते. खुर्चीत बसलेला तो आपला शेवट समजून चुकला होता. त्याच्या घामेजल्या कपाळावर घडी पडलेल्या आठ्या त्याची व्यथा सांगत होत्या. नजर वर उचलून पाहण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. इथून कुठून पळून जायला वाव नव्हता. आणि वाचण्यासाठी कोणाला कॉलही करता येणार नव्हता.

" चला, आता तुम्हाला त्या दिवशी नक्की काय घडलं ते विस्तृतपणे सांगायचंय.... " हातातील चहाचा कप सावरत समोरच्या खुर्चीत बसत अनिकेतने त्याला चुचकारल. उत्तरादाखल त्याने केवळ मान उचलून अनिकेतकडे पाहिलं.

" तुझं तर सोनियावर भरपूर प्रेम होत अस ऐकलंय... आणि तुला लग्नही करायचं होत म्हणे..."

" तुला सोनियासोबत लग्न करायचं होत...?" मध्येच सारिका ओरडली. तिला तर अर्धसत्य माहित होत. आपल्यासोबत लग्नाच्या आणाभाका घेणाऱ्या त्याला दुसरीच कोणी आवडते हे ऐकूनच ती हैराण झाली. तिच्या अशा ओरडण्याने तो मात्र कात्रीत सापडला. पोलिसांसोबत तीही फाडून खायच्या तयारीत होती.

" बोला..." अनिकेतने कुस्तितपणे डिवचल.

" हो.." समोर काहीच मार्ग न उरल्याने त्याने हताशपणे मान्य केलं.

" वाह... त्याच्या आधीपासून तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतास तर.. ती आपल्या आयुष्यात येऊन साधारण वर्ष झालं असेल.. पण मी... मी आधीपासून तुझ्यासोबत होती ना.. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे केली... तुझ्या खुशीसाठी मी स्वतःला तुझ्या हवाली केलं... तुला पैसाही पुरवला... आणि तू फक्त माझा वापर केलास... तुझ्या गरजा पूर्ण करायला... आणि तिच्यासोबत लग्न ठरवलं... कधी प्रेम झाल तिच्यात आणि तुझ्यात... मीपण तर तिथेच होती ना... माझ्या डोळ्यातील खर प्रेम कधीच नाही दिसलं का तुला... आणि तिच्याशी लग्न ठरलंय तरीही मला वापरत होतास ना तू... त्यादिवशी ही मला मावशीच्या गावी यायला सांगितलं ना... पण तू काही आलाच नाही.. तेव्हापासून तुझ्या भेटीसाठी तडफडत होती.. पण भेटलास तर हे कडवट सत्य समोर उभ ठाकलय..." तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. हुंदके देत बोलताना मध्येच श्वास कोंडत होता. सलग बोलल्याने तिचा घसा सुकुन खोकला लागला. मोरेबाईंनी पुढे होत तिच्या हाती पाण्याचा ग्लास दिला.

" सोनियाने अस काय केलं होत तुझं की तू तिच्याशी अस वागलास..?" देसाई पुढे होत त्याला विचारते झाले.

" कसं..?" घाबरलेल्या डोळ्यात शक्य तितका भोळेपणा साठवत त्याने उलट प्रश्न केला.

अनिकेत सावकाश जागेवरुन एका जुन्या लाकडी कपाटाकडे वळला. त्यावरील गंजलेली कडी खोलत थोड्या जोराने दरवाजा ओढला. जुन्या दुखण्याने विव्हळावा तसा तो दरवाजा कुरकुरला. आतल्या खणातून काही प्लास्टिक बॅग काढून त्याच्या पुढ्यात टेबलवर ठेवल्या. " आता बोल..."

टेबलवर पसरलेल्या बॅगांमधल्या वस्तू पाहून तो अजुन घाबरला. त्याच्या तोंडून काही शब्दच फुटेना. रक्ताचे डाग असलेले टी शर्ट, रक्ताने माखलेला रुमाल आणि एक सोन्याची चैन... आपले मोठाले डोळे फाडफाडून तो आळीपाळीने तो प्रत्येक वस्तूकडे पाहत होता.

" आता तू सत्य बोलणं अपेक्षित आहे... बोल.." अनिकेत फिरून त्याच्या बाजूला उभा राहिला.

" त.. ते..." त्याच अंग घामाने डबडबून निघाल. " मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.." तो अगदी नाटकीपणे उत्तरला.

त्याच्या उत्तरावर चिडून देसाई पुढे झाले. काय होतंय ते कळायच्या आत तो सुन्न होऊन खुर्चीतच पडला. त्याची किंकाळी सर्वांच्या कानाचे पडदे फाडत विरून गेली. देसाईंच्या हाताचा मार त्याच्या दोन्ही गालांवर पडला होता. त्यावर रुतलेले हातांचे वळ ठसठसून उठून दिसत होते. ओठाचे दोन्ही कोपरे फुटून त्यातून रक्त वाहत होत. आपले दोन्ही हात एकमेकांत गुंफत त्यांनी आपली बोट मोडली.

" बोल आता... मग तुझे सगळे गैरसमज दूर करतो.." त्याची कॉलर खेचत देसाईंनी आपली खुर्ची त्याच्या जवळ ओढली.

तो मात्र अजूनही टेबलवर निपचित पडून होता. गालावरच्या माराच्या वेदना कानाकपाळापर्यंत पोचल्या होत्या. मानेपासून मेंदूपर्यंत वेदनेच्या लहरी पसरल्या होत्या. त्याच्या नजरेसमोर अंधार पसरत होता. हळूहळू कानावर येणारे शब्द दुरून आल्यासारखे भासू लागले. अर्धवट उघड्या डोळ्यांसमोर पांढरा पडदा ओढला गेला.... कोणीतरी त्याच्या पाठीवर मारत होत... कोणी डोक्यात मारत होत.. कुठे तरी वेदना जाणवत होत्या... पण आता त्याच्या मेंदूला जाणीव होत नव्हती...
_________________

" आपण कुठे चाललोय....?" रोहनच्या पाठीवर अगदी प्रेमाने मान टेकवत अनिताने विचारलं.

" चाललोय कुठेतरी... सरप्राइज..." त्यानेही अगदी रोमँटिक पद्धतीने उत्तर दिले.

" ओहह... सरप्राइज ते ही माझ्यासाठी... निशाला विसरलात वाटतं...." त्याला मुद्दाम चिडवण्यासाठी अनिताने निशाचा विषय काढला. परंतु तिच्या वाक्यावर रोहनकडून काहीच प्रतिसाद आला नाही. तो तसाच आपली बाईक चालवत होता.

" रागावलास.." अनिताच्या बोलण्यातला खोडकरपणा जाऊन तिचा आवाज मृदू झाला.

" नाही... मी तर न्याहळतोय तुला... तुझे उडणारे मऊ केस कसे तुझ्या गालांना स्पर्श करतायत... तुझ्या तालात उघडझाप होणाऱ्या पापण्या... आणि तु अशी मला मिठी मारून बसलीस... उफ अजुन काय पाहिजे आयुष्यात..." पाठीमागे वळत त्याने तिच्या गालांवर हात फिरवला. आजकाल त्याच्या बोलण्यातून निशा हा विषय निघून गेला होता... आणि तो अनिताच्या खूप जवळ येत होता. त्याच्या अशा वागण्याने अनिताही सुखावत होती. कित्येक रात्री देवाकडे तिने रोहनला मागितलं होत... आणि जणू देवाने तीच ऐकल्यासारख रोहनही तिच्या प्रेमात बुडत चालला होता.

" इश्श... " तिने लाजून आपला चेहरा त्याच्या पाठीमागे लपवला.

" किती गोड लाजते यार तु..." त्याच्या बोलण्यावर तर ती निशब्द झाली. त्यांची बाईक वाऱ्याच्या वेगाने शहरातून बाहेर निघाली होती. सळसळणारी शेत आणि माडाच्या झाडातून रुंजी घालणारा वारा जणू त्यांच्या स्वागतासाठी गाणं म्हणत होता. दोन्ही बाजूच्या मोकळ्या शेतातून येणारा वारा तिच्या अंगावर शहारा आणत होता. आणि ती त्याला अजुनच बिलगत होती. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगातून गोड झिणझिण्या उठत होत्या. आपले डोळे मिटून ती शांतपणे त्याच्या पाठीवर पडून होती.

" बोल ना... गप्प का आहेस..." तिला अस गप्प त्याने पहिल्यांदाच पाहील होत.

" उ.. हूं.." तिने त्याच्या पाठीवरच नकारार्थी मान हलवली. त्याच्या मात्र पोटात गुदगुल्या झाल्या.

" बोल ना...." रोहनने हळूच तिला कोपरखळी मारली.

" उम...." तिने आपल तोंड अजुनच त्याच्या पाठीत खुपसल.

" बघ हा आताच बोलून घे.... नंतर बोलायला मिळणार नाही..." रोहन गालात हसत बोलले.

" म्हणजे काय रे...?" तिने आश्चर्याने विचारल.

" काही नाही..."

" सांग ना..." अनिता त्याला विनवणी करत होती. तो मात्र तिची खोडी करत सुसाट वेगाने निघाला....

क्रमशः