Julale premache naate - 71 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-७१

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७१

तिकडे माझे आई-बाबा ही होते. त्यांना बघून मी धावत जाऊन आई-बाबांना मिठी मारली. कदाचित त्यांना घडलेला प्रकार मिस्टर गोखल्यांनी सांगितला असावा. आता वाट बघायची होती ते त्या व्यक्तीची. आणि तो क्षण आला.



एका रूममधे आम्हाला नेण्यात आल. तिकडे एकाला खुर्चीला बांधल होत. तोंड काळ्या कपड्याने झाकेलेलं होत. मिस्टर गोखले आले आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा तो कपडा काढला. आणि ती अज्ञान व्यक्ती आज आमच्या समोर बसलेली होती.



काळे लांब मानेपर्यंतचे केस.. कदाचित गोरा असावा कारण मार खाण्याने चांगलाच लाल झाला होता.. आणि ते डोळे...
त्या डोळ्यांना आधी ही कुठे तरी पाहिल्याचं मला आठवत होत. पण कुठे ते आठवत नव्हतं.


मिस्टर गोखले त्याच्या जवळ जाऊन त्यांनी त्यांचा पोलिसी खाकीपणा दाखवला..

"बोल साल्या... कोण आहेस आणि का त्या पोरीला त्रास देत होतास. सांग नाही तर मारून मारून हाल करेन." अस बोलून त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. हे तर मला बघवल जात नसल्याने मी आईला बिलगले.


"जास्त मारू नकोस आणि तर उगाच माझ्या केला कॉल ने तुझी बदली व्हायची.." आणि तो जोरजोरात हसत राहिला.
हे ऐकून त्यांनी त्याला अजून मारल. तरीही तो काही बोलायला तय्यार नव्हता. शेवटी मीच त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या कानाखाली मारली..


"का केलंस अस.. कोण आहेस तू.. काय मिळालं अस करून.. का त्रास देतो आहेस मला.. सांग कोन आहेस तु.. हे डोळे.. यांना मी आधी ही कुठेतरी पाहिलं आहे..., पण कुठे.....???"


"फाईंड मी प्राजु...." त्याच्या या वाक्यावर मात्र मी माझे डोळे मोठे केले... आणि जोरात ओरडले.. "देवांश"

मी नाव घेताच आई-बाबा ही शोक मध्ये होते.

"देवांश..., तु.. म्हणजे तुला माझा पत्ता कसा सापडला...??" मी जरा घाबरतच विचारल असता तो जोरजोरात हसला.


"अग ज्याचे वडील एसपी असतील त्याला एका मुलीचा पत्ता शोधायला कितीसा वेळ लागेल ना.. तुला मी तेव्हाच बोललो होतो ना.. मी येणार परत.. आणि बघ मी माझ प्रॉमिस पूर्ण केलं. चल आता माझ्या सोबत. मी तुला घ्यायला आलो आहे."



"देवांश तु अजून ही वेडाच आहेस... तुला तेव्हा ही सांगितलं होतं आणि आता ही पुन्हा सांगते मला तु आवडत नाहीस.. आणि मला तुझ्याशी लग्न ही करायचं नाही आहे."
अस बोलतात तो उठण्याचा प्रयत्न करू लागला.. मी लगेच मागे माझ्या आई-बाबांकडे आले..


"कोण आहेत तुझे बाबा...?" मिस्टर गोखल्यांनी त्याला विचारलं. तेव्हा त्याने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि हसत बोलला.. ज्याला तुम्ही रोज सकाळी सलाम करतात ना तो आहे माझा बाप. एसीपी विक्रांत देशमुख. आणि मी त्यांचा मुलगा. आता तुम्ही माझे जे हाल केले आहेत ना आता त्याची फळ भोगा... जेव्हा त्यांना कळेल ना..." आणि तो जोरजोरात हसु लागला.


आम्ही सगळे ही त्या रूमध्ये टेंशनमध्ये होतो. त्यामुळे त्या खोलीचं वातावरण गूढ झालेलं.. टाचणी पडावी एवढी शांतता पसरलेली त्या खोलीत. आणि काही वेळात एक आवाज कानावर पडला. बुटांचा. कोणीतरी आमच्या दिशेने येत होतं. त्या व्यक्तीच्या येण्याने बाहेरच वातावरण चांगलंच बदललं होतं. ती व्यक्ती देवांश चे वडील होते. आता येताच मिस्टर गोखल्यांनी ही त्यांना सॅल्युट मारला....


"गोखले हा सॅल्युट तुमच्याकडे ठेवा. समोर कोण बसला आहे हे माहीत आहे ना. माझा मुलगा आहे. पण अस नका समजू की तो माझा मुलगा आहे. एखाद्या गुन्हेगाराकडुन माहिती काढता तशी त्याच्याकडून काढून घ्या." त्याच्या बोलण्याने आम्ही सगळेच बुचकल्यात पडलो होतो. नंतर ते माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत माफी मागितली..



"प्रांजल बेटा तुझ्या विक्रांत काकाला माफ कर. तेव्हा आणि आता दोन्ही वेळास तुला मी मदत करू शकलो नाही. त्यावेळी त्याच्या आईमुळे मी गप्प बसलो. पण आज त्याला शिक्षा केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे." एवढं बोलून ते आले तसे निघून गेले. हा मोठा धक्काच होता देवांशला. मागून तो ओरडत होता पण ते मागे फिरले नाही आले तसे निघून गेले नजरेआड होईपर्यंत....


"बोल आता सगळं सांग नीट.. तुझ्या वडिलांनी ही आता आम्हाला परवानगी दिली आहे. बोल आता का केलंस... आणि आधी काय केलं होतं तिच्या सोबत ते ही बोल नाही तर इथेच गोळ्या घालीन.." मिस्टर गोखले रागात बोलत होते. देवांशकडे आता कोणताच ऑपशन ही नव्हता. ज्या वडिलांच्या नावावर माज करत होतास ना त्यांनीच आता त्याला शिक्षा होण्यासाठी मागणी केली आहे."


" आता सगळं पहिल्यापासुन सांगायला सुरू कर...." एवढं बोलून ते शांत झाले.

देवांश ने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली...


"तो दिवस मी पहिल्यांदा प्रांजल ला पाहिलं होत. ती तिच्या मामाकडे आलेली पुण्याला. माझ्या बंगल्याच्या बाजूचा बंगला होता त्यांचा. मी आमच्या बाल्कनीत बसुन मोबाईल वर गेम खेळत होतो.. आणि अचानक माझी नजर खाली गेली.."



To be continued....