Julale premache naate - 69 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-६९

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६९

तेवढ्यात निशांत एकदम माझ्या जवळ आला.. "शांत हो.. तो मागेच उभा आहे. तो ब्लॅक टीशर्ट हेल्मेट घातलेला मुलगा राजच्या घरातुन निघाल्यापासुन आपला पाठलाग करत आहे. मी लगेच मिस्टर गोखले यांना मॅसेज केला आहे. राज ने आपल्याला सर्वांचा एक ग्रुप केला आहे आणि मी त्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकला आहे." निशांतने मला हे सांगताच मी फक्त खाली पडायचे बाकी होते.

मी बघण्याचा विचार करत असताना त्याने मला तस करू नकोस अस डोळ्यांनीच बजावलं...

"नको बघुस त्याच्याकडे. त्याला कळलं नाही पाहिजे की आपल्याला तो आपला पाठलाग करत आहे हे कळलंय."

निशांतच्या बोलण्याने मी हातात असलेला गरम चहा ओठांना लावला. आणि नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागले.

"तु राजच्या डॅड ला लगेच डॅड का बोललीस..??" निशांतच्या अचानक आलेल्या अशा प्रश्नाने मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.

"हो... तु त्यांना डॅड बोललीस तर त्यांनी लगेच राजला स्माईल दिली. जे मला बिलकुल आवडल नाहीजे."

"अरे...! पण तेच बोलले ना आपल्याला की आपण राज सारखेच आहोत त्यांना म्हणून मी बोलले. आणि तु कसा माझ्या आई-बाबांना आपलं मानतोस तसच केलं ना मी... वेड्या मुला...!!" एवढं बोलून मी निशांतच्या डोक्यावर हलकं मारलं. आणि आम्ही दोघेही हसु लागलो..



काही वेळ का होईना त्या मुलाबद्दल तर आम्ही विसरलो होतो. त्यांनतर परत बाईकवर बसून आम्ही माझ्या घराच्या दिशेने निघालो... तो मुलगा अजून ही आमचा पाठलाग करत होता..



निशांत मला वरपर्यंत सोडायला आला होता. थोडा वेळ बसून तो ही निघाला. खरतर मला टेंशन आलं होतं. कारण त्या व्यक्तीने निशांतला काही हानी पोहोचवली तर या विचारात मी माझ्या रूममधे बसले होते. तोच मोबाईलवर त्याच्या पोहोचण्याचा मॅसेज झळकला आणि मी टेंशन फ्री झाले.

रात्रीच जेवण जेवताना आज राजच्या घरी झालेला प्रकार मी आई-बाबांच्या कानावर टाकला. बाबांना राजच्या डॅड बद्दल कळताच त्यांना आनंद झाला की एवढा मोठा बिझिनेसमॅन आम्हाला मदत करत आहे.


आज लवकर झोप आली होती. आजचा दिवस जरा जास्तच थकवणारा आणि विचार करायला लावणारा होता. ती व्यक्ती किती पाठलाग करत असेल याचा अंदाज मी झोपल्या झोपल्या घेत होते आणि त्यातच मला झोप कधी लागली हे ही कळलं नाही.



जाग आली ती अलार्म ने.. डोळे चोळत उठले. सगळं आवरून कॉलेजसाठी निघाले. पण कॉलेज जवळ जाताच मला निशांतचा कॉल आला आणि मी तडक कॉलेज जवळच्या सिसिडीमध्ये पोहोचले. तिथे आधीच सगळे पोहोचले होते. राज, निशांत आणि मिस्टर गोखले.



मी पोहोचताच गरम कॉफी सोबत आमचा प्लॅन तयात झाला. प्लॅन ऐकताना मला भीती ही वाटत होती.., पण हे करण ही गरजेचं होतं. शेवटी सर्वांनी समजवल्यावर मी तयार झाले आणि आम्ही कॉलेजसाठी निघालो. कॉलेज मध्ये ही लेक्चर्स मध्ये मी त्याच प्लॅनचा विचार करत होते.. सगळे असताना मी तय्यार तर झाले होते. पण आता विचार करून मला टेंशन आलं होतं.


कॉलेज संपताच मला निशांतने घरी सोडले आणि परत एकदा प्लॅन बद्दल आठवण करून दिली आणि तो निघून गेला.


ती रात्र त्यातच संपली आणि दिवस उजाडला. लवकर आवरून मी बाहेर आले. मला जरा लेटच झालं होतं. निशांत खाली येताच मी पळत खाली आले आणि आम्ही राजच्या घराच्या दिशेने गेलो.



राजच्या रूममधे आम्ही सगळे बसलो होतो.
"प्रांजल.. करायची का सुरुवात..??" मिस्टर गोखल्यानी विचारलं. मी हळुच होकार दिला.

मग माझ्या मोबाईलवरून मी त्याला कॉल केला. आधी दोन वेळा कॉल लागला पण त्याने घेतला नाही. परत एकदा कॉल केला आणि त्याने घेतला. काही वेळ फोन वाजत होता. पण समोरची व्यक्ती कॉल काही घेतानाही बघून आम्ही ही टेंशनमध्ये होतो की त्याने कॉल घेतला..



To be continued....