Julale premache naate - 65 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-६५

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-६५

आम्ही तिघे ही त्या कॅफेमध्ये परत न जाता घरी गेलो. कारण राज आणि माझ्यासाठी हे धक्कादायक होत. हर्षलने माझा खून करण्याचा प्रयत्न हा विचारच मला नकोसा वाटत होता. शेवटी परत मॉल आणि आम्ही दोघांनी आप- आपलं घर गाठलं. मी काही ही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गप्प जाऊन स्वतःच्या रूममधे गेले आणि मनसोक्त रडले..

"का रडु नये..!!.. जिला मी माझी बेस्ट फ्रेंड मनात होते. जी माझ्यासाठी माझ्या बहिणी सारखी होती.. खरतर मानलेली बहिणीच आणि तिनेच मला जीवे मारण्याचा विचार करावा.. काळीज पिळवणूक टाकणार सत्य आज मला निशांतकडून कळल होत.."

रडून रडून डोळे लाल झालेले.. कोणाला कळु नये म्हणुन बाथ घेतला.. आणि हसऱ्या चेहऱ्याने मी आई ला भेटले. थोडं बोलले. तिला जेवणात मदत ही केली. पण राहून राहुन एकच प्रश्न सतावत होता.. आणि तो म्हणजे, "हर्षल अस वागली..."

डोळ्यातलं पाणी लपवत बाहेर आले तर समोर बाबा...

"बाबा...!!! तुम्ही कधी आलात..??? म्हणजे दरवाजा उघडुन... ते म्हणजे... बेल न वाजवता..??" मी काही ही विचारात होते.. काय करणार बाबा असे अचानक समोर आल्याने मला सुचतच नव्हतं काय बोलावे...

"अग हो.. किती ते प्रश्न.. आणि माझ्याकडे ही असते एक चावी. त्यानेच उघडलं आणि आत आलो.. कारण मला तुम्हा दोघांना एक सरप्राईज द्यायचं आहे.." बाबा आनंदाने बोलले आणि त्यांनी आईला हाक मारली..

"अग ऐकतेस ना... बाहेर ये बघु..."

"हा बोला.. काय हो लवकर आलात आणि अस ओरडायला काय झालं..??" आई हात पदराला पुसत बोलली.

"अरे तुम्हा दोघांना मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे मी आता सिनिअर मॅनेजर झालो आहे. माझं प्रमोशन झालं.." बाबांचं बोलण ऐकुन आई ने तर देवाला हातचं जोडले..

"खुप खूप अभिनंदन बाबा... आय एम सो हॅपी फॉर यु... कॉंग्रेजुलेशन.." बोलून मी तर मिठीच मारली.

"अग हे घे मिठाई देवापूढे ठेव.." हातातला मिठाईचा पुडा पुढे करत बाबा आईला बोलले.

बोलतात ना जेव्हा वाईट होत तेव्हा चांगल्या गोष्टीही आयुष्यात घडत असतात.. अगदी तसच झालेलं. एका बाजुला माझ्या बाबतीत हे अस घडत असेल तरीही बाबांच्या आयुष्यात नवीन आनंदाची भर पडत होती...

"बाबा.. अस अचानक प्रमोशन मिळालं.. म्हणजे तुम्ही कोणता प्रोजेक्ट पूर्ण केला होता का..??" मी सहजच जेवताना विषय काढला.

"अग मला ही आधीच कळलं नाही.. पण मागच्या दोन वर्षांपासून आम्ही एका प्रोजेक्ट वर काम करत होतो आणि तो प्रोजेक्ट इंटरनॅशनल लेव्हल वर खुप छान चालला.. कंपनीला भरपूर बेनिफिट मिळाले.. करोडो बोललीस तरी चालेल.. त्या प्रोजेक्टचा मी हेड होतो आणि त्या प्रोजेक्ट मध्ये जे कोणी होते ना त्या प्रत्त्येकाला प्रमोशन देण्यात आल आहे.." जेवताना गप्पा रंगल्या होत्या आज त्यामुळे का होईना मी हर्षल चा विषय ही विसरले होते...

जेवण उरकुन मी निशांतला कॉल केला. त्याच्याशी बोलून समाधान मिळत.. थोडं बोलून आम्ही झोपलो. कारण उद्यापासून आम्ही तिघेही त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेणार होतो..


आज माझा सकाळचा नाश्ता राजच्या घरी होणार होता. कारण मी आणि निशांत सकाळीच राजच्या घरी पोहोचलो होतो, त्यानेच आम्हाला बोलावून घेतलं होतं..



"हे बघा आता आपल्याला तिघांना मिळुन त्याला पकडणं गरजेचे आहे.. तरी कोण करत असेल अस वाटतंय तुला निशांत..??" राजने समोर बसलेल्या निशांतला विचारलं.

"ती व्यक्ती आपल्या तिघांना चांगलीच ओळखते.. म्हणजे त्या व्यक्तीने आपल्यावर पाळत ठेवली असावी... म्हणजे बघ ना हर्षलच्या खुनात मला तर प्रांजल ला त्रास देण्यात तुझा हात आहे असं त्याला दाखवायच होतं.. प्लॅन त्याने खूप आधीपासूनच केला असावा असा माझा संवशय आहे..." निशांत काहीतरी विचार करत बोलला...

निशांतच्या बोलण्यात तथ्य नक्कीच होत.. कारण त्या व्यक्तीला आमच्या बद्दल सगळी माहिती होती...


"प्रांजल तुला आठवतंय का कोणी अस तुझ्यावर प्रेम करणारा..?? म्हणजे आठवतोय का तुला कोणी...???" राजच्या प्रश्नावर मी माझ्या मेंदूवर जोर दिला... पण काही ही आठवायला तय्यार नव्हतं..

तेवढ्यात मला एका अनोख्या नंबर वरून मॅसेज आला...

"हाय.., कशी आहेस...??"

"आज तर आपली काही भेट झाली नाही.. पण लवकरच होईल. आणि अजून एक तुम्हा तिघांना काय वाटतंय की तुम्ही दिघे ही मला पकडू शकतात.."

"नाही.. मला पकडणं एवढं सोपं नाहीये. आणि पोलिसात जायचा प्रयत्न केला ना तर तुझ्या मित्रांना सांग अस काही डोक्यात असेल तर आधीच काढुन टाका. नाही तर उगाच मला प्रांजल तुझ्या आई-बाबांना. आणि निशांतच्या आजी-आजोबांना त्रास द्यावा लागेल.

"सो मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर खुप वाईट परिणाम होतील त्याचे..."
"बाकी डार्लिंग काल रेड वनपीस मध्ये एखाद्या डॉल सारखी वाटत होतीस. तो राज नसता ना तर आज मी तुझ्या समोर असतो.. पण ठीक आहे. आज नाही तर नाही... पण लवकरच आपली भेट होणार आहे."

माय स्वीट गर्ल..

युअर लव्ह..❤

"गाईज मॅसेज केला आहे त्या व्यक्तीने.." मी लगेच तो मॅसेज दोघांना दाखवला..

"राज आपण याला ट्रेस केलं तर. हा नंबर आपण ट्रेस करू शकतो. माझा मित्र यात आपल्याला मदत करेन." एवढं बोलून निशांतने एक नंबर वर कॉल लावला आज त्या व्यक्तीला काही समजावलं.

काही वेळाने निशांतने कॉल ठेवला... मी आणि राज निशांतच्या चेहऱ्याकडे बघत होती.. राग, चिडचिड सगळं काही दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर..

"निशांत काय झालं..??" मी हळुच निशांतला प्रश्न केला.

"अग मी माझ्या फ्रेंड ला सांगितलं आणि त्याने तो नंबर ट्रेस केला ही.. पण नंबर ट्रेस केला ते लोकेशन राजच्या बिल्डिंग खालच लोकेशन होत आणि आता नंबर बंद दाखवत आहे.." निशांतने आपला हात समोरच्या भिंतीवर जोरात आपटला..

"निशांत तु शांत हो.. मला वाटत आता आपल्याला डॅड ची मदत घ्यावी लागेल... एक काम करूया. आपण माझ्या डॅड शी या बाबतीत बोलून बघुया. मला वाटत प्रांजल ला त्रास देणारा आणि हर्षलचा खून करणारा एकाच असावा."

राजच बोलण पटलं आम्हाला.. शेवटी त्याच्या डॅड शी तो बोलेल अस त्याने सांगितलं आणि आम्ही तिथुन निघालो..

"निशांत आता काय करूया.. मला अस वाटतंय की ती व्यक्ती आपल्या फॉलो करते. नाही तर त्याला कस कळलं असत की आपण राजच्या घरी आहोत...??" माझ्या या वाक्यावर त्याने फक्त आपली मान डोलावली..

खरतर जे काही चालू होतं त्याने सगळेच डिस्टर्ब झाले होते.. कोण असेल ती व्यक्ती..?? मध्येच कुठून आली आणि मेन म्हणजे त्या व्यक्तीला नक्की हवं काय आहे...? असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला सतावत होते.

त्यात राज बोलला तर आहे की तो त्याच्या बाबांशी बोलले. पण ते करतील आपल्याला मदत..?? बघू काय होतंय. "हे गणु सगळं जाही ठीक जर रे बाबा.." मी हवेतच आपले दोन्ही हात जोडले आणि त्याला नमन केलं.

काय लिहिलंय प्रांजल च्या आयुष्यात ते त्या गणुलाच माहीत. आपण फक्त बघण्याच काम करू शकतो.. बाकी त्या देवाच्या हातात..



to be continued....

( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे..)

स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.