Julale premache naate - 42 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-४२

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४२

अलार्मने आज जाग केलं पण सुट्टी म्हणून मीच तो बंद करून झोपले.. जाग आली ती आईच्या हाकेने.. कंटाळा करतच उठले.. तसा मोबाईल हातात घेऊन निशांतला गुड मॉर्निंग विश केलं.. थोडा टीपी करून फ्रेश व्हायला गेले.. फ्रेश होऊन बाहेर आले आणि आईसोबत नाश्त्या करायला बसले..


आज छान अशा इडलीचा बेत होता.. पोटभर नाश्ता झाल्यावर आईने लिस्ट सांगितली की, या दिवाळीत काय काय बनवायचं ते.. यावेळी जरा जास्तीच बनवायचं ठरलं होतं कारण आम्हाला ते निशांतच्या घरीही द्यायचं होत..


"मग आई.., कोणत्या पदार्थांपासुन सुरुवात करूया...??" मी हातात मोबाईल घेऊन आईला विचारले... "अग आधी आपल्याला शॉपिंगसाठी जायचं आहे.. कारण रवा, मैदा, साखर, तुप वैगेरे सगळं घेऊन यायच आहे ना..." आईने ही बसल्या बसल्या मोबाईलमध्ये लिस्ट बनवली.


तसे आम्ही थोड काम करून.. म्हणजे आईच काम उरकून आमचं जवळच्या शॉपमध्ये जायचं ठरलं. तिकडे जाऊन नाही नाही म्हणता आईची चांगलीच खरेदी झाली.. मग काय आलो सगळं घेऊन.. माझी तर कंबर गेली सगळं घेऊन येईपर्यंत.. घरी आलो आणि सगळं सामान काढून ठेवलं.. यासर्वात इतका टाईम गेला की, कळलं ही नाही दुपारचे दोन कधी वाजले.. शेवटी बाहेरूनच आम्ही पिझ्झा मागवला..


तो खाऊन आम्ही तय्यारीला लागलो. आज शंकरपाळ्या करायचं ठरलं.. आईनेच पीठ मळल मी फक्त बघण्याच काम करत होते.. पिट मळून मग आम्ही काही वेळ ते तसच फ्रीजमध्ये ठेवून दिल आणि चकलीच्या पिठाची तय्यार करण्यात आली..



संध्याकाळी मी आईला, शंकरपाळ्या लाटून आणि कापून देत होते आणि ती त्या तुपामध्ये मस्त तळत होती.. शंकरपाळ्याचा खमंग सुगंध सगळीकडे दवळत होता. ते सगळं रात्रीच्या आठ वाजता उरकलं. तस मी जाऊन स्वतःच्या बेडरूमध्ये बेडवर स्वतःला झोकून दिले.. माझी कंबर तर चांगलीच धरली होती.. सहज म्हणुन मोबाईल पाहिला तर त्यात निशांतचे सहा-सात मिस कॉल होते.. ते बघून मी त्याला कॉलबॅक केला..


"हॅलो निशांत, कॉल केला होतास का मला..???" मी बेडवर झोपुनच विचारले... "हो.., काय करणार आमची आठवण तर कोणी काढत नाही म्हटलं आपणच करून द्यावी आठवण." एवढं बोलून निशांत हसला.. "काही ही हा तुझं निशांत.. अरे आईला मदत करत होते. शंकरपाळ्या करण्यात." मी देखील आज केलेल कामाबद्दल लगेच सांगून टाकल..


"अरे बापरे हे पण जमत का तुला...???!!!" निशांतच्या या वाक्यवर मी फक्त हसले. "निशांत जमत हा मला.. दिवाळीत ये हा घरी फराळ खायला. आई चकली मस्त बनवते" हे बोलताच निशांत ओरडलाच... "हनी-बी, मला हव्यात हा चकल्या... मला खूप आवडतात यार. आजी बनवायची आधी, पण आता तिला जमत नाहीत. सो आम्ही बाहेरूनच घेऊन येतो सगळं." निशांतचा आवज जरा रडवेला झालेला.


"अरे निशांत.., आता तू इकडे ये. हे पण तुझच घर आहे ना..??! आणि हो होणारा जावई आहेस तु.." मी बोलता बोलता बोलुन गेले.. तसा निशांत जोरात हसला... एकक्षण मलाही कळलं नाही की तो का हसला... "काय झालं खडूस हसायला..???!" मी विचारले असता तो काही ही बोलत नव्हता फक्त हसत होता. हे बघून मी जरा रागावलेच...


"अरे काय हसण्यासारख बोलले मी... मी तर फक्त...!!" आणि मीच माझ्या डोक्यावर हात मारून घेतला. जेव्हा आठवल की आपण काय बोललो होतो...


"अरे, ते मी... म्हणजे काही नाही..." मी चक्क लाजत होते.
"कळलं का मी का हसत होतो ते." निशांतने हसतच विचारले.. तशी मी त्याला फोनवरच लाडात ओरडले...
"असुदे हा... बाय द वे तु काय घालणार आहेस दिवाळीमध्ये..??" मी विषय बदलत विचारलं.



"हा हा हा..कोणी तरी विषय बदलत आहे." त्याने ही ते अचुक ओळखले होते. "अग मला नवीन कुर्ता घ्यायचा आहे या दिवाळीसाठी.. आपण जाऊया का घ्यायला... तुझ्या आवडीचा घेऊया. तुझी पसंद मस्त आहे. म्हणजे माझ्याकडे बघ ना...." एवढं बोलुन निशांत जोरात हसला.



"मोठा आला.. म्हणे माझ्याकडे बघ." मी पण लगेच त्याला प्रतिउत्तर देऊ केले. "पण जाऊ नक्की."...
मग अजून थोडं बोलून मी कॉल ठेवला... अशीच बेडवर होते की मला माझच वाक्य आठवल..,"होणारा जावई आहेस तु...!" आणि मी स्वतःच्या चेहऱ्यावर माझे हात ठेवले आणि चांगलेच लाजले.

"पण हा निशांत किती गोड आहे यार.. गणु.., किती आणि कसे आभार मानू तुझे की या निशांत सारख्या गोड मुलाची आणि माझी भेट घालून दिलीस. म्हणजे आधी मला वाटायचं की तो किती खडून आहे.. त्याला नाही कोणाची काळजी वगैरे.. पण खरच तो खुप समजदार, काळजी घेणारा आणि जीवापाड प्रेम करणार आहे.." मी हात जोडुन देवाचे आभार मानले...
अशीच पडल्या पडल्या कधी मला झोप लागली हे देखील मला कळलं नाही....



कोणाचे तरी थंड हात माझ्या चेहऱ्यावर लागले... शहारले मी... तो स्पर्श... कोणी तरी माझ्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजुला करत होतं.. त्याच्या शा करण्याने मी चांगलेच लाजले... आणि त्यानंतर ती व्यक्ती जवळ जवळ आली आणि त्याचे ओठ माझ्या ओठांवर विसावले.. आणि ती व्यक्ती दूर दूर हक्त नाहीशी झाली.....



काही क्षण तसेच होतो की आईचा आवाज आला.. मी तर सैरभैर झाले होते... डोळे उघडले तर....
"अरेच्चा...!! स्वप्न होत ते..." मी स्वतःच्या डोक्यावर हातचं मारून घेतला... "पण किगी गोड होत नाही स्वप्न.." गालातल्या गालात हसत मी फ्रेश व्हायला गेले.. फ्रेह होऊन बाहेर आले तर समोरच्या सोफ्यावर निशांत बसला होता..
स्वतःचं डोकं मोबाईलमध्ये घालुन....

To be continued