Mala Kahi Sangachany - 29 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय.... - २९

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

मला काही सांगाचंय.... - २९

२९. निमित्त

तिने दार उघडले ... बाहेर येतेवेळी नाईट लॅम्प आणि पंखा बंद न केल्याने सुरूच होते ... ती दार मागे ढकलून बिछान्यावर बसली , डायरी अलगद उचलून हातात घेतली ... पुढे वाचायला सुरुवात करणार तोच मोबाईलचा टॉर्च सुरु असल्याचं तिला समजलं , आधी टॉर्च बंद करून स्वतःशीच ---' कुमारने आणखी काय लिहिलं ? ' अस पुटपुटत ती डायरी वाचायला लागली ....

कुमारने लिहिलं होतं ..... .... ....

तेव्हा माझ्यात एक बदल झालेला मला समजून आला होता तो म्हणजे तिला भेटायचं म्हणून मी कोणता ना कोणता बहाणा शोधायचो . मग काही वेळा मला निमित्त साधून तिला भेटता यायचं पण दररोज भेटावंस वाटायचं मग रोज नवीन निमित्त थोडंच मिळत असतं तर भेटीची जशी सवयच झाली होती मग काय निमित्त असो वा नसो तिला भेटत होतो आणि ती तर नेमकं मी तिला जरा विसरलो किंवा मनात तिचा विचार समजा आला नाही की ती समोर हजर असायची मला काहीही कल्पना नसताना .... तिला भेटायचं कोणतंच निमित्त मी सोडत नव्हतं ... एक वेगळंच आकर्षण मला जाणवत होतं , आज तिला भेटलो कि जातेवेळी परत ती केव्हा दिसेल आणि कधी तिच्याशी बोलायला मिळेल मनात आस राहायची ...

असेच दिवस जात होते आणि तिची परीक्षा संपली , कॉलेजला सुट्टी लागली ... पण तिचे MS CIT चे क्लास काही दिवस सुरु होते आणि हेही एक तिच्या भेटीच निमित्त म्हणून काहीही काम नसतांना फक्त तिच्या सोबत बोलत जायला मिळेल म्हणून मी ती ज्या वेळेला क्लास ला जायची तेव्हा सायकल घेऊन तिला वाटेतच भेटत होतो आणि गप्पागोष्टी करत शहराला उगीचच जात होतो ...

एकदा असाच कबीर जवळ बसून असतांना मनात आलं सुद्धा कधी ती दिसली नाही , तिची भेट झाली नाही , तिच्याशी बोलणं झालं नाही की मन उदास होऊन जायचं अस का व्हायचं ? काहीएक कळत नव्हतं ... का एक हुरहूर मनाला लागली होती ? का तिला भेटावंस वाटायचं ? का मन तिच्यात रमायचं ? ती म्हणजे माझ्यासाठी काय आहे ? का मन तिला न पाहता दिवसभर साधी ती ओझरती तरी दिसावी म्हणून बेचैन व्हायचं असे प्रश्न येत होते आणि मी कबीरला सहज सांगून मोकळा व्हायचो पण ते प्रश्न तसेच राहिले ... मी त्यावर उत्तरं मिळवाचेच अस काही ठरवलं नव्हतं म्हणून बाकी कोणतीच उठाठेव केली नाही ...

तेव्हा एक नवीन भर म्हणजे बॅडमिंटन खेळण्याचा उत्साह वाढला होता आणि एकदोन घर सोडून बाजूच्या घरी बॅडमिंटन असायचे.. संध्याकाळ झाली रे झाली की लहानमोठे सगळे आपापल्या अंगणात खेळायला जमा व्हायचे ... आळीपाळीने बाद झाले की इतरांना खेळता येत असे ...

मी सुजितला भेटून परत येत होतो , तर ती तिच्या अंगणात खेळत होती ... आजूबाजूला बाकीचे काही शेजारी सुध्दा खेळाचा आनंद घेत होते ... ती आवाज देऊन थांबवेल किंवा नाही म्हणून मीच मुद्दाम तिथं थांबलो .... काहीवेळ असाच निघून गेला , बराच वेळ दोन्ही खेळाडू टिकून होते , ते हवेत इकडून तिकडे फुल बॅटने भिरकावत होते पण बराच वेळ झाला होता फुल काही खाली पडलं नाही ... तिला मी तिथं सायकल वर बसून त्यांचा खेळ पाहत असल्याचं लक्षात आलं आणि तिचा अंदाज बहुतेक चुकला कि काय अन ते फुल खाली पडलं ... दुसऱ्याक्षणी तिने मला आवाज दिला ' कुमार , ये आपण खेळूया ...' इतकं बोलून तिने दुसरी बॅट जवळ येऊन मला दिली ... तिला टाळणं मला शक्य नव्हतं म्हणून आणि ती स्वतःहून बोलवत होती तर मी नाही तरी कसा म्हणणार होतो .... बस मग काय घेतली बॅट अन मैदानात उतरलो , १० -१५ मिनिट झाली पण फुल काही खाली पडल नव्हतं तर सर्व तिथं गोळा झाले होते आणि दोघांनाही चांगलाच हुरूप चढला होता ...

मी जरा हलकेच बॅटने फुलं तिच्याकडे मारलं पण तिच्यापासून जरा जास्तच जवळ ते पोहोचलं अन घाईघाईत समोर येऊन तिने कसतरी माझ्याकडे सारायचं म्हणून बॅट हवेत उचलली अन तिचा पायात पाय अडकल्याने तोल गेला ती बस खाली पडणारच तरी तिने फुल बॅटने माझ्याकडे वळवले ... मी मात्र बॅट खाली टाकून तिला सांभाळायला म्हणून तिला आधार दिला अन बाद झालो .... त्याच मला काहीएक वाटलं नव्हतं पण जर का तिला लागल असतं तर नुसता विचार मनात आला अन मी विचारात हरवलो ...

तिच्याकडे पाहिलं तर ती हसत होती , तिला मला हरवलं आणि पडता पडता सांभाळलं याचा कदाचित आनंद झाला होता ... रोजच तिच्यासोबत बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्याने भेट होत राहिली .... तिच्याशी खेळतांना हरलो तरी एक वेगळाच आनंद होत असे ... ती मनमुराद हसली कि तिच्या चेहरा खुलून दिसायचा मी एकटक पाहत राहायचो ...

एक दिवस बॅडमिंटन खेळतांना -

" कुमार , पुढच्या रविवारी माझी परीक्षा आहे .."

" परीक्षा ? कसली ? "

" MS CIT चे क्लास पूर्ण झाले तर त्याचीच शेवटची परीक्षा आहे .."

" बरं मग काय ? "

" काही नाही बस सहज सांगितलं .."

" बाकी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असेलच .."

" काही सराव प्रश्नसंच बाकी आहेत "

" मग रोज बॅडमिंटन खेळण्यात वेळ काय वाया घालते , यापेक्षा सराव करायचा .."

" दिवसभर उन्हामुळं बाहेर यायला मिळत नाही मग संध्याकाळी जरावेळ या निमित्याने ...."

" ते हि बरोबर आहे ..."

आठवडा भर्रकन निघून गेला आणि परीक्षेचा दिवस रविवार उजाडला ... तिला पेपरला जाण्याआधी भेटलो होतो , best of luck बोलून आलो ...

असं डायरीत लिहिलेलं वाचून ती काही क्षण भूतकाळात हरवली ... नकळत डोळे मिटले काही वेळ निघून गेला मनात पाठोपाठ पुन्हा विचारांचा थवा भिरभिर करून कोणा एका क्षणाला शांत झाला आणि ती वास्तव्यात परतली ... बसून वाचायला तिला कंटाळा आला अन तिने पूर्णपणे बिछान्यावर झोपून , मान जरा वर राहील म्हणून उशी दुमडून घेतली .. दोन्ही पाय एकावर एक ठेवले , डायरी हातात डोळ्यासमोर धरली , हाताचे दोन्ही कोपरे गादीला टेकवले ...

" आता जरा आरामदायी वाटतंय "

स्वतःशी पुटपुटली ... समोर काय लिहिलं आणखी ? स्वतः स्वतःला प्रश्न करत ती पुढे वाचायला लागली ...