Mala Kahi Sangachany - Part - 1 - 2 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय..... - Part - 1 - 2

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

मला काही सांगाचंय..... - Part - 1 - 2

१. शेवटचा संवाद....?


उन्हाळा ऋतू । एप्रिल महिन्यात दिवसभर प्रवास करून सूर्य मावळतीला आला , तसे चिमणी पाखरांचे थवे शांततेने परत आपल्या घरट्याच्या दिशेने निघाले

तर दुचाकी चारचाकी वाहने तीच शांतता भंग करत, सर्व , घराच्या दिशेने निघाले, त्याच गर्दीत एक युवक आपल्या दुचाकीवरून जात होता बहुतेक घरीच ।

मध्येच दुचाकीचा वेग कमी करून त्याने मोबाइल बाहेर काढला आणि कानाला लावलेले हेडफोन ठीक करत रिंग जात आहे कि नाही ऐकायला लागला , तोच दुसऱ्या बाजूने


"हॅलो कोण बोलत आहे ? " असा आवाज ऐकू येताच एक दीर्घ श्वास घेत त्यानेसुद्धा हॅलो म्हणत प्रतिसाद दिला दुसऱ्या मोबाईल वरून "हॅलो ... कुमार ? तू बोलतोस? "


थोडा आणखी वेग कमी करून कुमार बोलू लागला ...

"बस सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला आणि...... आणि.... असं अडखडत तो बोलला .


दुसऱ्या मोबाइल वरून

"आणि ...आणि.. काय म्हणतोस असा थांबला का एकदम? हॅलो बोल ना काय झालं? चार वर्षानंतर अचानक कसा फोन केलास? "


कुमार दुचाकीचा वेग वाढवून मोबाईलवर बोलायला लागला ....

"आज 18 एप्रिल ...तुझा वाढदिवस... म्हणून ..तुला शुभेच्छा ...देण्यासाठी फोन ..केला ... " कुमार म्हणाला.


"तुला आठवण होता माझा वाढदिवस ? मला वाटलं तू विसरला असशील मला." दुसऱ्या मोबाईल वरून प्रतिसाद मिळाला


त्यावर कुमार -

"नाही ,अजून तरी नाही विसरलो आणि या चार वर्षात मला कळून चुकलं कि तुला विसरणं किमान याजन्मी तरी मला शक्य नाही....."


एवढं बोलून तो थांबला ...आता त्याला शब्द फुटेना, भावना अनावर होऊन हृदयात अनेक भूतकाळातील आठवणी ताज्या व्हायला सुरुवात झाली..

ती कुमारच्या जीवनात आली तोपासून तर शेवटी तिला जेव्हा पाहिले तोपर्यतचे सारेकाही क्षणभरात, नभात तारा चमकून नाहीसा व्हावा तसे नजरेआड झाले.

मन अति जड झाल्याने अश्रूसागर वाफ होऊन डोळयातून वाट शोधू लागला आणि तोच त्याने फोन ठेवला .....


आज पुन्हा इतक्या दिवस रोखून ठेवलेलं वादळ मनात उठलं अन स्वतःला तिच्याशी कधीच बोलायचं नाही असं दिलेलं वचन त्यानं तोडलं म्हणूनच तिच्या आठवणी

आज एखाद्या शापित राखणदार म्हणून ठेवलेला धनावरच्या नागासमान त्याचा पाठलाग करीत होत्या . भूतकाळात तो इतका मग्न झाला की त्याचा फोन १० ते १५ मिनिटांपासून

एकसारखा वाजत होता हे त्याच्या लक्षात आलं नाही. तेव्हा तिच्या आठवणीत गुंग असतानाच त्याची दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे जात असल्याचे त्याला कळलं नाही ...


समोरून येणाऱ्या दुचाकीवाल्याने जोरात हॉर्न दिल्यावर तो जरा भानावर आला आणि दुचाकी सावरायला लागला तोच फोन वाजल्याचे समजताच

त्याने मोबाईल बाहेर काढण्यासाठी खिश्यात हात घातला....

२. घात कि अपघात ?


कुमारने कुणी फोन केला ते पाहण्यासाठी मोबाईल हाती घेत दुचाकी चालवतच पाहू लागला, तर तिचे 7 सुटलेले कॉल त्याला मोबाईल मध्ये दिसले आणि पुन्हा त्याच्या मनात

ती आणि तिच्या आठवणी, यांची गर्दी व्हायला लागली आणि तो हळूहळू वास्तव विसरून संपूर्णपणे तिच्या सोबत भूतकाळातील जगात वावरायला लागला ...

तसा कुमार आज सकाळपासूनच काहीसा बेचैन होता बहुतेक नियतीने तो दिवस आधीच ठरवून ठेवला असावा जसा इतरांसाठी ठरवलेला असतो वाईट किंवा छान ...


कधी कधी नियतीने ठरवलेल्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं ज्यांना आपण घात म्हणतो तर कधी आपण स्वतःच संकट आपल्यावर ओढवून घेतो

त्याला आपण अपघात म्हणतो पण हे सगळं विसरून एका वेगळ्याच दुनियेत तो सफर करायला लागला . तो वास्तवातून प्रत्येक क्षणाला आणखी दूर जात होता...

भूतकाळात ... अगदी जेव्हा प्रथम त्यानं तिला पाहिलं होतं......


जीवनाच्या त्या वळणावर तो पोहोचला जणू काही त्या क्षणापासून आता नव्याने जीवनाला सुरुवात होणार की काय असं त्याला वाटून गेलं...


तो पुन्हा एकदा जसेच्या तसे अनुभवत होता आणि थोड्याच वेळात अचानक सर्वकाही थांबलं ..... कुमार रस्त्याच्या कडेला पडला होता ....


नेमकं तिथं काय घडलं होतं ? कुणालाही काहीएक समजलं नव्हतं. आता कुठे तो चार वर्षानंतर पुन्हा एकदा तिला आठवून तिच्यासवे जगत असल्याचे अनुभवत होता.

पण चूक झाली इतकीच कि तो जीवनाचे सत्य विसरला. ....


भुतकाळ परतीच्या प्रवासाचा सोबती नाही ... तो एकदा ज्या वाटेवरून जातो त्या वाटेवर पुन्हा फिरकून सुद्धा पाहत नाही की आठवण हि काढत नाही ...


हा स्वभावविशेष फक्त आपणा नश्वर मानवजातीला लाभला आहे. पण हे सर्व विसरून तो नकळत भूतकाळाच्या प्रवासाला निघाला होता पुन्हा त्याच वाटेवर चालायला लागला होता.

जेव्हा कुमार तिच्या आठवणीत भान हरपून बसला , तेव्हा नियतीने आपला डाव साधला आणि त्याचा घात केला.


जेव्हा कुमार गतकाळाशी संवाद करत तिच्या सोबत घालवलेले क्षण आठवून तिच्या आठवणी जपत होता. स्वैरपणे ती नसतांना ती सोबत असल्याचे भास आभास जाणून घेत होता

तेव्हा त्याच्या धूसर झालेल्या डोळ्यांना समोरून भरधाव येणारा ट्रक जणू दिसलाच नाही आणि क्षणात कुमार त्याच्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला जोरदार टक्कर लागल्याने जाऊन पडला.

ट्रक तर निम्मित मात्र होता अपघात घडण्यासाठी पण यात नियतीचा वेगळाच खेळ तिथं मांडला होता.........