Julale premache naate - 22 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-२२

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-२२






आज लवकरच कॉलेजसाठी निघाले होते.., कारण परत डान्स प्रॅक्टिस चालु करायची होती..अजून निशांत आला नव्हता. म्हणून मी पाहोचून प्रॅक्टिस करत बसले. मी प्रॅक्टिस करत असताना राज ऑडीमध्ये आला.. मला बघत येऊन समोर बसला.. पण माझं काही लक्ष त्याच्याकडे नव्हतं.. मी माझ्याच धुंदीत नाचत असताना पायात पाय येऊन खाली पडलेच... राज धावत माझ्याजवळ आला... "हेय, प्रांजल जास्त लागलं तर नाही ना..??" त्याने उचलत विचारलं.




"नाही.., पण पाय दुखतोय. मुरगळला वाटत." मी राजला बोलले. त्याने मला उठवुन खाली आणल, पण मला काही चालता येत नव्हतं. त्याने माझा एक हात त्याच्या हातात घेतला, तर दुसरा माझ्या कमरेत घातला आणि घेऊन जाऊ लागला. तोच दरवाजातून निशांत आला.. त्याने मला राज च्या जवळ पाहिलं आणि तो धावतच आमच्याकडे आला... "काय ग..! काय झालं तुला..." मी राज चा हात सोडुन निशांतजवळ लंगडतच गेले. "डान्स प्रॅक्टिस करताना अडकुन धडपडले..."



"तु पण ना हनी-बी.., चल आता डॉक्टरकडे जाऊन येऊया." एवढं बोलून त्याने जवळ घेतलं आणि आम्ही निघालो.. मी मागे वळून राजला थँक्स म्हटलं आणि आम्ही गेलो. पण राज मात्र चांगल्याच रागावला होता..



बाजूच्या खुर्चीवर स्वतःचा हात मारत रागातच कॅन्टीनमध्ये निघून गेला.. कॅन्टीनमध्ये बसला असता मागुन हर्षु आली.. "हाय भाई.., काय करतोस एकटाच..??" ती बाजुला बसत बोलली. त्याने जोरात टेबलावर हात मारला हे बघून सगळे कॅन्टीनमध्ये त्याच्याकडे बघू लागले. हर्षु उठून सर्वांना हसतच राजला शांत केलं...



"काय झालं आहे भाई..??" तिने विचारल. "त्या निशांतचा राग येतोय... आज मी प्रांजल ला लागलं म्हणुन घेऊन आलो.. तर तो आलाच मध्ये... आणि त्यात काय बोलला तो तिला..हनी-बी..." रागात त्याने हर्षुकडे पाहिलं. "हर्षु तु निशांतला प्रपोस करणार आहेस की, नाही. नाही तर निशांत प्रांजल ला करायचा आणि तु बस इथेच." एवढं बोलून राज निघून गेला.. हर्षु ही काही विचार करून निघाली.




इकडे मी आणि निशांत त्याच्या ओळखीच्या हाडांच्या डॉक्टरांकडे गेलेलो... "कसा आहेस निशांत. आणि आजोबा ठीक आहेत ना..??" डॉक्टर आणि निशांत बोलत होते.. "हो काका मी आणि आजोबा एकदम मस्त. आज मी माझ्या फ्रेंड ला घेऊन आलो आहे. आज ती डान्स करताना पडली. मुरगळला वैगरे नाही ना.. बघा तुम्ही.." माझ्याकडे बघत त्याने स्वतःच बोलणं थांबवलं.




निशांतला बाहेर पाठवुन त्यांनी चेकअप केलं. त्याला परत आत बोलावल. "जास्त काही नाही झालय. हा जरा दुक आहे; पण काही मेडिसिन लिहून देतो ते घ्यायच्या आणि एक क्रिम लावायची झोपताना. लवकर बर होईल." एवढं बोलुन त्यांनी आमच्याकडे बघितलं.



त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. त्यानेच मला घरी आणल.. मला अस लंगडत बघुन आईने लगेच टेंशन घेतलं.. "काय ग प्राजु कुठे पडलीस..??" "आई.., ती प्रॅक्टिस करताना जरा पडली. आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो आहोत. जास्त काही नाहीये." निशांतने सगळं सांभाळून घेतलं होतं.




मला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेला आणि झोपायला लावल. "मॅडम झोपा आता गप्प. आणि हो दुपारी जेवुन मेडिसिन घे कळलं का." त्याने माझ्या डोक्यावर हात फिरवून म्हटलं.... "तु थांबत नाही आहेस..?? म्हणजे निघतो आहेस लगेच.." मी स्वतःची जीभ चावत बोलले.




"अग कॉलेजमध्ये जातो. सरांकडे काम आहे माझं. सो जावं लागेल. डोन्ट व्हरी, मी संध्याकाळी येईल भेटायला." एवढं बोलून तो निघाला. आईचा निरोप घेऊन तो गेला ही.. हातात चहा चा ट्रे घेऊन आई माझ्यारूमध्ये आली. "काय ग निशांत थांबला नाही..." "अग तो संध्याकाळी येणार आहे. आता त्याला काम आहे कॉलेजमध्ये.." मी छान हसुन बोलले. हे ऐकून आई माझ्या बाजुला बसली... "प्राजु एक विचारू का..? म्हणजे बस तस काही नसेल पण असेल तर सांग तस." ती बाजुला बसत बोलली.



"निशांत तुला आवडतो का..?? म्हणजे तुमच्यात काही आहे का बाळा..? असेल तर सांग तस. बघ आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. निशांत खुप चांगला मुलगा आहे. आणि बाबांच्या मनात ही हेच होत. सो तस काही आले तर सांग बाळा मला." आईने माझ्याकडे बघत विचारल.. तिच्या या प्रश्नाने मी मात्र चांगलेच गोंधळले...





"आई ग.., तस काही नाहीये..., म्हणजे आम्ही आताच तर फ्रेंड्स झालो आहोत. आणि मला नाही माहीत की, निशांतला मी आवडते की नाही. त्यात तो बोलला आहे की, तो आमच्या डान्स प्रॅक्टिस नंतर एका मुलीला प्रपोज ही करणार आहे. त्यामुळे तस काही नाहीये. तुम्ही नका काही वेगळा विचार करू. आणि असेलच तर मी तुलाच आधी सांगेल ना ग आई." मी आई ला मिठी मारत बोलले.


तिनेही मला थोपटत तो विषय सोडून दिला. "चला मग आज छान बेत करूया. निशांत आपल्याकडे येणार आहे तर. मी चिकन बनवते. आवडेल ना त्याला...??" तिने माझ्याकडे बघत विचारल. "अग आई आवडेल काय,, नाचेल, धावेल सगळं. त्याला चिकन खुप आवडत..." मी हसुन सांगितलं. ती देखील हसुन निघून गेली.




मग मी जरा कशी तरी फ्रेश झाले आणि बेडवर पडले.. जाग आली ती आई च्या हाकेने. ती माझ्यासाठी जेवण घेऊन आली होती. जेवुन मी मेडिसिन घेतल्या आणि झोपले..



माझ्या चेहऱ्यावर आलेल्या बटेला निशांत बाजूला करत होता... हे करत असतानाच मला जाग आली.. "काय करतो आहेस निशांत..??" मी जरा आश्चर्याने पाहिलं.. "अग ती बत आलेली.., तीच दूर करत होतो. तु शांत झोपली होतीस. आणि ती बत तुला डिस्टर्ब करत होती" निशांत काही तरी बोलायच म्हणून बोलत होता.. "ते सोड., कस वाटत आहे आता. दुखणं कमी झाल आहे का..??" त्याने काळजीने विचारल असता मी मानेनेच होकार दिला आणि आपली तीन बोटं वर करून छान वाटतंय अस बोलले.





"मला वाटलं आता मला पार्टनर बदलावा लागतोय की काय...? नाही तर तुला घेऊन नाचाव लागेल.. तुटलेल्या पायासोबत.." आणि जोरजोरात हसु लागला... "किती हा खडूसपणा" मी जरा रागानेच बोलले आणि स्वतःचे तोंड फुगवून बसले.. "अग तु हसावीस म्हणून मस्करी केली.." स्वतःचे कान धरून त्याने लगेच माफी ही मागितली.



"असुदे.., नशीब मी फक्त डान्स पार्टनर आहे.. तुझी रिअल लाईफ पार्टनर असते आणि पाय मोडला असता तर पळुन गेला असतास." आणि एकटेच हसु लागले. यावर तो काही हसला नाही....

"तुला काहीही झालं तरीही मी तुला कधीच अंतर देणार नाही." हे वाक्य मात्र त्याने माझ्या डोळ्यात बघून म्हटलं.



हे ऐकून मी हसायची थांबले आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं.. "अग म्हणजे बेस्ट फ्रेंड्स एकमेकांना कधी सोडून जातात का..?" त्याने हसुन विचारल. मी पण लगेच स्माईल दिली... "चल फ्रेश हो आणि बाहेर ये.." एवढं बोलून तो बाहेर गेला.



मी पण फ्रेश होत लंगडतच बाहेर आले. बघते तर आई आणि निशांतच्या गप्पा चालू होत्या. मी जाऊन बसले तर मला काही कोणी विचारत नव्हतं. मग त्यानेच आईला जेवणात मदत ही केली.. दोघेही किचनमध्ये सुद्धा गप्पा मारत होते.. तेवढ्यात बाबा आले... मला बघून त्यांनी विचारपूस केली कारण आईने आधीच त्यांना कॉल वर सगळं सांगितले होते.




"काय बाळा पायाला काय हे करून घेतलंस.. " बाबा बाजूला बसते बोलले.. "बाबा मी काही नाही केलं.., ते डान्स करता करताच झालं." मी बत्तीच दातांची स्माईल देत बोलले. हे ऐकून बाबा ही हसले आणि आता गेले..




फ्रेश होऊन, आज मी आणि बाबा गप्पा मारत होतो. ते मला मॅनेजमेंट ची म्हाहित देत होते. हे सगळं असताना किचनमधुन निशांत आला आणि बाबांना भेटला... "बाबा कधी आलात तुम्ही.., कसे आहात..??"... "निशांत बाळा मी छान तु कसा आहेस..? आणि आई-बाबा कसे आहेत..? त्यांना पण आणायचं होतस आज.. मस्त मज्जा केली असती आपण.." बाबा जरा सॅड होत बोलले..



"हो नेक्स्ट टाईम घेऊन येतो" निशांत ही बाबांच मन राखण्यासाठी बोलला. हे ऐकून बाबांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली.. हे बघुन आम्हाला दोघांना ही छान वाटलं.



डायनिंग टेबलावर छान गप्पा चालू होत्या..."आज छान मदत केली हा निशांतने मला.." आई सर्वांना सांगत होती. "आणि हो चपात्या निशांतने केल्या आहेत त्यामुळे समजून घ्या.. एवढी मदत केली मला त्यामुळे गप्प खाऊन घ्या काहीही न बोलता.." हे बोलताच मी आणि बाबांनी एकत्र.., "येस मॅडम.." हे बोललो आणि सगळेच हसायला लागले.. त्यात आई देखील होती...




जेवताना माझी आणि निशांतची नजरा नजर होत होती... "त्याच चोरून बघणं मला लाजवत होत." जेवण संपवुन आम्ही सोफ्यावर गप्पा मारत बसलो.



"चला आई-बाबा आता निघतो मी.., घरी आजी-आजोबा वाट बघत असतील." एवढं बोलून तो जायला निघाला. मी जरा लंगडतच निशांत जवळ गेले... "अग नको ग उठुस तु गप्प आराम कर.., मी जाईल. एवढे बोलून तो निघून गेला. त्याला नीट बाय ही करता नाही आल.., म्हणून मला कस तरी वाटत होतं. मी रूममधे जाऊन त्याच्या पोहोचण्याची वाट बघत बसले..




तोच राज चा कॉल आला. तब्बेत कशी आहे हे विचारायला.. "प्रांजल कस वाटत आहे.??" तिकडून राज बोलत होता.. "मी आता छान आहे राज." मी ही हसुन उत्तर दिलं. थोडं बोलून मी कॉल ठेवला. तर निशांतचे मॅसेज होते... वाचून मी लगेच रिप्लाय केला.




"थँक्स निशांत आज माझी एवढी छान काळजी घेतल्याबद्दल. नीट बोलता ही आला आणि मला." "इट्स ओके ग." "उद्या जमल तर कॉलेजमध्ये भेटु." "हो चालेल.. आणि हो मेडिसिन घे आणि ती क्रिम लाव पायाला आणि आराम कर. वाटलं बर तर सांग मी येतो पीक करायला.. कळलं का.. हनी-बी??" त्याचा मॅसेज वाचून छान वाटलं. की कुणीतरी आपली किती काळजी घेत आहे. मी रिप्लाय देऊन त्याला गुड नाईट विश करून मोबाईल बाजुला ठेवला...


"किती काळजी घेतो नाही आपली निशांत.. पण "ती" कोण असेल. कारण मी निशांतच्या तोंडुन तिच्या बद्दल काहीच ऐकलं नाहीये... कोण बर असेल निशांतची ती" विचार करतच मी झोपले.



आज आईने उठवलं.. "प्राजु बाळा उठा.. जायचं आहे की नाही कॉलेज ला. मी जरा आळस देत उठले. आज पाय काही जास्त दुखत नव्हता.., म्हणून निशांतला मॅसेज टाकून पीक करायला सांगितलं. फ्रेश होऊन त्याची वाट बघत बसले.. बाईक खाली लावून तो वर आला आणि मला घेऊन गेला. बाईकवर नीट बसवुन आम्ही निघालो...




कॉलेजमध्ये पोहोचल्यावर कॅन्टीनमध्ये भेटु ठरवून आम्ही स्वतः स्वतःच्या क्लासमध्ये निघून गेलो.. "काय ग काल भाई बोलला तुझा पाय मुरगळला असा..?" हर्षु बाजूला बसत बोलली.. मी मानेनेच होकार दिला. "आणि काय ग सारख तु निशांतला काम सांगतेस. त्याला सारख सांगत नको जाऊस अशाने तो माझ्यापासून दूर जायचा आणि ते मला बिलकुल आवडणार नाहीये.." हे मात्र ती जरा रागातच बोलली.




"अग तोच घेऊन गेला मला.." मी कसतरी हसत बोलले. तिने फक्त माझ्याकडे पाहिलं. पण तिच्या डोळ्यात भाव मात्र वेगळे वाटले मला. लेक्चर्स संपवुन आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो.. निशांत आणि राज आधीच येऊन बसले होते.



निशांत पुस्तकामध्ये तर राज मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते.. आम्ही जाताच निशांत लगेच आला आणि मला चेअरपर्यंत घेऊन गेला.. हे राज ने इशाऱ्याने हर्षुला दाखवलं.. ती देशील तोंड वाकड करत बसली..



"गाईज नेक्स्ट वीकमध्ये माझ्या लाडक्या बहिणीचा म्हणजेच आपल्या हर्षुचा बर्थडे आहे आणि त्यामुळे तुम्ही यायच आहे हा.." "अरे हो खरचं की, मी तर पार विसरले होते.." मी हर्षुकडे बघत बोलले असता तिने एक खोटी स्माईल दिली.


हे माझ्या लगेच लक्षात ही आल. कदाचित निशांत मला घेऊन आला हे तिला आवडलं नव्हतं. सगळं ठरवून आम्ही आप-आपल्या घरी जायला निघालो..


to be continued.......



(कथेचा हा पार्ट कसा वाटला हे नक्की सांगा. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)