Julale premache naate - 16 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते- भाग-१६

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते- भाग-१६

सकाळच्या किरणांनी माझी झोपमोड केली... जणू काही ती सांगत होती की, उठ सकाळ झालीये. बाहेर वेगवेगळे पक्षी गात होते... जस की कोणी मॉर्निंग सॉंगच लावलं असाव. छान सकाळ झाली होती. मी उठुन खितकीत जाऊन बसले. समोर दूरवर पसरलेला समुद्र कालच्या आठवणी ताज्या करून गेला..


आज आमचा शेवटचा दिवस होता रत्नागिरी मधला. काल निशांतने मला सुंदर पद्धतीने सॉरी म्हटलं होतं, सोबत छान सरप्राईज ही दिल होत. आणि त्याच्या मनात हर्षु आहे हे तिच्याकडे बघुन कौल ही दिला होता. यासर्वात सर्वात जास्त मलाच वाईट वाटत होतं.. तेच मनाला कळत नव्हतं की, मला का वाईट वाटत आहे. त्यात भर म्हणून की काय.., हर्षु माझ्यावर चिडली होती. सगळं वेगळच होऊन बसल होत.


विचार करतच मी फ्रेश होण्यासाठी गेले. फ्रेश होऊन खाली आले. ते तिघे गार्डनमध्ये बसुन गप्पा मारत होते. मी जाताच हर्षु मात्र उठून निघून गेली.. याच मलाच वाईट वाटलं की, माझ्यामुळे हे अस झालं. "चला नाश्ता करूया.. तुझ्यासाठीच आम्ही थांबलो होतो.." राज माझ्याकडे बघुन बोलला. मी चेहऱ्यावर उसन हसु आणत आम्ही डायनिंग रूममधे यायला निघालो. थोड्यावेळाने हर्षु ही आम्हाला जॉईन झाली.


नाश्ता करून सगळे टाईमपास जारत होते. मी देखील टाईमपास करण्यासाठी एकटीच समोर पसरलेल्या समुद्रावर फेरफटका मारायला गेले. बीचवर वर्दळ कमीच होती.. छान शांत वाटत होतं. दुपार असल्याने समुद्राला भरती होती.. मी चालत जाऊन एका ठिकाणी बसली.. वर रखरखीत ऊन, पण समुद्रावरील थंड वाऱ्याने ते जाणवत नव्हतं. शांत वाटत होतं.., आवाज काय तो फक्त समुद्राच्या लाटांचा जो शांतता भंग करत होता...


परत कालची आठवण झाली.. आणि सगळं मनात फिरू लागल.. निशांत.., हर्षु.. ते एकत्र येतील... पण चांगलं आहे ना.. आपण तर बघितलं होत की हर्षु किती वेड्यासारखा प्रेम करते निशांतवर... आणि आधीच सगळं ठरलं होतं आपण फक्त मैत्री करायची होती...., मग आता का त्रास होतो आहे आपल्याला.... आपल्याच मनात कुठे तरी निशांतसाठी सॉफ्ट कॉर्नर तर होत नाहीये ना...?? आपल्याला तो आवडू तर लागला नसेल ना..?? काही काय.., आपण काय विचार करतो आहोत... निशांत फक्त आपला मित्र आहे. नको.., ते विचारच नको ज्याचा त्रास होईल..... मी माझ्याच विचारात असता मागून कोणीतरी येऊन माझे डोळे बंद केले... मला वाटलं निशांत असेल, पण तो राज होता...


"काय करतेय इथे....? ते ही एकटी..??कोणी घेऊन जायचं उचलुन.." यावर मला ही हसु आवरलं नाही.. "काही पण हा राज... मला घेऊन जायला मी काय सोन्याची आहे का..??"
"नाही तु त्याहून मौल्यवान आहेस." हे वाक्य त्याने माझ्या डोळ्यात बघत पूर्ण केलं.. मी फक्त एक स्माईल देत समोर पाहिलं.
"पण एकटी काय करतेस, मला सांगायच होतस मी आलो असतो सोबत.." "असच आले आज आपण निघणार आहोत ना.. म्हणून एकदा शेवटचं भेटुन यावं या समुद्राला.., सो आले."


"तुला कस कळलं मी इकडे आहे ते..??" तुला घरभर शोधलं पण दिसली नाहीस... निशांतला विचारल तर तो हर्षु सोबत गप्पा मारत बसला होता.. या वाक्यावर मी आश्चर्याने राजकडे पाहिलं.. "काय ग काय झालं असं का बघत आहेस..??" काही नाही असच..." मी लगेच समोर पाहिलं. खर तर आताही मला रागच येत होता.. कारण निशांतला नाही वाटलं मी कुठे गेली असावी हे शोधावं मनात एकटीच बोलत असताना.. निशांत ने माझ्या समोर एक टिचकी वाजवली... "काय झालं..? कसला एवढं विचार करत आहेस..?? तु ठीक आहेस ना.....?"


मी कसा तरी हसुन मानेनेच होकार दिला. "चला जाऊया आपण बंगल्यावर.. मला भुक लागली आहे." मी राजकडे बघत बोलले. "हो चल.., नाही तर चक्कर यायची तुला.."
"तुला कस कळलं की मला भुकेने चक्कर येते हे.???" मी आश्चर्याने राजकडे पाहिल... " हे मला निशांत बोलला होता.." हे ऐकून जरा बर वाटलं की, निशांतला माझी काळजी आहे.. थोड्यावेळाने आम्ही बंगल्यात आलो. फ्रेश होऊन जेवायला बसलो.

खाता खाता हर्षुला ठसका लागला असता निशांतने लगेच पाणी पुढे केलं. तोच मला लागता त्याने फक्त बघितल. पाणी राजने दिल.. अचानक एवढा बदल व्हावा. काय झालं असेल असं की, त्याने अस वागावं माझ्याशी. मी जेवण भरभर जेवत होते. पण जेवताना डोक्यात असंख्य प्रश्न...

काहीच कळत नव्हतं. कदाचित त्याला हर्षल आवडू लागली असावी. आपणच जास्त विचार करत आहोत असं मनाला समजावल. सगळं उरकून आम्ही गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो. आज कधी नव्हे तो निशांत हर्षुसोबत गप्पा मारत होता. हाताने टाळ्या देणं काय... नि काय चालू होतं त्यांचं... हे सगळं मी गप्पपणे बघत होते. वाईट वाटत होतं का ते म्हाहित नाही...


थोड्यावेळाने निघायचं म्हणून आम्ही आमच्या रूममधे गेलो. सगळं आवरू लागलो. आवरे पर्यंत संध्याकाळ उलटली.. त्यामुळे उद्या सकाळी निघायचं प्लॅन झाला. आजच वातावरण काही वेगळच होत. निशांत, हर्षु आणि राज छान गप्पा मारत होते. मी एकटीच बाजूला बसुन ऐकत होते.. कारण बोलण्यासारखं माझ्याकडे काही उरलच नव्हत. हर्षुची माझ्यावर नजर जाताच ती मला इग्नोर करत होती. त्यात भर म्हणून निशांत ही कमीच बोलत होता. एकच होता तिथे जो माझी विचारपूस करत होता..., तो म्हणजे राज.


रात्रीच जेवण जेवुन सगळे गच्चीत जायला निघाले.., पण मी झोपेचे कारण करून स्वतःच्या रूममधे आले. खर तर मला आता सहन होत नव्हतं की, निशांतच हर्षु सोबतच बोलणं. आता कळत होत्या हर्षुच्या भावना.. तिला किती वाईट वाटत असेल.. विचार करता करताच मी झोपी गेले..


सकाळच्या थंड हवेचे सकाळची आठवण करून दिली. खर तर उठायची इच्छा नसताना ही, मी उठले आणि फ्रेश होण्याकरता गेले. खाली आले तर, डायनिंगवर निशांत आणि हर्षु गप्पा मारत चहा पीत होते. हे बघुन तर मनाला चांगलाच झटका बसावा तस झालं..., हर्षुची नजर जाताच तिने एक स्माईल ही दिली.. "अग उठलीस तु, ये..., चहा प्यायला. आज चहा मी केला आहे सर्वांसाठी..." मी जरा उदास चेहऱ्याने जाऊन डायनिंगवर बसले. तोच राज ही आम्हाला जॉईन झाला.. "गुड मॉर्निंग फ्रेंड्स.." आम्ही पण त्याला विश केलं. "अग काय झालं प्रांजल..?? उदास का वाटते आहेस.??" सगळं ठीक आहे ना.??" "हो ठीक आहे.., आपण जाणार आहोत ना आज म्हणून.., मी उसने हसु आणून उत्तर दिल.. खर तर अपेक्षा होती की, निशांतने विचाराव पण... चहा- नाश्ता संपवुन आम्ही आपल्या आपल्या रूममधे गेलो.. आज आम्हाला निघावच लागणार होतं...

सगळे तय्यार होऊन आणि स्वतःच्या बॅग घेऊन आम्ही खाली आलो. काही नोकरांनी ते सामान गाडीत ठेवून दिल. मी सर्वांचा निरोप घेऊन गार्डनमध्ये गेले. तिथे मन भरून फुलांना बघून गाडीत बसायला निघाले.. निशांत गाडी चालण्यासाठी बसला होता तर बाजुची जागा आधीच हर्षुने बळकावली होती... मी नाईलाजाने मागे जाऊन बसले. थोड्यावेळाने राज ही आला.


गाडी निघाली..., मी खिडकीतुन बाहेरील निसर्ग माझ्या डोळ्यात सामावून घेत होते. परतीचा प्रवास चालु झाला होता.. मी निघताना ती प्रत्येक गोष्ट मनात साठवून घ्यायचा प्रयत्न करत होते.. बघता बघता दुपार झाली, म्हणून आम्ही जेवणासाठी थांबलो.


पोटभर जेवुन परतीच्या प्रवासाला लागलो. मी अजून ही मागेच बसले होते आणि हर्षु पुढे. निशांत आणि हर्षु छान गप्पा मारत होते... त्यांच हसन, गप्पा मारन.. मला त्रास देत होत... का त्याच उत्तर मला काही केल्या सापडत नव्हत. माझं डोकं दुखतंय सांगून मी झोपले. झोपता-झोपता राजच्या खांद्यावर माझं डोकं कधी मी ठेवलं हे देखील मला कळल नाही.... जाग आली ती राज च्या आवाजाने....

"प्रांजल... उठ चल चहा नाश्त्यासाठी... मी उठले तर गाडीमध्ये मी आणि राजच होतो. निशांत आणि हर्षु कधीच हॉटेलमध्ये जाऊन बसले होते. मग मी उठले आणि पाण्याने चेहरा धुत हॉटेलमध्ये गेले. ते दिघे अजून ही गप्पाच मारत होते. मी शांतपणे समोर असलेला चहा आणि कांदाभजी संपवली. खाऊन आम्ही निघालो असता.., हॉटेलमधून निघताना हर्षुने निशांतचा हात आपल्या हातात घेतला. हे बघून तर माझ्या रागाचा पारा चांगला तापला. पण मी काही न बोलता त्यांच्या समोरून निघुन गेले आणि पुढे बसले.

पण बोलतात ना जेव्हा तुमचं वाईट लक चालू होतं तेव्हा सगळंच वाईट होत. तसच काही माझा ही झालं. आता गाडी राज चालवत होता आणि मागे हर्षु आणि निशांत बसले होते. हर्षु निशांतच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. हे बघून मी माझी नजर खिडकी बाहेर फिरवली. बघता बघता मी देखील परत झोपले...


रात्रीच्या आठ वाजता आम्ही मुंबईमध्ये पोहचलो. राजने गाडी परत कॉलेज जवळ घेतली. आम्ही उतरून बाजुच्याच टपरीवर सर्वांनी एक एक चहा घेतला. राज आणि हर्षु घरी जायला निघाले. राजने मला विचारलं की, "सोडु का घरी." पण निशांत होता म्हणून त्यानेच नकार दिला. मी काहीच न बोलता उभी राहिली.

निशांतने आमच्यासाठी कार बुक केली होती. त्याची वाट बघत आम्ही उभे होतो. थोड्या वेळांले ती देखील आली आणि आम्ही ही आमच्या घराच्या दिशेने निघालो.. मला घरी सोडण्यासाठी आला. कॉलेजपासून घरापर्यतच्या प्रवासात मी एकही शब्द बोलले नव्हते की, निशांत बोलला होता. म्ही पोहोचलो. तो देखील माझ्यासोबत वर आला. घरी आई आणि बाबांना भेटण्याकरता.. त्यांना भेटुन जरा वेळाने तो निघाला. मला बाय करायला वळला असता मी काही न बोलता आपल्या रूममध्ये निघून गेले. साधं त्याला बाय देखील बोलले नाही. माझ्या अशा वागण्याचा कारण कदाचित त्याला म्हाहित असाव. त्याने ही आई-बाबांचं निरोप घेत तो निघून गेला.

मी थकल्यामुळे छान गरम बाथ घेतला. आईच्या हातचं जेवण जेवुन मी लवकर झोपायला पळाले. पण झोप काही केल्या येत नव्हती. सारख आज घडलेलं आठवत होत... एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरून केव्हा तरी मला झोप लागली असावी.


to be continued......


स्टेय ट्युन अँड हॅपी रीडिंग गाईज.