Book review - the Modern Science and the spirituality in Marathi Book Reviews by Shashikant Oak books and stories PDF | पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

15 Jul 2014 - 10:32 pm

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258

वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.

हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीनऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीतअसूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने काहोईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिकसत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातूनप्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकालान्याय देतात.

या सुसंगत संकलनातलेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतनथक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांनागीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय ‘स्ववैशिष्ठ्यवादी’म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचाखरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.

चार्वाकवादावर लेखनकरताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथेअग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्धहोते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झालाआहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.

चार्वाकांचादेहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतीलयंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेकउदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्याकसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठीजगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.

प्रकरण 2 मधे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीप्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिकनसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणेआवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात ‘परस्पर विरोध’(पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात ‘सदसद्विलक्षण’रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.

प्रकरण 3 मधे ‘जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला नसुटलेले कोडे’ यात ते म्हणतात, ‘जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तरमाहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हेतर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे.मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचाप्रयत्न करताना दिसतात.’तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.

प्रकरण 4 ‘प्लँचेट’ या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनीत्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतातकी मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.

प्रकरण 5ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भागम्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. ‘फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्यअसते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्याव्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही,कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्षकाढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्तीम्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात.म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पणसमस्याही राहात नाही.

प्रकरण 6 संतसाहित्यातूनअंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे?यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरीलअसून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असेत्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडेनिर्मित संताच्या ‘चमत्कारवादातील’ भ्रामक कथनातून त्यांनीवाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. ‘संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांनाचमत्कार करता येतात’हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी, ‘संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबूननाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तरयोगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.

प्रकरणे 7 ते 10 मधूनप्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना ‘समस्या’ ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील ‘विश्वोपत्तीच्या’ निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाशटाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही)‘न करता भजन जाहले’ म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावाकिंवा कसा लावू नये?याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येककर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो ‘जाणतो’ किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारणत्याच्या त्या ‘जाणण्यामुळे’ ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जोजाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजनघडत नाही’.

प्रकरण 9 मधे ‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे कीढगातील वाफेप्रमाणे असावा?,गीता कथनाला युद्धभूमि योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिकफोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे ‘गीतेचे अधिकारी कोण?असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देतानाप्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, ‘तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईलसुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारीआहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर- वधूची आई वरात श्रीमंतीपहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्नपाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला‘वर’ म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचासोबती’ म्हणून निवडते.म्हणून तिचा एकटीचाच वरावर ‘अधिकारचालतो’. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारीव्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणूननिवडाची असते.

प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. ‘अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना, केवल वेदांतातील ‘दृष्टीसृष्टीवाद’ तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिकदृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्यविचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्यअद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व ‘स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगर’ आहेत असे जाणवते.

पुस्तक बुकगंगा.कॉम वर उपलब्धब्ध

संकलक - शशिकांत ओक.