Canosa belongs to Pakistan, to America! in Marathi Anything by Shashikant Oak books and stories PDF | कानोसा पाकिस्तानचा, अमेरिकेचा!

Featured Books
Categories
Share

कानोसा पाकिस्तानचा, अमेरिकेचा!

मित्रांनो,

भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अंतर्गत घटनांचा आपल्या राजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.
सदर आवडले तर पुढे चालू ठेवता येईल...

१. सध्याच्या मोडकळीस आलेल्या अवस्थेतील पाकिस्तान आपल्या दृष्टीकोनातून किती सोईचा आहे? किंवा किती त्रासदायक ठरणार आहे? यावर विचार व्यक्त करतो. 

पाकिस्तान अस्तित्वात राहणे भारतीय जनतेसाठी आवश्यक आहे. आपापसातील मतभेद वैमनस्य, आर्थिक तंगी यात रंगून गेलेल्या पाकिस्तानी जनतेला भारताने पाक व्याप्त काश्मीर घेण्यासाठी हालचाली करणे आत्म घातकी आहे. 

२.तालेबानी राजवट कर्मठ मुस्लिम समाज रचनाला मान्यता देते. त्यांच्या धार्मिकतेचा पाठपुरावा इम्रान खान करत असल्याने तो तेथील लष्कराच्या उरावर उठलेला भस्मासुराचा अवतार आहे. इराण आणि तुर्किये देशात सत्तांतराचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या नंतर शिया सुन्नी हा संघर्ष क्रमप्राप्त आहे. 

३. तात्या ट्रंप यांना घाई आहे. कारण ४ पैकी शेवटच्या दोन वर्षांत पुढील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीचे वेध सुरू होणार असतात. आपल्यानंतर अमेरिका प्रथम याची तरतूद करण्यासाठी योग्य व्यक्तीला निवडणे ही एक परीक्षा आहे. आधीच्या ४ वर्षातील तात्या ट्रंप राजवटीत त्यांची मर्जी किती तकलादू असते ते त्यांनी झोकात लांबलचक सह्या करत हाकलून दिलेल्या सहकार्‍यांच्या यादी वाचून लक्षात येते. 

४.अमेरिका ही मोठी राजकीय महासत्ता आहे. पण ती जणूकाही एखाद्या कार्पोरेट कंपनी प्रमाणे चालवता येते. त्यातील बॉस मी म्हणालो ती पूर्व दिशा असे करून चालणार नाही हे तात्यांना युरोप, रशिया, चीन आणि भारत यांनी दाखवायला सुरुवात केली आहे. मी तयार केलेल्या कराराच्या मसूद्यावर गपगुमान सही शिक्का मारून घरी जायचे असा खाक्या चालणार नाही याची जाणीव झेलेन्स्कीची उर्मट भेट सांगून गेली. 

५. पाकिस्तानात स्टेट विदिन स्टेट अशी अवस्था झाली आहे. चीनने अनेक विमानतळ, रस्ते, बंदरे व वीज निर्मिती केंद्रांसाठी पाकिस्तानच्या जमिनीवर दीर्घ मुदतीच्या करारानुसार जमिनीचे मालकी हक्क मिळवले आहेत. दिलेल्या कर्जाची परतफेड फेड निव्वळ अशक्य असल्याचे नाव पाकिस्तान पण जमिनीची मालकी चीनच्या घशात घालून एक वेळ आपल्या देशात आपले उपरेपण आनंदाने स्वीकार करून बसायला लागले जाणार आहे. 

६. तसे पाहिले तर हे सर्व का घडत आहे? मुस्लिम धर्माचे जोखड आपणहून गळ्यात लटकवून घेऊन ते कसेही करून शेवटपर्यंत मरणोत्तर जहन्नुमच्या दिवा स्वप्नात, ७२ हूरे नंतर शारीरिक सूख देणार या आशेने ही कौम हिरीरीने काम करत आहे. आमच्या बरोबर इतर धर्माच्या लोकांना ते स्वर्गसुख मिळावे या उदात्त हेतूने ते आजीवन झटतात. बिचारा गैर मुस्लिम समाज त्यांच्या या कळकळीच्या कार्यक्रमात आनंदाने सहकार्य का करत नाही याचा विषाद त्यांना स्वस्थ बसू देत नाही. रमजानच्या पवित्र महिन्याची पर्वणी साधून त्यांना स्वतःला उपाशीपोटी राहून मतपरिवर्तन करायला लागावे लागते आहे.

७. हस्बे हाल नावाचा एक पंजाबी भाषेतील राजकीय भाष्य करणारा कार्यक्रम रोज पहायला मी विनंती करतो. त्यातील अझीझी मुख्य किरदार अनेक रूपात सामोरा येतो. कघी बायकोच्या कटकटींनी भेजा फ्राय करून घेतो. कधी खान दानी गायक कलाकार तक कधी अक्कडबाज पोलीस ठाण्यातील एस एच ओ दिसतो. पाकिस्तानातील वल्ली राजकारणी शेख रशीद चिरून ओढत शेखी मिरवणारा, तर कधी सध्याच्या काळातील वझीरे आज़म शाहबाज शरीफ तावातावाने हातवारे करून समोरच्या माईकची वाट लावताना चेष्टामस्करी मस्त करतो. सोनेरी विग घातलेला ट्रंपू  हा त्यांचा हातखंडा प्रयोग आहे. पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर काळा बराक ओबामा, लडबडत्या मानेचा जो बायडेन यांची तूतू मैं मैं समजायला पंजाबी मात्र कळायला हवे. 

आपली काय मते आहेत? समजून घ्यायला आवडेल विंग कमांडर शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049