Pyar mein.. kadhi kadhi - 15 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-१५)

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-१५)

परीक्षेच्या दोन दिवस आधी प्रितीचा मेसेज आला की नेहाने तिचं नावं कॉलेजमधुन काढून घेतलं आहे.. बहुतेक ती पुढे शिकणारच नाहीये..

मी तो मेसेज दोनदा वाचला आणि डिलीट करुन टाकला. मनामध्ये एक आशा होती की नेहाशी संबंधीत ही शेवटचीच गोष्ट.. कदाचीत.. ह्यापुढे नेहा किंवा तिच्याशी संबंधीत कुठलीच गोष्ट माझ्या.. ‘आमच्या’ आयुष्यात येणार नाही… कदाचीत..

प्रितीची परीक्षा संपण्याची तारीख मी दिवस मोजुन मोजुन जवळ आणत होतो. तिचं परीक्षेचे पुर्ण टाईम-टेबल मला पाठ होते. कुठल्या दिवशी, किती वाजता, कोणता पेपर आहे सगळं.

ह्या काळात मी प्रितीला कधी फोन केला नाही, की मेसेज.. मग प्रत्यक्ष भेटण्याचा तर प्रश्नच नव्हता. साधं ‘बेस्ट-लक’ सुध्दा म्हणालो नव्हतो. माझ्या बेस्ट विशेश नेहमीच तिच्या बरोबर होत्या.. असतील.. आणि हे प्रितीला ही नक्कीच चांगले माहीती होते. मला तिच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणायचा नव्हता. ह्या उलट मी सुध्दा माझ्या कामावर पुर्ण लक्ष केंद्रीत केले. सकाळी लवकर ऑफीस गाठायचे, तर संध्याकाळी शक्य तितक्या उशीरापर्यंत थांबुन कामं उरकायची. कसंही करुन मला माझं रिलिज प्रितीच्या परीक्षेच्या आधीच संपवायचं होतं. त्यानंतरचा वेळ फक्त मला आमच्या दोघांकरता हवा होता. मी कामाच्या बाबतीत फुल्ल चार्ज्ड झालो होतो.. आणि सगळ्यांनाही कामाला लावलं होतं.

एक टीम-लिड म्हणुन, मला कधी कधी हाताखालच्या लोकांची दया येत होती, विनाकारण त्यांना मी प्रेशराईज करत होते.. पण मला निदान त्या क्षणी तरी माझ्ं प्रेम महत्वाचं वाटत होतं. खुप तरसलो होतो मी त्यासाठी.. आणि आता जेंव्हा मला माझं.. मला हवं असलेलं प्रेम मिळणार होतो.. तेंव्हा त्यासाठी मी वाट्टेल ते करायला तयार होतो.


प्रितीच्या शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशी माझं प्रोजेक्ट अलमोस्ट रेडी टु लॉंच होतं.. रात्रीचे साडे-बारा वाजुन गेले होते. टेस्ट-टीम कडुन फायनल साईन-ऑफ मिळाला की माझी तयार असलेली ‘रिलिज-मेल’ फक्त पाठवायचं काम बाकी होतं.

मनात प्रितीचा विचार आला.

काय करत असेल प्रिती आत्ता?..

मला आठवलं.. प्रितीचा शेवटचा पेपर अगदीच सोप्पा आहे असं ती म्हणाली होती.. आणि शिवाय तो फक्त ५० मार्कांचाच होता..

तिच्याशी फोनवर बोलायची इच्छा खूपच प्रबळ होत होती.

प्रिती जागी असेल? अभ्यास करत असेल? की झोपली असेल?

इतक्या दिवसांच्या कठीण श्रमाने खूप्पच थकवा आला होता.. तिचा गोड आवाज ऐकायची मनाची इच्छा डावलणं अवघड होतं चाललं होतं. मग ठरवलं फोन करुयात.. फक्त तिन रिंग्ज.. तेवढ्यात तिनं फोन नाही उचलला तर बंद करायचा.

मी तिचा नंबर डायल केला.

एकदाच रिंग वाजली आणि लगेचच प्रितीने फोन उचलला..

“हाय तरुण…” महाप्रचंड गोड.. साखरेत..मधात घोळलेला तिचा आवाज कानावर पडला आणि असं सुप्पर रिफ़्रेश झाल्यासारखं वाटलं..
“मी डिस्टर्ब तर नाही ना केलं..?” शक्य तितक्या हळु आवाजात, शेजारच्या क्युबीकमधील कुणाला ऐकु जाणार नाही असं मी प्रितीला विचारलं..
“टेलीपथी..यु सी तरुण.. मला पण तुलाच फोन करावासा वाटत होता…”, प्रितीपण अगदी फोनच्या जवळ जाऊन बोलत होती..बहुदा.. बाहेर आई-बाबांना ऐकु जाऊ नये म्हणुन..

मॅन.. धीस लव्ह थिंग इज जस्ट ऑस्सम.. असं मध्यरात्री चोरुन चोरुन बोलण्यातली मज्जा ज्याने प्रेम केलं तोच जाणे..

प्रितीच्या आवाजातला आनंद मला जाणवत होता…

“माय रिलिज इज जस्ट ऑन द वे.. अजुन अर्धा-पाऊण तास.. खूप दमुन गेलो होतो.. म्हणुन म्हणलं तुला फोन करावा..”
“डोन्ट पुश टू हार्ड तरुण.. तब्येतीची काळजी घे.. आय .. आय निड यु फ़ॉर रेस्ट ऑफ़ माय लाईफ़..”, प्रिती हळु आवाजात म्हणाली..

खरंच सांगतो मित्रांनो.. सर्वांगावर रोमांच उभे राहीले.. असं वाटलं.. असं वाटलं जणू कानशीलं गरमं झाली आहेत.. जणु हृदयाच्या जागी एखादी धडधडत येणारी एक्स्प्रेस आहे..

“डाईंग टु सी यु टुमॉरो प्रिती.. खूप काही महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी..” आवाजात तो नॉटीनेस आणत मी म्हणालो..
“आय नो.. सेम हिअर..”, प्रिती म्हणाली..
“चलं.. डिस्टर्ब नाही करत तुला.. मी ठेवतो फोन.. ऑलराईट..?”
“ऑलराईट तरुण.. सी यु टुमॉरो.. गुड नाईट..”
“गुड नाईट..”

मला खरं तर फोन ठेवायची बिलकुल इच्छा नव्हती.. मी प्रितीने फोन ठेवायची वाट बघत फोन धरुन होतो.

काही काळ शांततेत गेला. प्रितीच्या श्वासोत्छासाचा आवाज मला ऐकु येत होता.

“तरुण..”, प्रिती म्हणाली..
“हम्म..”
“Mwaaaah :* ”

मी काही बोलायच्या आधीच फोन बंद झाला होता.

टेस्ट-टीम ने नेहमीप्रमाणे नको त्या प्रोसेसे फॉलो करत करत रिलिजला अडीच वाजवले. मेल पाठवुन ३.३० ला घरी पोहोचलो. बेडवर अडवा झालो तेंव्हा असा अर्धवट तंद्रीतच होतो. अर्धवट जागा.. अर्धवट झोपलेला..


प्रितीच्या आठवणींतच कधीतरी झोप लागली.. सकाळी जाग आली ते आईने मोठ्या आवाजात चालु ठेवलेल्या मिक्सरच्या आवाजाने. घड्याळात बघीतले तेंव्हा १०.४५ होऊन गेले होते. अजुन पंधरा मिनीटं आणि प्रितीचा शेवटचा पेपर सुरु होणार होता आणि दोन तासांनंतर मी माझ्या प्रितीला भेटणार होतो.

मी आरश्यात तोंड बघीतले. रिलीजने माझी पुर्ण वाट लावली होती. केस..दाढी वाढली होती.. चेहरा ओढल्यासारखा झाला होता.. डोळे निस्तेज झाले होते. पटकन कपडे बदलले आणि सलुनला पळालो. पाऊण तासांनंतर केस/दाढी कापुन.. कटींगवाल्याच्या हातचा मस्त हेड आणि फेस मसाज घेतल्यावर जरा माणसात आल्यासारखे वाटले. घरी येऊन हॉट शॉवरने आंघोळ केली आणि फेव्हरेट शर्ट-पॅन्ट चढवली. घड्याळात १२ वाजत होते तेव्हढ्यात मोबाईल वाजला.

प्रितीचा फोन होता.

मी घड्याळात पुन्हा पुन्हा बघीतले.. प्रितीचा पेपर तर १ वाजता संपणार होता..

“हॅल्लो..”
“कॉलेज गेटपाशी ये १२.३० वाजता..”
“१२.३० वाजता? पण तुझा पेपर तर १ ला संपणार आहे ना? आणि तु आहेस कुठे?”
“मी रेस्ट-रुम मध्ये आहे.. आय कान्ट वेट टु मिट यु टील १ ओके.. आणि जेव्हढा पेपर लिहुन झालाय तेव्हढा पुरेसा आहे मी पास व्हायला.. सी यु अ‍ॅट १२.३० अ‍ॅन्ड डोन्ट बी लेट..”

“पण प्रिती.. पर्सेंटेज कमी येतील ना..”
“फ* विथ द पर्सेंट.. आय कान्ट राईट मोअर… यु बेटर बी ऑन टाईम..”

मी काही बोलायच्या आधीच तिने फोन ठेवुन दिला..

दॅट वॉज इन्सेन..
तिच्या आवाजात आनंद होता.. एक्साईटमेंट होती.. रोमान्स होता..

मी पट्कन आवरले आणि बाईकवर टांग टाकुन प्रितीच्या कॉलेजच्या दिशेने निघालो. ट्रॅफीकमधुन गाडी घुसवत, शक्य तेंव्हा सिग्नल मोडत.. मधुनच चालणारे पादचारी, वाकडे तिकडे चालणारे रिक्शावालांना शिव्या घालत कसा बसा वेळेवर पोहोचलो. गाडी मेन स्टॅडवर लावत होतो तेंव्हा कॅम्पसमधुन प्रिती बाहेर येताना दिसली..

माझ्या पुर्ण शरीरातुन एक अतीशय विचीत्र संवेदना धावत होती.. जणु शरीराचा प्रत्येक स्नायु प्रितीला मिठीत घ्यायला आसुसला होता.. जणु कित्तेक वर्षांनंतर मी तिला भेटत होतो.. जणु ती माझ्याच शरीराचा एक अविभाज्य भाग होती..

मी प्रितीला काही बोलणार एव्हड्यात ती हळुच म्हणाली..”काहीही मुर्खासारखं करु नकोस.. आमची एच.ओ.डी. मागेच आहे..”

मी मागे बघीतलं. दोन स्त्रीया गेट बाहेर येत होत्या. त्यांच्यातल्या एकीला मी लग्गेच ओळखलं.. मला आणि नेहाला त्या दिवशी थांबवुन चौकशी करणार्‍यांपैकी एक त्या होत्या. बहुतेक त्यांनी ही मला ओळखलं.. पण तेंव्हा मी नेहाबरोबर होतो.. आणि आता प्रितीबरोबर ह्याबद्दलच काहीसे कुतुहल, आश्चर्य आणि मग.. ‘चालायचंच..’ असे काहीसे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले आणि त्या दोघीही तेथुन काहीही नं बोलता निघुन गेल्या.

ह्यावेळेस मी कॉलेजच्या गेटच्या बाहेर उभा होतो.. सो अर्थात त्यांना काही बोलण्याचा अधीकारही नव्हता..

मी प्रितीकडे बघीतले.

“टेक मी अवे.. फ़ार फ़्रॉम धीस क्राऊड..विल यु?”, प्रितीने भुवया उडवत विचारलं..
“अ‍ॅज यु विश मॅम..” म्हणत मी बाईक चालु केली.

मी आरश्यात बघीतलं, प्रिती माझ्याकडेच बघत होती.

“फार वाईट्ट सवय आहे तुला तरुण सारखं आरश्यात बघण्याची, पु्ढे बघुन चालवं गाडी..”, प्रिती लटक्या रागाने म्हणाली.


प्रितीला पहील्यांदा पाहीलं तेंव्हा पासुन आत्तापर्यंतच्या सर्व आठवणी एक एक करुन मनामध्ये उतरत होत्या. कॉलेजमध्ये पहील्यांदा पहाताच ‘हीच ती’ जिच्यासाठी जिव ओवाळून टाकावाचा झालेला अविष्कार. दोन भेटींमध्येच नेहाला विसरुन पुर्णपणे प्रितीच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार, नेहाच्या लग्नात बार असुनही, केवळ मला भेटायला आलेली प्रिती.. नेहाच्या घरी पुजेला जाताना बाईकवर घालवलेले ते सुंदर क्षण, तिचा पहीला स्पर्श.. सिटी लायब्ररीमध्ये ते चोरटे कटाक्ष.. बॅंगलोरला जाताना विमानात प्रितीशी बोलण्यात घालवलेले ते अविस्मरणीय क्षण.. आनंदाच्या हिंदोळ्यावरुन निराशेच्या गर्तेत कोसळवणारे बॅंगलोरचे ते दोन-तिन दिवस.. प्रितीशिवाय घालवलेले ते दोन-तिन आठवडे आणि नेहाशी माझ्याबाजुने.. माझ्यासाठी भांडणारी प्रिती.. सगळं काही जणु मनामध्ये कोरलं गेलं होतं.. कायमचं..

“कसला विचार करतो आहेस?”, प्रितीच्या आवाजाने भानावर आलो..
“काही नाही.. असंच सगळं स्वप्नच ते.. आठवत होतं मागचं सगळं.. कुणासाठी तरी जिव इतका तुटत होता.. वाटतं आज ते स्वप्न पुर्ण झालं..”
“ओह.. हो का? कुणासाठी रे…”
“आहे.. अश्शीच एक गोड गोड मुलगी आहे..”

साधारण २०-२५ किलोमीटर गेल्यावर गावाबाहेरुन एक टेकडीवजा डोंगराकडे जाणार्‍या रस्त्याने गाडी वळवली. आजुबाजुला दाट झाडी होती. क्षणार्धात हवेत गारठा पसरला.. थोड्या खराब रस्त्याने गेल्यावर पुढे एक मोठ्ठ पठार होतं तेथे गाडी थांबवली. तेथुन खालच्या गावाचा मस्त व्ह्यु दिसत होता.

“वॉव्व.. काय मस्त जागा आहे ही तरुण.. नेहा बरोबर इथे नेहमी यायचास का रे?” प्रितीने थट्टेने विचारलं.
मी चिडून एक जळजळीत कटाक्ष प्रितीकडे टाकला.. “बास ना आता.. निदान इथं तरी नको नेहा..”

“स्वॉरी..” प्रितीने दोन्ही हाताने आपले कान पकडले..

सर्वत्र प्रचंड शांतता होती. फक्त वार्‍याचा आणि वार्‍याने हलणार्‍या झाडांचाच आवाज. मी आणि प्रिती एकमेकांकडे बघत उभं होतो..

मी दोन्ही हात हवेत पसरले.

प्रिती माझ्यापासुन काही पावलं लांब होती.

ती स्वतःशीच हसली आणि मान खाली घालुन दोन पावलं चालत आली आणि मग पळत पळत येऊन मला घट्ट बिलगली…

“बस्स.. ह्यासाठीच तर केला होता हा सगळा अट्टाहास..”, मनामध्ये एक विचार येऊन गेला.

किती क्षण.. किती वेळ .. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो काय माहीत. जणु स्वभोवतालचा पुर्ण विसर पडला होता. जणु आजुबाजुला काही नव्हतेच.. कदाचीत आम्ही ह्या दुनियेत.. ह्या पृथ्वीवर्च नव्हतोच..

लोकं म्हणतात स्वर्ग कुणी पाहीलाय??

आज छातीठोकपणे मी सांगू शकतो.. “होssss मी स्वर्ग पाहीलाय…. मी स्वर्ग पाहीलाय……”

[क्रमशः]