Pyar mein.. kadhi kadhi - 14 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-१४)

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

प्यार मे.. कधी कधी (भाग-१४)

“तरुण, बॅंगलोर ऑफीस कन्व्हेड स्पेशल थॅक्स टु युअर व्हिजीट, इट हेल्प्ड देम अ लॉट..”, मुरली दुसर्‍या दिवशी मला ऑफीस मध्ये म्हणत होता.. “दे वेअर जस्ट चेकींग इफ़ यु वुड लाईक टु रिलोकेट टु बॅंगलोर?”

“रिलोकेट? यु मीन परमनंटली? ऑर टेंम्पररी?”
“लेट्स सी.. स्टार्ट विथ अ इअर फ़स्ट अ‍ॅन्ड इफ़ यु लाईक, यु कॅन टेक अ कॉल.. आय एम गुड विथ इट.. यु डिसाईड..”

कल्पना खरं तर चांगली होती.. सगळ्यांपासुन काही काळासाठी दुर गेलो तर कदाचीत हे सगळं विसरायला होईल असं काहीसं वाटत होतं, पण त्याचबरोबर प्रितीपासुन इतक्या दुर जायचं मनाला पटत नव्हतं. म्हणजे.. जस्ट दोन दिवसांपुर्वीच तर आम्ही ब्रेक-अप केलं होतं.. परत कध्धीच न भेटण्यासाठी.. पण तरीही मनामध्ये कुठेतरी आशा होती.. की निदान सर्व सुरळीत होईल.. प्रितीशी भेटणं अधुन-मधुन का होईना, होईल.. सो डिसाईडेड टु वेट अ‍ॅन्ड वॉच..

मुरलीला ‘विचार करुन सांगतो’ असं सांगुन तो विषय तेथेच तात्पुर्ता का होईना थांबवला.


चार-पाच दिवस होऊन गेले, पण प्रितीची आठवण काही केल्या मनातुन जात नव्हती. मनात खुप वेळा विचार येऊन गेला तिला फोन करण्याचा, पण हिम्मत होत नव्हती.

कुठल्या तोंडाने फोन करणार होतो मी? मीच स्वतः तर ब्रेक-अप करुन टाकले होते. कुठुन तो स्वामी-लक्ष्मी भेटले असं क्षणभर वाटुन गेलं. प्रितीने तिचं ‘लास्ट सिन’ स्टेटस व्हॉट्स-अ‍ॅपच बंद करुन टाकलं होतं, त्यामुळे ती ऑनलाईन आहे किंवा कधी होती तेच कळत नव्हतं. कित्तेक वेळा तिचा नंबर टाईप केला, पण ‘कॉल’ बटन काही दाबु शकलो नाही.

मला तिच्याशी बोलायचं होतं. निदान एक मित्र म्हणुन तरी! त्या दिवशी नातं तुटल्याचं जसं दुःखं मला झालं होतं तस्संच तिलाही झालं असणारच होतं. किंबहुना तो विषय काढायच्या आधी, मी बराच विचार तरी केला होता.. तिला मात्र ते सगळं अचानकच घडलं होतं. मला ती कशी आहे? स्वतःला सावरु शकली आहे? की नाही? हे जाणुन घ्यायची फार इच्छा होती.

शेवटी फोन नको, निदान व्हॉट्स-अ‍ॅप मेसेज करायला काहीच हरकत नाही ह्या निर्णयावर मी येऊन पोहोचलो.

थरथरत्या हाताने फोन उचलला..

“यु देअर?” मी प्रितीला मेसेज केला..
जवळ जवळ पंधरा मिनीटं वाट पाहीली, पण काहीच रिप्लाय आला नाही. मला पुर्ण खात्री होती की प्रिती फोनपाशीच आहे..

“आय नो यु आर देअर..”
“..व्हाय आर यु प्लेईंग सो स्ट्रॉंग ऑर मॅच्युअर?”
“व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ़ बिईंग जस्ट फ्रेंड्स?”
“हे सगळं करताना मला काय आनंद होतो आहे का? मला माझं दुःखं शेअर करावंस वाटलं तर मी कुणाशी बोलायचं?”

मी धाड धाड मनाला येईल ते टाईप करत होतो.

मी अजुन १०-१५ मिनीटं वाट पाहीली.. पण काहीच रिप्लाय नव्हता..

“फ़ाईन..इट वॉज माय मिस्टेक आय मेसेज्ड यु..सो सॉरी प्रिती मॅम.. सो सॉरी…”

“काय झालंय? का चिडचीड करतो आहेस एव्हढी?”, पाच मिनीटांनंतर प्रितीचा रिप्लाय आला
“मग काय तरं? एव्हढं अगदी शब्दाला जागायला तु काय लॉर्ड फोकलॅंड आहेस का?”
“मगं नको ना विचार करुस एव्हढा.. गेट बॅक टु युअर वर्क.. गेट बॅक टु युअर लाईफ़.. आय गेस इट इज जस्ट अ मॅटर ऑफ़ टाइम..”

“प्रिती.. आर यु आऊट ऑफ़ इट?”
“नो..”
“नो व्हॉट?
“नॉट आऊट ऑफ़ इट..”
“मग तुला कसं माहीती, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ़ टाईम..”
“तसंच असेल कदाचीत.. निदान मी तरी माझ्या मनाला तसंच समजावण्याचा प्रयत्न करतेय तरुण..”

“आय होप प्रिती, तुला माहीते मी हे मुद्दाम नाही केलं..”
“मला माहीते तरुण.. मी तुला चुकीचं नाही समजत आहे.. तुला कसं मी चुकीचं समजीन रे.. तु तर…”

मध्ये बराच वेळ शांततेत गेला..

“तु तर काय प्रिती…??”
“ओह तरुण.. का आपण परत बोलतो आहे? नको ना आपण बोलुयात काही दिवस..”
“मला भेटायचं आहे तुला प्रिती .. प्लिज.. एकदा तरी.. आपण एकमेकांच प्रेम इनडायरेक्टली का होईना कबुल केलं होतं आणि लगेच ब्रेक-अप पण केलं.. पण ह्या सगळ्यात मी तुझ्यापासुन खुप लांब होतो.. मी तुला भेटलोच नाही.. आपण एकदा पण नाही का भेटु शकत?”
“नो तरुण..”
“पण का?”

“तरुण माझ्या एक्झाम्स प्रि-पोन झाल्यात.. जर्नल्स सगळे कंप्लिट करायचे आहेत.. बराच अभ्यास राहीलाय.. आधीच फ़ोकस करायला प्रॉब्लेम होतोय..”

“ठिक आहे ना.. मी कुठे तुला ४ तास घालव म्हणतो आहे.. थोड्यावेळ भेटायला काय होतेंय?”
“नाही जमणार तरुण.. प्लिज.. उगाच नको त्या गोष्टींसाठी नको हट्ट करुस..”
“आर यु अव्हॉईडींग मी प्रिती..”
“नो! आय एम नॉट अव्हॉईडींग यु तरुण.. आय एम अव्हॉईडींग द सिच्युएशन..”

“नो प्रिती.. यु आर अव्हॉईडींग मी.. आय एम फिलींग लाईक अ बेगर नाऊ.. इट्स ओके प्रिती..”
“प्लिज डोन्ट से दॅट.. वुई हॅव डीसाईडेड टु गेट आऊट ऑफ़ इट.. मग तसंच नको का वागायला? कश्याला नको त्या गोष्टी करायच्या. एका गोष्टीवरुन दुसरं.. त्यावरुन तिसरं.. वाढतंच जातं मग ते..”

“प्रिती मी काय करतोय, काय वागतोय.. माझं मलाच कळत नाहीये.. डोन्ट नो फ़ॉर हुम आय एम हर्टींग मायसेल्फ़. माझ्या आई-वडीलांसाठी जे आपलं एकच तुणतुणं डोक्यात घेऊन बसलेत.. का तु.. जी अचानक मनाने इतकी खंबीर झालीय की मी कितीही कपाळ आपटलं, तरी फरक पडणार नाही..”

“व्हॉटएव्हर…”
“थॅंक्स प्रिती.. थॅंक्स फ़ॉर युअर रुडनेस..”
“तरुण तुच म्हणला आहेस ना.. आपण ह्यातुन बाहेर पडुयात.. मग?”
“हम्म बरोबर आहे तुझं.. तुझं माहीत नाही.. मी तरी ह्यातुन बाहेर पडलो आहे”

“व्हेरी गुड.. चलो, बाय देन.. मी जाते अभ्यासाला…”
“तु एव्हढी कुचकट्ट असशील माहीती नव्हतं.. जा.. करं अभ्यास.. नोबेल पारीतोषिक मिळणार असेल ना तुला..”
” बाय..”

सॉल्लीड चिडचिड होतं होती माझी.. इतकं काय होतं होतं तिला एकदा तरी भेटायला?

दिवसांमागुन दिवस जात होते. बघता बघता एक आठवडा उलटला आणि मग दोन आणि तीन. प्रितीकडून काहीच मेसेज नव्हता. मी सुध्दा ठरवले होते कि स्वतःहून मेसेज नाहीच करायचा. पण मनातल्या आठवणी काही केल्या कमी होत नव्हत्या.

मनामध्ये आक्रोश चालू होता.

“इट किल्स मी दॅट आय सी यु एव्हरी डे एन्ड आय नो थिंग्स कॅन नेव्हर बी द सेम. आय हेट नॉट टॉकींग टू यु, बट आय नो इट्स द ओन्ली वे टू गेट ओव्हर यु. यु हर्ट मी मोर दॅन आय डिझर्व, अ‍ॅन्ड आय नीड टू लर्न हाऊ टू बी मोर इंड्पेंडन्ट. बट आय जस्ट.. मिस्स यु. नॉट बिकॉज आय कान्ट हॅव यु, बिकॉज आय कुड. नॉट बिकॉज यु आर फार अवे, बिकॉज यु आर नॉट. नॉट बिकॉज यु हेट मी, बिकॉज यु डोंट.

आय मिस्स द वे थिंग्स युज्ड टु बी; द वे यु युज्ड टु बी. आय मिस्स अस. आवर स्ट्युपिड जोक्स, आवर क्युट मोमेंट्स…. दे वेअर व्हॉट आय लीव्ड फॉर, अंड नाऊ दॅट दे आर गॉन, अ‍ॅन्ड प्रोबब्लि विल नेव्हर कम बॅक, आय एम लॉस्ट.”


आणि एके दिवशी अगदी अनपेक्षितपणे प्रीतीचा फोन आला.

“तरुण, संध्याकाळी तासभर वेळ काढ, भेटायचंय.”, दम लागल्यासारखा प्रितीचा आवाज येत होता
“हो चालेल, पण काय झालंय?”
“नेहाने वाइट्ट डोकं फिरवलं आहे”, प्रिती चिडून बोलत होती
“नेहाने? ती कुठून आली मध्येच? काय झालंय निट सांगशील का?”

“अरे नेहाने आपले सगळे व्होट्स-अप चे मेसेज वाचले”
“काय?”, मी विसरलोच होतो मी ऑफिस मध्ये आहे. मी इतक्या जोरात ओरडलो कि आजूबाजूचे सगळे माझ्याकडे बघायला लागले
“पण कसं?”
“अरे मी मागच्या आठवड्यात नविन मोबाइल घेतला. आज नेहा आली होती घरी एक्झाम्सचं स्केड्युल घ्यायला. तिला आवडला मोबाईल म्हणून ती बघत होती. शहाणपणा करून तिने व्हॉट्स-अ‍ॅप उघडले”

“मग?”
“मग काय, मी नव्हते तिथे, किचनमध्ये होते. सगळे वाचले मेसेजेस तिने. अंगावरच आली माझ्या, कधीपासून चालू आहे हे सगळं म्हणाली”
“हे म्हणजे?”
“हे म्हणजे हेच रे आपलं व्हॉट्स-अ‍ॅपच”
“पण मग तिला चिडायला काय झालं? तसंही आपण कित्तेक दिवस बोलत नाहीये, शेवटचे मेसेज असतीलच कि आपले ब्रेक-अप चे”
“नाही, मी ते तेव्हढे डिलीट केले होते. ”
“तेव्हढेच, का?”
“अरे का काय? मला नको होते ते मेसेज, म्हणून डिलीट केले, फक्त आधीचेच ठेवले होते”
“मग आता म्हणणं काय आहे तीच?”
“आता सगळं फोनवरच सांगू का? तू भेट संध्याकाळी, ती पण येतेय. तूच बोल तुझ्या गर्ल-फ्रेंडशी”
“बरं येतो. किती वाजता? कुठे?”
“७.३० मॅडीज पास्ता, बाय”

“एक मिनीटं.. आपण ६.४५ ला भेटुया, मला जरा सविस्तर सांग काय झालं. नेहा यायच्या आधी थोडं बोललो तर बरं होईल..”
“ऑलराईट, मी येते ६.४५.. बाय..”

इतक्या दिवसांनी प्रितीला भेटण्याचा योग येत होता.. मला नेहाच्या आधी फक्त दोघांसाठी वेळ हवा होता. नेहा काय म्हणाली, ती काय विचार करतेय ह्याच्याशी मला काहीही देणं-घेणं नव्हतं. प्रितीबरोबरची ती ४५ मिनीटं मला अधीक मोलाची होती.

मी फोन बंद केला.. ऑफीसमधले अजुनही माझ्याकडे विचीत्र नजरेने बघत होते.


६.४५ ला शार्प मी हॉटेलवर पोहोचलो. टु माय सर्प्राईज प्रिती आधीच येऊन थांबली होती. तिला बघताच छातीमध्ये ‘धक धक..’ सुरु झालं.. जणु पहील्यांदा पहील्यासारखंच..

ऑफ-व्हाईट रंगाची कॅप्री आणि फ्लोरोसंट ग्रीन रंगाचा सेमी-ट्रान्स्परंट शर्ट घातला होता आणि गळ्याभोवती रंगेबीरंगी स्ट्रोल.. असली चिकनी दिसत होती.

मनामध्ये विचार केला.. ‘निट विचार कर तरुण.. व्हॉट यु विल बी मिसींग.. ही तुझी गर्ल-फ्रेंड, बायको झाली तर अर्ध्याहुन अधीक मित्र-परीवार आणि ऑफीसमधले जळुन जळुन जातील तुझ्यावर.. ती तुझी व्हायला तयार आहे आणि तु.. तु फालतु गोष्टींसाठी तिला सोडुन देतो आहेस..’

“हाय प्रिती..”
प्रिती नुसतंच हसली माझ्याकडे बघुन..

“बोल.. काय झालं…?”
प्रितीने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली आणि म्हणाली, “हे बघ तरुण, तु आणि नेहा.. तुम्हा दोघांमध्ये जे काय होतं तो एक भूतकाळ होता.. बरोबर?”
“ऑफकोर्स..” मी नकळत मान हलवली

“आणि तुझ्या म्हणण्यानुसार.. शी इज नोबडी टु यु.. अ‍ॅन्ड सेम शुड बी विथ हर..”
“अ‍ॅब्स्युलेटली..”

“मग असं असताना, मी तुला केंव्हा भेटले.. तुला केंव्हा फोन केला, मेसेज केला हे मी तिला का सांगावं? ती कोण महाराणी लागुन गेली. मी काय तुझ्यासंबंधी प्रत्येक गोष्ट तिला विचारुन करायला पाहीजे का?”

कॉफी घेऊन येणारा कॉफी बॉय प्रितीला चिडलेलं पाहुन तेथेच थांबला.. त्याला वाटलं बहुदा आमच्या दोघांच भांडण सुरु आहे.. मी हसुन त्याला कॉफी आणायची खुण केली.

“ओके.. ओके.. शांत हो.. मला बघु दे ती काय म्हणतेय.. मे बी.. तु तिची मैत्रीण ना, म्हणुन तिने एस्क्पेक्ट केलं असेल की तु तिला सगळं सांगावं असं..”
“तसं नाहीये तरुण..”
“मग कसं आहे? मला निट सांगशील का?”
“ती मला म्हणाली की .. की आता तिचं लग्न झालं आणि तु एकटा पडलास हे बघुन मी तुला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतेय वगैरे..”
“असं म्हणाली ती?”, मला खरं तर मनातल्या मनात हसु येत होतं. ह्या मुली कुठल्या गोष्टीवरुन काय आणि कश्या भांडतील.. खरंच..
“हो मग.. मी काय कुणाला जाळ्यात ओढायला बसलेय का इथं? आणि समजा असले, तरी मला हे कळत नाही, तुझ्यावर हक्क सांगणारी ती कोण? जा ना म्हणाव तुझ्या त्या शेरु कडे.. गोंजारत बसं त्याला.. आम्ही इथे काय करायचं ते आमचं आम्ही बघु..”

तिच्या तोंडुन ‘आम्ही’ शब्द ऐकुन खुप बरं वाटलं.. निदान त्या शब्दापुरतं का होईना, आम्ही ‘आम्ही’ होतो.. एकत्र होतो

“बरं मग, एक काम करु ना.. तिला सांगुन टाकतो मी आमचं ब्रेक-अप झालंय.. आणि आम्ही एक महीन्यांनी भेटतोय…”
“नाही.. प्लिज.. तिला काहीही सांगायची गरज नाहीये. आपण पॅच-अप करु नाहीतर ब्रेक-अप करु.. तिला अपडेट करायची गरज नाहीये. तिला फक्त क्लिअर कर की तुझा आणि तिचा आता काहीही संबंध नाही.. ओके?”

मला काही केल्या सिरीयस होता येत नव्हतं. आय मीन.. प्रिती खरंच चिडली होती.. पण तरी ती इतकी गोडं दिसत होती ना.. मला ती पॉन्ड्सची जाहीरात आठवत होती.. ‘गुगली-वुगली वुश्श’ची.. तीचे गाल तसे ओढावेसे वाटत होते.

पुढची १५-२० मिनीटं प्रिती बरंच काही बोलत होती, पण मी.. मी तिला माझ्या नजरेत.. मनात साठवुन घेण्याचा प्रयत्न करत होतो.

बरोब्बर ७.३०ला नेहा आली.

“हाय तरुण.. हाय प्रिती…”
आम्ही दोघंही इन-रिप्लाय हाय म्हणालो..

नेहाचं लक्ष टेबलावरच्या कॉफी-कप्स कडे गेलं.

“ओह.. तुम्ही बर्‍याच आधीपासुन आहात का इथं? मी लवकर तर नाही ना आले?” विचीत्र टोन मध्ये नेहा म्हणाली
आम्ही दोघंही काहीच बोललो नाही.

“प्रिती.. माझ्यासाठी काही केलं आहेस ऑर्डर?”

प्रितीने नकारार्थी मान हलवली..

“ऑफकोर्स.. मी पण ना..तु कश्याला काही ऑर्डर करशील माझ्यासाठी..” तिने मेन्यु कार्ड उचलले आणि स्वतःसाठी सॅन्ड्विच ऑर्डर केले.

प्रितीने लगेच माझ्याकडे बघीतलं..जणु..”बघीतलंस ना, कसं बोलतेय ते..”
मी नजरेनेच तिला शांत रहायला खूण केली.

“सो? हाऊ इज लाईफ़ तरुण?”, नेहाने विचारलं..
“लाईफ़ इज गुड..”
“बेटर दॅन बिफोर?”
“सर्टनली..”

“अ‍ॅन्ड हाऊ इज प्रिती?” माझ्याकडे बघतच नेहाने विचारलं..
“मला विचारते आहेस का?”
“येस्स..”
“आस्क हर, व्हाय मी..?”
“मला वाटलं तिच्याबद्दल तुला जास्तं माहीती असेल..”

“हे बघ नेहा, काहीतरी गैरसमज झालाय तुझा…”
“ओह रिअली? केअर टु एक्स्प्लेन?” आपले केस हाताने मागे सारत नेहा म्हणाली..

मी काहीतरी बोलणारच होतो पण प्रितीने तिचा हात माझ्या हातावर ठेवुन मला थांबवले.

तो क्षणभराचा स्पर्श, त्यातील तो उबदारपणा, त्या भावना.. स्वर्गीय..

“तो का तुला काही एक्स्प्लेन करेल नेहा?” प्रिती म्हणाली
“तु त्याची वकील आहेस का? मी त्याला विचारलं आहे, तो सांगेल..”, नेहा
“वकील नाही.. मैत्रीण आहे.. आणि तु माझं नावं घेतलं नसलंस तरी तो प्रश्न तु का विचारते आहेस हे मला चांगलं कळतंय..”, प्रिती

“प्रिती..” उगाचाच कुत्सीत हसत नेहा म्हणाली.. “मला वाटतं तु विसरती आहेस.. मी आणि तरुण आम्ही दोघं दोन वर्ष एकत्र होतो. ही वॉज माय बॉयफ्रेंड..”

“एक्झाक्टली नेहा.. एकत्र होतात.. ही वॉज युअर बॉयफ्रेंड..आता नाहीये. ते जे काही होतं ते भूतकाळ होता ओके? आपण आता वर्तमानात आहोत..”

प्रितीचा रिप्लाय जबरदस्त होता. तिचेच शब्द पकडुन तिच्यावर उलटवलेला.

नेहाला काय बोलावं काहीच सुचेना..

“तुझं लग्न झालंय नेहा. तरुण त्या रिलेशनशीप मधुन केंव्हाच बाहेर पडलाय. त्यामुळे आता तो कुणाला किती ओळखतो आणि कुणाबद्दल त्याला किती माहीती आहे हे तुला सांगायला तो बांधील नाही..”

मला खरंच खुप मस्त वाटत होतं.. दोन सुंदर मुली माझ्यावरुन एकमेकींशी भांडत होत्या.. फार सुखद विचार होता तो… मी आरामशीर खुर्चीत टेकुन त्यांच बोलणं ऐकत होतो.

“बरोबर आहे प्रिती.. पण दोन वर्ष काही कमी काळ नाही.. आमचं एकमेकांवर प्रेम होतं.. आणि कदाचीत अजुनही असेल.. लग्न झालं म्हणजे प्रेम संपलं असं होत नाही.. निदान त्यामुळे तरी..”

“रॉग नेहा.. तुमचं एकमेकांवर कध्धीच प्रेम नव्हतं..”, प्रिती म्हणाली

नेहा आणि मी प्रितीच्या त्या वाक्याने चांगलेच चमकलो.

“व्हॉट डु यु मीन नव्ह्तं. वुई डीड लव्ह्ड इच आदर.. राईट तरुण?”, नेहाने माझ्याकडे बघत विचारलं.
“नो..”स्पष्टपणे प्रिती म्हणाली.. “मला खात्री आहे तो तुमचा गोड गैरसमज होता.. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असतं तर तुम्ही आज वेगवेगळे नसता. कसंही करुन तुम्ही लग्न केलं असतंच”

“ओह कमऑन प्रिती. डोन्ट स्टार्ट अगेन. हजार वेळा मी तुला सांगीतलं होतं प्रॉब्लेम काय होता ते..”
“बरोबर आहे.. तु सांगीतलं होतंस हजार वेळा.. पण एक लक्षात ठेव नेहा, प्यार कभी झुकता नही. निदान ह्या पृथ्वीवर तरी कुठलाही माणुस किंवा सुपरनॅचरल शक्ती प्रेमाला हरवु शकत नाही.. लव्ह इज इंमॉर्टल.. तुमचं खरंच प्रेम असतं तर तुम्ही हजारो मार्ग शोधले असतेत असं एकमेकांपासुन वेगळं होण्यापेक्षा…”

तिच्या त्या वाक्याने माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले..

“तुला हे वेगळं सांगायला नको नेहा, व्हेन अ वुमन वॉन्ट्स समथींग, शी गेट्स इट बाय एनी मिन्स..”

प्रिती म्हणत होती ते कदाचीत खरंच होतं. मी भले प्रितीशी ब्रेक-अप केलं असेल.. पण माझं मन अजुनही हे मानण्यास तयारच नव्हतं की आम्ही वेगळे आहोत.. प्रिती माझ्या आयुष्यात आता कधीच नसणारे. उद्या जर प्रिती मला म्हणाली की मी लग्न करतेय.. किंवा माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी पसंद केली तर मी तयार होईन त्यासाठी.???

शक्यच नाही…. श क्य च नाही…

मी इकडचं जग तिकडे करेन.. पण हे होऊन देणार नाही.. प्रिती माझी आहे.. फक्त माझी…

नवाविष्कार झाल्यासारखा मी बेभान झालो होतो.

“तुझ्याबद्दल तरुणला आता काहीही वाटत नाही नेहा.. आणि मला वाटतं तु सुध्दा आता हे समजुन घ्यायला हवंस.. सो फालतु इतरांच्या भानगडीत पडायचं सोडुन दे…”

“तरुण.. एम आय नोबडी टु यु?” नेहाने शॉक होऊन विचारलं..
“वेल नॉट नोबडी.. वुई आर गुड फ्रेंन्ड्स नाऊ.. जस्ट फ्रेंन्ड्स..”

नंतर बराच वेळ आम्ही बोलत राहीलो.. पण ते सर्व निरर्थकच होते. नेहाकडे बोलायला असा प्रमुख काहीच मुद्दा नव्हता. ती जणु काही एकटीच पडली होती.

शेवटी तिने मोबाइलवरुन ड्रायव्हरला बोलावुन घेतले, पर्समधुन शंभराची नोट काढुन टेबलावर ठेवली आणि म्हणाली..

“आय एम पेईंग फॉर माय सॅन्डविच.. तुम्ही तुमचं पेमेंट करा…”

जाताना माझ्याकडे बघुन नेहा म्हणाली.. “गुड दॅट अ‍ॅटलीस्ट वुई आर गुड फ्रेन्ड्स.. एक मित्र म्हणुन सल्ला देते.. जी चुक तु तेंव्हा केलीस तिच तु परत करतो आहेस तरुण.. तु प्रितीशी लग्न करु शकणार नाहीस, मग तुला परत इतिहास रिपीट करायचा आहे का? जो त्रास, जे दुःख त्यावेळी भोगलंस.. तेच तुला पुन्हा ओढुन घ्यायचं आहे का? निट विचार कर आणि मग निर्णय घे…”

प्रितीकडे न बघताच नेहा निघुन गेली.


“हुश्श..” बर्‍याच वेळानंतर मी मोकळा श्वास घेतला..

टेबलावरची कॉफी थंड होऊन गेली होती.

“कॉफी घेशील?”, मी प्रितीला विचारलं..
“हम्म..”, प्रिती म्हणाली..

मी दोघांसाठी परत कॉफी ऑर्डर केली..

बराच वेळ कोणीच काहीच बोललं नाही.

“प्रिती.. तु मगाशी जे म्हणालीस.. माझ्या आणि नेहाबद्दल.. की आमचं प्रेम वगैरे नव्हतंच.. समहाऊ मला पटलं ते..” कॉफी पिताना मी म्हणालो..

“हम्म..” प्रिती अजुनही माझ्याकडे बघत नव्हती

“नेहाला मी शेरुकडे जाऊ दिलं.. पण तिच्याजागी तु असतीस तर…”
प्रितीने तिचे टपोरे डोळे माझ्या नजरेत मिळवले..

तो एक क्षण.. बस्स.. बाकीचं सगळं धुसर होऊन गेलं होतं. मी तिचा हात हातात घेतला..

“आय एम सॉरी प्रिती.. सगळ्यासाठी.. मी मुर्ख होतो.. आहे.. तु म्हणलीस तेच खरं.. लव्ह इज इम्मोर्टल.. प्रेम कध्धीच हरु शकत नाही. आपण एकत्र ह्यातुन मार्ग काढु.. वुई विल डु समथींग.. माफ़ करशील मला?”

“हम्म..” प्रिती नजर खाली ठेवुन म्हणाली…

“प्रिती.. आय..”
“नो.. डोन्ट.. स्टॉप..”, प्रिती एकदम म्हणाली..
“का? काय झालं?”

“प्लिज आत्ता नको.. पुढच्या आठवड्यात माझी एक्झाम आहे.. प्लिज.. आत्ता नाही.. इथे नाही.. वेट फ़ॉर दॅट.. सेव्ह दोज थ्री मॅजीक वर्ड फ़ॉर लॅटर…”, माझ्या हातातुन हात काढुन घेत प्रिती म्हणाली..

“बाय तरुण.. माझ्या एक्झाम नंतर भेटु..”
प्रिती पट्कन बाहेर पडली..

ती रस्ता क्रॉस करत होती तेंव्हा मी मोबाइलवरुन तिला मेसेज केला “हम आपके है कौन…”
मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होतो. डिव्हायडरवर उभं राहुन ती माझा मेसेज वाचत होती..

समोरचा रस्ता क्रॉसींगसाठी मोकळा झाला होता.. प्रितीने माझ्याकडे वळुन बघीतले आणि….
आणि तिने माझ्याकडे एक फ्लाईंग किस पाठवला..

त्या क्षणाचा तो अनुभव.. शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य.. सॉरी मित्रांनो.. तुम्ही फक्त तो समजुन घ्या.. अधीक मी काय बोलु.. मै अब नशे मै हु… मै नशे मै हु…

[क्रमशः]