Avyakt - 6 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | अव्यक्त (भाग - 6)

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

अव्यक्त (भाग - 6)

कनिका दिसायला सावळी पण तेज बाण्याची .  स्वभावाने तेवढीच नम्र . मनात मालती बद्दल तिच्याही आदर होताच .  ऐवढचं तो तिच्या वागण्यातून मालतीला झळकत नव्हता . आपल्या संसाराला आधीपासूनच ह्या कनिकामुळे ग्रहन लागलं असा खोटा गैरसमज मालतीने करून घेतला .
कनिकात असं काय आहे जे आपल्यात नाही ? माझ्यासारखी बायकोही निरजला शोधून कुठे सापडणार नाही . म्हणातात ना प्रेम हे आंधळं असतं त्याचाच प्रत्यय तिला यायला लागला .  दोन प्रतिस्पर्धी मध्ये श्रेष्ठ कोण ह्याचा जसा हेवा होतो तसचं काहीस मालतीला वाटतं होतं . 

तिकडे निरज मालतीला घरी ड्रॉप न करून देता कनिकाला घेऊन तिच्या रूमवर निघून गेला . 
मालती प्रेग्नेंट आहे हे ऐकून कनिकाला धक्का पोहचलाच होता . नीरजने आपल्याला धोक्यात ठेवलं . तो मालती मध्ये गुंतत जातं आहे ह्याची आठवण तिने त्याला काढून दिली पण कनिका समजत होती तसं काहीच नव्हतं . नीरज तिला म्हणाला , " कनिका तू समजते तसं काहीच नाहीये . मालती प्रेग्नेंट आहे हे खरं असलं तरी माझा नाईलाज आहे . माझ्या घरचाना नातू हवाय . हे बघ जे चालय ते योग्य आहे . तू ह्या विषयावरून माझ्यासोबत वाद घालू नकोस . " 

त्याच्याकडे रागाने बघत कनिका म्हणाली , " तुला असं वाटतंय जे काही चाललं ते योग्य आहे म्हणून , तर माझा पाठलाग करणं सोड ना ! आपल्या बायकोत तू खुश रहा .... माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करत असल्याचा थापा मारतो ना तू ??  तो सर्व देखावा आहे .  प्रेम तू कधी केलंच नाही माझ्यावर  .  तुझ्यासाठी मी लग्न करायचे थांबले तिकडे तू स्वतःचा संसार सुखाने थाटला आ तर तू बाप होणार आहेस म्हटल्यावर ..... आणि मी किती दिवस प्रतीक्षा करू तुझी . किती फॉर्मलिटीज अजून पूर्ण करायचा आहेत तुला ? मी असं किती दिवस खोटेपणाचे आव आणत जगू तुझ्यासोबत .... " 

तिला मधेच थांबवत नीरज म्हणाला , " हे बघ मी खूप गुंत्यात फसलोय गं .  तू मला समजून नसेल घ्यायला तयार तरी माझं ऐक आधी ... मी तुला नाही सोडू शकतं . मालती सामजिक बंधनाने माझी बायको असली तरी माझं तिच्यावर प्रेम नाहीये . मी आयुष्यात फक्त तुझ्यावर खूप प्रेम केलय . मला मान्य आहे मी खूप चुकलो . पण तेव्हा तूच माझी चूक पदरात घेत मला जवळ केलं . मग आता मुलं जन्माला येणार म्हणून तू  मला सोडायला तयार झालीस ??  आणि हो आपलं नातं खोटं नाहीये आणि मी कोणत्याच खोटेपणाचे आव आणत नाही तुझ्यामुळे तुझ्या प्रेमाखातर मी मालती सोबत कधीच चांगला वागलो नाही . तुला वाटतंय ना मी तुला फसवतोय तर जाऊन विचार मालतीला मी मारल्याचा किती जखमांना घेऊन ती जगते आहे  . तुझ्यासोबत असतांना मी कधीच तिचा कॉल रिसिव्ह नाही करतं एनी वे तुला काय एवढं त्याचं   ... "

कनिकाला ड्रॉप करून नीरज ऑफिसला गेला . दिवसभर त्याचं मन कुठल्याच ऑफिसच्या कामात लागतं नव्हतं . मालती घरी गेली आणि घरचांना आपण आई होणार असल्याची खुशखबरी दिली . 
घरच्याचा चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात असतांना मालती स्वतःशीच पुटपुटली . हा आनंद खुप काळ टिकणारा नसेल . 

सायंकाळची वेळ होती . मालती बालकनीमध्ये ऐकटीच डायरी लिहतं बसली होती खुप काही लिहायचं होतं आज तिला . कनिका बद्दल नीरज बद्दल आणि ह्या दोघांच्या मधात फसलेल्या घुटमळत चाललेल्या स्वतः बद्दल . पक्षी घरट्याकडे रवाना होताना तिला दिसत होते . तांबूस सुर्याची किरणे आता राखंडी रंग धारण करत होती . क्षितिजाच्या पल्याड जातं सुर्य डुबायला आला होता आणि  अंधार पडुन तुळशीजवळ दिवा लावयची तिला लिखाण आवरताना घाई झाली होती . 
अंधारात अक्षरे दिसत नव्हती , पण मालतीच्या मनातल्या भावना व्यक्त होतं कागदावर खरडल्या जातं होत्या ...  
मन भरून येते 
सय कोरडी वाटे 
जिवात माझ्या 
त्याचे बीज वाढते 
मी त्यांच्यात  गुंतत जाते
नाव देऊन सामाजिक
बांधिलकीचे
तो निघून जाते ... 
संपते का नाते ? 
संपवून हिशोब सारे 
उरते तरी  वंशाचे रोपटे गर्भजळी ....