Avyakt - 2 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | अव्यक्त ( भाग - 2)

Featured Books
  • 99 का धर्म — 1 का भ्रम

    ९९ का धर्म — १ का भ्रमविज्ञान और वेदांत का संगम — 𝓐𝓰𝓎𝓪𝓣 𝓐𝓰𝓎...

  • Whispers In The Dark - 2

    शहर में दिन का उजाला था, लेकिन अजीब-सी खामोशी फैली हुई थी। अ...

  • Last Benchers - 3

    कुछ साल बीत चुके थे। राहुल अब अपने ऑफिस के काम में व्यस्त था...

  • सपनों का सौदा

    --- सपनों का सौदा (लेखक – विजय शर्मा एरी)रात का सन्नाटा पूरे...

  • The Risky Love - 25

    ... विवेक , मुझे बचाओ...."आखिर में इतना कहकर अदिति की आंखें...

Categories
Share

अव्यक्त ( भाग - 2)

गाभारा


माणूस जन्माला आल्यावर त्याला नाव मिळते आधार म्हणून कुटुंब मिळते आणि जगण्याचे साधन म्हणून जात मिळते ...

त्याला कुटंबात वावरतांना जातीयतेचे धर्म परंपरेचे धडे मिळते मग तो माणुसकी विसरून जातीयतेच्या गटारगंगेत 

भर धारेने वहात सुटतो ... 

ऑफिस मध्ये एकदा मी आपलंच काहीतरी कंम्प्युटरवर काम करत बसली एक छोटा पहिल्या वर्गात शिकणारा बाजूच्या ग्लॉसरी शॉप मधला मुलगा माझ्या जवळ आला 

आणि चेअर वर येऊन बसला आपला .... त्याची प्रश्नावली थोड्यावेळातच सुरु झाली त्याचा पहिला प्रश्न कंम्प्युटरला बघूनच होता , 

" कंम्प्युटरचा शोध कोणी लावला ?? "

----

मी त्याला म्हणाली , " चार्ल्स बेबेज .. "

मग तो म्हणाला , " ताई आपल्याला त्याला ह्या pc वर बघता येईल का ? " 

मी म्हटलं " का नाही .... " 

इमेज सर्च मध्ये जाऊन चार्ल्स बॅबेज कसा दिसतो हे त्याला दाखवून दिलं .... 

त्याची प्रश्न विचारण्याची शैली वाढतच गेली ... चार्ल्स बॅबेजला बघून होतेच की नाही तर तो म्हणाला , 

" फोन चा शोध कोणी लावला असावा ?? "

मी त्याला हसतच उत्तर दिलं ... " ग्राम बेल .... " 

तो उत्तर ऐकून पुन्हा तिसऱ्या प्रश्नाच्या तयारीत होताच त्याची नजर आता ऑफिस मधल्या लाईट वर खिळलेली होती प्रश्नन ही त्याला 

तोच पडला ... 

" ताई , ह्या लाईटचा पण कोणी शोध लावला असणार ना ! "

" हो हो पराग ... बल्ब चा शोध थॉमस एडिसने लावला ... " उत्तर ऐकताच तो म्हणाला

" ओह्ह्ह्ह छान ... !! "

त्याला थॉमस एडिसन बदल अधिक जाणून घायचं होतं म्हणून त्याने मला त्यांच्या इमेज सर्च करायला सांगितलं 

एडिसनला बघताना गूगल इमेजवर त्याला एका व्हील चेअरवर तोंडासमोर कंम्प्युटर फिट केलेला वेगळाच चेहरा दृष्टीस पडला 

तो मला थांबवतच म्हणाला , " ताई ताई .... ह्यांना बघ हे कोण ? आणि चेअर वर असे मान खाली करून वाकडी करून का बसलेत 

त्यांच्या समोर असा कॉम्प्युटर का लावलेला आहे ?? " 

त्या लहानग्या परागच आता कौतूक करावं तेवढं कमी वाटतं होतं मला त्याची प्रश्न विचारून घेण्याची जिज्ञासा आणि त्याच्या मनात 

घर केलेल्या प्रश्नांनी मी भांबावून गेली ... त्याला म्हणाली , " पराग , स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला ...

१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ते बघ पराग माझ्या वयाचे होते .... " तो न राहून म्हणाला ,

" ताई तुझ्या वयाचे म्हणजे तू आहे एवढे असताना ... "


" हो पराग ,


या रोगाला इंग्लडला मोटर न्यूरॉन डिसीज (MND)अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.

स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले ..... म्हणून त्या रोगामुळे ते तुला तसे व्हील चेअर वर दिसतात ... "

माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला , " मग ते जेवत कसे असणार ? त्यांना बोलता पण येतं नसावं त्यांना काही लागलं तर इतरांना कसं कळणार ?? "


परागचे भनाट् प्रश्न .... आणि मला ह्या विषयीच एवढं सखोल ज्ञान नव्हतंच , 

तरी मी त्याचे प्रश्न सोडवू पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ... मग मी त्याला म्हणाली ,

" पराग , स्टीफन हॉकिंग हे जग सोडून पण गेले ह्याच वर्षी ... "

मग तो म्हणाला , " खरं .... जग सोडून म्हणजे कुठे गॉडजवळ म्हणजे ते आता कुणालाच दिसणार नाही ना ! " 

" नाही पराग ते आता दिसणार पण नाही ... " माझ्या ह्या उत्तरावर तो म्हणाला ,

" कॉम्पुटर मध्ये दिसतील ना ते ?? "

" हो अरे ... इथे कधीही बघ तू त्यांना . "

" ते कोणत्या दिवशी गॉड जवळ गेले पेपर मध्ये आलं असेल ना ... "

मी म्हटलं , " हो .... पेपर मध्ये येतं होतं तेवढ्यात त्यांच्याबद्दल बरच काही ... " 

" मला तारीख सांग ना माझ्या दुकानात रोज न्यूजपेपर येत असतो मी बघतो ... "

मी त्याला तारीख सांगितली ... त्या नंतर आम्ही एक त्या दिवशीचा न्यूज पेपर सर्च केला ... द हिंदू ह्या पेपर मध्ये ती माहिती होती

मी परागला त्या पेपरचं नावं द हिंदू न्यूज पेपर म्हणताच तो म्हणाला , " हिंदू तो हम है ना ! "

तेव्हा मी चकितचं झाली ...

सांगाच तात्पर्य मुलांच्या मनावर एवढ्या लहान वयात जातं बिंबवल्या जाते ...

( वास्तविकता )