10. leh ladakh - avismraniy anubhav - 1 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | १०. लेह-लडाख - अविस्मरणीय अनुभव भाग १

Featured Books
Categories
Share

१०. लेह-लडाख - अविस्मरणीय अनुभव भाग १

१०. लेह-लडाख - अविस्मरणीय अनुभव भाग १

लडाख हा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा थंड प्रदेश आहे. येथे हिवाळ्यात -४००सेंटिग्रेड तापमान असते. आणि खूप थंडी असते. लडाख हा जम्मू आणि काश्मीर या भारतातील राज्याचा एक विभाग आहे. याचे मुख्यालय लेह या गावी आहे. लेहचा विमानतळ हा जगातील समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाणी असलेला विमानतळ आहे. या विमानतळाचे नाव कुशोक बकुला रिम्पोचे असे आहे. इथेविमान उतरवण्यासाठी फार कौशल्य लागते. लडाख मध्ये खर्दुगला, तंग्लंग ला, चांग ला अशा अत्युच्च खिंडी आहेत.खर्दुगला हा जगातला सर्वात अधिक उंचीवरचा वाहतूक मार्ग आहे. दुसरे म्हणजे येथे बांधण्यात आलेला 'बेली बिज' हा जगातील सर्वात इंचीवर बांधण्यात आलेला हा पूल आहे. हा समुद्रसपाटीपासून ५,६०२ मीटर (१८,३७९ फूट) इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला आहे.त्याची लांबी ३० मीटर आहे. हा पूल भारतीय लष्कराने १९८२ साली उभारला. हा द्रास आणि सुरु नदी दरम्यान बांधण्यात आलेला पूल आहे.

सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, मोनास्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन, निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या लेह-लडाखची भटकंती एकदा तरी अनुभवावी अशी प्रत्येक पर्यटनाची आवड असणाऱ्यांची इच्छा असतेच. खरंच आहे ते.. निसर्गाचे चमत्कार लेह-लडाख मध्ये पाहायला मिळतात. इथला निसर्गाला उपमा द्यायच्या म्हणजे कदाचित शब्द अपुरे पडतील. नेहमीच्या प्रवासापेक्षा खूप वेगळा असा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये हिमालयाच्या डोंगरांमध्ये अरुंद रस्त्यांवर केलेला हा प्रवास म्हणजे वेगळाच थरार आहे. आणि तुफान थंडी आणि विरळ होणारा ऑक्सिजन यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. येते प्रत्येक मिनिटाला काहीतरी वेगळ येथे अनुभवायला मिळते. या रस्त्यांच्या सभोवताली असलेलं निसर्गसौंदर्य म्हणजे देवाची अफलातून कारागिरी आहे असच वाटत राहत. मनमोहक, पण तेवढेच खतरनाक रस्ते इथे आहेत. जरा इकडचं तिकडं झालं, की तुम्हाला जवळजवळ १००० फूट खोल दरीचा धोका असतो. म्हणजे ह्या सहली दरम्यान थ्रील सुद्धा अनुभवता येते. म्हणजे इथे मनाची ताकद अनुभवता येते. आणि कदाचित यासाठीच काही साहस वेड्या माणसांना हा रस्ता आपलासा वाटत असावा. भ्रमंतीची आवड असणार्‍यांमध्ये हिमालयाचे आकर्षण नाही अशी व्यक्ती मिळणे विरळच! त्यातूनही सिमला-कुल्लू-मनालीच्या निसर्गसुंदर हिमालयाचे रूप वेगळे, श्रीनगरमधले त्याचे बर्फाच्छादित नाजुक देखणेपण वेगळे, कैलासाकडचा रौद्र, अंगावर धावून येणार्‍या कडे-कपारींचा उग्र हिमालय वेगळा तर लेह-लडाखमधले त्याचे करडे, रुक्ष तरीही विभिन्न छटा दर्शविणारे रांगडे रूप विलक्षण वेगळे. हिमालयाच्या या वेगळेपणामुळेच तो सतत आपल्याला खुणावत राहतो. बऱ्याच लोकांच्या "टू व्हिजीट प्लेसेस" मध्ये लेह लडाख चा समावेश असतोच. कारण ही जागा आहेच तितकी सुंदर!! निसर्गाच लोभस रूप इथे पाहायला मिळत. इथला निसर्ग पाहून चकित व्हायला होते. आणि थंडीची मजा आणि बर्फातला आंनद इथे घेता येतो.

लेह-लडाख सध्या पर्यटनासाठी आवडत ठिकाण बनले आहे. पृथ्वी वरचा स्वर्ग म्हणून लेह-लडाख प्रसिद्ध आहे. स्वच्छ, नितळ नद्या; विशाल, निळेशार चमकते तलाव; विस्तीर्ण दर्‍या; लाल-पिवळ्या-हिरवट-राखाडी रंगांचे उंच-उंच पहाड; त्यांवर कोरल्यासारखे दिसणारे वळणदार रस्ते, उंच टेकडीवर दिमाखात असलेल्या गोम्पा, रस्त्यांवर ठिकठिकाणी आढळणारे स्तूप, वार्‍यावर फडफडणार्‍या रंगीबेरंगी कापडी पताका, त्यांवर तिबेटी भाषेत लिहिलेल्या प्रार्थनेच्या ओळी; पहाडांच्याच मातकट रंगाची घरे, हसतमुख आणि साधी-सुधी माणसे ही लेह-लडाखची वैशिष्ट्ये! जी पर्याकांना नेहमीच आकर्षित करत असतात. लेह-लडाख ईशान्येला काराकोरम पर्वतरांगांनी आणि दक्षिणेला हिमालय पर्वतरांगांनी वेढलेले आहे. जगातला सर्वात जास्त उंचीवरचा मोटरगाड्या जाण्यायोग्य रस्ता इथेच आहे. लेहचा विमानतळही जगातला सर्वात जास्त उंचीवरचा विमानतळ. जगात सर्वात उंचावर मनुष्यवस्ती असलेले ठिकाणही इथेच. त्यामुळे परदेशी पर्यटकांचेही हे आवडते पर्यटनस्थळ आहे.

* इथे काय पाहाल-

हिमालय आणि लेह-लडाख मधलं सौंदर्य सगळ्यांच भुरळ घालत पण इथे आल्यावर काही ठिकाणी आवर्जून पहावी अशी आहेत. स्वप्नातल्या जागा म्हणून ह्या जागांचा उल्लेख करता येऊ शकतो. आपल्या भारतात इतकी सुंदर ठिकाण आहेत त्यातलं लेह-लडाख एक महत्वाच ठिकाण आहे जे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असत. त्यातली काही निवडक-

१. पॅन्गाँग त्सो- लडाख
हा तलाव लेह-लडाख जवळ आहे. लेह- लडाख सहलीत पँगाँग सरोवर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. लडाखला गेल्यावर पँगाँग सरोवराला भेट दिली नाही तर ती सफर पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. अत्यंत पारदर्शी, नितळ पाणी आणि मन प्रसन्न करणारे निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. अथांग पसरलेला तो जलाशय चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. एवढ्या उंचीवरील हे सरोवर खार्‍या पाण्याचे असूनही हिवाळ्यात संपूर्णपणे गोठते. पण इतरवेळी पाण्याचा वेगवेगळ्या छटा पाहतांना मन प्रसन्न होत. ह्या तलावाची खासियत म्हणजे, कधी तलावाच पाणी निळ दिसत तर कधी ग्रे.. ह्या पाण्याचा रंग कधीच सारखा नसतो. अतिशय नयनरम्य देखावा इथे पाहता येतो. निसर्गाची किमाया पाहताना आवाक व्हायला होत. हा तलाव १२ किलो मीटरचा आहे. इथल तापमान -५ डिग्रीज ते १० डिग्रीज च्या आस पास असत आणि थंडीत हा तलाव पूर्ण गोठतो. पॅन्गाँग त्सो (जगातील सर्वात उंच सरोवर) 159 किमी आणि स्पीटूक गोम्पा 17.8 किमी अंतरावर आहे. इथे गेल्यावर ३ इडियट्स ची आठवण नक्की येईल. आणि लाल लेहंगा घातलेल्या करीना कपूरला पॅन्गाँग त्सोच्या किनाऱ्यावरून स्कूटर चालवतानाचे दृश्य आपल्या नक्कीच आठवणीत असेल. हे दृश्य चित्रपटात पाहतांना इथे एकदा जाऊन याव अस देखील तुम्हाला वाटल असेल आणि इथे आलात की अंगावर रोमच उभ राहिल्यावाचून राहणार नाही. इतक मनमोहक दृश्य मनात साठून राहील. इथली अजून रंजक गोष्ट म्हणजे, वास्तविक नियंत्रण रेषा अगदी यामधून गेलेली आहे आणि तलावाचा मोठा भाग चीनच्या मुख्यभूमीमध्ये आहे. हे कदाचित खूप कमी जणांना माहिती असेल. खर्‍या फोटोग्राफरला पँगाँग सरोवर परिसर म्हणजे फोटोसाठी पर्वणीच आहे. मन भरून जाईल इतके फोटो तिथे मिळतील ह्याची खात्री..सरोवराला कितीही वेळा जा तिथला नित्य बदलत असणारा निसर्ग छायाचित्रकारासाठी नवनवीन संधी सतत देत असतो आणि हेच ह्या जागेच वैशिष्ट आहे. अत्यंत प्रसन्न करणारा हे सरोवर नक्की पाहायला हवे. इथे भेट दिल्यावर स्वर्गात जाऊन आल्याची भावना नेहमीच मनात राहील. आणि परत परत ह्या जागेला भेट देण्याची इच्छा कमी होणार नाही.

२. त्सो मोरिरी सरोवर-लडाख-

त्सो मोरिरी ला माऊंटन लेक सुद्धा म्हणल जात. ह्या सरोवराच्या आजूबाजूला उंच डोंगर आहेत. डोंगराच्या मध्यावर हे सरोवर असल्यामुळेच माऊंटन लेक अस ओळखला जातो. डोंगर बर्फाच्छादित असतात आणि हे दृश्य इतक सुंदर असत की त्यावरून नजर हातात नाही. लेहच्या अवतीभोवती असलेल्या उंच पर्वत रांगा, त्यांचा पसरलेला डोलारा आणि त्याचे विहंगमय दृश्य यामध्ये असलेला त्सो मोरिरी तलाव हा भारतातील सर्वात सुंदर आणि नेत्रदीपवून टाकणाऱ्यापैकीच एक तलाव आहे. २८ किमीपर्यंत पसरलेला हा तलाव बर्रेन टेकड्यांनी वेढलेला आहे. हा तलाव पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. हे सरोवर चांगथंग अभयारण्यातल कमी प्रसिद्ध अस ठिकाण आहे. पण इथला निसर्ग मात्र तितकाच सुंदर आहे. इथे बरेच पक्षी पाहायला मिळतात. म्हणजेच पक्षी प्रेमींसाठी त्सो मोरिरी ही जागा म्हणजे पर्वणीच! आणि इथे कमी लोकं येत असल्यामुळे इथला निसर्ग अनटच्ड आहे आणि हीच ह्या तलावाची खासियत आहे. हिरवळ, पक्षी अशा अनेक गोष्टी सरोवराच्या सौंदर्यात भर घालतात आणि प्रत्येक क्षणी नवीन अनुभूती देत राहतात. अफलातून निसर्ग सौंदर्य मन ताजतवान करत त्यामुळे आयुष्यात एकदा तरी ह्या जागेला भेट दिली पाहिजे. नाहीतर काहीतरी राहून गेल्याची खंत नेहमीच मनात राहू शकते.