11. leh ladakh - avismraniy anubhav - 2 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | ११. लेह- लडाख- अविस्मरणीय अनुभव भाग २

Featured Books
Categories
Share

११. लेह- लडाख- अविस्मरणीय अनुभव भाग २

११. लेह- लडाख- अविस्मरणीय अनुभव भाग २

३. शांती स्तूप-

शांती स्तूप हा उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील लेह जिल्ह्यातील टेकडीवर एका बौद्ध पांढऱ्या गुंफाचे स्तूप आहे. हे इ.स. १९९१ मध्ये जपानी बौद्ध भिक्खु, ग्योमोयो नाकामुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून बांधण्यात आले. शांती स्तूप चौदावे दलाई लामा यांनी नमूद केलेल्या बुद्धांच्या अवशेषांवर आधारित आहे. प्राचीन, शाही सौंदर्याचा हा एक आविष्कार आहे. या स्तूपामध्ये बुद्धाचे पुतळे आणि जुनी, दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. हे स्तूप केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वामुळेच नव्हे तर सभोवतालच्या परिसराचे पॅनोरमिक दृश्ये प्रदान करण्याच्या ठिकाणामुळे देखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे इथे पर्यटन वाढीस लागले आहे. शांती स्तूपामध्ये सध्याच्या दलाई लामाचे छायाचित्र आहे. स्तूप दोन-स्तरीय रचना म्हणून तयार केले आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रत्येक बाजूला हरीण असलेल्या धर्मचक्राची मध्यवर्ती रीलीज आहे. मध्यवर्ती सोनेरी बुद्ध प्रतिमा "धर्म चालू होण्याचे चक्र" (धर्मचक्र) दर्शविणारी व्यासपीठांवर बसते. दुसऱ्या स्तरावर बुद्धांचा "जन्म", बुद्धांचे निधन आणि बुद्ध "देवतेला पराभूत करताना" असे पाहायला मिळते. अत्यंत विलोभनीय दृश्य बघायला मिळाल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच होईल..

शांती स्तूप जागतिक शांती आणि समृद्धीला चालना देण्यासाठी आणि २५०० वर्षांच्या बौद्ध धर्माच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. हे जपान आणि लडाखच्या लोकांमधील संबंधांचे प्रतीक मानले जाते.

द हिंदू यांच्या मते, हे लेह शहराभोवती "सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षण" आहे, तरीही त्याची वास्तू शैली लडाखी शैलीपेक्षा वेगळी आहे हे जाणवतं. शांती स्तूप पासून शहराचे विस्तीर्ण दृश्य, चंग्स्पा गाव, नमाजील त्सो आणि जवळच्या अंतरावरील पर्वत यांचे सर्वोत्तम दर्शन होते. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त प्रसिद्ध आहे. रात्रीच्या वेळी स्तूप चंद्राच्या प्रकाशात सुंदर दिसतो. पर्यटकांसाठी हा स्तूप सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत उघडा असतो. ३,६०९ मीटर (११,८४१ फूट) उंच असलेल्या लेह पॅलेसच्या समोर असलेल्या उंच टेकडीवर, आणि लेहपासून ५ कि.मी. (३.१ मैल) अंतरावर हा स्तूप स्थित आहे. डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्यावर ५०० पायऱ्या चढून स्तूपावर पोहचतो. इथे वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवता येते. आणि एक वेगळाच अनुभव आपल्या गाठीशी बांधला जातो. त्यासाठी शांती स्तूप ला एकदातरी भेट द्यायला हवी.

४. मॅग्नेटिक हिल्- लेह –
ऐकायला थोडे विचित्र वाटेल की, लेहमध्ये असा एक डोंगर आहे. की, या डोंगरावरून प्लेन, हेलीकॉप्टर जाणार नाही. कारण या डोंगरात चुंबकीय शक्ती असल्यामुळे सरकारने इथून जाण्यास बंदी केली आहे. विश्वास बसणार नाही पण इथे असंच घडत. निसर्गाचा वेगळाच चमत्कार इथे पाहता येतो. एक चुंबकीय शक्तीचा डोंगर म्हणजे अविश्वसनीय वाटतो पण असा डोंगर खरच लेह मध्ये आहे. तिथे थांबवलेली गाडी त्या डोंगरातील चुंबकत्वाने आपोआप पुढे ओढली जाऊ लागली. उलट दिशेला वळवलेली गाडी मागे जाते. तिथे एक फलकही होता. त्यावर लिहिले आहे, Magnetic Hills - The phenomenon that defies gravity. या डोंगरावर चुंबकीय भार आहे त्याचा परिणाम धातूंच्या वस्तूंवर होतो व त्याचे प्रात्यक्षिक देखील पाहता येऊ शकते. कधी मजा आणि कधी भीतीचा अनुभव इथे घेता येऊ शकतो. जेव्हा कधी तुम्ही लेहला भेट द्याला जाणार तर हे ठिकाण पाहण्यासाठी नक्की जा. आणि निसर्गाच्या चमत्कारात रमून जा आणि काहीतरी भारी बघितल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्की दिसेल.

५. खारडुंग ला, लडाख-

हिमालयातील १८ हजार ३५० फूट उंचीवर खारडुंगला पास नावाची ‌खिंड आहे. मोटर जाईल असा जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्ता म्हणून खारडुंगला पासची ओळख आहे. अतिशय सुंदर निसर्ग इथे पाहायला मिळतो. त्याचबरोबर, शुद्ध हवा इथे आहे. इथे आल्यावर तुम्ही "टॉप ऑफ द वर्ड" आला आहेत असंच वाटून जात. यामुळेच हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असत. लडाख म्हणजे बर्फाचा प्रदेश, इथे रस्त्यावर नेहमी बर्फ असल्याकारणाने येथील रस्त्यांवरून जपूनच प्रवास करावा लागतो. याच लडाखमधील खारडुंग ला पास म्हणजे एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला बर्फाचे डोंगर आहे. या मार्गावर टू व्हीलरवरून प्रवास कण्याची जगभरातील दुचाकीप्रेमींची इच्छा असते. दुचाकी चालवण्याचे कसब आणि शारीरिक क्षमता ह्याची परीक्षा घेणारा हा मार्ग आहे. वेगळच थ्रील अनुभवायचं असेल तर इथे भेट देण मस्ट आहे पण त्या आधी तुमची हेल्थ आणि मन खंबीर असण्याची सुद्धा तितकीच गरज आहे.

६. लेह पॅलेस-

लेह पॅलेस आपल्या वेगळ्याच शैलीने पर्यटकांना आकर्षित करतो. लेह पॅलेस सेंगे नामग्याल द्वारा 17 व्या साली बांधला होता. ही इमारत तिबेट मधल्या ल्हासा मधल्या पोताला पॅलेस सारखी आहे. ह्या महालाच्या एकदम वरून सूर्योदय, सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. आजूबाजूचा निसर्ग सुद्धा अतिशय देखणा दिसतो. इथे फक्त भारतातून नाही तर परदेशातून देखील पर्यटक भेट देतात. काही वेळी जेव्हा लेह पॅलेस वर रोशणाई केली जाते तेव्हा तर लेह पॅलेस अधिकच सुंदर दिसतो. मनात साठून राहील अस ते दृश्य असत. या लेह पॅलेस चा थोडा भाग खराब झाला आहे तरीही आजही हा लेह पॅलेस दिमाखात उभा आहे. इथे बुद्धा चे अवशेष पाहायला मिळतात त्याचबरोबर, रॉयल कुटुंबांनी वापरलेली जुनी पेंटिंग, भांडी देखील इथे पाहायला मिळतात. सध्या पुरातत्व खात्याकडून पॅलेस ची देखभाल केली जात आहे. आणि सध्या हा महाल खूप काही चांगल्या स्थितीत नाहीये.

अश्या सुंदर निसर्गानी वेढलेला लेह लडाख चा परिसर ला एकदा तरी भेट दिली पाहिजे. आणि तिथे जायला बरेच पर्याय देखील उपलब्ध आहेत. तरुणाई स्वतःच्या गाड्यांनी किंवा अगदी बाईक वर लेह लडाख च नियोजन करतात. इथे रोड ट्रीप ठरवत असाल तर वेगळेच अनुभव तुम्हाला मिळतील. काही टूर्स बरोबर जाण पसंत करतात. पण शेवटी प्रत्येक पर्यटकाला लेह-लडाख मध्ये निसर्गाकडून भरभरून मिळत. फक्त तिथे जाण्यापूर्वी थोडी काळजी घेण गरजेच आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेण तितकाच महत्वाच आहे. इतर जागांपेक्षा ही जागा वेगळी आहे हे विसरून चालणार नाही. व्यवस्थित काळजी घेतली तर लेह लडाख ट्रीप मध्ये काही अडचणी येणार नाहीत आणि स्वर्गात जाऊन आल्याचा अनुभव तुमच्या गाठीशी राहील हे अगदी नक्की!! आणि खूप वेगळे अनुभव इथे घ्यायला मिळतील हे सुद्धा अगदी नक्की!!