Nakaratmak vichar nakoch in Marathi Magazine by Anuja Kulkarni books and stories PDF | नकारात्मक विचार नकोच-

Featured Books
Categories
Share

नकारात्मक विचार नकोच-

नकारात्मक विचार नकोच

काळे ढग आले की सगळीकडे अंधाराच साम्राज्य पसरतं. नकारात्मक विचार काळ्या ढगांसारखे असतात. एक जरी नकारात्मक विचार आला तर तो विचार सगळ्या चांगल्या गोष्टी पुसून टाकू शकतो. आणि नकारात्मकतेच साम्राज्य आयुष्यावर पसरायला लागत. आणि एकदा का नकारात्मकता वरचढ ठरली तर त्या नकारात्मकतेटून बाहेर पडण अवघड होऊ शकत.

एक महत्वाची गोष्ट म्हणजे खर तर, सगळी पॉवर आपल्याकडेच असते पण त्याचा योग्य ठिकाणी आपण उपयोग करून घेत नाही. आयुष्यातले सगळे काळे ढग बाजूला सारून सूर्याला पाहायचं असेल तर त्यासाठी फक्त स्वतःची मदत केली पाहिजे. स्वतःला सतत उर्जा देत राहील पाहिजे. अस केल्यानी नकारात्मक विचारांचे ढग क्षणार्धात नाहीसे होऊन आयुष्य लख्ख सूर्यप्रकाशाने उजळून निघेल.

नकारात्मक विचार आले की ते क्षणार्धात आपला ताबा घेतात आणि एका मागोमाग एक असे असंख्य नकारात्मक विचारांची रांगच जणू लागते. मग मात्र आनंदी आयुष्य जगताच येत नाही. कधी कधी तर नकारात्मकता इतकी वाढते की चांगल्या गोष्टींमधून सुद्धा वाईटच शोधण्याकडे आपला कल वाढतो. आणि ही नक्कीच चांगले चिन्ह नाही. कधी कधी नकारात्मकता जणू अंगी मुरते अश्या वेळी जाणकार लोकांची मदत घेण चांगल ठरत पण त्याआधी नकारात्मक विचार आपल्यालाच कमी करता येतील आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अवलंबायची गरज असते. आयुष्य मस्त आनंदी असेल तर ते जगायला सुद्धा मजा येते आणि त्या सकारात्मकतेच तेज सुद्धा चेहऱ्यावर झळकायला लागत.

* नकारात्मक विचार कमी करण्यासाठी काही टिप्स-

१. खूप हसा-

नकारात्मक विचारांना बाजूला करायसाठी सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे खूप हसा. मोकळेपणानी हसा. कोणाला दाखवायला कोणी आपल्याकडे पाहताय म्हणून खोट हसण्यापेक्षा आतून हसण्यानी विचार जरा वेळ थांबतात आणि विचारांना लगाम लागतो. अर्थात, उदास असू तर हसू येतंच नाही पण अश्यावेळी प्रयत्नपूर्वक हसल्याने मन परत उत्साहित होण्यास सुरु होते. कधी ताण आला, मनात नकारात्मक विचारांची गर्दी झाली असेल तर आरश्यासमोर उभ राहून मुद्दाम हसण्याचा प्रयत्न करा. अस केल्याने मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर नकारात्मक विचार सुद्धा कमी होते.

२. सारख सारख समस्यांबद्दल बोलणं टाळा-

काही वेळा आपण सतत समस्यांबाद्दलाच विचार करत असतो आणि आपल्या बोलण्यातून सुद्धा तेच येत असत. पण कोणालाही सततच रडगाण ऐकण्यात रस नसतो. अश्यावेळी तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला टाळू शकतील आणि त्याचा परिणाम साहजिकच नकारात्मक येऊ शकतो. त्याचबरोबर, सतत समस्यांबद्दल बोलल्यामुळे आयुष्य नकारात्मकतेकडे झुकू शकत. हे टाळायच असेल तर समस्या आली तरी त्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यावर उपाय काढला तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर दिसू शकतो.

३. नकारात्मक विचार येत असतील तर ते थांबायचा प्रयत्न करा-

कधी एखादा नकारात्मक विचार आला तरी त्यामागोमाग नकारात्मक विचारंची रांग लागते. आणि नकारात्मक विचार थांबवण अवघड नक्कीच असत पण ते थांबवण्यासाठी थोडे प्रयत्न केले तर नकारात्मक विचार आपण सकारात्मक विचारांमध्ये बदलू शकतो. त्यासाठी विचार वेगळीकडे वळवले तर हळू हळू नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. कधी शारीरिक व्यायाम केल्यानी मन शांत होण्यास मदत होते आणि नकारात्मक विचार आपोआप कमी होण्यास मदत होते. चालणे, जॉगिंग, किंवा कधी जिम केल्याने विचार कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आवडीची गोष्ट केल्याने सुद्धा मन शणात होऊन नकारात्मक विचार बाजूला टाकले जाण्यास मदत होईल. स्वयपाक घरात किंवा डान्स क्लास मध्ये जाऊन हे करता येऊ शकत.

४. सगळ्यांशी चांगल वागा-

आपण आसपास असलेल्या लोकांबरोबर चांगले वागत राहिलो तर आपोआप भरपूर लोकांना तुमच्या बरोबर रहावस वाटेल. आणि कधी तुम्हाला कोणासमोर मन मोकळ करण्याची वल आली तर तुम्ही एकटे पडणार नाही. आपण सगळ्यांना मदत करत राहिलो तर आपल्या मदतीला सुद्धा ते लोक नक्की येतील. महत्वाच म्हणजे, कोणाला मदत केल्यानी आपल्याला चांगल वाटत आणि मूड छान असला की फक्त सकारात्मक विचार यायला लागतात.

५. 'शक्य नाही', 'मला जमणारच नाही' असे नकारार्थी शब्द नकोच-

आपला स्व संवाद नेहमीच चालू असतो. त्या स्व संवादात बऱ्याच वेळा नकारार्थी शब्द असतात. आणि त्यानेच आतली नकारात्मकता वाढते. हे सहज टाळता येऊ शकत. जेव्हा जेव्हा आपला स्व संवाद चालू असतो तेव्हा जाणीवपूर्वक नकारार्थी शब्द टाळले आणि त्या शब्दांना सकारात्मकतेची जोड दिली तर नकारात्मकता तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही.

६. आनंदी आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहाण गरजेच-

आपल्या आजूबाजूला जसे लोकं असतात त्याचा परिणाम नकळत आपल्या विचार करण्याच्या पद्धती मध्ये दिसून येत असतो. म्हणजे आजूबाजूला नकारात्मक विचार करणारे लोकं असतील तर त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा झालेला दिसून येतो. कारण ते त्यांचा खराब मूड पास ऑन करत असतात. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही नकारात्मक लोकांच्या संगतीत राहाण कमी करा किंवा त्यांना बदलायचा प्रयत्न करा.

नकारात्मक विचार थांबवता येऊ शकतात. कधी नकारात्मक विचार आपले आपण दूर होतात पण कधी मात्र ते घालवायला थोडे कष्ट घ्यावे लागतील. कोणी येईल आणि आपले नकारात्मक विचार घालवेल असा विचार करण्यापेक्षा आपणच त्यासाठी प्रयत्न कारण गरजेच असत. नकारात्मक विचारांमधून बाहेर यायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. वेळीच नकारात्मक विचार घालवण हे देखील खूप गरजेच आहे. अस केल्यानी आयुष्यात परत सूर्याच्या तेजानी प्रकाशमान होईल. म्हणूनच काहीही झाल तरी नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि आनंद वाटायला सुद्धा विसरू नका.

-- अनुजा कुलकर्णी.