सह्याद्रीच्या कड्यांवरून वाहणारा वारा नुसता थंड नव्हता; तो मूक साक्षीदारासारखा होता. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा होता. जंगलातील उंच झाडांच्या फांद्यांवरून तो थंड वारा जाताना त्याचा आवाज एखाद्या हळूवार फुसफुसाटासारखा वाटायचा, जणू काही अनादी काळापासून दडलेले रहस्य तो 'आदित्य देसाई' च्या कानात सांगू पाहत होता. पण आदित्य देसाई, हे गुन्हे अन्वेषण विभागाचा (CID) सर्वात शांत आणि अनुभवी इन्स्पेक्टर, त्याला असे फुसफुसणे नवीन नव्हते. त्याने आयुष्यात अनेक रहस्ये पाहिली होती, जी रात्रीच्या भयाण शांततेत दडून असायची.
रुधिरारंभ - 1
अध्याय १-------------अदृश्य खुणा----------------सह्याद्रीच्या कड्यांवरून वाहणारा वारा नुसता थंड नव्हता; तो मूक साक्षीदारासारखा होता. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे हवेत गारवा जंगलातील उंच झाडांच्या फांद्यांवरून तो थंड वारा जाताना त्याचा आवाज एखाद्या हळूवार फुसफुसाटासारखा वाटायचा, जणू काही अनादी काळापासून दडलेले रहस्य तो 'आदित्य देसाई' च्या कानात सांगू पाहत होता. पण आदित्य देसाई, हे गुन्हे अन्वेषण विभागाचा (CID) सर्वात शांत आणि अनुभवी इन्स्पेक्टर, त्याला असे फुसफुसणे नवीन नव्हते. त्याने आयुष्यात अनेक रहस्ये पाहिली होती, जी रात्रीच्या भयाण शांततेत दडून असायची.रात्रीचे दोन वाजून गेले होते. आदित्य ची महिंद्रा स्कॉर्पिओ, ज्याला तो प्रेमाने 'रणगाडा' म्हणायचा, सह्याद्रीच्या कुशीत, आंबोली खिंडीजवळील जंगलाच्या एका अरुंद आणि कच्च्या ...Read More