लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतय पिता तोडतोय....... मधुराणी मधुराणी पान कोण तोडतय चाण्डाळीण तोडतेय...... गोष्ट अगदी रंगात आलेली. आम्ही पोरं आजीच्या तोंडाकडे एकटक बघत जीवाचा कान करून ऐकत होतो. राजाच्या दुष्ट लाडक्या राणीने सवतीची आवळी जावळी मुलं लहुतटू नी मधुराणी याना आपल्या दासींकरवी पळवून नेवून राजउद्यानात जिवंतपणी पुरून टाकलं. राजाने देखणेपणाला भुलून दुसरं लग्न केलन. आवडत्या राणीची कुस काय उजवली नाय. पण पहिल्या नावडत्या राणीलाच जुळी मुलं झाली. आता मुलांच्या ओढीने नावडत्या राणीच्या महालात राजाच्या खेपा वाढल्या. आता कदाचित आपल्याला मुलगा झालाच तरी सवतीच्या मुलाला लहूतटूला राज्य मिळणार म्हणून दुष्ट आवडती राणी नुसती पिचत रहायची. तिच्या दासीनी सवतीची मुलं पळवून त्याना मारून टाकायचा बेत दुष्ट राणीला सांगितला.हे काम झालं तर एक हजार सोन्याच्या मोहरा देण्याच वचन तिने दिलं. दासी संधीची वाट पहायला लागला.
उगवतची आज्जी - 1
उगवतची आजी भाग 1 लहुतटू लहुतटू फुल कोण तोडतय पिता तोडतोय....... मधुराणी मधुराणी पान कोण तोडतय चाण्डाळीण तोडतेय...... गोष्ट अगदी रंगात आलेली. आम्ही पोरं आजीच्या तोंडाकडे एकटक बघत जीवाचा कान करून ऐकत होतो. राजाच्या दुष्ट लाडक्या ...Read More
उगवतची आज्जी - 2
तेवढ्यात हवेतून शब्द आले, “महाराज, या रोपांच्या सभोवती खोदून आम्हाला बाहेर काढा.” कामगारानी सावधपणे खोदकाम करून लहुतटू नी मधुराणी अलगद बाहेर काढलं. कोषाध्यक्षांकडून सुवर्णमुद्रा घेतल्याचं दुष्ट राणीचं बिंग फुटलं. तिला नी दासीना सुळावर चडवण्यात आलं. गोष्ट संपली नी आम्ही झोपी गेलो. त्यानंतर रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर कुणीतरी म्हणायचा,“ लहुतटू लहुतटू गोष्ट कोण सांगतय्?” त्यावर सगळे एकसुरात म्हणायचे. “आजी सांगतेय्....” उगवतची आजी ही आमची चुलत चुलत आजी. तिचं घर आमच्या वाड्याच्या पलिकडच्या पडणात, पूर्व दिशेला. म्हणून ती उगवतची आज्जी. तसं गावात सुद्धा आम्हाला वडाखालचे साने नी विठू आजोबाना उगवतचे साने म्हणत. विठू आजोबा नी रुक्मिणी आज्जी दोघंही ...Read More