आयुष्य...कधी एक उमलती धग, कधी निवांत विझणारा चंद्रगोल.क्षणोक्षणी आपलं रूप पालटणारा एक प्रवाह...कधी केशरासारखा सुवासित, तर कधी मेथीसारखा कडवट, पण आरोग्यदायी.या दोन्हीच्या सीमारेषेवर, एका स्त्रीचं अस्तित्व सावधपणे ताठ उभं आहे...ही कथा आहे तिची..ती.....जी उमेदीच्या कड्यावर असूनही, स्वतःच्या आयुष्याच्या रंगमंचावरून निमूटपणे उतरली.ती ....चेहऱ्यावर अपराजित तेज, डोळ्यांत असंख्य विश्वांची झळाळी, आणि ओठांवर न बोललेले अनुभव.कला तिचं देणं होतं....ती बोलायची अभिनयात, श्वासायमान होत असलेल्या प्रत्येक भूमिकेत
कस्तुरी मेथी - भाग 1
आयुष्य...कधी एक उमलती धग, कधी निवांत विझणारा चंद्रगोल.क्षणोक्षणी आपलं रूप पालटणारा एक प्रवाह...कधी केशरासारखा सुवासित, तर कधी मेथीसारखा कडवट, आरोग्यदायी.या दोन्हीच्या सीमारेषेवर, एका स्त्रीचं अस्तित्व सावधपणे ताठ उभं आहे...ही कथा आहे तिची..ती.....जी उमेदीच्या कड्यावर असूनही, स्वतःच्या आयुष्याच्या रंगमंचावरून निमूटपणे उतरली.ती ....चेहऱ्यावर अपराजित तेज, डोळ्यांत असंख्य विश्वांची झळाळी, आणि ओठांवर न बोललेले अनुभव.कला तिचं देणं होतं....ती बोलायची अभिनयात, श्वासायमान होत असलेल्या प्रत्येक भूमिकेत ...Read More
कस्तुरी मेथी - भाग 2
रात्रि उशिर झाले पण उद्या पुन्हा लवकर सराव म्हणुन मोजक्या लोकांनी सेटवरच मुक्काम ठोकला. सुरभिला एका जुनाट मराठी चित्रपट छोटंसं ड्रेसिंग रूम मिळाली.पिवळसर झाक असलेला बल्ब हलकी प्रकाश टाकतो. वरचा पंखा घरघरतो, त्याचा आवाज वेळोवेळी शांततेला छेद देतो.आरशाभोवतीची बल्बांची रांग अर्धवट पेटलेली, काही पूर्ण गेलेली.हवेतील वास — चंदनाचा,केशतैलाचा आणि जुन्या ग्रीसपेंटचा.भिंती हलक्या समुंद्री हिरव्या रंगाच्या, थोड्या ठिकाणी रंग उडालेला. कोपऱ्यात एक गोदरेजची स्टील कपाट, टेबलवर एक लाकडी कंगवा, सिनेमा मासिकांची ढीग, आणि एक अर्धवट सुकलेली मोगऱ्याची गजरा.रेडिओवरून मंद तानपुरा वाजतो आहे. एका बाजूला १९७४चा..दिनदर्शक—त्यावर पाकीज़ा मधील मीना कुमारीचा फोटो.सुरभी..कधीकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना..आरशासमोर बसलेली. डोळ्यांखाली थोडासा काळसरपणा, पण काजळ ...Read More