मियाँ बिबि राजी

(4)
  • 30
  • 0
  • 1.6k

चवेड रत्नागिरी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं अन् साप्ताहिक रत्नदुर्ग प्रेसच्या मागे वडारांची पालं पडली. मटांगे कॉन्ट्रक्टरकडे खडी फोडणारा कल्लाप्पा अलिकडे चांगलाच वधारलेला... चवेड रस्त्याचं टेंडर शेट्टी कॉन्ट्रक्टरला मिळालं. त्याला काळवत्री खडी पुरविण्याचा मक्ता कलाप्पाकडे. स्वतः कल्लाप्पा, त्याचे तीन भाऊ भिमु, भरमु, नामु आणि त्यांचे कुटुंबीय... अठरा माणसांचं टोळकं होतं... अधिक कर्नाटकातुन चाळीस जोड्या कलाप्पाने आणल्या. स्वतःचा क्रशर टाकला आणि रात्रंदिवस खडीच्या कामाला सुरवात झाली. आता स्वतः कल्लाप्पा, त्याची बायको सुंद्री आणि पोरगी ईमली याचे कष्ट बंद झाले.

1

मियाँ बिबि राजी - भाग 1

चवेड रत्नागिरी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं अन् साप्ताहिक रत्नदुर्ग प्रेसच्या मागे वडारांची पालं पडली. मटांगे कॉन्ट्रक्टरकडे खडी फोडणारा अलिकडे चांगलाच वधारलेला... चवेड रस्त्याचं टेंडर शेट्टी कॉन्ट्रक्टरला मिळालं. त्याला काळवत्री खडी पुरविण्याचा मक्ता कलाप्पाकडे. स्वतः कल्लाप्पा, त्याचे तीन भाऊ भिमु, भरमु, नामु आणि त्यांचे कुटुंबीय... अठरा माणसांचं टोळकं होतं... अधिक कर्नाटकातुन चाळीस जोड्या कलाप्पाने आणल्या. स्वतःचा क्रशर टाकला आणि रात्रंदिवस खडीच्या कामाला सुरवात झाली. आता स्वतः कल्लाप्पा, त्याची बायको सुंद्री आणि पोरगी ईमली याचे कष्ट बंद झाले. कल्लाप्पा स्वच्छ धोतर नेसुन बंडीच्या खिशात नोटांची बंडले सांभाळीत कामगारांवर डाफरत राहायचा. त्याची बायको नी पोरगी पान खाऊन ...Read More

2

मियाँ बिबि राजी - भाग 2

फकीरला कळताच गाडी घेऊन तो शिवरे वठारात आला. वठारातल्या लोकांनी त्याच्यासकट गाडीतल्या सगळ्यांना बेदम चोप दिलाच पण पोलिस आणुन जप्त करायला लावले. असा वठार पाठीशी असताना सुऱ्या कशाला गडबडेल ? ईमलीचा विश्वास पटेल अशा शब्दात त्याने तिची समजुत काढली. चांगले मध्यस्त घालून कलाप्पाकडूनच परवानगी घेईन. वेळ आल्यावर तु मात्र कच खाऊन मला तोंडघशी पाडू नको. माझे मी बघून घेईन. मी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. सुऱ्याने शपथ घेतली. ही गोष्ट सुऱ्याने मित्र मंडळीच्या कानावर घातली. सगळयांनी त्याला मदत करायचे वचन दिले. आधी कलाप्पाला समजूतीने सांगून बघायचे. तरीही तो ऐकला नाही तर सरळ ...Read More

3

मियाँ बिबि राजी - भाग 3

खाजगी डॉक्टर गाठला तर तो गपाचुपीत गर्भपात करून ईमलीला मोकळी करील आणि सुऱ्या ईमलीचा बेत धुळीला मिळेल, त्यापेक्षा सिव्हील अॅडमिट व्हायचं... आपल्याला सुऱ्यापासुन दिवस गेलेयत्, तो आपल्याशी लग्न करायला तयार आहे, मात्र आईबाबाचा याला विरोध आहे. ते जातपंचायतीला घाबरून आपल्याला जीवे मारतील. तेव्हा सरळ पोलिस केस करा नी सुऱ्याशी माझे लग्न लावून द्यायला आईबापाला भाग पाडा... असे सिव्हील हॉस्पीटल मधल्या डॉक्टरांना सांगायचे पण या प्रकाराची मिटवा मिटवी करू द्यायची नाही असे त्याने ईमलीला बजावले. कल्लाप्पा नाना भाव्यांची टॅक्सी घेऊनच बिऱ्हाडी आला. ईमली, तिची आई टॅक्सीत बसल्या. “आपून सिविल हॉस्पिटलमदी जाऊया” असं ईमलीने आईला अगोदरच पटवून सांगितलेलं. ...Read More

4

मियाँ बिबि राजी - भाग 4

बादशाचे भेसूर रडणे ऐकुन मंगेशची आई-बहिण दोघी बाहेर आल्या. मंगेशच्या बहिणीने आजुबाजुला नजर टाकली. तिला काहीच अर्थबोध होईना. मग बादशहाला साखळीने बांधले अन् ती पुन्हा कामाला घरात गेली. दहा पंधरा मिनिटे बादशा भीषण रडत राहीला तेव्हा मात्र काहीतरी अघटीत घडल्याची चाहुल मंगेशच्या बहिणीला लागली. घरात पुरूष मनुष्य कोणीच नव्हते. तिने मागीलदारी जाऊन शेजारच्या भाईला हाक मारली. भाई आला. भाई समोर दिसताच बादशा दोन पायांवर उभा रहात भुंकायला लागला. भाईने बादशाची साखळी हातात पकडून त्याला मोकळं केल मात्र... साखळीला ओढ देत बादशा बागेकडे निघाला. बागेच्या गेट बाहेर सुऱ्याची बजाज सुपर भाईने ओळखली. ...Read More