चवेड रत्नागिरी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं अन् साप्ताहिक रत्नदुर्ग प्रेसच्या मागे वडारांची पालं पडली. मटांगे कॉन्ट्रक्टरकडे खडी फोडणारा कल्लाप्पा अलिकडे चांगलाच वधारलेला... चवेड रस्त्याचं टेंडर शेट्टी कॉन्ट्रक्टरला मिळालं. त्याला काळवत्री खडी पुरविण्याचा मक्ता कलाप्पाकडे. स्वतः कल्लाप्पा, त्याचे तीन भाऊ भिमु, भरमु, नामु आणि त्यांचे कुटुंबीय... अठरा माणसांचं टोळकं होतं... अधिक कर्नाटकातुन चाळीस जोड्या कलाप्पाने आणल्या. स्वतःचा क्रशर टाकला आणि रात्रंदिवस खडीच्या कामाला सुरवात झाली. आता स्वतः कल्लाप्पा, त्याची बायको सुंद्री आणि पोरगी ईमली याचे कष्ट बंद झाले.
मियाँ बिबि राजी - भाग 1
चवेड रत्नागिरी रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू झालं अन् साप्ताहिक रत्नदुर्ग प्रेसच्या मागे वडारांची पालं पडली. मटांगे कॉन्ट्रक्टरकडे खडी फोडणारा अलिकडे चांगलाच वधारलेला... चवेड रस्त्याचं टेंडर शेट्टी कॉन्ट्रक्टरला मिळालं. त्याला काळवत्री खडी पुरविण्याचा मक्ता कलाप्पाकडे. स्वतः कल्लाप्पा, त्याचे तीन भाऊ भिमु, भरमु, नामु आणि त्यांचे कुटुंबीय... अठरा माणसांचं टोळकं होतं... अधिक कर्नाटकातुन चाळीस जोड्या कलाप्पाने आणल्या. स्वतःचा क्रशर टाकला आणि रात्रंदिवस खडीच्या कामाला सुरवात झाली. आता स्वतः कल्लाप्पा, त्याची बायको सुंद्री आणि पोरगी ईमली याचे कष्ट बंद झाले. कल्लाप्पा स्वच्छ धोतर नेसुन बंडीच्या खिशात नोटांची बंडले सांभाळीत कामगारांवर डाफरत राहायचा. त्याची बायको नी पोरगी पान खाऊन ...Read More
मियाँ बिबि राजी - भाग 2
फकीरला कळताच गाडी घेऊन तो शिवरे वठारात आला. वठारातल्या लोकांनी त्याच्यासकट गाडीतल्या सगळ्यांना बेदम चोप दिलाच पण पोलिस आणुन जप्त करायला लावले. असा वठार पाठीशी असताना सुऱ्या कशाला गडबडेल ? ईमलीचा विश्वास पटेल अशा शब्दात त्याने तिची समजुत काढली. चांगले मध्यस्त घालून कलाप्पाकडूनच परवानगी घेईन. वेळ आल्यावर तु मात्र कच खाऊन मला तोंडघशी पाडू नको. माझे मी बघून घेईन. मी एकदा ठरवले म्हणजे ठरवले. सुऱ्याने शपथ घेतली. ही गोष्ट सुऱ्याने मित्र मंडळीच्या कानावर घातली. सगळयांनी त्याला मदत करायचे वचन दिले. आधी कलाप्पाला समजूतीने सांगून बघायचे. तरीही तो ऐकला नाही तर सरळ ...Read More