"सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ" ही एक गुन्हेगारी थरारक काल्पनिक कथा आहे. जिथे पोलीस निरीक्षका विजया साठे आणि बुद्धिमान चोर रुद्र यांच्यात एक मानसिक खेळ रंगतो. धक्का , सावधगिरी आणि बुद्धीची कसोटी यांचा अनोखा संगम या कथेत आपणास पाहायला मिळेल. या कादंबरीत सर्व पात्र,घटना व स्थळ पूर्णतः काल्पनिक असून , फक्त वाचकांसाठी रचलेली आहेत.
Full Novel
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 1
प्रस्तावना"सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ" ही एक गुन्हेगारी थरारक काल्पनिक कथा आहे. जिथे पोलीस निरीक्षका विजया साठे आणि चोर रुद्र यांच्यात एक मानसिक खेळ रंगतो. धक्का , सावधगिरी आणि बुद्धीची कसोटी यांचा अनोखा संगम या कथेत आपणास पाहायला मिळेल. या कादंबरीत सर्व पात्र,घटना व स्थळ पूर्णतः काल्पनिक असून , फक्त वाचकांसाठी रचलेली आहेत.___________________________________प्रकरण१: शांत रात्रीचा पहिला वारभंडारा जिल्ह्यातील एका शांत,निवांत शहरावर संध्याकाळचा सावट झपाट्याने पसरत होता. घराघरांत दिवे मंद प्रकाश देत झगमगू लागले होते,आणि लोक हळूहळू त्यांच्या रात्रीच्या आरामासाठी सज्ज होत होते. रस्त्यांवरून क्वचितच गाड्या जात होत्या;काही चहाच्या टपऱ्या अजून उघड्या होत्या, पण ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 2
भाग २ : सावध चोरांची टोळी. तपासाच्या ओघात विजयाने मागील काही महिन्यांत घडलेल्या चोरिंची सर्व केस फाईल एकत्र केल्या. तिच्या टेबलावर शेकडो पानांचा ढीग पडलेला होता, पण ती शांत डोळ्यांनी प्रत्येक घटना पुन्हा पुन्हा चाळत होती.जणू अक्षरांमध्ये कोणतातरी सूर शोधत होती. ती ज्या ज्या केसकडे बघत गेली,त्यात एक विलक्षण समानता स्पष्ट होत होती.प्रत्येक चोरी रात्री २.४५ ते ३.१५ या अर्ध्या तासातच झाली होती. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा काही क्षणांसाठीच निष्क्रिय झाली होती. जणू एखाद्या कुशल माणसाने ते मुद्दाम ठरवून केलं असाव. आणि प्रत्येक वेळी चोरी झालेले दागिने एकच प्रकारचे, जुन्या ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 3
भाग ३ : पोलिसांची घडी आणि पहिला सापळासंध्याकाळच्या फुटत्या उजेडात, भंडारा पोलीस मुख्यालयाची चौथी मजला तलम नारिंगी प्रकाशात न्हाऊन होती. कॉरिडॉरमध्ये पायऱ्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते, तर कंट्रोल रूमच्या काचेमागे मॉनिटर्सवर निळ्या-हिरव्या रेषा सतत लुकलुकत होत्या. जणू शहराची धडधड त्या स्क्रीनवर झगमगतेय. याच धडधडीच्या पलीकडे, निरीक्षिका विजया राणे वेगात चालत आपल्या कॅबिनमध्ये शिरली. टेबलावर पडलेला तणाव तिच्या भुवईव्यतिरिक्त कुणालाच दिसत नव्हता, पण सगळ्यांनाच जाणवत होता. आता खेळ खरोखर गंभीर झाला होता.विजयाने आता ठाम निर्णय घेतला होता. तपासाच्या गतीला आणखी धार देण्याचा. एका लक्षवेधी अंतर्गत बैठकीनंतर तिने दोन स्वतंत्र पथकं नेमली, ज्यांचं काम स्पष्ट, आणि दिशा ठरलेली होती.पहिलं पथक — ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 4
सकाळ झाली होती… पण ती साधी सकाळ नव्हती. पावसाची एकसुरी सरसर चाललेली सळसळ, ओल्या मातीचा उग्र वास आणि वाऱ्याच्या वाड्याच्या भिंती चिवटपणे चरकावत होत्या. त्या जुन्या, विस्मरणात गेलेल्या वाड्याच्या तहखान्यात एक अनामिक जडपणा भरलेला होता. जणू तिथं हवाच थांबून बसली होती, काळाची नोंद घेत.त्याच तहखान्याच्या मध्यभागी एका फाटलेल्या, काळसर टेबलासमोर रुद्र शांतपणे बसलेला होता. डोळे मिटलेले नव्हते, पण हालचाल नव्हती. त्याच्या समोर नकाशा होता . एखाद्या युद्धाच्या पूर्वसंध्येसारखा.त्याच्या डोळ्यांत विचारांची धग होती. रम्या आणि राकेश अटकेत होते, पण त्याच्या डोक्यात ती 'अटक' म्हणजे शेवट नव्हे, तो होता सुरुवातीचा नाद.तो नकाशा रेखाटलेला नव्हता, तो कोरला गेलेला वाटत होता . एक ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 5
भाग ५ : काळाच्या सावल्यांमध्येपोलीस मुख्यालयात एका कोपऱ्यात विजया एका जुन्या लाकडी टेबलाजवळ बसली होती. तिच्या समोर साखर विरघळलेला चहा अजूनही किंचित धुरकटत होता, पण ती त्याकडे पाहतही नव्हती. खिडकीबाहेर धूसर सकाळ ओसंडून वाहत होती. रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती, पण या खोलीत एक निराळी शांतता होती. खोल, खोल जणू अंतःकरणात घुसणारी.तिच्या समोर पडलेलं ते A4 चं पान, जणू काळाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून उगम पावलेलं भयंकर साक्ष्य होतं. त्या चिठ्ठीवर एकच अक्षर: 'R'. तेही सरळसोट न होता, थोडं झुकलेलं, जणू त्याचं स्वतःचंही काहीतरी लपवण्याचं प्रयत्न होतं. अक्षराच्या खाली एक सरळ रेष. काहीशी कंपलेल्या ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 6
भाग ६ : भयावह वळण अंतिम चरणशहराच्या आभाळावर गर्द काळसर ढगांनी तंबू ठोकला होता. थेंब न पडता येणारा तो दडपणयुक्त आवाज जणू काही आकाशात काहीतरी अनिष्ट घडण्याची पूर्वसूचना देत होता. भंडाऱ्याच्या रस्त्यांवर रोजच्या गडबडीला एक विचित्र थांबा मिळाला होता. गाड्या कमी झाल्या होत्या, लोक चालताना थांबत होते, एकमेकांकडे पाहून काही न बोलता काहीतरी ‘समजून’ घेत होते.हवा दमट होती, पण स्फोटाच्या आठवणींनी तिला अजूनच जड बनवलं होतं. एखाद्या जुनाट घराच्या बंद खिडकीतूनही आता जळलेल्या बारूदाचा उग्र वास दरवळत होता. कुणी एकाने घरात खालच्या आवाजात म्हटलं, “रुद्र अजून जिवंत आहे…” आणि त्या एका वाक्याने शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात थरकाप निर्माण झाला.प्रत्येक घराचे ...Read More