भ्रमंती सिंधुदुर्गाची

(0)
  • 2.3k
  • 0
  • 681

लाल माती हिरवी पाती जन्मांतरीची अतूट नाती फेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटा मालवणी माणूस त्याचा मालवणी तोरा मोडेन पण वाकणार नाही,ह्याच खरा रेवती नगर रेवती नगर म्हणजे आजचे रेडी गाव. गेल्या पंधराशे वर्षांपासून एक उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव. जगभरातले व्यापारी इथे येत.पोर्तुगिज ,डच , फ्रेंच, अरब या ठिकाणची प्रवासी जहाजे इथे येत.मसाला ...सुगंधी द्रव्ये...मोती...मासे अश्या अनेक पदार्थांची खरेदी व विक्री इथे होत असे.

1

भ्रमंती सिंधुदुर्गाची - 1

भ्रमंती - सिंधुदुर्गाचीभाग१लाल माती हिरवी पातीजन्मांतरीची अतूट नातीफेसाळत्या लाटा तश्या अवघड वळणवाटामालवणी माणूस त्याचा मालवणी तोरामोडेन पण वाकणार नाही,ह्याच नगररेवती नगर म्हणजे आजचे रेडी गाव. गेल्या पंधराशे वर्षांपासूनएक उत्कृष्ट बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव. जगभरातले व्यापारी इथे येत.पोर्तुगिज ,डच , फ्रेंच, अरब या ठिकाणची प्रवासी जहाजे इथे येत.मसाला ...सुगंधी द्रव्ये...मोती...मासे अश्या अनेक पदार्थांची खरेदी व विक्री इथे होत असे.आज इथे बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. यशवंतगड...द्विभुज गणपती....किनाऱ्यालगत असलेले सिद्धेश्वर मंदिर....श्री माऊली मंदिर... भवानी मंदिर ...नवदुर्गा मंदिर....पांडवकालीन हनुमान मंदिर...हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा खडक...किनाऱ्याला लागून असलेले घंगाळेश्वर देवस्थान....पांडवकालीन गुहा....इथून हाकेच्या अंतरावर असलेला तेरेखोल किल्ला अशी अनेक ऐतिहासिक व पौराणिक स्थळ इथे बघायला ...Read More

2

भ्रमंती सिंधुदुर्गाची - 2

भ्रमंती सिंधुदुर्गाची२कविलगाव ते वालावल खाडीदुपार टळून गेली होती.सव्वा तीनला घरातून बाहेर पडलो.कुठे जायचे ठरले ते नव्हते.मनाला ओढ होती भटकण्याची.सरळ रस्ता पकडला.कविलगावच्या साईबाबांच्या मंदिराबद्दल ऐकले होते पण जायचा योग आला नव्हता. भारतातलेच नव्हे तर संपूर्ण जगातले पहिले साई मंदिर आपल्या सिंधुदुर्गात असूनही आपण ते बघितलं नाही ही थोडी लाजीरवाणी गोष्ट होती.कुडाळ रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे कुठेतरी ते आहे एवडच माहित होते. गाडी वळवली रेल्वे स्टेशन गाठले. डावीकडून एक रस्ता जातो तिथून उजवीकडे वळलो.रेल्वेब्रीज ओलांडले.तिथेच एक आडवा रस्ता जात होता. नेमकं डावा रस्ता पकडायचा की उजवीकडचा या संभ्रमात होतो तेवढ्यात एक गुराखी दिसला." कविलगाव ?"" उजव्या बाजूनं वळा...थोडा अंतर गेलास काय मग ...Read More