पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

(0)
  • 2.5k
  • 0
  • 999

सकाळचे साधारण दोन वाजत आले होते. विलासराव मोकादम आणि अलका मोकादम जरा घाबरलेले दिसत होते कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही अंगाला थरथर सुटली होती. नकळत अलका मोकादमनी आपल्या नव-याचा म्हणजे विलासरावांचा हात पकडला. तेही थरथरतच होते पण आपली बायको अजून घाबरू नये म्हणून तिच्याकडे बघून विलासरावांनी तिला डोळ्याने धीर दिला. अजूनही हे दोघे पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच उभे होते. त्याच वेळी काॅन्स्टेबल कदम आपल्या बाईकने आत शिरले. शिरतांना त्यांचं सहज या दांपत्याकडे लक्ष गेलं. हे दोघंही म्हातारे असून घाबरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. " काका काय झालं? कंप्लेंट लिहायची आहे?" " हो." चाचरत विलासराव म्हणाले. अलका घाबरून काॅन्स्टेबल कदम कडे बघत होत्या.

Full Novel

1

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भाग १सकाळचे साधारण दोन वाजत आले होते.विलासराव मोकादम आणि अलका मोकादम जरा घाबरलेले दिसत कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही अंगाला थरथर सुटली होती. नकळत अलका मोकादमनी आपल्या नव-याचा म्हणजे विलासरावांचा हात पकडला. तेही थरथरतच होते पण आपली बायको अजून घाबरू नये म्हणून तिच्याकडे बघून विलासरावांनी तिला डोळ्याने धीर दिला.अजूनही हे दोघे पोलिस स्टेशनच्या गेटमध्येच उभे होते. त्याच वेळी काॅन्स्टेबल कदम आपल्या बाईकने आत शिरले. शिरतांना त्यांचं सहज या दांपत्याकडे लक्ष गेलं. हे दोघंही म्हातारे असून घाबरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं." काका काय झालं? कंप्लेंट लिहायची आहे?"" हो."चाचरत विलासराव म्हणाले. ...Read More

2

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 2

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा भाग २मागील भागावरून पुढे..अलकाची चाल थकली होती पण मनात मात्र सकाळी झालेलं दोघांमधलं संभाषण ते तिच्यासाठी संजीवनी घुटीसारखं होतं म्हणून ती चालत होती.हळूहळू चालत अलका विलासरावांच्या मागोमाग पोलीस जीपमध्ये बसली. जीपमध्ये हवालदार दाबके पण होते. दाबके या दोघांना अलकाच्या वैद्यकीय तपासणी साठी घेऊन चालले होते.जीप चालू झाली तसं अलकाच्या मनात मनात सकाळचा प्रसंग झरझर एखाद्या चलचित्राप्रमाणे उमटू लागला.****सकाळची वेळ होती. अलकाताई आपल्या वयानुसार हळूहळू कामं आटोपत होत्या. बॅंकेतील काम करण्यासाठी विलासराव नाश्ता करून मघाशीच घरातून बाहेर पडले. विलासरावांना अलकाताई शक्यतो उपाशीपोटी बाहेर जाऊ देत नसत.मागचं थोडं काम आवरताना अलकाला मघाशी घडलेला प्रसंग आठवला आणि ...Read More

3

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 3 (अंतिम )