रात्र खेळीते खेळ

(58)
  • 200.9k
  • 13
  • 102.8k

आई ग...... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला. समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट जंगलच जंगल होत त्याला काहीच आठवेना कि आपण नेमक कोठे आलो आहोत. तो याचा विचार करतच होता कि जंगलातून अनेक श्वापदांचे आवाज येवू लागले. ते ऐकून तर त्याच्या अंगावर सर्रकन काटाच आला.त्याला वाटल आता आपल काही खर नाही आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.

1

रात्र खेळीते खेळ - भाग 1

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी....आई ग...... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरतच जागा झाला. समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट जंगलच जंगल होत त्याला काहीच आठवेना कि आपण नेमक कोठे आलो आहोत. तो याचा विचार करतच होता कि जंगलातून अनेक श्वापदांचे आवाज येवू लागले. ते ऐकून तर त्याच्या अंगावर सर्रकन काटाच आला.त्याला वाटल आता आपल काही खर नाही आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला आज एक एक क्षण घालवण सुद्धा कठीण झाल होत. आणि मुळात त्याला आपण इथे कस आलो हेच आठवत नव्हत. तोपर्यंत त्याला अस जाणवू ...Read More

2

रात्र खेळीते खेळ - भाग 2

रात्र खेळीते खेळ भाग 2ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हातावर जखमाच जखमा झालेल्या. एक पाय तुटलेला हातात घेऊन तो तसाच त्याच्या दिशेने येत होता. अधिराज तर मनातून हालूनच गेला होता. एकिकडूण त्याच्याकडे पाहताच धडकी भरत होती तर दुसरीकडून विचार घोळत होते. अरे हा तर माझ्यासारखाच दिसतो पण हा नेमका आहे तरी कोण. मी तर एकटाच आहे. माझा कोणी भाऊ पण नाही जूळा मग हा आपल्यासारखा कसा काय दिसत आहे. अरे अस काय बघतोयस ...Read More

3

रात्र खेळीते खेळ - भाग 3

रात्र खेळीते खेळ भाग 3 सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच. पण आत आल्यावर वेगळीच अनुभूती यायची. बाहेरून पडक आणि खूपच छोट्स वाटणार ते घर आतून मात्र खूपच भव्य होत. अस वाटायच कि खूपच मोठ्या जागेत ते घर वसल आहे. छताच्या खालची रचना अतुलनीय होती त्यावर हिऱ्यांचा वापर करून केलेले नक्षीकाम होते. व त्या खाली एक फॅन फिरत होता ज्याच झुंबर खूप विशिष्ट पद्धतीने चित्रित केल गेलल त्यावर काही नंबर्स कोरल्यागत दिसत होते व त्यासोबतच काही ...Read More

4

रात्र खेळीते खेळ - भाग 4

रात्र खेळीते खेळ भाग 4टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या उठली. तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जावू लागली. तस आवाज आणखीच जोरात येवू लागला. तस तर आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. सगळ्यांनी झोपताना दिवे मालवले होते. तीचा पाय कशाला तरी आदळला आणि ती खाली पडली व तसच स्वतः हाला सावरत परत उठली. मगाशी वाढत जाणारा आवाज कमी ऐकू येवू लागला तस तिला वाटल आपण बहुतेक चूकीच्या दिशेने चाललोय. आधी आपला मोबाईल शोधूया कमीत कमी ...Read More

5

रात्र खेळीते खेळ - भाग 5

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून जागी येवून झोपली.........खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लागले. राजला त्या वाऱ्यामुळे शहारा येवू लागला. तो अंगावरच पांघरूण वर घेवू लागला. पण तरीही थंडी वाजतच होती. त्याला तो बाहेरून येणारा वारा असह्य होवू लागला. तो खिडकी लावण्यासाठी वरती उठला आणि जागीच खिळला. बाहेरच्या गर्द अंधारातून दोन डोळे त्याच्यावर नजर रोखून होते रागाने लाल झाल्यासारखे ती समोरची व्यक्ती तर दिसत नव्हती पण ते डोळे मात्र चांगलीच भिती भरत होते मनात. राजला पुढे जायच धाडस होईना तरीही ...Read More

6

रात्र खेळीते खेळ - भाग 6

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड्याळात तर सकाळचे दहा वाजलेले ती ने परत टाईम झोन चेक केला. पण टाइम झोन बरोबर भारतातलाच होता. तस तर तीचा मोबाईल न स्वीच आॅफ झालेला आधी न बंद पडलेला मग टाईमींग बदलू कस शकत. क्षणभर तर या विचारात गेली आणि लगेच भानावर आली. व स्वतः शीच म्हणाली असो कावू आता या सगळ्याचा विचार करण्याचा वेळ नाही आधी आपल्याला त्या झुंबराकडे गेल पाहिजे. तिथेच आपल्याला ...Read More

7

रात्र खेळीते खेळ - भाग 7

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला होता त्याच त्यालाच कळेना की आपण नेमक कोठे आलोय आणि आपण इथे आलो तरी कस. तो त्या गुहेला निरखून पाहू लागला त्याला अस वाटल कि कोठे ना कोठे इथून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच असेल पण तो जसजस गुहा निरखून पाहू लागला तस तस मनातून ढासळूच लागला. कारण तो ज्या गुहेत होता त्याला कोणतीच वाट नव्हती ती गुहा पूर्णपणे भिंतींनीच ग्रासलेली होती. पण ...Read More

8

रात्र खेळीते खेळ - भाग 8

अनुश्री काही मार्ग सापडतो का ? हे शोधू लागली. ती पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्री आपण हार कस काय करत आहात.... त्यावर ती स्त्री विचित्र पद्धतीने हसत म्हणाली.. अग हे तिरडीसाठी करत आहे..... आणि हसू लागली.... अनुश्रीला थोड विचित्रच वाटल पण आपल्याला काय करायचे आहे अस म्हणत ती ने तो विषय तिथेच सोडून दिला..... व पुन्हा तिला विचारू लागली इथून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काय? तुम्ही ये जा ...Read More

9

रात्र खेळीते खेळ - भाग 9

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि कोण आहे.. पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण तिलाच माहिती नव्हत... ती तर नेमक आपल्याला या स्त्रीविषयी आपलेपणा का जाणवतोय याचा विचार करत होतीच कि त्या स्त्रीने तीच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणले.... काय ग कसला एवढा विचार करतेस.... तीच्या या प्रश्नाने अनुश्री गोंधळलीच .....न न न नाही कसला नाही... बर मला वाटत तु खूप थकली असणार आतापर्यंत ज्या संकटांना तोंड देवून आलीस त्यामुळे तु आत चल आपण थोड मोकळ होवून बोलू तसही अजून धोका टळला ...Read More

10

रात्र खेळीते खेळ - भाग 10

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तो माणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याची बायको सुद्धा शुद्धीवर होती. बाकिची मुल तिथून कधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून येत होता या सगळ्यांना खाऊ कि गिळू अस झालेल त्यांना.... ती सगळी तर पुरती गोंधळून गेली आता पुढे काय करायच हेच त्यांना कळेना..... मागून पळाव तर त्या माणसाची बायको त्यांना पकडायला जवळ येत होती.. आणि पुढून तो माणूस पुढे पुढे सरकत होता... ते विचारातच हरवले होते....तोवर तो माणूस त्यांच्या जवळ जवळ येवू लागला.. त्याने मागे घेतलेला हात पुढे केला तर त्याच्या हातात एक चाकू दिसत होता ...Read More

11

रात्र खेळीते खेळ - भाग 11

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का झाले ‌.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांनी त्या माणसाच्या बायकोला तर गोळ्या घातल्या तसेच त्या माणसाने स्वतः ला मारून घेतले म्हणून पोलिसांना वाटले की आता काही वाईट करायला कोण उरल नाही सगळे गुन्हेगार संपले. पण त्या माणसाच्या साथीदाराबद्दल कोणालाच काही माहिती नव्हते. फक्त त्या मुलग्याच्या आईला आणि त्या मुलग्याला माहित होत. पण त्या मुलग्याची आई सध्या हयात नव्हती आणि तो मुलगा पण तिथे नव्हता.. त्या माणसाच्या साथीदाराने त्या मुलग्याला एक ...Read More

12

रात्र खेळीते खेळ - भाग 12

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरतो आणि ते पुस्तक शोधण्यासाठी तयार होतो... तो वाडा तो मुलगा गेल्यानंतर पूर्वस्थितीत येतो. त्याला तर ते सगळ अविश्वसनीयच वाटत... पण जास्त विचार न करता तो पुन्हा स्वतः ला सावरतो. त्याला काहीही करून अर्ध्या तासात ते पुस्तक शोधायचे असत नाहीतर त्याच्यासाठी पुस्तक शोधण जास्तच अवघड होवून बसणार होत.. तो वाड्याच निरीक्षण करत करत पुढे जातो. तो सुरूवातीला वाड्यातील वरच्या खोलीत जातो.. पण जस ती खोली ...Read More

13

रात्र खेळीते खेळ - भाग 13

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रकाश गिळूनच टाकला. तो दरबारही रिकामा झालेला. खालची जमीन हादरू लागली. व वीरच्या कानावर एक आवाज येवू लागला. तस त्याच मन जास्तच अस्वस्थ झाले. वीर ये वीर वाचव वाचव मला........... राजचा आवाज त्याच्या कानी येत होता.... तो हळूहळू येणाऱ्या आवाजाचा वेध घेत त्या अंधारात चाचपडत पुढे चालला... तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणखी एक आवाज येवू लागला... वीर वीर इकडे ये ना आधी हा हा माणूस ...Read More

14

रात्र खेळीते खेळ - भाग 14

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार........ वीर म्हणाला.... अरे गप्प शांत हो नाहीतर आपला आवाज त्यांना ऐकू जाईल.... अनूश्री वीरला समजवू लागली.....नाही खोट आहे हे सध्या तर विश्वासच बसत नाही आहे माझा..... वीर म्हणाला.....तेरी मेरी दोस्ती...... अस म्हणत अनूश्रीने वीरच्या तोंडावर हात ठेवला..... व म्हणाली.... शांत हो हे वाक्य पूर्ण नको करू आताच आपल्याला सगळ्यांनाच आधी एकत्र याव लागेल.... जर हे वाक्य त्यांना ऐकू गेल तर एकमेकांना ओळखण नंतर अजूनच ...Read More

15

रात्र खेळीते खेळ - भाग 15

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंतर त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे सरळ पुढच्या दिशेने जावू लागते.. त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे तिला पुढे चालत गेल्यावर खरच त्या भिंतीच्या पलिकडे पाण्याचा आवाज ऐकू येतो. तिला मनोमन खूप आनंद होतो कारण तिथूनच तिला पुढचा मार्ग मिळणार असतो पण तितकच भयाचे भाव पण दाटून येतात. कारण तिथे सगळ्याच गोष्टींपासून धोका असतो.. काही वेळ जावाव कि नको अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते तरीसुद्धा आपल्या मित्रांसाठी आपल्याला गेलच पाहिजे तसही इत राहिलो ...Read More

16

रात्र खेळीते खेळ - भाग 16

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. ती ने त्याला दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त्याशिवाय त्याला त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचणच शक्य होणार नव्हत. आणि जरी तिच्यासोबत तो मित्रांपर्यंत पोहोचला तरी त्याच्या मित्रांसमोर आणखी एक अडचण उभी झाली असती अस त्याला वाटत होत. त्याला त्याच्या मित्रांना अडचणीत आणायच नव्हत. त्याला मनोमन अस वाटत होत आपण इथून बाहेर पडू अगर न पडू पण आपले मित्र सुखरूप बाहेर पोहोचले पाहिजेत. याच विचारातून त्याने एक निर्णय घेतला कि या स्त्रीला आपण आपल्या मित्रांपर्यंत ...Read More

17

रात्र खेळीते खेळ - भाग 17

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी पाठलाग करत आहे. एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो गर्कन मागे वळून बघतो. तस तो ही झटकन हात लांब करत त्याची वाढलेली नख अधिराजच्या मानेत घस्सकन घुसवतो. तस अधिराजच्या मानेतून रक्ताच्या चिळकांड्या आणि किंचाळी दोन्ही पण निघाल... तो थरथरत्या आवाजाने कावू, वीर, अनू, राज अस म्हणतच गतप्राण झाला..... व जोरात किंचाळत राज जागा झाला.... अधी अधी अस म्हणत...... राज बाजूला बघतो तर अंधारच असतो. पण घाबरत घाबरतच म्हणतो हे ... हे..... असल कसल स्वप्न दिसल आज... आपला अधी ...Read More

18

रात्र खेळीते खेळ - भाग 18

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्या स्त्रीला तिथल्या वातावरणात काहीच त्रास होईना. अधिराजच्या डाव्या बाजूला कावेरीच्या रूपात आलेली स्त्री होती तर त्याच्या उजव्या बाजूला थोड्या दुर अंतरावर अंधूकशा प्रकाशात ओढणीत बांधलेली माती जमिनीवर आपटणारी कावेरी अधिराजला दिसली त्याला खूपच आनंद झाला. पण या स्त्रीपासून तिला लांब ठेवण्यासाठी अधिराजने तसच सावरत सावरत दूसरीकडे जावूया आपण म्हणून त्या कावेरीच्या रूपातल्या स्त्रीला दूर दूर नेवू लागला. ती स्त्री सुद्धा त्यासोबतच चाललीच होती तोपर्यंत अधिराजला झालेल्या ...Read More

19

रात्र खेळीते खेळ - भाग 19

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात.. ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आवाज देवू लागतात पण ते आलेले वादळ आणि पावसाचा वाढलेला जोर यातून त्यांचा आवाज कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसतो‌. ते परत हाक मारून एकदा परत जावून बघाव म्हणून मागे वळतात. आणि मोठ्या काळजीत पडतात कावेरीला अधिराज दिसतच नाही कोठे ती खूपच घाबरते अरे अचानक हा अधी कोठे गेला आताच तर आम्ही बोललो... अधिराजही जस मागे वळतो तस त्याला धक्का बसतो त्याला कावेरी दिसतच नाही त्याच्या मनातही ...Read More

20

रात्र खेळीते खेळ - भाग 20

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दुर्गंध येत असतो. तो नाक दाबत दाबत नेमक तिथे काय आहे हे बघायला जात असतो. तो जस जस त्या दिशेने जात असतो तस त्याला ढवळून आल्यासारख होत असत. तरीही तो तसाच पुढे जातो.. पुढे गेल्यानंतर त्याच्या पायाला काहितरी लागत म्हणून तो खाली वाकून बघतो तर तिथे अनूश्रीच प्रेत पडलेल असत. ते पाहून त्याला तर घेरीच येते.. कावेरी आणि अधिराज हालवून हालवून अनूला उठवण्याचा प्रयत्न करत असतात.. थोड्या वेळानंतर ...Read More

21

रात्र खेळीते खेळ - भाग 21

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तरीही ते एकमेकांकडे बघत एकमेकांना धीर देतात. आणि इशारा करत अधिराज अनुश्रीला खुणावतो. अनुश्री लागलेल्या जख्मेवरची पट्टी काढते तस त्यातल्या जख्मेवरची खपली दिसते. त्या प्रेतांना ते पाहून भलताच आनंद होतो. तिथे असणारी सगळीच प्रेत अनुश्रीच्या दिशेने येवू लागतात ते पाहून अधिराज कावेरीला खुणावतो ती तशीच त्या पुस्तकाकडे वळते आणि अधिराज त्या शस्त्राकडे जावू लागतो अनुश्री जोरात वेगाने पळत असते. ती पळत पळत तिथून बाहेर पडते. ती प्रेतही तिच्या ...Read More